Vyavsayik Prashikshan Yojana 2024 | युवकांना व्यावसायिक प्रशिक्षण योजना |
Vyavsayik Prashikshan Yojana 2024 |
नमस्कार मित्रानो, महाराष्ट्र शासनाकडून राज्यात वेगवेगळ्या योजनांची अंमलबजावणी होत असते. या योजना समाजातील जनतेसाठी कल्याणकारी असतात. राज्यातील प्रत्येक घटकांसाठी योजनांची अंमलबजावणी केली जाते. त्यामध्ये महिला, बालके, विद्यार्थी, अपंग, ज्येष्ठ नागरिक, शेतकरी, बांधकाम कामगार, अनुसूचित जाती जमाती आणि कष्टकरी मागासवर्गीय सर्वांचा समावेश केलेला असतो.
प्रत्येक घटकाला अनुदान स्वरूपात आर्थिक सहाय्य करून त्यांचे जीवनमान उंचावण्याचा प्रयत्न, या योजनेच्या माध्यमातून होत असतो. त्यांचे आर्थिक स्थिती सुधारावी व त्यांचा विकास व्हावा, या उद्देशाने योजना सुरू केलेले आहेत
राज्यात शिक्षणाच्या संधी मोठ्या प्रमाणात उपलब्ध झालेल्या आहेत. त्यामुळे राज्यात सुशिक्षित बेरोजगारांचे प्रमाण वाढत चाललेले आहेत. अनेक तरुण नोकरीच्या शोधात आहेत. त्याच प्रमाणात नोकरीच्या संधी कमी होत आहेत. मोठ्या कंपन्यांमध्ये मनुष्यबळाची जागा आता तंत्रज्ञानाने घेतली आहे. त्यामुळे बेरोजगारीचे प्रमाण वाढत आहे.
या सर्व गोष्टीचा विचार करून राज्य सरकारने या तरुणांनी नोकरीच्या मागे न भटकतात स्वतःचा स्वयंरोजगार करावा. यासाठी एका नवीन योजनेची सुरुवात केली आहे. ती योजना म्हणजे ” व्यवसायिक प्रशिक्षण योजना “ होय. या योजनेच्या माध्यमातून विविध स्वयंरोजगाराचे प्रशिक्षण या तरुण वर्गांना देण्यात येते.
राज्यातील तरुण-तरुणींनी नोकरीच्या मागे न धावता स्वतःचा एखादा स्वयंरोजगार उभा करून रोजगाराच्या संधी उपलब्ध कराव्यात, यासाठी या योजनेची सुरुवात करण्यात आली. तसेच या उद्देशाने या योजनेची सुरुवात करण्यात आली. या योजनेअंतर्गत स्वयंरोजगार निर्मितीसाठी वैयक्तिक दहा हजार रुपये अनुदान दिले जाते. तसेच व्यावसायि कीट देखील या तरुण-तरुणी यांना दिले जाते.
या प्रशिक्षण कार्यक्रमाने स्वयंरोजगार सुरू झाल्यास बेरोजगारीचे प्रमाण कमी होऊन, अनेक तरुण-तरुणी स्वतःच्या पायावर उभे राहतील. तसेच इतरांनाही रोजगार देऊ शकतील, हा विश्वास निर्माण करण्याचे काम या प्रशिक्षण योजनांद्वारे केली जात आहे.
Vyavsayik Prashikshan Yojana 2024 | वाचकांना नम्र विनंती |
मित्रांनो, राज्य शासनाच्या विविध योजनांची माहिती आपण रोजच घेत असतो. त्या सर्व योजना या कल्याणकारी असतात. त्याचा फायदाही आपण आपल्या रोजच्या जीवनात घेत असतो. त्याचप्रमाणे आज आपण शासनाच्या एका नवीन योजनेची म्हणजेच व्यावसायिक प्रशिक्षण योजनेची माहिती घेणार आहोत.यासाठी तुम्ही आमचा लेख शेवटपर्यंत वाचा.
तसेच तुमच्या परिवारात किंवा आसपासच्या परिसरात जे कोणी सुशिक्षित बेरोजगार तरुण आहेत. जे नोकरीच्या शोधार्थ वर्षानुवर्ष आपला वेळ वाया घालवत आहेत. त्यांना या प्रशिक्षण योजनेची माहिती सांगा. तसेच या लोकांपर्यंत आमचा हा लेख जास्तीत जास्त शेअर करा. त्यामुळे त्यांना योजनेचा फायदा घेता येईल व स्वतःचा उदरनिर्वाह करण्यासाठी स्वतंत्र होता येईल, ही विनंती.
Vyavsayik Prashikshan Yojana 2024 |
योजनेचे नाव | युवकांना व्यावसायिक प्रशिक्षण योजना |
योजनेची सुरुवात | महाराष्ट्र राज्य |
लाभार्थी | राज्यातील सुशिक्षित बेरोजगार तरुण |
लाभ | 10,000/- रुपये आर्थिक सहाय्य |
उद्देश | तरुणांना स्वयं रोजगार करण्यास प्रोत्साहन देणे |
अर्ज करण्याची पध्दत | ऑनलाईन / ऑफलाईन |
हे देखील वाचा –
विधवा पेन्शन योजना 2024 | Good News | Vidhwa Pension Yojana Maharashtra | ऑनलाईन अर्ज सुरु |
डीझेल पंप सब्सिडी योजना महाराष्ट्र 2024 | नोंदणी सुरु | Good News | Diesel Pump Subsidy Yojana |
आम आदमी बीमा योजना 2024 | Good News | Aam Aadmi Bima Yojana Maharashtra | पात्रता, नोंदणी व फायदे |
शैक्षणिक कर्ज योजना मराठी महाराष्ट्र | Good News | Education Loan In Maharashtra 2024 | नोंदणी सुरु |
Vyavsayik Prashikshan Yojana 2024 | युवकांनासाठीच्या व्यावसायिक प्रशिक्षण योजनेची उद्दिष्ट्ये |
- महाराष्ट्र राज्यातील सुशिक्षित बेरोजगार तरुण-तरुणींना स्वयंरोजगार सुरू करता यावा, या उद्देशाने या प्रशिक्षण योजनेची सुरुवात करण्यात आली.
- या व्यावसायिक प्रशिक्षण योजनेअंतर्गत व्यावसायिक कौशल्य या तरुण पिढीच्या अंगी निर्माण करणे, हा या योजनेचा उद्देश आहे.
- राज्यातील तरुण-तरुणींनी नोकरीच्या मागे न लागता व्यावसायिक क्षेत्रात आपला ठसा उमटवावा, या उद्देशाने ही योजना सुरू झाली.
- व्यावसायिक प्रशिक्षण योजनेच्या माध्यमातून तरुण-तरुणींचा सामाजिक व आर्थिक विकास करणे.
- प्रशिक्षण योजनेच्या माध्यमातून तरुणांच्या जीवनमानाचा दर्जा उंचावणे.
- या तरुणांना स्वयरोजगार सुरू करण्यासाठी कोणाकडूनही कर्ज घेण्याची गरज पडू नये, तसेच कोणावरही अवलंबून राहता कामा नये, या उद्देशाने या योजनेची सुरुवात झाली.
- व्यावसायिक प्रशिक्षण योजनेच्या माध्यमातून राज्यातील तरुणांना स्वतंत्र व आत्मनिर्भर बनवणे.
- या योजनेच्या माध्यमातून राज्यातील तरुण स्वतंत्रपणे स्वतःच्या पायावर सक्षम उभे राहतील.
- या योजनेच्या माध्यमातून राज्यातील बेरोजगारीचे प्रमाण कमी करून रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध करणे.
युवकांनासाठीच्या व्यावसायिक प्रशिक्षण योजनेची वैशिष्ट्ये |
- राज्यातील युवकांना स्वतःचा स्वयंरोजगार सुरू करता यावा, यासाठी आर्थिक सहाय्य करण्यासाठी या योजनेची सुरुवात करण्यात आली.
- या योजनेअंतर्गत अर्ज करण्याची पद्धत अत्यंत सोपी ठेवण्यात आली आहे. त्यामुळे अर्जदाराच्या वेळेची व पैशाची बचत होणार आहे.
- या योजनेतील अर्जदार घरी बसून मोबाईलवर आपल्या अर्जाची स्थिती पाहू शकतो.
- दहा हजार रुपयांची आर्थिक सहाय्य या व्यावसायिक प्रशिक्षण योजनेअंतर्गत या तरुणांना केले जाते.
- व्यावसायिक प्रशिक्षण योजनेअंतर्गत दिली जाणारी आर्थिक लाभाची रक्कम थेट DBT मार्फत अर्जदाराच्या खात्यात जमा केली जाते.
Vyavsayik Prashikshan Yojana 2024 | व्यावसायिक प्रशिक्षण योजनेअंतर्गत दिले जाणारे आर्थिक सहाय्य |
तरुणांना व्यावसायिक प्रशिक्षण योजनेअंतर्गत महाराष्ट्र शासनाकडून स्वतःचा एखादा लघुउद्योग किंवा स्वयंरोजगार व्यवसाय सुरू करण्यासाठी दहा हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य दिले जाते.
Vyavsayik Prashikshan Yojana 2024 | व्यावसायिक प्रशिक्षण योजनेची लाभार्थी |
व्यवसायिक प्रशिक्षण योजने अंतर्गत महाराष्ट्र राज्यातील सर्व सुशिक्षित बेरोजगार तरुण-तरुणी लाभार्थी आहेत.
युवकांनासाठीच्या व्यावसायिक प्रशिक्षण योजनेचे फायदे |
- महाराष्ट्र राज्यातील तरुणांना व्यावसायिक प्रशिक्षण योजनेअंतर्गत विविध व्यवसायांचे प्रशिक्षण दिले जाते.
- या योजनेअंतर्गत व्यावसायिक प्रशिक्षणाबरोबर स्वयं रोजगार सुरू करण्यासाठी दहा हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य केले जाते.
- व्यावसायिक प्रशिक्षण कार्यक्रमात सहभाग होण्यासाठी अर्जदाराचे वय 18 ते 45 या दरम्यान असावे.
- व्यावसायिक प्रशिक्षण योजनेच्या माध्यमातून तरुणांचा जीवनमानाचा दर्जा उंचावून त्यांना स्वतःच्या पायावर उभे करणे.
- प्रशिक्षण योजनेच्या माध्यमातून स्वतःचा स्वयंरोजगार सुरू करून तरुणांना स्वतंत्र व आत्मनिर्भर बनवणे.
- या योजनेतून बेरोजगारीचे प्रमाण कमी करणे व राज्यात नवीन रोजगाराच्या संधी उपलब्ध करणे.
- व्यावसायिक प्रशिक्षण योजनेअंतर्गत प्रशिक्षण घेण्यासाठी या योजनेच्या माध्यमातून तरुणांना मासिक बस पास मोफत दिला जातो मोफत दिला जातो.
- राज्यातील तरुणांचा आर्थिक व सामाजिक विकास करणे.
- या योजनेअंतर्गत तरुणांना आर्थिक सहाय्य केल्याने पैशासाठी कोणावरही अवलंबून राहण्याची गरज पडत नाही, तसेच कोणाकडून कर्जही काढावे लागत नाही.
Vyavsayik Prashikshan Yojana 2024 | व्यावसायिक प्रशिक्षण योजनेसाठी आवश्यक पात्रता |
- व्यवसायिक प्रशिक्षण योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार महाराष्ट्र राज्याचा मूळ रहिवासी असावा.
- हा अर्जदार कमीत कमी बारावी उत्तीर्ण असावा.
Vyavsayik Prashikshan Yojana 2024 | व्यावसायिक प्रशिक्षण योजनेसाठी नियम व आटी |
- व्यावसायिक प्रशिक्षण योजनेसाठी अर्ज करणारा अर्जदार कमीत कमी तीन वर्षे पुणे महानगरपालिका हद्दीत रहिवासी असणे आवश्यक आहे.
- या प्रशिक्षण योजनेचा अर्जदार हा मागासवर्ग प्रवर्गातील किंवा अपंग असणे आवश्यक आहे.
- व्यावसायिक प्रशिक्षण योजनेअंतर्गत अर्जदाराला एका विषयाचे प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर इतराने एक विषयांची पूरक प्रशिक्षण करता येईल.
- प्रशिक्षणासाठी प्रशिक्षणार्थीला आवश्यक ती अनामत रक्कम भरावी लागेल जर प्रशिक्षणार्थी अनुत्तीर्ण झाल्यास तसेच अर्धवट प्रशिक्षण सोडल्यास ती रक्कम परत केली जाणार नाही.
- व्यावसायिक प्रशिक्षण योजनेत प्रवेश मिळूनही प्रशिक्षण योजनेत अर्जदाराने सहभाग न नोंदवल्यास अनामत रक्कम जप्त करण्याचा अधिकार महानगरपालिकेला आहे.
- या योजनेचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्याचे वार्षिक उत्पन्न एक लाखापेक्षा जास्त असू नये.
- प्रशिक्षण विषयाचे प्रशिक्षण घेण्यासाठी आवश्यक असलेले शैक्षणिक अहर्ता लाभार्थ्याकडे असणे गरजेचे आहे.
- प्रशिक्षण योजनेच्या नियम व अटींमध्ये बदल करण्याचा अधिकार माननीय सचिव, मुख्याधिकारी यांना आहे.
- या योजनेअंतर्गत स्कॅन डॉक्युमेंट संलग्न करणे गरजेचे आहे.
Vyavsayik Prashikshan Yojana 2024 | व्यावसायिक प्रशिक्षण योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे |
- अर्जदाराचे कुटुंब मागील तीन वर्षापासून पुणे महानगरपालिका हद्दीत रहिवाशी असल्याचे पुरावा म्हणून भाडे बिल, टॅक्स पावती किंवा रहिवासी दाखला असणे आवश्यक आहे.
- आपत्य पडताळणीसाठी रेशनिंग कार्ड ची सत्यप्रत जोडणी आवश्यक आहे.
- वयाचा पुरावा देण्यासाठी शाळेचा दाखला, जन्माचा दाखला किंवा बोनाफाईड जोडणे आवश्यक आहे.
- व्यावसायिक प्रशिक्षण योजनेसाठी अर्जदार अपंग असल्यास अपंगत्वाचा दाखला जोडा.
- अर्जदार हा मागासवर्गीय प्रवर्गातील असल्यास जात प्रमाणपत्र जोडावे.
- अर्जदाराने शैक्षणिक अहर्ता प्राप्त केल्याचे प्रमाणपत्र जोडावे.
- तसेच अर्जदार हा शेवटची परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे गुणपत्रक जोडणे आवश्यक आहे.
- उत्पन्नाची माहिती मिळण्याकरता उत्पन्नाचा दाखला जोडावा.
- मोबाईल नंबर
- बँक पासबुक
- पासपोर्ट साईझ फोटो
- इमेईल आयडी
युवकांना व्यावसायिक प्रशिक्षण योजने अंतर्गत अर्ज रद्द होण्याची करणे |
- व्यावसायिक प्रशिक्षण योजनेच्या अर्जदाराने अर्ज त खोटी माहिती लिहिली असेल, तर त्या अर्जदाराचा अर्ज रद्द केला जातो.
- अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा मूळ रहिवाशी नसल्यास त्याचा अर्ज रद्द होतो.
- अर्जदाराने यापूर्वी केंद्र व राज्य शासनाच्या एखाद्या योजनेअंतर्गत प्रशिक्षण कार्यक्रमात सहभाग घेतलेला असल्यास त्या अर्जदाराचा अर्ज रद्द होतो.
- व्यावसायिक प्रशिक्षण योजनेचा अर्जदार हा विशिष्ट शैक्षणिक अहर्ता प्राप्त केलेला नसेल, तर त्याचा अर्ज रद्द केला जातो.
Vyavsayik Prashikshan Yojana 2024 | ऑनलाईन अर्ज करण्याची पध्दत |
- प्रथम आपणाला शासनाच्या अधिकृत website वर जावे लागेल.
- website वर गेल्यावर नवीन नोंदणीवर Click करावे.
- त्यानंतर username व password टाकून Login करावे.
- आता आपल्यासमोर अर्ज Open होईल त्यामध्ये आवश्यक ती सर्व माहिती भरावे.
- त्या अर्जासोबत आवश्यक डॉक्युमेंट च्या सर्व सत्यप्रत Apload करावेत.
- सर्व भरून झाल्यानंतर अर्ज Submit करावा.
- अशाप्रकारे आपले व्यवसायिक प्रशिक्षण योजनेमध्ये ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत पूर्ण होईल.
युवकांना विविध व्यावसायी प्रशिक्षण योजनेमध्ये ऑफलाईन अर्ज करण्याची पध्दत |
- प्रभाग पातळीवरील समूह संघटकांचे कार्यालय
- आपल्या क्षेत्रातील क्षेत्रीय कार्यालय
- समाज विकास कार्यालय पुणे
- यापैकी एका ठिकाणी जाऊन व्यावसायिक प्रशिक्षण या योजनेचा अर्ज घ्यावा.
- अर्जामध्ये विचारलेली सर्व माहिती अचूक व योग्य भरावे.
- या अर्जासोबत सर्व कागदपत्रांच्या सत्यप्रत जोडाव्यात.
- तो अर्ज कार्यालयामध्ये जमा करावा.
- त्या अर्जाची पोच पावती घ्यावी.
- अशाप्रकारे व्यवसाय प्रशिक्षण योजनेमध्ये आपली ऑफलाइन अर्ज करण्याची प्रोसेस पूर्ण होईल.
Vyavsayik Prashikshan Yojana 2024 |
युवकांना विविध व्यावसायिक प्रशिक्षण योजना अधिकृत website Click Here