अहिल्यादेवी होळकर रोपवाटिका योजना |
ahilyadevi Holkar Rop vatika Yojana
Ropvatika Yojana Maharashtra
Ahilyadevi Holkar farmar scheme
Nursery scheme for government
Ropvatika subsidy scheme
नमस्कार, ahilyadevi Holkar Rop vatika Yojana राज्य शासनामार्फत राज्यातील शेतकऱ्यांसाठी आर्थिक सहाय्य वाढविण्यासाठी, मदत करण्यासाठी तसेच त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध योजना राबवल्या जातात. त्या योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा विकास करणे, हा उद्देश साध्य केला जातो. राष्ट्रीय कृषी विकास योजना अंतर्गत महाराष्ट्र सरकारने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर रोपवाटिका विकास योजना सुरू केली आहे.
या योजनेचा मूळ उद्देश शेतकऱ्यांचा आर्थिक उत्पन्न वाढवणे आणि भाजीपाला पिकांचे दर्जेदार आणि कीड रोग मुक्त रोप तयार करणे हा आहे. या योजनेतून शेतकऱ्यांना कमाल खर्च रुपये 5 लाख 55 हजार रुपये इतका ग्राह्य धरून 2 लाख 77 हजार 500 रुपयांचे आर्थिक सहाय्य दिले जाते.
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी | लवकरच खात्यात जमा होणार 2000 हजार रुपये | लाभ घेण्यासाठी हे करा |
योजना नक्की काय आहे ?
महाराष्ट्र सरकार कडून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर रोपवाटिका विकास योजना चालवली जाते. आपले राज्य शेतीमालाच्या निर्यातीमधील संपूर्ण देशात अग्रेसर आहे. या निर्यातीत महाराष्ट्रातून उत्पादित होणारा शेतीमाला चांगल्या गुणवत्तेचा असणे गरजेचे आहे. शिवाय दर्जेदार व रोग मुक्त शेतमाल शेतकऱ्यांसाठी निर्मिती करणे गरजेचे आहे.
त्यासाठी या योजनेद्वारे प्रयत्न केले जातात. राज्यातील शेतकऱ्याकडून चांगलं बियाणं आणि चांगला रोपांची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. ती पूर्ण करण्यासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर रोपवाटीका विकास योजना फायदेशीर ठरत आहे. ahilyadevi Holkar Rop vatika Yojana
त्याचबरोबर राष्ट्रीय कृषी विकास योजना अंतर्गत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर रोपवाटिका विकास योजनेद्वारे शेडनेट, पॉलीटनेल, पावर स्प्रे आणि प्लास्टिक प्लेट्स यासाठी अनुदान देण्यात येते. 1 हजार चौरस मीटर च्या शेडनेटच्या साहित्यास उभारणीचा खर्च एकूण 5 लाख 55 हजार गृहीत धरून त्यातील दोन लाख 77 हजार पाचशे रुपयांचे आर्थिक सहाय्य दिले जाते.
संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजनेचा लाभ DBT मार्फत लाभार्थ्याच्या बँक खात्यात जमा होणार |
रोपवाटिका योजनेचा उद्देश |
- भाजीपाला लागवडीच्या पिकासाठी आधुनिक तंत्रज्ञान आणि उत्तम व दर्जेदार रोपांची निर्मिती करणे.
- शेतकऱ्यांच्या उत्पन्नात भरघोस वाढ करण्यासाठी आधुनिक व शस्त्रशुद्ध पद्धतीने रोपवाटिका उभारणीस प्रोत्साहन देणे.
- दैनंदिन वापरातील विविध प्रकारच्या भाजीपाल्यांच्या लागवडीसाठी जागतिक दर्जाचे व उत्पन्न वाढ देणारी भाजीपाला रोपे उपलब्ध करून देणे.
Ahilyadevi Holkar Rop Vatika Yojana | आवश्यक पात्रता |
- अर्जदार शेतकऱ्याकडे स्वतःच्या मालकीची कमीत कमी एक एकर जमीन असावी.
- पाण्याची कायमस्वरूपी सोय असणे आवश्यक आहे.
- महिला कृषी पदवीधरांना प्रथम प्राधान्य दिले जाणार आहे.
- महिला गट आणि शेतकरी गटाला द्वितीय प्राधान्य.
- यापूर्वीच्या शेतकऱ्यांकडे रोपवाटिका शेडनेट हाऊस किंवा हरितगृहासाठी अनुदान घेतलेल्या व्यक्ती आहेत, त्यांना या योजनेतून वगळले जाईल.
आवश्यक कागदपत्रे |
- शेतकऱ्याचा सातबारा उतारा
- 8अ उतारा
- बँक खाते पासबुकची झेरॉक्स
- आधार कार्ड
- रेशन कार्ड
- स्थळदर्शक नकाशा
- कृषी पदविका प्रमाणपत्र
- शेतकरी उत्पादक गट असल्यास नोंदणी प्रमाणपत्र
ज्येष्ठ नागरिकांसाठी खास योजना | आता 574 रुपयांचा गुंतवणुकीवर बना लखपती | वाचा सविस्तर |
या योजनेअंतर्गत मिळणारे अनुदान |
- रोपवाटिका निर्मिती खर्च एकूण – 5 लाख 55 हजार रुपये
- शासनाकडून रोपवाटिकेसाठी मिळणारे अनुदान – 2 लाख 77 हजार 500 रुपये
- उर्वरित सर्व खर्च हा लाभार्थ्याला स्वतः करावा लागेल.
Rop Vatika Yojana | अर्ज करण्याची प्रक्रिया |
- अर्ज करण्यासाठी प्रथम अर्जदाराला आपला महाडीबीटी पोर्टलच्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल.
- संकेतस्थळावर गेल्यानंतर आपण आदी महाडीबीटी पोर्टलवर नोंदणी केली असेल, तर आपणास लॉगिन पर्याय वापरावा लागेल.
- आदी नोंदणी केली नसल्यास ,आपण नवीन नोंदणी हा पर्याय निवडून आपली नोंदणी पूर्ण करावी लागेल.
- लॉग इन केल्यानंतर आपणास अर्ज करा या पर्यायावर क्लिक करावे लागेल.
- आपल्यासमोर नवीन अर्ज करण्यासाठी टॅब ओपन होईल.
- फलोत्पादन या टॅबसमोरील बाब निवडा या पर्यायावर क्लिक करा.
- घटक मध्ये इतर घटक निवड करा.
- त्यानंतर त्यामध्ये भाजीपाला रोपवाटिका हा घटक निवडा.
- सर्व नियम अटी मान्य असल्याचे क्लिक करून, अर्ज सादर करा या पर्यायावर क्लिक करा. ahilyadevi Holkar Rop vatika Yojana