पंडित दीनदयाळ उपाध्याय स्वयंम योजना 2024 | Good News | Pandit Dindayal Upadhyay Swayam Yojana | मिळणार 43000/- रुपये भत्ता |

Table of Contents

Pandit Dindayal Upadhyay Swayam Yojana | पंडित दीनदयाळ उपाध्याय स्वयंम योजना 2024 |

Pandit Dindayal Upadhyay Swayam Yojana
Educashion scheme in marathi
maha govt scheme
pandit dindayal upadhyay yojana maharashtra
pandit dindayal upadhyay swqayam yojana onlain form

Pandit Dindayal Upadhyay Swayam Yojana |

नमस्कार मित्रांनो, आपल्या देशात केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून वेगवेगळ्या योजना सुरू करून समाजातील प्रत्येक घटकाचा  आर्थिक व सामाजिक विकास केला जातो. केंद्र शासनामार्फत वेगवेगळ्या राज्यात या योजनेचे अंमलबजावणी केली जाते, तर राज्य शासनामार्फत राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात या योजना राबवल्या जातात.
प्रत्येक योजनेमध्ये विशेष उद्दिष्ट ठेवलेले असते ते उद्दिष्ट साध्य करण्यासाठी शासन स्तरावरून निधी पुरविला जातो व त्याची कारवाई करण्याचे काम कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून केले जाते.
समाजातील प्रत्येक घटक हा या योजनेचा केंद्रबिंदू असतो. त्याच अनुषंगाने योजना राबवल्या जातात. त्यामध्ये शेतकरी वर्ग, कामगार वर्ग, महिला, ज्येष्ठ नागरिक, बालके व शालेय विद्यार्थी तसेच समाजातील आर्थिक दुर्बल घटक या सर्वांसाठी या योजनांची अंमलबजावणी केली जाते.
त्याचप्रमाणे राज्यातील अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व इतर मागास प्रवर्ग तसेच आर्थिक दृष्ट्या मागास व दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य पुरवण्याचे उद्देशाने राज्य शासनाकडून एका नवीन योजनेची सुरुवात करण्यात आली. ती योजना म्हणजे ” पंडित दीनदयाळ उपाध्याय स्वयं योजना “ होय.
राज्यात विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्यासाठी गाव खेड्यातून शहराकडे जावे लागते. पण आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने त्यांना शहराच्या ठिकाणी असणारा खर्च परवडत नाही. त्यामुळे असे विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहतात. या सर्वांचा विचार करून राज्य शासनाने या योजनेची सुरुवात केली.
अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेताना निवासी, निर्वाह तसेच भोजनासाठी भत्ता देऊन त्यांना आर्थिक सहाय्य करून उच्च शिक्षण घेण्यासाठी हातभार लावणे, हा योजनेचा मुख्य उद्देश आहे.
घरची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने असे विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नयेत. बुद्धिमत्ता असूनही त्यांना परिस्थितीमुळे शिक्षण अर्धवट सोडावे लागू नये, यासाठी शासनाकडून दरवर्षी प्रतिविध्यार्थी भोजन, निवास व निर्वाह भत्ता देण्यात येतो. दर वर्षी प्रती विध्यार्थी 43000/- रुपये भत्ता देण्यात येतो.
राज्यात अशा विद्यार्थ्यांसाठी वस्तीग्रहाची सुरुवात करण्यात आलेले आहे. पण वस्तीग्रह प्रवेश क्षमता मर्यादित असल्याने सर्व विद्यार्थ्यांना प्रवेश मिळत नाही. त्यामुळे इतर विद्यार्थ्यांसाठी वस्तीग्रह सुरू करण्यात यावीत, अशी मागणी दरवर्षी विविध संघटनांच्या माध्यमातून होत असते. त्यासाठी या योजनेची सुरुवात करण्यात आली.

Pandit Dindayal Upadhyay Swayam Yojana | वाचकांना नम्र विनंती |

मित्रांनो, केंद्र व राज्य शासना मार्फत राज्यात सुरु करण्यात आलेल्या वेगवेगळ्या योजनांची माहिती आतापर्यंत आपण आपल्या लेखांच्या माध्यमातून घेतलेली आहेच. त्याच प्रमाणे आज आपण राज्य शासनामार्फत राज्यातील अनुसूचित जाती , अनुसूचित जमाती, आर्थिकदृष्ट्या मागास व दुर्बल घटक, या प्रवर्गातील विध्यार्थ्यांसाठी सुरु करण्यात आलेल्या पंडित दीनदयाळ उपाध्याय स्वयंम योजनेची माहिती पाहणार आहोत.

त्यासाठी तुम्ही हा लेख शेवटपर्यंत वाचा. तसेच तुमच्या परिसरात जे कोणी विध्यार्थी असतील त्यांना या योजनेची माहिती सांगा. त्यासाठी तुम्ही हा लेख जास्तीत – जास्त लोकांपर्यंत शेअर करा. त्यामुळे उच्च शिक्षण घेणाऱ्या विध्यार्थ्यांना या योजनेचा फायदा होईल. या योजनेच्या सहाय्याने त्यांचे शिक्षण पूर्ण होण्यास मदत होईल. हि विनंती.

योजनेचे नाव पंडित दीनदयाळ उपाध्याय स्वयंम योजना 
योजनेचा विभागसमाज कल्याण विभाग, महाराष्ट्र
लाभार्थीअनुसूचित जाती – जमातीतील विध्यार्थी
लाभशिक्षणासाठी आर्थिक सहाय्य
अर्ज करण्याची पद्धतऑनलाईन

 

हे देखील वाचा –

महिला बचत गट कर्ज योजना महाराष्ट्र | Good News | Mahila Bachat Gat Loan Scheme 2024 | नोंदणी सुरु |

Good News | Madh Kendra Yojana 2024 | मध केंद्र योजना महाराष्ट्र | मध केंद्र सुरु करण्यासाठी 50 % अनुदान मिळणार |

रमाई आवास घरकुल योजना | Good News | Ramai Awas Yojana maharashtra 2024 | 1.5 लाख अनुदान घरासाठी मिळणार |

बालिका समृद्धी योजना महाराष्ट्र 2024 | New | Balika Samridhi Yojana In Marathi | मुलींना मिळणार प्रति महिना 1000 रुपये

पंडित दीनदयाळ उपाध्याय स्वयंम योजनेची उद्दिष्ट्ये |

  •  राज्यातील अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्ग प्रवर्ग तसेच अल्पसंख्यांक समाजातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य करण्याच्या उद्देशाने शासनाकडून या योजनेची सुरुवात करण्यात आली.
  • या योजनेच्या माध्यमातून राज्यातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्यासाठी निर्वाह, निवास व भोजन भत्ता दिला जातो.
  • या योजनेमुळे विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेताना येणाऱ्या आर्थिक अडचणी जाणवणार नाहीत.
  • मागासवर्गीय समाजातील मुलांच्या सामाजिक व आर्थिक विकास करण्यासाठी या योजनेची मदत होणार आहे.
  • सदर योजनेच्या माध्यमातून मुलांना इतर शहरांमध्ये शिक्षण घेण्यासाठी राहता येणार आहे.
  • या योजनेच्या आर्थिक सहाय्यामुळे मुलांच्या शिक्षणात खंड पडणार नाही, तसेच त्यांना आपले शिक्षण अर्धवट सोडावे लागणार नाही.
  •  पंडित दीनदयाळ उपाध्याय योजनेच्या माध्यमातून आर्थिक सहाय्य मिळाल्याने अल्पसंख्याक समाजातील मुलांचे भविष्य उज्वल होण्यास मदत होईल.
  • या योजनेच्या सहाय्याने राज्यातील मुले सशक्त व आत्मनिर्भर बनतील. Pandit Dindayal Upadhyay Swayam Yojana |
  •  या योजनेतील आर्थिक सहाय्यामुळे या योजनेतील अल्पसंख्याक समाजातील साक्षरतेचे प्रमाण वाढेल.

पंडित दीनदयाळ उपाध्याय स्वयंम योजनेची वैशिष्ट्ये |

  1.  महाराष्ट्र शासनाने राज्यातील अनुसूचित जाती – जमाती, इतर मागासवर्ग, अल्पसंख्यांक व आर्थिकदृष्ट्या मागास व दुर्बल घटक या समाजातील विद्यार्थ्यांसाठी या योजनेची सुरुवात केली.
  2. महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग या मार्फत या योजनेची अंमलबजावणी केली जाते.
  3. पंडित दीनदयाळ उपाध्यक्ष योजनेच्या माध्यमातून राज्यातील विद्यार्थ्यांना सशक्त व आत्मनिर्भर बनवून त्यांचे जीवनमान उंचावणे.
  4. या योजनेअंतर्गत अर्ज प्रक्रिया ही अत्यंत सोपी ठेवण्यात आली आहे. ती म्हणजे ऑनलाईन असल्याने, विद्यार्थ्यांना कोणत्याही गोष्टींचा समस्यांचा सामना करावा लागणार नाही.
  5. या योजनेअंतर्गत सर्व प्रक्रिया ऑनलाईन असल्यामुळे विद्यार्थी मोबाईल द्वारे घरी बसून अर्जाची पाहणी करू शकतो. त्यामुळे त्याच्या वेळ व पैशाची बचत होते.
  6. या योजनेमुळे राज्यातील अल्पसंख्या क विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची नुकसान होणार नाही.
  7.  या योजनेअंतर्गत दिली जाणारी लाभाची रक्कम थेट विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात डीबीटी मार्फत जमा करण्यात येते.

Pandit Dindayal Upadhyay Swayam Yojana |

पंडित दीनदयाळ उपाध्याय स्वयंम योजनेअंतर्गत दिली जाणारी आर्थिक लाभाची रक्कम |

पंडित दीनदयाळ पंडित दीनदयाळ उपाध्याय योजनेअंतर्गत राज्यातील मोठ्या महानगरांमध्ये मधील शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश घेतलेल्या, तसेच शासकीय वसतिगृहामध्ये प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना निर्वाह निवास व भोजन भत्ता त्यासाठी ठराविक रक्कम दरवर्षी देण्यात येते, ती रक्कम पुढीलप्रमाणे :

     शहरे    निवास भत्ता    भोजन भत्ता    निर्वाह भत्ता    एकूण वार्षिक खर्च 
मुंबई, नागपूर, औरंगाबाद व पुणे20000/- रुपये32000/-रुपये8000/- रुपये60,000/-रुपये
महानगरपालिका क्षत्रे15000 /- रुपये28000/-रुपये8000/- रुपये51,000/- रुपये
जिल्हा ठिकाणे12000/-रुपये25000/-रुपये6000/- रुपये43,000/- रुपये

पंडित दीनदयाळ उपाध्याय स्वयंम योजनेचे लाभार्थी |

महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, मागास दुर्बल घटक, इतर मागास प्रवर्ग तसेच अल्पसंख्यांक प्रवर्ग या घटकातील विद्यार्थी या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र असतील.

 

पंडित दीनदयाळ उपाध्याय स्वयंम योजनेचे फायदे |

  • पंडित दीनदयाळ उपाध्याय योजनेअंतर्गत आर्थिक सहाय्य मिळाल्याने अनुसूचित जाती – जमाती, इतर मागास प्रवर्ग, व आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्यासाठी मदत होते.
  • या योजनेमुळे राज्यातील आदिवासी जाती – जमाती व मागासवर्ग घटक हा साक्षर होऊन सुशिक्षित बनेल.
  • या योजनेच्या आर्थिक साहाय्य मुळे या प्रवर्गातील तरुण उच्च शिक्षण घेऊन स्वतःच्या पायावर उभे राहतील.
  • तसेच स्वतःचा व कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी हे तरुण सक्षम बनतील.
  • या प्रवर्गातील तरुणांना आर्थिक सहाय्य लाभल्याने त्यांना दुसऱ्या कोणाकडे पैशासाठी अवलंबून राहावे लागणार नाही, तसेच कर्ज काढून शिक्षण घ्यावे लागणार नाही.
  • या योजनेअंतर्गत आर्थिक सहाय्य लाभल्याने या समाजातील तरुणांना आपले शिक्षण अर्धवट सोडावे लागणार नाही.
  • तसेच तरुणांना आर्थिक मदत मिळाल्याने त्यांचा आत्मविश्वास वाढवून ते अधिक जोमाने आपले शिक्षण सुरू ठेवतील.
  • या योजनेमुळे या वर्गातील तरुणांच्या जीवनमानाचा दर्जा उंचावेल.
  • तसेच त्यांच्या सामाजिक व आर्थिक विकास होण्यास मदत होईल.
  • या वर्गातील तरुण उच्च शिक्षण घेऊन नवीन नोकरीचे संधी निर्माण करतील, त्यामुळे बेरोजगारीचे प्रमाण कमी होऊन रोजगार उपलब्ध होतील.
  • हा समाज आधुनिकतेची तसेच साक्षरतेची वाट धरेल.

 

पंडित दीनदयाळ उपाध्याय स्वयंम योजनेअंतर्गत समाविष्ट महाविद्यालये |

  1. तंत्रनिकेतन
  2. आय टी आय
  3. आय आय टी
  4. वैद्यकीय महाविद्यालय
  5. अभियांत्रिकी महाविद्यालय
  6. उच्च महाविद्यालय
  7. कला महाविद्यालय
  8. तसेच ओपन युनिव्हर्सिटी आणि इतर कौशल्य आधारित अभ्यासक्रम

पंडित दीनदयाळ उपाध्याय स्वयंम योजनेचे आटी व नियम |

  •  पंडित दीनदयाळ उपाध्येय योजनेचा लाभ घेणारा अर्जदार विद्यार्थी हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे आवश्यक आहे.
  • या योजनेअंतर्गत अर्ज करणारा विद्यार्थी हा अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागास प्रवर्ग व आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील असणे आवश्यक आहे.
  • इतर प्रवर्गातील विद्यार्थ्यांना या योजनेअंतर्गत लाभ दिला जाणार नाही.
  • या योजनेचा लाभ घेणाऱ्या अर्जदार विद्यार्थ्यांची वार्षिक उत्पन्न 2.50 लाख रुपये असणे आवश्यक आहे.
  • या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार विद्यार्थी हा इतर शहरांमध्ये उच्च शिक्षण घेणारा असावा.
  • जर विद्यार्थी त्याच शहरात राहतात आणि त्यांनी तिथेच शैक्षणिक संस्थेत प्रवेश घेतलेला असल्यास त्याला या योजनेअंतर्गत लाभ दिला जाणार नाही.
  • अर्जदार विद्यार्थ्यांनी यापूर्वी शासनाच्या कोणत्या योजनेअंतर्गत लाभ घेतला असल्यास त्याला या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
  • या योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी आपले जात पडताळणी प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक आहे.
  •  या योजनेचा लाभ घेणाऱ्या विद्यार्थी हा बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
  • या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार विद्यार्थ्यांचे आधार कार्ड बँकेशी लिंक असणे गरजेचे आहे.
  • विध्यार्थ्याने ज्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेला आहे, तो दोन वर्षापेक्षा जास्त कालावधीचा असावा तरच या योजनेचा लाभ घेता येईल.
  • या योजनेचा लाभ इतर राज्यातील विद्यार्थ्यांना दिला जाणार नाही.
  • एका विद्यार्थ्याला एकाच वेळेस या योजनेअंतर्गत लाभ घेता येईल.
  • तसेच पोस्ट मॅट्रिक अभ्यासक्रमासाठी या योजनेअंतर्गत लाभ दिला जातो.
  •  या योजनेसाठी लाभ घेण्यासाठी विद्यार्थी हा मागील वर्षी 60 टक्के गुणांनी उत्तीर्ण झालेला असावा.
  • या योजनेचा लाभ कमीत कमी सात वर्षे विद्यार्थ्यांना दिला जातो.
  • अर्जदार विध्यार्थी हा जास्तीत जास्त 28 वर्षाचा असावा.
  • एखाद्या कारणाने एखाद्या विद्यार्थ्याने शिक्षण सोडल्यास त्याचा योजनेअंतर्गत दिला जाणारा लाभ बंद केला जाईल.

 

Pandit Dindayal Upadhyay Swayam Yojana | आवश्यक कागदपत्रे |

  •  आधार कार्ड
  • मतदान ओळखपत्र
  • रेशन कार्ड
  • उत्पन्नाचा दाखला
  • बँक पासबुक
  • जन्माच्या दाखला
  • मागील वर्षाचे गुणपत्रक
  • यावर्षीच्या शैक्षणिक संस्थेत प्रवेश घेतल्याचे प्रमाणपत्र
  •  पासपोर्ट साईज फोटो
  • मोबाईल नंबर
  • ईमेल आयडी
  • रहिवासी दाखला
  • शिक्षणासाठी इतर कोणत्या शहरात राहत असेल तेथील भाडेपट्टी बिल

Pandit Dindayal Upadhyay Swayam Yojana | अर्ज करण्याची पद्धत |

  • प्रथम विद्यार्थ्याला शासनाच्या अधिकृत website वर जावे लागेल.
  • तिथे password व username टाकून login करावे.
  • login केल्यानंतर योजनेचा अर्ज open होईल.
  • त्यामध्ये आवश्यक ती स्टुडन्ट डिटेल्स तसेच स्कूल डिटेल्स भरावीत.
  • त्यानंतर आवश्यक डॉक्युमेंट च्या झेरॉक्स apload  कराव्यात.
  • हे सर्व इन्फॉर्मेशन भरून झाल्यानंतर तुम्हाला prossed बटनावर click  करावयाचे आहे.
  • त्यानंतर तुमच्यासमोर एक अर्ज open होईल, त्यामध्ये तुम्हाला तुमचा तपशील भरावयाचा आहे.
  • त्यानंतर submit बटनावर click करून अर्ज submit करावा.
  • अशाप्रकारे तुमची ऑनलाईन अर्ज करण्याची प्रोसेस पूर्ण होईल.

 

Pandit Dindayal Upadhyay Swayam Yojana |

पंडित दीनदयाळ उपाध्याय स्वयंम योजना अधिकृत website click here 

1 thought on “पंडित दीनदयाळ उपाध्याय स्वयंम योजना 2024 | Good News | Pandit Dindayal Upadhyay Swayam Yojana | मिळणार 43000/- रुपये भत्ता |”

Leave a Comment