Ramai Awas Yojana maharashtra 2024 | रमाई आवास घरकुल योजना |
Ramai Awas Yojana maharashtra 2024 |
नमस्कार मित्रांनो, केंद्र व राज्य शासन देशातील व राज्यातील जनतेसाठी विविध योजनांच्या माध्यमातून सामाजिक व आर्थिक विकास करण्याचे ध्येय पूर्ण करण्यासाठी अनुदान देत असते. या अनुदानाच्या माध्यमातून राज्यातील सर्व सामान्य नागरिक आपल्या गरजा भागवण्याचा व समस्या सोडवण्याचा प्रयत्न करीत असतो.
देशात व राज्यात शासनामार्फत राबवल्या जाणाऱ्या या योजनेच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेच्या जीवनमानाचा दर्जा उंचावून, त्यांना स्वावलंबी बनवणे. हा राज्य व केंद्र शासनाचा महत्वाचा उद्देश आहे.
देशात केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून नागरिकांच्या कल्याणासाठी आणि त्याच्या भल्यासाठी वेगवेगळ्या योजना अनेक वर्षापासून राबवल्या जात आहेत. या योजना जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रातील नागरिकांसाठी व त्यांचे जीवन जगण्यासाठी महत्वपूर्ण ठरत आहेत. या योजना राबवताना वर्ग, जात किंवा धर्म काहीच विचारात न घेता या योजनांची कार्यवाही होत असते.
राज्यातील आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबातील ज्या नागरिकांना राहण्यासाठी स्वतःचे घर नाही किंवा जे कच्च्या घरात राहतात, त्यांना घर बांधून देण्यासाठी शासनाकडून एका नवीन योजनेची सुरुवात करण्यात आली. ती योजना म्हणजे ” रमाई आवास घरकुल योजना “ होय. या योजनेच्या माध्यमातून राज्यातील अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व नवबौद्ध या प्रवर्गातील नागरिकांना घर उपलब्ध करून दिले जाते.
देशात दारिद्र्य खाली असणाऱ्या लोकसंख्येचे प्रमाण मोठे आहे. त्यामुळे त्यांना राहायला स्वतःचे घर नाही, असे लोक मोठ्या प्रमाणात आढळतात. त्यामुळे ते इकडे तिकडे भटकत असतात किंवा ते रस्त्याच्या कडेला झोपड्या बांधून ही राहतात. त्यामुळे ते घर बांधण्यासाठी सक्षम नसतात. अशा लोकांचा विचार करून शासनाने या योजनेची सुरुवात केली.
या आर्थिकदृष्ट्या मागास, गरीब प्रवर्गातील लोकांना घर नसल्याने त्यांच्या मुलांच्या शिक्षणात त्यांना अडचणी येतात. तसेच मानसिक, शारीरिक त्रास सहन करावे लागतात. या अनुषंगाने या समाजातील लोकांना आर्थिक दृष्ट्या मजबूत करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासनाने रमाई घरकुल योजनेची सुरुवात केली.
राज्यात रमाई घरकुल योजनेच्या माध्यमातून अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व नवबौद्ध या प्रवर्गातील लोकांना पक्की घरे उपलब्ध करून देवून, त्यांच्या जीवनमानाचा दर्जा उंचावणे, तसेच समाजाच्या मुख्य प्रवाहात आणून सामाजिक व आर्थिक विकास करणे, हा या योजनेमागील मह्त्वपूर्ण उद्देश आहे.
Ramai Awas Yojana maharashtra 2024 | वाचकांना नम्र विनंती |
मित्रांनो केंद्र व राज्य शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती आपण आपल्या लेखाद्वारे रोज घेत असतो. त्याचप्रमाणे आज आपण अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व नवबौद्ध प्रवर्गातील लोकांसाठी शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या रमाई आवास योजनेची माहिती घेणार आहोत. त्यासाठी तुम्ही हा लेख शेवटपर्यंत वाचा.
तसेच तुमच्या परिसरात जे कोणी, या प्रवर्गातील लोक असतील, जे आपले दारिद्र्य रेषेखालील जीवन जगत असतील, ज्यांना राहायला स्वतःचे घर नाही. त्यांना या योजनेची माहिती सांगा. त्यासाठी आमचा हा लेख जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, त्यामुळे त्यांना या योजनेचा लाभ घेता येईल. हि विनंती.
योजनेचे नाव | रमाई आवास घरकुल योजना |
योजनेची सुरुवात | केंद्र शासन |
लाभार्थी | नवबौद्ध प्रवर्गातील नागरिक |
लाभ | पक्के घर बांधण्यासाठी अनुदान देणे |
उद्देश | सामाजिक व आर्थिक विकास करणे |
अर्ज करण्याची पद्धत | ऑनलाईन व ऑफलाईन |
हे देखील वाचा –
बालिका समृद्धी योजना महाराष्ट्र 2024 | New | Balika Samridhi Yojana In Marathi | मुलींना मिळणार प्रति महिना 1000 रुपये
बेटी बचाओ बेटी पढाओ योजना मराठी | New | Beti Bachao Beti Padhao yojana 2024 | ऑनलाईन करा अर्ज | मुलींसाठी महत्त्वाची |
शेतकरी योजना महाराष्ट्र 2024 | Good News | Shetkari Sarkari Yojana Maharashtra | असा करा अर्ज, मिळेल लाभ |
महाज्योती फ्री टॅबलेट योजना | Good News | Free Tablet Yojana Maharashtra 2024 | ऑनलाईन असा करा अर्ज |
Ramai Awas Yojana maharashtra 2024 | रमाई आवास घरकुल योजनेची उद्दिष्ट्ये |
- राज्यातील ज्या नागरिकांना, आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबातील लोकांना राहायला स्वतःचे घर नाही किंवा कच्च्या घरांमध्ये राहत आहेत. अशा कुटुंबांना घर उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने, या योजनेची सुरुवात करण्यात आली.
- अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व नावबौद्ध प्रवर्ग यांचा सामाजिक व आर्थिक विकास करणे.
- या योजनेच्या माध्यमातून राज्यातील आर्थिक दृष्ट्या मागास व गरीब वर्गाला सशक्त व आत्मनिर्भर बनवणे.
- रमाई आवास योजनेअंतर्गत गरीब कुटुंबाचे जीवनमान सुधारणे आणि त्यांना समाजाच्या मूळ प्रवाहात आणणे, हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.
- या योजनेअंतर्गत आर्थिक सहाय्य करून या मागास प्रवर्गातील नागरिकांना स्वावलंबी बनवणे.
- मागास प्रवर्गातील नागरिकांना आपल्या घर बांधण्यासाठी पैशासाठी कोणावर अवलंबून राहावे लागू नये, तसेच कर्ज ही काढावे लागू नये.
- रमाई आवास योजनेअंतर्गत घर बांधण्यासाठी आर्थिक सहाय्य आणि समर्थन देऊन भारत झोपडपट्टी मुक्त बनविणे.
Ramai Awas Yojana maharashtra 2024 | रमाई आवास घरकुल योजनेची वैशिष्ट्ये |
- रमाई आवास योजना महाराष्ट्र शासनाद्वारे राज्यातील अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व नवबौद्ध प्रवर्ग यांच्यासाठी राबविण्यात येणारी महत्त्वपूर्ण योजना आहे.
- या योजनेला RSY म्हणून हि ओळखले जाते. ही भारत सरकार गृहनिर्माण आणि शहरी गरीब निर्मूलन मंत्रालय द्वारे सुरू करण्यात आलेली, एक ग्रहनिर्माण योजना आहे.
- या योजनेच्या माध्यमातून ज्या व्यक्तींकडे कच्च्या स्वरूपाचे घर आहे किंवा जे रस्त्याच्या कडेला झोपडपट्टी बांधून राहतात. त्यांना पक्के घर बांधण्यासाठी आर्थिक सहाय्य दिले जाते.
- ” विधवा महिलांसाठी घरकुल योजना ” या नावाने रमाई आवास योजनेची ओळख आहे.
- या योजनेअंतर्गत सर्वसाधारण क्षेत्रासाठी 1 लाख 32 हजार रुपये अनुदान दिले जाते.
- शहरी भागासाठी 2 लाख 50 हजार रुपये घर बांधण्यासाठी दिले जातात.
- डोंगराळ भागासाठी 1 लाख 42 हजार रुपये अनुदान या योजनेअंतर्गत दिले जाते.
- तसेच शौचालय अनुदान योजनेअंतर्गत 12 हजार रुपयांची तरतूद शौचालय बांधण्यासाठी केली आहे.
- या योजनेअंतर्गत अर्ज प्रक्रिया अत्यंत सोपी असल्याने नागरिक घरबसल्या मोबाईल किंवा कम्प्युटर च्या साह्याने ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात.
- या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी व्यक्तीची उत्पन्न एक लाख पर्यंत असणे आवश्यक आहे.
- या योजनेअंतर्गत गरिब लाभार्थ्यास नारेगा अंतर्गत रोजगार उपलब्ध केला जातो. त्यासाठी लाभार्थ्या दर महिना 18000/- रुपये दिले जातात.
Ramai Awas Yojana maharashtra 2024 | रमाई आवास घरकुल योजनेचे लाभार्थी |
- राज्यातील आर्थिक दृष्ट्या मागास, कमजोर व्यक्ती ज्यांच्याजवळ स्वतःचे पक्के घर उपलब्ध नाही, अशा व्यक्तींना या योजनेचे लाभ दिला जातो.
- स्वतःचे घर बांधायला असमर्थ असणाऱ्या नागरिकांना या योजनेअंतर्गत आर्थिक सहाय्य दिले जाते.
- रमाई आवास योजनेचा लाभ अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व नव बौद्ध प्रवर्गातील व्यक्ती घेऊ शकतात.
- तसेच रस्त्याच्या कडेला झोपडपट्ट्यांमध्ये राहणाऱ्या कुटुंबांना या योजनेचा लाभ दिला जातो.
Ramai Awas Yojana maharashtra 2024 | रमाई आवास घरकुल योजनेची लाभार्थी निवडीची पध्दत |
- या योजनेअंतर्गत लाभार्थ्याची निवड 2011 च्या जात सर्वेक्षणानुसार पारदर्शकपणे केली जाते.
- त्यातून अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व बौद्ध प्रवर्गातील नागरिकांना जरा स्वतःचे घर नाही, अशांना या योजनेअंतर्गत लाभ दिला जातो.
- योजनेच्या निवड प्रक्रियेमध्ये ग्रामसभा, ग्रामपंचायत, पंचायत समिती व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा यांच्यामार्फत कारवाई करून मंजुरी देण्यात येते.
- तर शहरी भागात नगरपालिका, महानगरपालिका यांच्यामार्फत मंजुरी देण्यात येते.
- रमाई घरकुल योजनेअंतर्गत अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व बौद्ध प्रवर्गातील लाभार्थ्यांची तीन टक्के घरकुल देणे बंधनकारक केली आहे.
- या योजनेअंतर्गत जमा झालेल्या सर्व अर्जांमधून मधून लॉटरी पद्धतीने लाभार्थ्याची निवड करण्यात येते.
Ramai Awas Yojana maharashtra 2024 | रमाई आवास घरकुल योजनेचे फायदे |
- समाजातील मागास प्रवर्गातील लोकांचे आर्थिक स्थिती सुधारण्यास या योजनेमुळे मदत होईल.
- ज्या लोकांकडे कच्ची घरी आहेत किंवा झोपडपट्टी आहे, त्यांना पक्की घरी उपलब्ध होतील.
- दारिद्र रेषेखालील कुटुंबातील नागरिकांना या योजनेचा लाभ दिला जाईल.
- या योजनेमुळे राज्यातील आर्थिक दृष्ट्या करी कुटुंबाचे जीवनमान सुधारते स्वावलंबी व आत्मविश्वास बनतील.
Ramai Awas Yojana maharashtra 2024 | रमाई आवास घरकुल योजनेअंतर्गत दिला जाणारा लाभ |
- सर्वसाधारण क्षेत्रासाठी घर बांधण्यासाठी 1. 5 लाख रुपये अनुदान दिले जाते, शहरी भागासाठी 2.5 लाख रुपये ची मदत केली जाते, डोंगराळ भागासाठी 1 . 42 लाख रुपये शौचालय बांधण्यासाठी 12000 रुपये.
- तसेच नरेगा अंतर्गत उपलब्ध लाभार्थ्यास नव्वद दिवसाच्या रोजगार उपलब्ध केला जातो.
Ramai Awas Yojana maharashtra 2024 | रमाई आवास घरकुल योजनेसाठी आवश्यक पात्रता |
रमाई आवास योजनेचा लाभ घेणारा अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा मूळ रहिवासी असणे आवश्यक आहे.
Ramai Awas Yojana maharashtra 2024 | रमाई आवास घरकुल योजने नियम व आटी |
- रमाई घरकुल योजनेसाठी अर्ज करणाऱ्या व्यक्तीस महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असल्याचे प्रमाणपत्र सादर करणे गरजेचे आहे.
- राज्य बाहेरील नागरिकांना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
- अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व नवबौद्ध प्रवर्गातील व्यक्ती योजनेसाठी अर्ज करणे आवश्यक आहे.
- अर्जदार ग्रामीण भागात असल्यास त्याला एक लाख वीस हजार वार्षिक उत्पन्न आवश्यक आहे.
- तसेच अर्जदार नगरपरिषद क्षेत्रात असल्यास त्याला एक पण 50 हजार वार्षिक उत्पन्न मर्यादा ठरवण्यात आली आहे.
- तसेच अर्जदार महानगरपालिका क्षेत्रात राहत असल्यास त्याला 2 लाख रुपयांची वार्षिक मर्यादा ठेवण्यात आली आहे.
- तसेच या योजनेचा लाभ घेणारा अर्जदार कच्च्या मातीच्या घरात राहणाऱ्या किंवा झोपडपट्टीमध्ये राहणारा असावा.
- अर्जदाराने केंद्र व राज्य शासनामार्फत राबवण्यात येणाऱ्या कोणत्याही घरकुल योजनेचा लाभ या अगोदर घेतलेला नसावा.
- आज तर कुटुंबातील कोणी व्यक्तीचे सरकारी नोकरीत कार्यरत असेल, तर त्यांना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
- रमाई आवास योजनेचा लाभ घेण्यासाठी नागरिकांना ऑफलाईन किंवा ऑनलाईन अशा दोन्ही पद्धतीने अर्ज करता येणार आहे.
Ramai Awas Yojana maharashtra 2024 | रमाई आवास घरकुल योजने अंतरगत देण्यात येणारा प्राधान्यक्रम |
- जातीय दंगल तसेच आग व इतर कारणामुळे घराची मोडतोड झाल्यास मोठी घराची झालेली नुकसान.
- अनुसूचित वर्गातील पीडित जातीच्या पात्र व्यक्ती
- भूकंपामुळे घराचे नुकसान झालेले पीडित कुटुंबे
- घरात कोणीही कमावती व्यक्ती नसेल, अशा विधवा महिला
Ramai Awas Yojana maharashtra 2024 | रमाई आवास घरकुल योजने अंतर्गत अनुदान वितरण कार्यपद्धती |
- पहिला हप्ता-घराचे बांधकाम सुरू करताना 50% अनुदान लाभार्थीच्या बँक खात्यात जमा करण्यात येते.
- दुसरा हप्ता-पन्नास टक्के अनुदान निधीचा उपयोग केल्याचे प्रमाणपत्र सादर केल्यानंतर 40% अनुदान बँक खात्यात जमा करण्यात येते.
- तिसरा हप्ता-घर पूर्ण झाल्यानंतर घर पूर्ण झाल्याचा दाखला मिळाल्यानंतर उर्वरित दहा टक्के अनुदान बँक खात्यात जमा करण्यात येते.
Ramai Awas Yojana maharashtra 2024 | रमाई आवास योजना आवश्यक कागदपत्रे |
- आधार कार्ड
- मतदान कार्ड
- पॅन कार्ड
- जातीचा दाखला
- रेशन कार्ड
- विधवा असल्यास पतीची मृत्युपत्र
- पासपोर्ट साईज फोटो
- घराच्या बांधकामासाठी स्वतःच्या मालकीची जमीन असल्यास त्याचा सातबारा
- शाळेचा दाखला
- यादी कोणत्या योजनेचा लाभ न घेतल्याचे हमीपत्र
- उत्पन्नाचा दाखला
- रहिवासी दाखला
- बँक पासबुक
- मोबाईल नंबर
- ई-मेल ऍड्रेस
- 100 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर प्रतिज्ञापत्र
Ramai Awas Yojana maharashtra 2024 | रमाई आवास योजना
अर्जदार महाराष्ट्राच्या मोरे वाशिम असल्यास अर्ज रद्द केला जातो.
अर्जदार हा मागास प्रवर्गातील नसल्यास त्याचा अर्ज रद्द होत.
अर्जदार आणि अर्जदार चुकीचे तो खोटी माहिती भरल्यास अर्ज रद्द होत.
अर्थाची वार्षिक उत्पन्न निश्चित केलेल्या रकमेपेक्षा जास्त असल्यास अर्ज रद्द केला जातो.
या अगोदर कोणत्यातरी प्रशासकीय योजनेअंतर्गत घरकुलाचा लाभ घेतलेला असल्यास अर्ज रद्द होतो.
Ramai Awas Yojana maharashtra 2024 | रमाई आवास योजना ऑनलाईन अर्ज करण्याची पध्दत |
- प्रथम आपणास शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल.
- नंतर तुमच्यासमोर home page open होईल, त्यामध्ये नगरपरिषद किंवा नगरपंचायत निवडायचे आहे.
- त्यातील रमाई आवास योजनेवर क्लिक करावे लागेल.
- आता तुमच्यासमोर योजनेचा अर्ज ओपन होईल, त्यामध्ये आवश्यक ती सर्व माहिती भरायचे आहे.
- सर्व माहिती भरून झाल्यानंतर आवश्यक कागदपत्रांच्या झेरॉक्स अपलोड करायचे आहेत.
- त्यानंतर अर्ज submit करण्यासाठी submit बटनावर click करावे.
- अशाप्रकारे तुमची रमाई आवास योजनेअंतर्गत ऑनलाईन अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल.
Ramai Awas Yojana maharashtra 2024 | रमाई आवास योजना ऑफलाईन अर्ज करण्याची पद्धत |
- प्रथम आपणाला आपल्या जवळच्या ग्रामपंचायत कार्यालय, नगरपालिका कार्यालय किंवा महानगरपालिका कार्यालय जाऊन योजनेचा अर्ज घ्यावा लागेल.
- अर्जात विचारलेली सर्व माहिती योग्य व अचूक भरावी लागेल.
- त्यानंतर भरलेल्या अर्जासोबत अवश्य कागदपत्रांच्या सत्यप्रत जोडाव्या लागतील.
- त्यानंतर तो अर्ज कार्यालयात जमा करावा
- अर्ज जमा केल्याची पोच पावती घ्यावी.
- अशाप्रकारे तुमची ऑफलाईन आज प्रक्रिया पूर्ण होईल.
Ramai Awas Yojana maharashtra 2024 |
रमाई आवास योजना शासन अधिकृत website click here
1 thought on “रमाई आवास घरकुल योजना | Good News | Ramai Awas Yojana maharashtra 2024 | 1.5 लाख अनुदान घरासाठी मिळणार |”