कन्यादान योजना महाराष्ट्र | Good News |Kanyadan Yojana Maharashtra 2024 | मुलीच्या लग्नाची चिंता सोडा | सरकार देत आहे मदत |

Table of Contents

Kanyadan Yojana Maharashtra 2024 | कन्यादान योजना महाराष्ट्र मराठी |

kanyadan Yojana Maharashtra
Kanyadan Yojana 2024
Kanyadan Yojana marathi
mukhyamantri kanyadan yojana
maharashtra shasan yojana

 

Kanyadan Yojana Maharashtra 2024 |

नमस्कार मित्रानो, महाराष्ट्र शासनामार्फत राज्यात वेगवेगळ्या योजनांचे अंमलबजावणी केली जाते . या योजना कल्याणकारी व जनहिताच्या असतात. या योजना अनुदान स्वरूपात राबवल्या जातात. या योजनेच्या माध्यमातून समाजातील आर्थिक, मागास, दुर्बल घटकातील लोकांच्या हिताचाच विचार केला जातो.
शेतकऱ्यांसाठी कृषी ड्रोन योजना, मल्चिंग पेपर योजना तसेच महिलांसाठी बचत गट योजना, महिला सन्मानधान योजना, ज्येष्ठ नागरिकांसाठी वयोश्री योजना मुलींसाठी सुकन्या समृद्धी योजना व किशोरी शक्ती योजना, मजुरांसाठी बांधकाम कामगार योजना अशा विविध योजनांची अंमलबजावणी केली जाते. या योजना राज्यात राबवल्या जातात.
त्याचप्रमाणे राज्यातील अनुसूचित जाती, विमुक्त जमाती, भटक्या जाती तसेच आर्थिक दृष्ट्या मागास प्रवर्गातील, गरीब कुटुंबातील मुलींच्या विवाह साठी राज्य शासनामार्फत एका योजनेची अंमलबजावणी केली जाते. त्या योजनेचे नाव आहे ” कन्यादान योजना महाराष्ट्र “ होय.
महाराष्ट्र राज्यात राबवले जाणारे कन्यादान योजनाही सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत राज्यात राबवली जाते. योजनेच्या माध्यमातून अनुसूचित जाती – जमाती प्रवर्गातील तसेच भटक्या जाती, विमुक्त जमाती प्रवर्गातील मुलींच्या लग्नासाठी राज्य शासनाकडून 25 हजार रुपयांच्या आर्थिक मदत दिली जाते.
या आर्थिक सह्यातून मुलींच्या नवविवाहासाठी लागणारे खर्च करण्यास मदत होते. मुलीच्या लग्नादरम्यान कुटुंबांना आर्थिक समस्यांचा सामना करावा लागू नये. तसेच लग्नात केले जाणारे औपचारिक खर्च म्हणजेच विधी, कपडे, भांडी इत्यादी वस्तू खरेदी करण्यासाठी या योजनेची सुरुवात करण्यात आली.
कन्यादान योजनेअंतर्गत आर्थिक दृष्ट्या मागास, दुर्बल घटकातील, कुटुंबातील मुलींना लग्नासाठी देण्यात येणारी मदत ती पूर्वी दहा हजार होती. त्यावरून वाढवून ती 25 हजार रुपये करण्यात आली आहे. त्यामुळे या समाजातील मुलींचे लग्न करताना कुटुंबांना मुली या भार वाटू नये हा या योजनेचा उद्देश आहे.

Kanyadan Yojana Maharashtra 2024 | वाचकांना नम्र विनंती |

मित्रांनो, राज्य शासनामार्फत राज्यातील प्रत्येक घटकासाठी राबवण्यात येणाऱ्या कल्याणकारी योजनांची आपण माहिती यापूर्वी घेतलीच आहे. त्याचप्रमाणे आज आपण एका नवीन योजनेची माहिती घेणार आहोत. ती योजना म्हणजे राज्यातील आर्थिक, मागास घटकातील, गरीब कुटुंबातील मुलींच्या लग्नासाठी आर्थिक सहाय्य करण्याच्या उद्देशाने शासनामार्फत सुरू केलेल्या कन्यादान योजना महाराष्ट्र या योजनेची माहिती पाहणार आहोत. त्यासाठी तुम्ही हा लेख शेवटपर्यंत वाचा.

तसेच तुमच्या परिसरात कोणी मागास प्रवर्गातील, आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबातील मुलीच्या लग्न करण्यास असमर्थ असणारे पालक असतील तर त्यांना या योजनेची माहिती सांगा. तसेच अशा लोकांपर्यंत हा लेख जास्तीत जास्त शेअर करा. त्यामुळे त्यांना आपल्या मुलीचे लग्न करताना कोणतीही अडचणी भेडसावणार नाही, ही विनंती.

योजनेची नाव कन्यादान योजना महाराष्ट्र 
योजनेची सुरुवातमहाराष्ट्र शासन
लाभार्थीअनुसूचित, मागास प्रवर्गातील नवविवाहित मुली
लाभ25,000/- रुपयाचे आर्थक सहाय्य
उद्देशलग्नासाठी आर्थिक सहाय्य करणे
अर्ज करण्याची पध्दतसामुहिक विवाह करणाऱ्या स्वयंसेवी संस्था, संघटना

 

हे देखील वाचा –

                             युवकांना व्यावसायिक प्रशिक्षण योजना महाराष्ट्र | Good News | Vyavsayik Prashikshan Yojana 2024 | नोंदणी सुरु |

                            विधवा पेन्शन योजना 2024 | Good News | Vidhwa Pension Yojana Maharashtra | ऑनलाईन अर्ज सुरु |

                            डीझेल पंप सब्सिडी योजना महाराष्ट्र 2024 | नोंदणी सुरु | Good News | Diesel Pump Subsidy Yojana |

                           शैक्षणिक कर्ज योजना मराठी महाराष्ट्र | Good News | Education Loan In Maharashtra 2024 | नोंदणी सुरु |

Kanyadan Yojana Maharashtra 2024 | कन्यादान योजना महाराष्ट्र ची उद्दिष्ट्ये |

  •  राज्यातील अनुसूचित जाती – जमाती, भटक्या जाती, विमुक्त जमाती तसेच आर्थिक दृष्ट्या मागास दुर्बल घटकातील, कुटुंबातील मुलीच्या लग्नासाठी आर्थिक सहाय्यक करण्याच्या उद्देशाने कन्यादान योजनेची सुरुवात करण्यात आली.
  • या योजनेच्या माध्यमातून या समाजातील लोकांना सामूहिक विवाह सोहळा सहभागी व्हावे या उद्देशाने ह्या योजनेची सुरुवात झाली.
  • या योजनेमुळे समाजात लग्नात होणाऱ्या अनाठायी खर्चावर निर्बंध घातले जाऊ शकतात.
  • तसेच या योजनेमुळे समाजमध्ये त्याच्या परंपरेत या लोकांचे विवाह पार पाडले जाऊ शकतात.
  • कन्यादान योजना महाराष्ट्र यामुळे या समाजात असणाऱ्या मुलींचा वाटणारा बोजा / भर कमी करण्यासाठी मदत होणार आहे.
  • या समाजात मुलींकडे बघण्याचा दृष्टिकोन या योजनेमुळे बदलता येणार आहे.

 

Kanyadan Yojana Maharashtra 2024 | कन्यादान योजना महाराष्ट्रची वैशिष्ट्ये |

  • राज्यातील मागास प्रवर्गातील तरुण-तरुणींना सामूहिक विवाह सोहळ्यात विवाह करण्यासाठी 20,000/-  रुपयांची आर्थिक मदत देण्यात येते.
  • समाजात वैयक्तिक विवाहांवर होणार अवाढव्य खर्च कमी करून, सामायिक विवाह सोहळयास प्रोत्साहन देणे ,हे योजनेचे प्रमुख वैशिष्ट्य आहे.
  • कन्यादान योजनेच्या माध्यामातून या विवाह सामाजिक मान्यता मिळवून देणे.
  • पूर्वी या योजनेअंतर्गत दहा हजार रुपयांच्या आर्थिक सहाय्य देण्यात येत होते. त्यामध्ये 6000 रुपयांचे मंगळसूत्र व चार हजार रुपयांचे घरगुती साहित्य दिले जात होते.
  • या योजनेच्या माध्यमातून सामायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करणारया संस्था व संघटनांना प्रोत्साहनपार अनुदान म्हणून चार हजार रुपयांची आर्थिक  मदत दिली जाते.
  • कन्यादान योजनेअंतर्गत आर्थिक सहाय्याचा दिला जाणारा धनादेश हा मुलीच्या लग्नानंतर मुलीच्या पालकांच्या नावे दिला जातो.

Kanyadan Yojana Maharashtra 2024 | कन्यादान योजना महाराष्ट्राचे फायदे |

  1. महाराष्ट्र राज्यात कन्यादान योजना अंतर्गत अनुसूचित जाती, भटक्या जाती, मुक्त जमाती, विशेष मागास प्रवर्गातील नव्या जोडप्यांना तसेच पालकांना वीस हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य दिले जाते.
  2. तसेच या योजने अंतर्गत सामायिक विवाह सोहळ्याच्या आयोजन करणारे सोयीसेवी संस्था, संघटना यांना प्रतिजोडप्यामागे चार हजार रुपयांचे अनुदान शासनामार्फत देण्यात येते.
  3. कन्यादान योजनेमार्फत विवाह केल्यास विवाहासाठी होणारा पालकांचा अनाठायी खर्च कमी होण्यास मदत होते.
  4. या योजनेमुळे नवविवाहित जोडप्यांचा सामाजिक व आर्थिक विकास होतो.
  5. या योजनेअंतर्गत विवाह केल्यास या मागास प्रवर्गातील जोडप्यांना विवाहासाठी समाज मान्यता मिळते.
  6. मुलीच्या पालकांना मुलीच्या विवाह साठी कोणाकडून कर्ज घ्यावे लागत नाही.
  7. तसेच मुलीच्या लग्नासाठी पालकांना कोणावर अवलंबून राहण्याची या योजनेमुळे गरज पडणार नाही.
  8. या योजनेमुळे कुटुंबातील लोक मुलींना बोज समजणार नाहीत, त्यामुळे समाजाचा मुलींकडे बघण्याचा दृष्टिकोन बदले.

 

Kanyadan Yojana Maharashtra 2024 | कन्यादान योजना महाराष्ट्रासाठी आवश्यक पात्रता |

  • या योजनेचा लाभ घेणारे वर वधू महाराष्ट्र राज्याचे मूळ रहिवासी असावेत.
  • या योजनेतील वराचे वय 21 वर्ष, व वधूचे वय 18 वर्षापेक्षा कमी असू नये किंवा पूर्ण केलेले असावे.
  • या योजनेचा लाभ घेण्यासाठी वर वधू यापैकी एक जण किंवा दोघेही मागास प्रवर्गातील असणे आवश्यक आहे.
  • या कन्यादान अनुदान योजनेअंतर्गत दिले जाणाऱ्या लाभा वधू-वरांच्या प्रथम विवाहसच दिला जाईल.
  • सामूहिक विवाह सोहळा अंतर्गत कमीत कमी दहा जोडप्यांचा विवाह पार पडणे गरजेचे आहे, तरच या योजनेचा लाभ मिळेल.
  • या योजनेचा लाभ घेणाऱ्या अर्जदार  वर किंवा वधु पैकी कोणीही सदस्य सरकारी कर्मचारी नसावेत.
  • या योजनेचा लाभ घेण्यासाठी या नवदांपत्याकडून बालविवाह प्रतिबंध कायदा व हुंडा प्रतिबंध कायद्याचा कोणताही उल्लंघन न  केल्याचे प्रतिज्ञापत्र सादर करणे गरजेचे आहे.

 

Kanyadan Yojana Maharashtra 2024 | कन्यादान योजना महाराष्ट्र आवश्यक कागदपत्रे |

  1. विहित नमुन्यातील अर्ज
  2. वर वधूचे ओळखपत्र
  3. रहिवशी प्रमाणपत्र
  4. मागास प्रवर्गातील असल्याचे जात प्रमाणपत्र
  5. विवाह नोंदणी प्रमाणपत्र
  6. विधवेच्या बाबतीत पतीच्या मृत्यूचे प्रमाणपत्र
  7. उत्पन्नाचा दाखला
  8. रेशन कार्ड
  9. बँक पासबुक
  10. मोबाईल नंबर
  11. वयाच्या पुराव्यासाठी जन्माचा दाखला किंवा शाळेचा दाखला

 

Kanyadan Yojana Maharashtra 2024 | कन्यादान योजने अंतर्गत अर्ज रद्द होण्याची कारणे |

  • कन्यादान योजनेचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यापैकी म्हणजे वर किंवा वधूचे वय कमी असेल तर अर्ज रद्द केला जातो.
  • वर किंवा वधू यापैकी कोणीही मागास प्रवर्गातील नसल्यास या योजनेचा लाभ दिला जात नाही.
  • या योजनेचा लाभ घेणाऱ्या अर्जदारा वर किंवा वधू पैकी दोघेही महाराष्ट्र राज्याचे मूळ रहिवाशी नसल्यास अर्ज रद्द केला जातो.
  • यापैकी वर किंवा वधू कोणीही जर सरकारी नोकरीत कार्यरत असेल तर त्या या योजनेचा लाभ दिला जात नाही.

 

Kanyadan Yojana Maharashtra 2024 | कन्यादान योजनेसाठी ऑफलाईन अर्ज करण्याची पध्दत |

  1. कन्यादान योजनेचा लाभ घेण्यासाठी राज्यातील स्वयंसेवी संस्थेने समाज कल्याण सहाय्यक आयुक्तांकडे अर्ज करणे, गरजेचे आहे.
  2. अर्जामध्ये सबंधित सर्व माहिती व आवश्यक कागदपत्रे असावीत.
  3. त्यानंतर कन्यादान योजने अंतर्गत सामुहिक विवाह सोहळ्यामध्ये सहभाग नोंदवाव.
  4. त्यांच्या मार्फत अनुदानासाठी प्रस्ताव पाठवला जातो.

 

Kanyadan Yojana Maharashtra 2024 | कन्यादान योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची पध्दत |

  • तुम्हाला या योजनेचा अर्ज करण्यासाठी सामाजिक न्याय विभागाच्या अधिकृत website वर अर्ज करावा लागेल.
  • त्यानंतर मुख्यमंत्री कन्यादान योजनेशी सबंधित आधी सूचना देण्यात आली आहे, ती download करून वाचावी लागेल.
  • sso पोर्टलवर जावून तुमचा आय डी login करावा लागेल.
  • त्यानंतर सामाजिक न्याय विभागाच्या मुख्यमंत्री कन्यादान योजनेवर click करावे लागेल.
  • आता तुम्हाला नवीन वापर करता म्हणून नोंदणी करावी लागेल.
  • अर्जामध्ये विचारलेली सर्व माहिती योग्यरीत्या भरावी.
  • नंतर अर्ज submit करून अर्जाची प्रिंट आउट घ्या.

 

Kanyadan Yojana Maharashtra 2024 |

महाराष्ट्र शासन कन्यादान योजना अधिकृत website click here 

2 thoughts on “कन्यादान योजना महाराष्ट्र | Good News |Kanyadan Yojana Maharashtra 2024 | मुलीच्या लग्नाची चिंता सोडा | सरकार देत आहे मदत |”

Leave a Comment