Diesel Pump Subsidy Yojana | डीझेल पंप सब्सिडी योजना महाराष्ट्र |
नमस्कार मित्रानो, आपल्या महाराष्ट्र राज्यात केंद्र व राज्य शासनामार्फत देशातील शेतकऱ्यांच्या उज्वल भविष्यासाठी त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी वेगवेगळ्या योजनांची अंमलबजावणी करत असतील. राज्यात कृषीप्रधान देश असल्याने शेती करण्याचे प्रमाण अत्यंत आहे. हे शेतकरी शेतीला पाणी देण्यासाठी विहीर, शेततळे, नदी व नाले यांचा वापर करतात. तसेच त्यांना पाण्याचा उपसा शेततळे, विहिरी यामधून करावा लागतो व त्यासाठी त्यांना विद्युत पंपाचा वापर करावा लागतो.
पण विजेच्या आनिय्मित्तेमुळे तसेच ग्रामीण भागातील वाढत्या लोड शेडिंग मुळे शेतकऱ्यांना शेतीसाठी योग्य प्रमाणात पाणी देता येत नाही. त्यामुळे त्यांच्या पिकाच्या पाण्याचा प्रमाण कमी झाल्याने वाळून जातात, तसेच रोगराईला बळी पडतात.
ग्रामीण भागात शेतकऱ्यांना पिकाला पाणी देण्यासाठी दिवसा वीज उपलब्ध नसल्याने रात्री वीज उपलब्ध करून दिली जाते. पण रात्रीच्या अंधारात असणाऱ्या रानटी जनावरांच्या भीतीने शेतकऱ्यांसमोर पिकाला पाणी देण्याची मोठी समस्या निर्माण होते. या सर्व कारणाने शेतकऱ्याच्या शेतीच्या नुकसानीला सामोरे जावे लागते. याचा आर्थिक फटका शेतकऱ्याला मोठ्या प्रमाणात बसतो.
या सर्व गोष्टींचा विचार करून महाराष्ट्र शासनाने एका नाविन्यपूर्ण योजनेची सुरुवात केली आहे. ती योजना म्हणजे ” डिझेल पंप सब्सिडी योजना “ होय. विहिरी, नदी व नाल्यातून पिकांना पाणी उपसा करून देण्यासाठी डिझेल पंप हा एक चांगला पर्याय शेतकऱ्यांसाठी मानला जातो.
परंतु राज्यातील बहुतांशी शेतकरी आर्थिक दृष्ट्या हलाखीचे जीवन जगत असतात. त्यांना डिझेल पंप खरेदी करणे परवडत नाही. त्यामुळे डिझेल पंप सबसिडी योजने अंतर्गत शासनाकडून राज्यातील शेतकऱ्यांना पंप खरेदी करण्यासाठी अनुदान देण्यात येते.
Diesel Pump Subsidy Yojana | वाचकांना नम्र विनंती |
मित्रानो, महाराष्ट्रत राज्य शासनामार्फत शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या वेगवेगळ्या योजनांची माहिती आतापर्यंत आपण पाहिलेच आहे. त्याचप्रमाणे आज आपण शेतकऱ्यांसाठी चालवण्यात येणाऱ्या डिझेल पंप सबसिडी योजनेची माहिती पाहणार आहोत. त्यामुळे तुम्ही हा लेख शेवटपर्यंत वाचा व या योजनेचा लाभ मिळवा. तसेच तुमच्या परिसरात जे कोणी शेतकरी असतील, जे विजेच्या अनियमत्तेमुळे त्रस्त असतील.
त्यांनाही योजनेची माहिती सांगा. तसेच आमचा हा लेख जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत जास्तीत जास्त प्रमाणात पोहोचवा. त्यामुळे त्यांना या योजनेचा लाभ घेता येईल, ही विनंती.
योजनेचे नाव | डिझेल पंप सब्सिडी योजना |
योजनेची सुरुवात | महाराष्ट्र राज्य |
लाभार्थी | राज्यातील शेतकरी |
लाभ | डीझेल पंप खरेदीसाठी अर्थ सहाय्य |
उद्देश | शेतकर्यांना शेतीसाठी प्रोत्साहित करणे |
अर्ज करण्याची पध्दत | ऑफलाईन / ऑनलाईन |
हे पण वाचा –
आम आदमी बीमा योजना 2024 | Good News | Aam Aadmi Bima Yojana Maharashtra | पात्रता, नोंदणी व फायदे |
शैक्षणिक कर्ज योजना मराठी महाराष्ट्र | Good News | Education Loan In Maharashtra 2024 | नोंदणी सुरु |
Kadba Kutti Machine Anudan Yojana Maharashtra | Good News | कडबाकुट्टी मशीन 100% अनुदान योजना | असा करा अर्ज |
Diesel Pump Subsidy Yojana | डीझेल पंप सब्सिडी योजनेची उद्दिष्ट्ये |
- राज्यात विजेच्या आनिय्मितातेमुळे शेतकऱ्यांना शेताला पाणी देता येत नाही त्यामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात होणारे नुकसान कमी करण्याच्या उद्देशाने डिझेल पंप सबसिडी योजनेची सुरुवात करण्यात आली.
- डिझेल पंप खरेदी करण्यासाठी राज्य शासनामार्फत शेतकऱ्यांना अनुदान दिले जाते.
- या योजनेतून राज्यातील शेतकऱ्यांना शेती करण्यासाठी प्रोत्साहित केले जाते.
- या योजनेमुळे शेतकऱ्यांचे भविष्य उज्वल होण्यास मदत होणार आहे.
- डिझेल पंप योजनेमुळे शेतकऱ्यांना शेतीला पाणी देण्यासाठी विजेवर अवलंबून राहण्याची गरज पडणार नाही.
- तसेच राज्यात विजेवर असणारा अतिरिक्त फार कमी होईल.
- या योजनेमुळे राज्यातील शेतकरी सशक्त व आत्मनिर्भर होतील.
- राज्यातील शेतकऱ्यांना डिझेल पंप खरेदी करण्यासाठी कोणावरही अवलंबून राहण्याची गरज पडणार नाही तसेच कर्जही काढावे लागणार नाही.
Diesel Pump Subsidy Yojana | डीझेल पंप अनुदान योजनेची वैशिष्ट्ये |
- महाराष्ट्र शासनाद्वारे राज्यातील शेतकऱ्यांसाठी डिझेल पंप सबसिडी योजना, हि अनुदान योजना सुरू करण्यात आले.
- शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांना पाणी देण्यासाठी डिझेल पंप खरेदी करण्यासाठी अनुदान देण्याच्या उद्देशाने या योजनेची सुरुवात करण्यात आली.
- राज्यातील शेतकऱ्यांचा सामाजिक व आर्थिक विकास करून त्यांचे जीवनमान सुधारण्यासाठी डिझेल पंप अनुदान योजनेची सुरुवात करण्यात आली.
- डिझेल पंप खरेदीसाठी अनुदान मिळाल्याने राज्यातील सर्व शेतकरी या योजनेचा लाभ घेऊ शकतील.
- या योजनेअंतर्गत राज्य शासनामार्फत दिले जाणारे आर्थिक सहाय्य हे DBT मार्फत लाभार्थ्याच्या खात्यात जमा केली जाईल.
- राज्यातील शेतकऱ्यांना आता विजेवर अवलंबून राहण्याची गरज भासणार नाही.
- राज्य शासनामार्फत डिझेल पंप योजनेची अर्ज प्रक्रिया ऑनलाइन असल्याने अर्जदार घरी बसून मोबाईलच्या सहाय्याने अर्ज करू शकतो.
- त्यामुळे अर्जदाराला सरकारी कार्यालयात फेऱ्या मारण्याची आवश्यकता पडणार नाही, तसेच त्याच्या पैशाची व वेळेची बचत होईल.
- सर्व प्रक्रिया संगणकीय असल्याने अर्जदार अर्जाची स्तिथी तपासू शकतो.
Diesel Pump Subsidy Yojana | डीझेल पंप अनुदान योजनेचे लाभार्थी व लाभ |
- महाराष्ट्र राज्यातील सर्व जाती धर्माचे शेतकरी डीझेल पंप अनुदान योजनेसाठी पात्र लाभार्थी आहेत.
- महाराष्ट्र शासनामार्फत डीझेल पंप सब्सिडी योजने अंतर्गत शेतकर्यांना त्यांच्या शेतातील विहिरी, बोरवेल, शेततळे व नाले यातून पाणी उपसा करण्यासाठी, डीझेल पंप खरेदी करण्यासाठी 50% अनुदान देण्यात येते.
डीझेल पंप सब्सिडी योजनेचे फायदे |
- राज्य शासनामार्फत डीझेल पंप सब्सिडी योजने अंतर्गत शेतकर्यांना शेतात पाणी उपसा करण्यासाठी डीझेल पंप खरेदी करण्यासाठी अनुदान देण्यात येते.
- डीझेल पंप अनुदान योजनेमुळे विजेच्या सततच्या अनियमिततेमुळे त्रस्त झालेल्या शेतकर्यांना दिलासा मिळेल.
- डीझेल पंप अनुदान योजनेमुळे लोडशेडिंग मुळे होणारे पिकाचे नुकसान कमी होवून शेतकऱ्यांच्या आर्थिक उत्पनात वाढ होईल.
- राज्यात ज्या शेतकऱ्यांच्या शेतात अद्यप वीज पुरवठा उपलब्ध नाही, अशा शेतकर्यांना डीझेल पंप अनुदान योजनेमुळे फायदा होणार आहे.
- डीझेल पंप सब्सिडी योजनेमुळे शेतकऱ्यांचा आर्थिक व सामाजिक विकास होईल.
- डीझेल पंप अनुदान योजनेमुळे राज्यातील शेतकऱ्यांचे भविष्य उज्जवल बनेल.
- डीझेल पंप सब्सिडी योजने अंतर्गत आर्थिक सहाय्य मिळाल्याने शेतकर्यांना डीझेल पंप खरेदीसाठी कोणावर अवलंबून राहण्याची गरज पडणार नाही तसेच जास्त व्याज दराने कोणाकडून कर्ज हि घ्यावे लागणारा नाही.
- महाराष्ट्र राज्यातील शेतकरी या योजनेमुळे सशक्त व आत्मनिर्भर होतील.
- राज्यातील विजेच्या सततच्या वाढत्या दरामुळे शेतकऱ्यावर पडणारा अतिरिक्त भर कमी होईल.
- महाराष्ट्र राज्यातील या योजनेमुळे शेतकर्यांना तसेच तरुण पिढीला प्रोत्साहन मिळेल.
Diesel Pump Subsidy Yojana | डीझेल पंप अनुदान योजनेची पात्रता |
महाराष्ट्र राज्याचा मूळ रहिवासी शेतकरी डीझेल अनुदान योजनेसाठी पात्र असेल.
डीझेल पंप सब्सिडी योजनेचे नियम व आटी |
- महाराष्ट्र राज्यातील मूळ रहिवाशी शेतकऱ्यांनाच डीझेल पंप अनुदान योजनेचा लाभ दिला जाईल.
- राज्याबाहेरील शेतकर्यांना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
- डीझेल पंप अनुदान योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकर्याकडे शेती योग्य जमीन असणे आवश्यक आहे.
- डीझेल पंप खरेदीसाठी या योजनेंतर्गत शासनाकडून 50 % अनुदान देण्यात येते, उरलेली 50 % रक्कम शेतकऱ्याला स्वताकडील भरावी लागेल.
- पाणी उपसा करण्यासाठी शेतकऱ्याच्या शेतात बोअरवेल, विहीर किंवा शेततळे असणे गरजेचे आहे.
- डीझेल पंप अनुदान योजनेचा लाभ शेतकऱ्याला फक्त एकदाच दिला जाईल.
- अर्जदार शेतकर्याने या अगोदर केंद्र व राज्य शासनाच्या कोणत्याही योजनेतून डीझेल पंप खरेदी केलेला नसावा.
- या योजनेचा लाभ फक्त आर्थिकदृष्ट्या गरीब व मागास शेतकर्यांना दिला जाईल.
Diesel Pump Subsidy Yojana | डीझेल पंप सब्सिडी योजनेंतर्गत आवश्यक कागदपत्रे |
- आधार कार्ड
- मतदान ओळखपत्र
- रेशन कार्ड
- रहिवाशी दाखला
- जात संवर्गाचे प्रमाणपत्र
- 7/12 , 8 अ
- मोबाईल नंबर
- इमेल आयडी
- बँक पासबुक
- पासपोर्ट साईझ फोटो
- स्वयं घोषणापत्र
- डीझेल पंप खरेदीचे बिल / कोटेशन
Diesel Pump Subsidy Yojana | या योजने अंतर्गत अर्ज रद्द होण्याची करणे |
- डीझेल पंप अनुदान योजनेसाठी अर्ज करणारा अर्जदार महाराष्ट्र राज्याचा मूळ रहिवाशी नसल्यास अर्ज रद्द केला जातो.
- अर्जदार व्यक्तीने अर्जात खोटी अथवा चुकीची माहिती भरल्यास अर्ज रद्द केला जातो.
- अर्जदारने या पूर्वी शासनाच्या योजनेतून डीझेल पंपाचा लाभ घेतलेला असल्यास त्या व्यक्तीचा अर्ज रद्द होतो.
- अर्जदार शेतकऱ्याच्या शेतात पाणी उपसा करण्यासाठी विहीर, बोरवेल नसल्यास अर्ज रद्द होतो.
Diesel Pump Subsidy Yojana | ऑनलाईन अर्ज करण्याची पध्दत |
- प्रथम आपणाला शासनाच्या अधिकृत website वर जावे लागेल.
- नंतर आधार कार्ड व username टाकून login करावे.
- आता तुमच्यासमोर एक नवीन अर्जाचे page open होईल.
- या अर्जामध्ये आवश्यक बाबी भरून आवश्यक कागदपत्रे upload करावीत.
- नंतर submit बटनावर click करावे.
Diesel Pump Subsidy Yojana | ऑफलाईन अर्ज करण्याची पध्दत |
- आपल्याला सर्वात प्रथम जिल्हा कार्यालयाच्या कृषी विभागात जावे लागेल.
- कृषी विभागात जावून तिथून डीझेल पंप अनुदान योजनेचा अर्ज घ्यावा लागेल.
- त्या अर्जात विचारलेली सर्व माहिती योग्य व अचूक भरावी.
- अर्ज सोबत आवश्यक कागदपत्रांच्या सत्यप्रत जोडाव्यात.
- नंतर तो अर्ज कृषी विभागात जमा करून त्याची पोचपावती घ्यावी.
- अशाप्रकारे तुमची या योजनेची ऑफलाईनअर्ज प्रक्रिया पूर्ण होईल.
Diesel Pump Subsidy Yojana | डीझेल पंप सब्सिडी योजना |
डीझेल पंप सुब्सिडी योजना पोर्टल Click Here
डीझेल पंप अनुदान योजना हेल्पलाईन नंबर Click Here – 022-49150800
1 thought on “डीझेल पंप सब्सिडी योजना महाराष्ट्र 2024 | नोंदणी सुरु | Good News | Diesel Pump Subsidy Yojana |”