महिला बचत गट कर्ज योजना महाराष्ट्र | Good News | Mahila Bachat Gat Loan Scheme 2024 | नोंदणी सुरु |

Table of Contents

Mahila Bachat Gat Loan Scheme 2024 | महिला बचत गट कर्ज योजना महाराष्ट्र |

Mahila Bachat Gat Loan Scheme 2024
mahila bachat gat yojana
bachat gat yojana maharashtra
mahila bachat gat karj yojana marathi
maha shasan yojana

Mahila Bachat Gat Loan Scheme 2024 |

नमस्कार मित्रांनो, राज्यात महाराष्ट्र शासनामार्फत वेगवेगळ्या योजनांची अंमलबजावणी करून नागरिकांचा विकास करणे, हे ध्येय निश्चित करण्यासाठी शासन नेहमीच प्रयत्नशील असते. राज्यातील प्रत्येक घटकातील तरुणांचा विकास करून त्यांना जीवन जगण्यासाठी आर्थिक सहाय्य करणे, हा या योजनांचा उद्देश आहे.

शासनामार्फत या योजनेच्या माध्यमातून सर्वसामान्य लोकांना अनुदान देऊन, त्यांच्या सामाजिक व आर्थिक विकास करणे, या उद्देशाने या योजना सुरू करण्यात येतात. प्रत्येक क्षेत्रात क्रांती व प्रगती घडवून आणण्यासाठी या योजनांची अंमलबजावणी केली जाते.
त्याचप्रमाणे राज्यातील सुशिक्षित व रोजगाराच्या शोधामध्ये असणाऱ्या महिलांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी, तसेच त्यांना आर्थिक सहाय्य करण्यासाठी शासनामार्फत एका नवीन योजनेची सुरुवात करण्यात आली आहे. ती योजना म्हणजे ” महिला बचत गट योजना “ होय. या योजनेच्या माध्यमातून सरकारकडून महिलांना स्वतःचा उद्योग धंदा सुरु करण्यासाठी कर्ज उपलब्ध करून दिले जाते.
राज्यातील बहुतांश महिला या सुशिक्षित असून देखील पुरेशा भांडवल अभावी स्वतःचा उद्योग सुरू करू शकत नाहीत. अशा इच्छुक महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी व त्यांना भांडवल उभे करण्यासाठी, या योजनेची सुरुवात करण्यात आली.
महिलांकडे समाजाचा बघण्याचा दृष्टिकोन हा बहुतेक वेळा तितक्या प्रमाणात चांगला राहिलेला नाही. त्यामुळे बहुतांश बँका व वित्त पुरवठा  करणाऱ्या संस्था,या महिला उद्योजकांना कर्ज देण्यास टाळाटाळ करतात. त्यामुळे अशा महिलांचे आपल्या स्वतःचा उद्योग सुरू करण्याचे स्वप्न ही स्वप्नच राहून जाते. त्यासाठी शासनाने सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या माध्यमातून महिला बचत गट योजनेची सुरुवात करण्याचा एक महत्वपूर्ण निर्णय घेतला.
या योजनेच्या माध्यमातून महिला उद्योजकांना प्रोत्साहन व चालना देण्यासाठी कमी व्याजदरात तसेच कमी अटी – शर्तींचा वापर करून कर्ज उपलब्ध करून दिले जाते. त्यातून महिला स्वतःचा उद्योग सुरू करतील व स्वतःचा तसेच इतर महिलांच्या आर्थिक विकास करण्यास हातभार लावतील, हा या योजनेमध्ये महत्त्वाचा उद्देश आहे.

राज्यातील महिला स्वताचा लघु उद्योग सुरु करून, महिलांसाठी रोजगाराच्या नवीन संधी निर्माण करतील. त्यामुळे महिलांना रोजगाराच्या शोधार्थ इतरत्र जावे लागणार नाही. तसेच राज्यातील बेरोजगारीचे प्रमाण कमी होईल.

Mahila Bachat Gat Loan Scheme 2024 | वाचकांना नम्र विनंती |

मित्रांनो, शासनामार्फत राबवण्यात येणाऱ्या विविध योजना यांची माहिती आपण आपल्या लेखाद्वारे रोज घेत असतो. त्याचप्रमाणे आज आपण राज्य शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या महिला बचत गट शासकीय योजनेची माहिती घेणार आहोत. त्यासाठी आमचा हा लेख शेवटपर्यंत वाचा.
तसेच तुमच्या कुटुंबात किंवा आसपासच्या परिसरात ज्या कोणी महिला असतील व त्यांना स्वतःचा उद्योग सुरू करावयाचा आहे. त्यांना या योजनेची माहिती सांगा. त्यासाठी आमचा हा लेख जास्तीत जास्त गरजू महिलांपर्यंत पोहोचवा. त्यामुळे त्यांना या योजनेचा लाभ घेता येईल, ही विनंती.

योजनेचे नाव महिला बचत गट शासकीय योजना 
विभागसामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, महाराष्ट्र
लाभार्थीबचत गटातील महिला
लाभकर्ज उपलब्ध करून देणे
अर्ज करण्याची पद्धतऑफलाईन

हे देखील वाचा –

Good News | Madh Kendra Yojana 2024 | मध केंद्र योजना महाराष्ट्र | मध केंद्र सुरु करण्यासाठी 50 % अनुदान मिळणार |

रमाई आवास घरकुल योजना | Good News | Ramai Awas Yojana maharashtra 2024 | 1.5 लाख अनुदान घरासाठी मिळणार |

बालिका समृद्धी योजना महाराष्ट्र 2024 | New | Balika Samridhi Yojana In Marathi | मुलींना मिळणार प्रति महिना 1000 रुपये

बेटी बचाओ बेटी पढाओ योजना मराठी | New | Beti Bachao Beti Padhao yojana 2024 | ऑनलाईन करा अर्ज | मुलींसाठी महत्त्वाची |

 

Mahila Bachat Gat Loan Scheme 2024 | महिला बचत गट शासकीय योजनेची उद्दिष्ट्ये |

  •  ज्या सुशिक्षित महिला स्वतःचा उद्योग सुरू करण्यासाठी इच्छुक आहेत, अशा महिलांना उद्योगासाठी भांडवल उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने या योजनेची सुरुवात करण्यात आली.
  • या योजनेच्या माध्यमातून महिलांचा सामाजिक तसेच आर्थिक विकास करणे.
  • राज्यात वाढत जाणाऱ्या बेरोजगारीचे प्रमाण कमी करून, महिलांना रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने महिला बचत गट योजनेची सुरुवात करण्यात आली.
  • महिला बचत गट योजनेच्या माध्यमातून राज्यातील महिलांच्या जीवनमानाचा दर्जा उंचावेल.
  • या योजनेच्या माध्यमातून उद्योग सुरू करण्याची इच्छा असणाऱ्या महिलांना स्वावलंबी व आत्मनिर्भर बनवणे, हा या योजनेचा उद्देश आहे.
  • या योजनेच्या माध्यमातून राज्यातील तरुण महिला उद्योजक प्रोत्साहित होतील.
  • या योजनेमुळे समाजाचा महिलांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलेल.
  • महिला बचत गट योजनेमुळे महिला स्वयंपूर्ण व स्वतंत्र होतील.
  • महिला स्वतःच्या पायावर उभे राहून, आपले अस्तित्व निर्माण करतील.
  • ज्या महिलांनी स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करण्याच्या उद्देशाने, एखादा उद्योग सुरू केला असेल,तर त्या उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी शासनाकडून महिला बचत गट योजनेची सुरुवात करण्यात आली.

 

Mahila Bachat Gat Loan Scheme 2024 | महिला बचत गट शासकीय योजनेची वैशिष्ट्ये |

  • महाराष्ट्र शासनाकडून राज्यातील महिलांच्या विकासासाठी महिला बचत गट शासकीय योजनेची सुरुवात करण्यात आली.
  • राज्यातील महिलांनी सुरू केलेल्या लघु उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी ही योजना महत्वपूर्ण आहे.
  • महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून या योजनेची सुरुवात करण्यात आली.
  • या योजनेमुळे राज्यातील महिलांचा आर्थिक व सामाजिक विकास करून, त्यांना समाजात मनाचे स्थान मिळवून देण्यास मदत होईल.
  • या योजनेसाठी अर्ज करण्याची पद्धत अत्यंत सोपी ठेवण्यात आली आहे. त्यामुळे महिलांना कोणत्याही समस्यांचा सामना करावा लागणार नाही.
  • या योजनेच्या माध्यमातून आर्थिक भांडवल उपलब्ध झाल्याने महिलांचा आत्मविश्वास वाढण्यास मदत होईल.
  • महिला बचत गट योजनेच्या माध्यमातून कमी व्याजदरात कर्जपुरवठा झाल्याने महिला उद्योजकांना कोणाकडून जास्त व्याजदराने कर्ज घ्यावे लागणार नाही.
  • राज्य शासनाकडून महिलांना चार टक्के व्याजदराने कर्ज उपलब्ध होते.
  • तसेच या योजनेअंतर्गत प्राप्त झालेल्या कर्जाच्या परतफेरीचा कालावधी हा राज्य शासनाकडून तीन वर्षाचा ठरवण्यात आला आहे. त्यामुळे महिला उद्योजकांना पुरेसा वेळ मिळतो.
  • या योजनेमुळे लघु उद्योग सुरू केल्याने महिला उद्योजकांना आर्थिक पाठबळ मिळून त्यांच्या उत्पन्नात वाढ होईल.

 

Mahila Bachat Gat Loan Scheme 2024 | महिला बचत गट शासकीय योजनेचे लाभार्थी |

महाराष्ट्र राज्यातील सर्व बचत गटातील महिला सदस्य या योजनेच्या लाभार्थी आहेत.

Mahila Bachat Gat Loan Scheme 2024 | महिला बचत गट शासकीय योजने अंतर्गत दिले जाणारे कर्ज व व्याजदर |

  • राज्यातील महिलांना स्वतःचा लघु उद्योग सुरू करून देण्यासाठी शासनामार्फत पाच ते वीस लाखापर्यंतचे कर्ज महिला उद्योजकांना पुरविले जाते.
  • बचत गटांसाठी देण्यात येणाऱ्या कर्जासाठी चार टक्के व्याजदर शासनाकडून निश्चित केला गेला आहे.

Mahila Bachat Gat Loan Scheme 2024 | महिला बचत गट शासकीय योजनेचे फायदे |

  1.  महिला बचत गट योजना अंतर्गत दिले जाणारे कर्ज पाच टक्के राज्य महामंडळाकडून व 95 टक्के राष्ट्रीय महामंडळाकडून दिले जाते.
  2. या योजनेअंतर्गत शहरी व ग्रामीण भागातील महिलांना लाभ दिला जातो.
  3. या योजनेमुळे महिलांच्या आर्थिक उत्पन्नात वाढवून त्या स्वतंत्र होतील.
  4. शासकीय महिला बचत गट योजनेमुळे महिलांचे जीवनमान सुधारण्यास मदत मिळेल.
  5. या योजनेअंतर्गत उपलब्ध झालेल्या कर्जपुरवठामुळे महिला उद्योजकांना प्रोत्साहन मिळेल.
  6. या योजनेमुळे राज्यातील महिलांचे जीवनमान सुधारेल.
  7. महिलांच्या जीवनमानाचा स्तर उंचावून त्या स्वावलंबी बनतील.
  8. आर्थिक दृष्ट्या गरीब व मागास कुटुंबातील महिलांना या योजनेअंतर्गत कर्ज पुरवठा केला जातो.

Mahila Bachat Gat Loan Scheme 2024 | महिला बचत गट शासकिय योजनेसाठी पात्रता |

महिला बचत गट शासकीय योजनेसाठी अर्ज करणारे अर्जदार महिलाही महाराष्ट्र राज्याचे असणे आवश्यक आहे.

Mahila Bachat Gat Loan Scheme 2024 | महिला बचत गट शासकिय योजनेचे नियम व आटी |

  •  या योजनेअंतर्गत राज्यातील फक्त महीलांन चा लाभ दिला जातो, पुरुषानं नाही.
  •  या योजनेअंतर्गत दारिद्र्य रेषेखालील महिलांना लाभ दिला जाईल.
  • ग्रामीण भागातील महिलांसाठी वार्षिक उत्पन्नाचे  98,000/- हजार रुपये तर, शहरी भागासाठी वार्षिक उत्पन्न एक लाख 20,000 हजार रुपये असणे आवश्यक आहे.
  • ज्या महिलांनी बचत गट स्थापन करून दोन वर्षे होऊन गेले आहेत. त्यांनाच या योजनेअंतर्गत कर्जाचा लाभ दिला जाईल.
  • या बचत गट शासकीय योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलेचे वय 18 ते 50 च्या दरम्यान असणे आवश्यक आहे.
  • या योजनेअंतर्गत महिलांना जास्तीत जास्त वीस लाखापर्यंत कर्ज उपलब्ध करून दिले जाते.
  • तसेच ही महिला बचत गटाचा सभासद असणे आवश्यक आहे.
  • एखाद्या महिलेस या योजनेअंतर्गत कर्ज मिळाल्यास मिळाल्याच्या तारखेपासून चार महिन्याच्या आत त्या महिलेने कर्जाचा उपयोग करणे अनिवार्य आहे.
  • या योजनेच्या अर्जासोबत बचत गटातील सर्व महिलांच्या नावांची यादी जोडणे गरजेचे आहे.
  • अर्ज सोबत बचत गटाच्या मासिक उत्पन्नाचा तपशील जोडणे आवश्यक आहे.
  •  बचत गटाच्या बँक खात्यामध्ये किमान दहा हजार रुपये रक्कम शिल्लक असणे आवश्यक आहे.

Mahila Bachat Gat Loan Scheme 2024 | महिला बचत गट योजना आवश्यक कागदपत्रे |

  1. आधार कार्ड
  2. रेशन कार्ड
  3. मतदान ओळखपत्र
  4. बँक पासबुक
  5. उत्पन्नाचा दाखला
  6. रहिवासी दाखला
  7. मोबाईल नंबर
  8. ईमेल आयडी
  9. पासपोर्ट साईज फोटो
  10. व्यवसायासाठी परवाना असल्याचे प्रमाणपत्र
  11. जागेचा पुरावा
  12. व्यवसाय प्रकल्पाच्या खर्चाचे अंदाजपत्रक

Mahila Bachat Gat Loan Scheme 2024 | महिला बचत गट योजना अंतर्गत अर्ज रद्द होण्याची कारणे |

  •  अर्जदार व्यक्तीने अर्जात खोटी अथवा चुकीची माहिती भरली असल्यास अर्ज रद्द होतो.
  • अर्जदार महिलेने यापूर्वी केंद्र व राज्य शासनाच्या कोणत्या योजनेअंतर्गत कर्ज घेतलेले असल्यास त्या महिलेचा अर्ज रद्द होतो.
  • अर्जदार महिला साठ वर्षाच्या वरील असल्यास त्या व्यक्तीचा अर्ज रद्द केला जातो.
  • अर्जदार महिला इतर कोणत्याहि बँकेचे थकबाकीदार असल्यास त्या महिलेचा अर्ज रद्द होतो.
  •  अर्जदार महिलेने दोन अर्ज केल्यास त्या महिलेचा अर्ज रद्द केला जातो.

 

Mahila Bachat Gat Loan Scheme 2024 | महिला बचत गट योजनेसाठी अर्ज करण्याची पद्धत |

  1. प्रथम आपणाला आपल्या जवळच्या जिल्हा कार्यालयातील सामाजिक न्याय व विशेष विभागात जाऊन या योजनेचा अर्ज घ्यावा लागेल.
  2. अथवा शासनाच्या अधिकृत वेबसाईटवरून शासकीय समृद्धी बचत गट योजनेचा अर्ज डाऊनलोड करावा लागेल.
  3. नंतर तो अर्ज योग्य व अचूक भरावा.
  4. अर्जात विचारलेले सर्व माहिती बरोबर असल्याचे खात्री करून घ्यावी.
  5. त्यानंतर अर्जासोबत आवश्यक कागदपत्रांच्या सत्यप्रत जोडाव्यात.
  6. नंतर तो अर्ज कार्यालयात जमा करावा.
  7. जमा केलेल्या अर्जाची पोच पावती घ्यावी.
  8. अशाप्रकारे तुमची ऑफलाईन अर्ज करण्याची प्रोसेस पूर्ण होईल.

 

Mahila Bachat Gat Loan Scheme 2024 |

महिला बचत गट योजना शासकीय अधिकृत website CLICK HERE

महिला बचत गट योजना FORM CLICK HERE

2 thoughts on “महिला बचत गट कर्ज योजना महाराष्ट्र | Good News | Mahila Bachat Gat Loan Scheme 2024 | नोंदणी सुरु |”

Leave a Comment