पिक विमा नुकसान भरपाई |
Crop insurance claim
Pik vima
Crop insurance government scheme
Farmers scheme
Crop insurance scheme
नमस्कार, Crop insurance claim राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाकडून पिक विमा योजना सुरू केली. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान झाल्यास त्यांना भरपाई म्हणून पिक विमा मंजूर केला जातो. शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीमुळे निर्माण झालेल्या परस्थितीत भरपाई म्हणून पिक विमा मंजूर केला जातो. त्यामध्ये अवकाळी पाऊस, सध्या राज्यात जोरदार अवकाळी पाऊस सुरू झालेला आहे. गारपीट झालेली आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांच्या गहू, मका, द्राक्षे या fal बागेमध्ये मोठे नुकसान झालेले आहे. त्याचबरोबर जनजीवन विस्कळीत झालेले आहे, म्हणून पीक विमा मंजूर केला जातो.
प्रधानमंत्री पिक विमा योजना अंतर्गत शेतकऱ्यांना खरीप हंगामी व रब्बी हंगाम या अंतर्गत नुकसान झाल्यास ७२ तासाच्या कंपनीला कळवणे बंधनकारक आहे. यासाठी विमा कंपनीला तक्रार कशी करायची ? ऑनलाईन अर्ज कसा करायचा ? याबद्दलची सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत. त्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचा.
लाडकी बहीण योजनेबाबत नवीन माहिती | कोणत्या महिला अपात्र ? एप्रिल महिन्याचा हप्ता कधी जमा होणार ? कोणते बदल झाले ? संपूर्ण माहिती |
अशी करा विमा कंपनीला तक्रार |
- प्रथम तुम्ही प्रधानमंत्री पिक विमा योजना मध्ये नोंदणीकृत असणे आवश्यक आहे.
- सर्वात प्रथम प्ले स्टोअर वरून क्रॉप इन्शुरन्स हे app डाऊनलोड करायचा आहे.
- त्यानंतर Continue as guest हा पर्याय निवडा.
- यात पिक नुकसान हा पर्याय निवडा.
- यात पिक नुकसानीची पूर्वसूचना या पर्यायावर क्लिक करा.
- त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर टाका, त्यानंतर तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबर वर ओटीपी येईल, तो टाका.
- पुढील टप्प्यात हंगाम खरीप, वर्ष 2024, योजना आणि राज्य निवडा.
- नोंदणीचा स्त्रोत CSC निवडा. नंतर पॉलीसी क्रमांक टाका. Crop insurance claim
- ज्या गट क्रमांकमधील पिकाची तक्रार तुम्हाला करायची असेल किंवा स्वतंत्र तक्रार करायची असेल, तर तो अर्ज निवडून स्वतंत्र तक्रार करा.
- नक्की कशामुळे नुकसान झाले? याचा तपशील भरा. पिकांचा फोटो काढून सबमीट करा.
- यानंतर तक्रार यशस्वीरित्या नोंद केली असल्याची खात्री देणारा docket Id मिळेल. यावरच तुम्हाला विमा मिळतो. त्यामुळे हा नं जपून ठेवा.
राज्यात आजपासून जिवंत सातबारा मोहीम सुरू | नक्की काय आहे ही प्रक्रिया ? संपूर्ण माहिती |
अशी ही करू शकता तक्रार |
प्रधानमंत्री पिक विमा योजनेच्या अधिकृत संकेतस्थळावरून तुम्हाला तुमची तक्रार करावी लागेल. त्यासाठी प्रधानमंत्री फसल बीमा योजनेच्या अधिकृत वेबसाईट वर https://pmfby.gov.in/ जावे लागेल. त्यानंतर त्यावर रिपोर्ट लॉस वर क्लिक करून, कोणत्या इन्शुरन्स कंपनीमध्ये तुमच्या पिकाच्या विमा काढला आहे. कंपनी निवडून त्यात आपली सर्व तपशील भरा. त्यानंतर नुकसानाची तक्रार दाखल केल्यानंतर मिळणारा क्रमांक सेव करून ठेवा. जो नंतर तुम्हाला कामाला येईल.
कृषी विभागाकडेही करू शकता तक्रार दाखल |
कृषी विभागाकडून हेल्पलाइन क्रमांक देण्यात आलेला आहे. तक्रार दाखल करण्यासाठी टोल फ्री क्रमांक 14447 यावर call करू शकतात. या क्रमांकावर शेतकरी कॉल करून आपल्या झालेल्या नुकसानीची तक्रार दाखल करू शकतात. Crop insurance claim