Aam Aadmi Bima Yojana Maharashtra | आम आदमी बीमा योजना 2024 |
Aam Aadmi Bima Yojana Maharashtra |
नमस्कार मित्रानो, राज्य सरकारकडून जनतेच्या आरोग्यासाठी वेगवेगळ्या योजना राबवल्या जात असतात. या योजनांची अंमलबजावणी केंद्र व राज्य शासनामार्फत केली जाते. राज्यातील जनतेचे आरोग्य जोपासण्याच्या उद्देशाने या योजनांची सुरुवात शासनामार्फत केली जाते.
आपल्या देशात आर्थिक दृष्ट्या मागास समाज तसे अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातील लोकांचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे या लोकांमध्ये सुशिक्षित पणाचा अभाव आहे. त्यामुळे हे लोक आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे त्यांना कोणत्या ना कोणत्या आजाराने त्रस्त असतात. त्याचा या लोकांच्या जीवनमानावर परिणाम होत असतो.
या सर्व गोष्टींचा विचार करून महाराष्ट्र शासनामार्फत राज्यातील आर्थिक दृष्ट्या मागास प्रवर्गातील तसेच अनुसूचित जाती जमातीतील लोकांसाठी ” आम आदमी विमा योजना “ या योजनेची सुरुवात केली. गरीब व कमी उत्पन असेलेल्या कुटुंबासाठी एक सामाजिक सुरक्षा योजना आहे. हि योजना अचानक उद्भवलेल्या दुर्दैवी परस्ठीतीला तोंड देण्यासाठी आर्थिक सहाय्य पुरवते.
या योजनेच्या माध्यमातून सामान्य व्यक्तीचा मृत्यू झाल्यास किंवा कायमचे अपंगत्व आल्यास आर्थिक साह्य दिले जाते. ही योजना ग्रामीण भागातील सामान्य जनतेसाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. तसेच भूमिहीन कुटुंबप्रमुखाला विम्याचे संरक्षण देणारी ठरणार आहे. तसेच शिक्षण घेणाऱ्या विध्यार्थ्यांना दरमहा शिशुवृती देणारी फायद्याची व महत्वाची योजना आहे.
महाराष्ट्र शासनामार्फत राबवली जाणारी आम आदमी विमा योजना ही केंद्रशासन पुरस्कृत एक महत्त्वपूर्ण योजना आहे. राज्य शासनाने 2 ऑक्टोबर 2007 रोजी या योजनेची सुरुवात केली. हि भारतीय आयुर्विमा महामंडळ ( LIC ) द्वारे राबवली जाणारी सामाजिक सुरक्षा योजना आहे.
सामान्य लोकांसाठी विमा काढणे अत्यंत गरजेचे आहे. मात्र विमा काढण्यासाठी रकमेची गरज असते. ती रक्कम या लोकांकडे उपलब्ध नसल्याने ते विमा काढू शकत नाहीत. अशा कुटुंबांना थोडीफार मदत मिळावी, या उद्देशाने राज्य शासनामार्फत आम आदमी विमा योजना राबविण्यात येत आहे.
Aam Aadmi Bima Yojana Maharashtra | वाचकांना विनंती |
मित्रानो, राज्य शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या वेगवेगळ्या योजनांची माहिती आपण घेतच आहोत. त्याचा लाभ ही तुम्ही घेतला असेलच. त्याचप्रमाणे आज आपण आम आदमी विमा योजनेची माहिती या लेखामध्ये घेणार आहोत. त्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचा. तसेच या योजनेचा लाभ तुम्ही घ्या आणि जर तुमच्या परिसरात कोणी गरीब कुटुंब असतील, तर त्यांना या योजनेची माहिती सांगा. तसेच आमचा हा लेख जास्तीत जास्त गोरगरीब लोकांपर्यंत जास्तीत जास्त प्रमाणात पोहोचवा, ही विनंती.
योजनेची नाव | आम आदमी विमा योजना |
योजनेची सुरुवात | 2 ऑक्टोबर 2007 , महाराष्ट्र |
लाभार्थी | राज्यातील आर्थिकदृष्ट्या गरीब नागरिक |
लाभ | 30,000/-रुपयांचे आर्थिक सहाय्य |
उद्देश | नागरिकांना विम्याचे संरक्षण देणे |
अर्ज करण्याची पध्दत | ऑनलाईन / ऑफलाईन |
हे पण वाचा –
शैक्षणिक कर्ज योजना मराठी महाराष्ट्र | Good News | Education Loan In Maharashtra 2024 | नोंदणी सुरु |
रोजगार संगम योजना महाराष्ट्र 2024 | Rojgar Sangam Yojana Maharashtra | Good News| ऑनलाईन नोंदणी सुरु |
गाय गोठा अनुदान योजना महाराष्ट्र | Gai Gotha Anudan Yojana 2024 | Good News | ऑनलाईन अर्ज सुरु |
Aam Aadmi Bima Yojana Maharashtra | आम आदमी विमा योजनेची उद्दिष्ट्ये |
- महाराष्ट्र राज्यातील आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबाना विमा सुरक्षा प्रधान करून देण्याच्या उद्देशाने या योजनेची सुरुवात करण्यात आली.
- आर्थिक दृष्ट्या मागास कुटुंबांना मोठ्या उपचारासाठी सशक्त व आत्मनिर्भर बनविणे या योजनेचा उद्देश आहे.
- गरीब मागासवर्गीय कुटुंबना विमा सुरक्षा प्रधान करणे, जेणेकरून त्यांना कोणाकडूनही जास्त व्याजदराने कर्ज काढण्याची आवश्यकता पडणार नाही.
- तसेच त्यांना पैशासाठी कोणावरही अवलंबून राहावे लागणार नाही.
- महाराष्ट्र राज्यातील आर्थिक दृष्ट्या मागास कुटुंबीयांचे जीवनमान या योजानेच्या माध्यमातून सुधारणे.
- राज्यातील गरीब, मागास शेतकऱ्यांचा सामाजिक व आर्थिक विकास करणे.
Aam Aadmi Bima Yojana Maharashtra | आम आदमी विमा योजनेची वैशिष्ट्ये |
- केंद्र व राज्य शासन यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू करण्यात आलेली, आम आदमी विमा योजना एक महत्त्वपूर्ण योजना आहे.
- राज्यातील गरीब कुटुंबाचे, उत्पन्न क्षमता कमी असलेल्या लोकांना सामाजिक सुरक्षा प्रदान केली जाते.
- आम आदमी विमा योजनेच्या हप्त्याची रक्कम अत्यंत अल्प आहे.
- तसेच आम आदमी विमा योजनेच्या हप्त्याची 50% रक्कम शासनामार्फत भरण्यात येते, त्यामुळे ही योजना नागरिकांना पेलवणारी आहे.
- या योजनेची पूर्ण कार्यवाही ही संगणकीय करण्यात आल्यामुळे लाभार्थ्याला आर्थिक सहाय्य मिळण्यास लवकर मदत होते.
Aam Aadmi Bima Yojana Maharashtra | आम आदमी विमा योजनेची माहिती |
- एखाद्या लाभार्थ्यांचा नैसर्गिक उत्तम मृत्यू झाल्यास या योजनेअंतर्गत त्याला विमा संरक्षण दिले जाते.
- एखाद्या नागरिकाचा अपघातात मृत्यू झाल्यास, या योजनेअंतर्गत त्या व्यक्तीच्या कुटुंबास विमा संरक्षण देण्यात येते.
- एखाद्या लाभार्थ्याला अपघातामुळे कायमस्वरूपी किंवा थोड्याफार प्रमाणात अपंगत्व आल्यास या योजनेअंतर्गत संरक्षण दिले जाते.
- या योजनेतील लाभार्थ्यांच्या पाल्यांनाही शिष्यवृत्ती देण्यात येते.
Aam Aadmi Bima Yojana Maharashtra | या योजने अंतर्गत लाभार्त्याला दिला जाणारा लाभ |
- लाभार्थ्याचा नैसर्गिक रित्या मृत्यू झाल्यास :
विम्याचे मुदत संपण्यापूर्वी या योजनेच्या लाभार्थ्याचा मृत्यू झाल्यास लाभार्थ्याच्या वारसदार व्यक्तीला तीस हजार रुपये आर्थिक सहाय्य देण्यात येते. - लाभार्थ्याचा अपघातात मृत्यू झाल्यास :
- विम्याची मुदत संपण्यापूर्वी या योजनेच्या लाभार्थ्याचा अपघाती मृत्यू झाल्यास पुढील प्रमाणे पुढील स्वरूपात मदत दिली जाते.
- अपघातात मृत्यू झाल्यास 75,000/- रुपये आर्थिक मदत दिली जाते.
- अपघातामुळे कायमचे अपंगत्व आल्यास 75,000/- रुपये आर्थिक मदत दिली जाते.
- लाभार्थी व्यक्तीचा अपघातात दोन डोळे व दोन अवयव गमावल्यास 75,000/- रुपयांची आर्थिक मदत दिली जाते.
- लाभार्थी व्यक्तीचा अपघातात एक डोळा व एक अवयव गमावल्यास 37,500/- रुपयांची आर्थिक मदत दिली जाते.
आम आदमी विमा योजनेअंतर्गत लाभार्थ्याच्या पाल्यांना दिली जाणारी शिष्यवृत्ती |
- इयत्ता नववी ते बारावी या वर्गामध्ये शिकत असलेल्या लाभार्थ्याच्या जास्तीत जास्त दोन पाल्यांना प्रतिमाह 100/- रुपये शिष्यवृत्ती दिली जाते.
- शिष्यवृत्तीची रक्कम लाभार्थ्याच्या बँक खात्यात वर्षातून दोन वेळा म्हणजे 1 जुलै व 1 जानेवारीला जमा केली जाते.
Aam Aadmi Bima Yojana Maharashtra | आम आदमी विमा योजनेचे लाभार्थी |
राज्यातील ग्रामीण व शहरी भागातील 18 ते 59 वयोगटातील भूमिहीन, अल्पभूधारक शेतकरी तसेच अत्यंत अल्पभूधारक मजुरांसाठी आम आदमी विमा योजना राबविण्यात येत आहे. किंवा हे लोक या योजनेचे लाभार्थी आहेत.
Aam Aadmi Bima Yojana Maharashtra | आम आदमी विमा योजनेचे फायदे |
- या योजनेच्या माध्यमातून राज्यातील आर्थिक दृष्ट्या गरीब नागरिकांचा सामाजिक विकास होईल.
- या योजनेमुळे राज्यातील नागरी कोणत्याही अडचणी शिवाय स्वतःचा विमा काढू शकतील.
- या योजनेतील हप्त्याची रक्कम अत्यंत अल्प असल्याने नागरिक सहजरित्या भरू शकतील.
- या योजनेतील प्रमुख लाभार्थ्याचा मृत्यू झाल्यास वारसदार मिळणाऱ्या रकमेतून आपल्या दैनंदिन गरजा पूर्ण करू शकतील.
- या योजनेतील लाभार्थ्याला अपंगत्व आल्यास मिळणाऱ्या आर्थिक सहाय्यामुळे तो स्वतःचा उपचार व उदरनिर्वाह सहजरित्या करू शकेल.
- या लाभार्थ्याच्या पाल्यांना शिष्यवृत्ती दिल्याने ते स्वतःचे शिक्षण पूर्ण करून स्वतःच्या पायावर उभे राहतील.
- या योजनेमुळे राज्यातील नागरिकांना भविष्यासाठी बचत करण्याची सवय लागेल.
- या योजनेमुळे नागरिक स्वतंत्र व स्वयंपूर्ण होतील.
- आम आदमी विमा योजनेमुळे नागरिकांचा आत्मविश्वास वाढेल.
Aam Aadmi Bima Yojana Maharashtra | आम आदमी विमा योजना अंतर्गत व्यापलेले व्यवसाय |
आम आदमी विमा योजनेंतर्गत राज्यातील छोटे – मोठे उद्योग व्यवसाय करणार्यांना विमा सुरक्षा प्रदान केली जाते. ते कोण कोणते व्यवसाय आहेत ते उदाहरण दाखल काही दिले आहेत, ते पुढीलप्रमाणे :
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
Aam Aadmi Bima Yojana Maharashtra | आम आदमी विमा योजनेचे नियम व आटी |
- आम आदमी विमा योजनेचा लाभ फक्त महाराष्ट्र राज्याच्या मूळ रहिवाश्यांना दिला जाईल.
- राज्याबाहेरील नागरिकांना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
- या योजनेचा लाभ भूमीहीन मजूर तसेच 5 एकर पेक्षा कमी जिरायती व 2.5 एकर पेक्षा कमी बागायती शेतजमीन असलेल्या शेतकऱ्यांना दिला जाईल.
- या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराचे वय 18 ते 59 च्या दरम्यान असावे.
- आम आदमी विमा योजने अंतर्गत विमा काढताना अर्जदार आणि वारसाचे नाव देणे आवश्यक आहे.
- अर्जदाराच्या मृत्यू वेळी अथवा अपघातावेळी अर्जदाराची पॉलिसी सक्रिय असणे गरजेचे आहे.
- लाभार्थ्याच्या दोन पाल्यांना या योजनेअंतर्गत शिष्यवृत्ती दिली जाते.
- या योजनेचा लाभार्थी हा आर्थिकदृष्ट्या मागास कुटुंबातील कुटुंब प्रमुख असणे गरजेचे आहे.
Aam Aadmi Bima Yojana Maharashtra | आवश्यक कागदपत्रे |
Aam Aadmi Bima Yojana Maharashtra | आम आदमी विमा योजनेत पुढील कारणांसाठी लाभ दिला जाणार नाही |
- लाभार्थी रुग्णालयात भारती असल्यास रुग्णालयाचा खर्च
- मानसिक वैफल्यातून आलेल्या अपंगत्वास
- एखाद्या लाभार्थ्याने आत्महत्या केल्यास
- धोकादायक खेळामुळे मृत्यू झाल्यास
- बीकायदेशीर कृत्य करतानाचे अपंगत्व आल्यास
- अमली पदार्थाच्या सेवनाने मृत्यू झाल्यास
- लाभार्थ्यांनी स्वतःहून इजा करून घेतल्यास
Aam Aadmi Bima Yojana | लाभार्थ्याचा मुर्त्यू झाल्यास आम आदमी विमा योजने अंतर्गत दावा करण्याची पध्दत |
- एखाद्या लाभार्थ्याचा काव्हारेजच्या कालावधीत किंवा विमा योजना लागू असताना, मृत्यू झाल्यास त्याच्या किंवा तिच्या वारसदाराला एजन्सी नियुक्त अधिकाऱ्याकडे हक्काचे रक्कम भरण्यासाठी मृत्यू प्रमाणपत्र सह अर्ज करावा लागेल.
- अर्जात विचारलेली सर्व माहिती अचूक प्रकारे भरून अर्जासोबत पोलीस FRI ची प्रत, पोलीस निष्कर्ष, पोलिसांचा अंतिम आवहाल इत्यादी कागदपत्रे जोडून ती एजन्सी अधिकाऱ्याकडे जमा करावा.
लाभार्थ्याला अपंगत्व आल्यास आम आदमी विमा योजने अंतर्गत दावा अर्ज करण्याची पध्दत |
- एखाद्या लाभार्थ्याला काव्हारेजच्या कालावधीत किंवा विमा पॉलिसी लागू अपघातात पूर्ण किंवा थोडेफार अपंगत्व आल्यास त्याला या योजनेअंतर्गत दावा करावा लागेल.
- अर्जात सर्व माहिती योग्य प्रकारे भरून त्यासोबत पोलीस FRI, अपघाताची व्हिडिओ रेकॉर्डिंग तसेच अपघाताची छायाचित्रे सोबत जोडावेत.
- अपघाताचा कागदपत्रे पुरावा तसेच सरकारी सिविल सर्जन यांचे वैद्यकीय प्रमाणपत्र, अपघातामुळे कायमस्वरूपी किंवा अंशतः अपंगत्व आल्याचे प्रमाणपत्र इत्यादी नमूद करणे आवश्यक आहे.
Aam Aadmi Bima Yojana Maharashtra | ऑनलाईन अर्ज करण्याची पध्दत |
- सर्वप्रथम आपणाला आयुर्विमा महामंडळाच्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल.
- त्यानंतर आम आदमी विमा योजनेच्या पर्यावर Click केल्यास योजनेचा अर्ज Open होईल.
- त्यामध्ये आवश्यक असलेली सर्व माहिती अचूक भरावी.
- संपूर्ण माहिती भरून झाल्यावर submit बटनावर click करावे.
- अशाप्रकारे आपले योजनांमध्ये ऑनलाईन अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल.
Aam Aadmi Bima Yojana Maharashtra | ऑफलाईन अर्ज करण्याची पध्दत |
- ऑफलाईन अर्ज करण्यासाठी आयुर्विमा महामंडळाच्या जवळच्या शाखेत जाऊन योजनेचा फॉर्म घ्यावा.
- त्या फॉर्ममध्ये असलेली माहिती वाचून आवश्यक माहिती योग्य भरावी.
- याचा सोबत आवश्यक कागदपत्रांच्या सत्यप्रत जोडाव्यात.
- नंतर तो अर्ज आयुर्विमा महामंडळाच्या ( LIC ) शाखेत जमा करावा.
2 thoughts on “आम आदमी बीमा योजना 2024 | Good News | Aam Aadmi Bima Yojana Maharashtra | पात्रता, नोंदणी व फायदे |”