CMEGP लोन योजना |
Cmegp loan scheme
Cm employment generation program
Cmegp subsidy scheme for government
Online apply for cmegp
Loan scheme for government
नमस्कार, Cmegp loan scheme राज्यातील नागरिकांचा विकास करण्यासाठी व त्यांच्या प्रगतीला चालना देण्यासाठी शासनाकडून विविध योजना राज्यात राबवल्या जातात. त्या योजनांमध्ये अनेक महत्त्वपूर्ण योजना ही राबवल्या जातात. त्यातील राज्यातील सुशिक्षित बेरोजगार युवक व युवती यांनी आपल्या स्वतःचा उद्योग व्यवसाय सुरू करण्यासाठी मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम शासनाची योजना उद्योग संचलना मार्फत राबवली जाते.
राज्य शासनामार्फत राबविली जाणारी योजना नक्की काय आहे ? या माध्यमातून किती कर्ज मिळणार ? या सर्वांची सविस्तर माहिती आज आपण या लेखात पाहणार आहोत. त्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचा.
योजनेचे स्वरूप |
मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजनेअंतर्गत प्रक्रिया असलेल्या उत्पादन उद्योगासाठी 50 लाख व सेवा उद्योगासाठी 20 लाख रुपये पर्यंत या प्रकल्प मर्यादित कर्ज दिले जाते. Cmegp loan scheme
ज्यात सर्वसाधारण प्रवर्गासाठी ग्रामीण भागासाठी 25% अनुदान व शहरी भागासाठी 15 टक्के अनुदान दिले जाते, तसेच राखीव प्रवर्गासाठी ग्रामीण भागासाठी 35 टक्के अनुदान व शहरी भागासाठी 25 टक्के अनुदान दिले जाते ग्रामीण भागासाठी आणि शहरी भागासाठी वेगवेगळ्या वर्गवारीनुसार अनुदान वितरित केले जाते.
नमो शेतकरी महासन्मान योजनेच्या 2000 हजार रुपयांचा हप्ता जमा झाला का नाही ? आशे चेक करा तुमच्या मोबाईलवरून |
मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम अनुदान प्रक्रिया |
राज्यातील मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेअंतर्गत ग्रामीण भाग आणि शहरी भाग यासाठी वेगवेगळ्या अनुदान जाहीर करण्यात आलेले आहे. त्यानुसार ग्रामीण भागातील आरक्षित नागरिकांना वेगवेगळे अनुदानित केले जाते, ते पुढील प्रमाणे :
ग्रामीण भाग
- आरक्षित प्रवर्ग – ग्रामीण भागातील महिला, अनुसूचित जाती, जमाती तेथील नागरिकांना 35 टक्के अनुदान दिले जाते.
- सर्वसाधारण प्रवर्ग – सर्वसाधारण प्रवर्गासाठी ग्रामीण भागात 25 टक्के अनुदान वितरित केले जाते.
शहरी भाग
- आरक्षित प्रवर्ग – शहरी भागातील महिला आणि अनुसूचित जाती, जमातीतील नागरिकांना 25 टक्के अनुदान विक्री केले जाते.
- सर्वसाधारण प्रवर्ग – शहरी भागातील सर्वसाधारण प्रवर्गातील नागरिकांना 15 टक्के अनुदान वितरित केले जाते.
लाडकी बहीण योजनेबाबत नवीन माहिती | कोणत्या महिला अपात्र ? एप्रिल महिन्याचा हप्ता कधी जमा होणार ? कोणते बदल झाले ? संपूर्ण माहिती |
योजनेच्या अटी व नियम |
मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी शासनाकडून अर्जदार व्यक्तींसाठी काही नियम व अटी लागू करण्यात आलेले आहेत. त्या अटींची व नियमांची पूर्तता झाल्यास अर्जदार व्यक्तीला लाभ दिला जातो, त्या अटी पुढीलप्रमाणे :
- अर्जदाराचे वय हे 18 वर्षे ते 45 वर्षाच्या दरम्यान असणे आवश्यक आहे. Cmegp loan scheme
- अनुसूचित जाती जमातीतील नागरिकांसाठी व महिलांसाठी पाच वर्षाची अधिकची सूट देण्यात आली आहे.
- अर्जदार व्यक्तीने या पूर्वी कोणत्याही शासकीय व इतर शासकीय योजनेतून व्यवसायासाठी कर्ज घेतलेले किंवा लाभ घेतलेला नसावा.
- या योजनेअंतर्गत कर्ज मिळवण्यासाठी दहा लाख रुपये पर्यंत कर्ज मिळवण्यासाठी अर्ज किमान 7 वी पास आवश्यक आहे.
- दहावी पास असणाऱ्या अर्जदारास 25 लाख किंवा त्यावरील कर्ज मिळवण्यासाठी पात्र आहे.
या उद्योगांसाठी मिळणार कर्ज |
मुख्यमंत्री रोजगार निर्मिती अंतर्गत जवळपास सर्वच व्यवसायांना कर्ज दिली जाते. यामध्ये फक्त दारू व तंबाखूजन्य पदार्थ अशा व्यवसायासाठी या माध्यमातून कर्ज वितरीत केले जात नाही, बाकी इतर व्यवसायासाठी कर्ज आणि अनुदान वितरीत केले जाते ते व्यवसाय कोणकोणत्या आहेत, ते पुढील प्रमाणे :
पिकाचे नुकसान झाले आहे ? मोफत ! विमा कंपनीकडे तक्रार कशी करावी ? तक्रारीची A टू Z प्रक्रिया | सविस्तर वाचा |
- उत्पादन उद्योग
- सेवा व्यवसाय उद्योग
- लेडीज ब्युटी पार्लर
- जेंट्स पार्लर
- पशुखाद्य निर्मिती उद्योग
- चप्पल बूट कारखाना
- उद्योग बेकरी उत्पादने उद्योग
- शेती उत्पादनापासून तयार केले जाणारे प्रक्रिया उद्योग
- ट्रान्सपोर्ट व्यवसाय
- मोबाईल शॉपी
- फोटोग्राफी
- हॉटेल
- किरण दुकान
अशा सर्व व्यवसायांसाठी शासनाकडून योजनेच्या नियम व अटींच्या अधीन राहून मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेअंतर्गत कर्ज वितरीत केले जाते. वरील यादी व्यतिरिक्त इतर व्यवसाय मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेमध्ये समाविष्ट आहेत.
CMEGP loan scheme | आवश्यक कागदपत्रे |
- अर्जदाराचे आधार कार्ड
- पॅन कार्ड
- जातीचे दाखला
- शाळा सोडल्याचा दाखला
- शैक्षणिक प्रमाणपत्र
- पासपोर्ट साईज फोटो
- व्यवसाय प्रकल्प अहवाल
- ग्रामीण भागात असल्यास ग्रामपंचायत ठराव
- शहरी भागात असल्यास नगर परिषद ची परवानगी
- बँक पासबुक
- ईमेल आयडी
- मोबाईल नंबर
मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम अंतर्गत तरुण युवक अनुदान मिळवून नवीन उद्योग उभारू शकतात. त्यामुळे बेरोजगार तरुणांना रोजगार प्राप्त होईल, त्यासोबतच इतर तरुणांना देखील रोजगार उपलब्ध होईल. या हेतूने शासन उपक्रम राबवत आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार आपल्या जवळील जिल्हा उद्योग केंद्र येथे संपर्क साधून या योजनेचा लाभ घेवू शकतात.