पी एम किसान योजना |
PM Kisan Yojana
Pm Kisan New registration
Pm Kisan Yojana New installment
Pm Kisan Yojana News update
PM Kisan Yojana 20 installment
नमस्कार, Pm Kisan New registration प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना केंद्र सरकारने सुरू केलेले आहे. केंद्र सरकारकडून फेब्रुवारी मार्च 2019 मध्ये ही योजना सुरू करण्यात आली. या योजनेअंतर्गत पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांना आतापर्यंत 19 हप्त्याचे रक्कम वितरित केलेली आहे. या योजनेअंतर्गत पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांना 19 व्या हप्त्याची रक्कम 2 एप्रिल रोजी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात देण्यात आली.
पी एम किसान योजनेचा विसावा हप्ताही लवकरच जारी केला जाईल. जर तुम्ही शेतकरी असाल आणि या योजनेचा लाभ घेऊ इच्छित असाल, तर अर्ज कसा करायचा ? त्यासाठी पात्रता काय ? ऑनलाइन प्रक्रिया कशी असणार ? ऑफलाइन कसे असणारे ? या सर्वांची सविस्तर माहिती आपण या लेखात पाहणार आहोत. त्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचा. Pm Kisan New registration
पिकाचे नुकसान झाले आहे ? मोफत ! विमा कंपनीकडे तक्रार कशी करावी ? तक्रारीची A टू Z प्रक्रिया | सविस्तर वाचा |
या योजनेसाठी आवश्यक पात्रता |
- पीएम किसान योजनेअंतर्गत लहान आणि सीमांत म्हणजे अल्पभूधारक शेतकरी अर्ज करू शकतात.
- शेतकऱ्याकडे शेती योग्य जमीन असणे आवश्यक आहे.
- शेतकऱ्याचे नाव राज्य किंवा केंद्रशासकर सरकारच्या जमिनीच्या नोंदीमध्ये नोंदवलेले असावे.
- शेतकऱ्याचे आधार कार्ड, बँक साठी मोबाईल क्रमांक योजनेशी जोडलेले असावे.
ऑफलाइन नोंदणीची पद्धत |
पी एम किसान योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी तुम्हाला जर ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करायची नसेल, तर तुम्ही ऑफलाइन पद्धतीने या योजनेअंतर्गत नोंदणी करू शकता, त्यासाठी :
- तुम्हाला ( सीएससी ) सेंटर कॉमन सर्विस सेंटरला भेट देऊन अर्ज करावा लागेल.
- त्यासाठी जवळच्या सीएससी केंद्राला भेट द्या आणि योजनेसाठी अर्ज भरा भरा.
- केंद्रात उपस्थित असलेले अधिकारी तुमची पात्रता तपासतील आणि कागदपत्रांच्या पडताळणी करतील.
- तुम्ही या योजनेसाठी पात्र असल्याचे आढळले, तर तुमचा अर्ज सादर केला जाईल. Pm Kisan New registration
राज्यात आजपासून जिवंत सातबारा मोहीम सुरू | नक्की काय आहे ही प्रक्रिया ? संपूर्ण माहिती |
ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया |
- सर्वात प्रथम योजनेच्या https://pmkisan.gov.in/ या अधिकृत वेबसाईट वर जावे लागेल.
- होम पेजवर दिलेल्या न्यू फार्मर रजिस्ट्रेशन पर्यावर क्लिक करा.
- आता तुम्हाला तुमच्या बारा अंकी क्रमांक आधार क्रमांक टाकावा लागेल.
- यानंतर दहा अंकी मोबाईल नंबर भरावा लागेल.
- आता तुमचे राज्य निवडा.
- स्क्रीनवर दिलेल्या कॅपच्या कोड भरा आणि तुमच्या मोबाईल नंबर वर पाठवलेला ओटीपी भरा.
- आता आवश्यक कागदपत्रे आधार कार्ड, बँक पासबुक, जमिनीशी संबंधित कागदपत्रे अपलोड करा.
- सर्व माहिती भरल्यानंतर सबमिट बटनावर क्लिक करा, तुमचा अर्ज पूर्ण होईल. Pm Kisan New registration
महिलांना मिळत आहे, मोफत पिठाची गिरणी | अर्ज कसा करायचा ? संपूर्ण माहिती |
20 व्या हप्त्याचा लाभ मिळवण्यासाठी हे करा |
जर तुम्ही आधीच पीएम योजनेची जोडलेले असाल आणि 20 वा हप्ता वेळेवर मिळवायचा असेल, तर तुम्हाला काही महत्त्वाचे कामे करावी लागतील, ती म्हणजे :
- इ केवायसी : तुम्ही सीएससी केंद्र किंवा पीएम किसान पोर्टल द्वारे करू शकता.
- जमीन पडताळणी : तुमच्या शेत जमिनीची पडताळणी आवश्यक आहे.
- आधार लिंक करणे आवश्यक आहे.
- तुमच्या आधार क्रमांक बँक खात्याशी जोडलेला असणे आवश्यक आहे, डीबीटी द्वारे तुमची रक्कम तुमच्या बँक खात्यात जमा केली जाईल.