बियाणांची विक्री ‘ साथी ‘ पोर्टलवरून |
Seed sathi portal
Sathi portal
Agriculture news
Truthful seed
Kharif season seed sathi portal
नमस्कार, Seed sathi portal राज्यातील शेतकऱ्यांकडून दरवर्षी रब्बी व खरीप हंगामामध्ये वेगवेगळ्या बियाण्यांची खरेदी होत असते, परंतु या बियाणे खरेदी-विक्रीमध्ये बनावट बियाणे, यांची विक्री न झालेले, बियाणे न उगवणे, निकृष्ट असणे, विशेषता परराज्यातून आलेले निकृष्ट बनावट बियाण्याची खरेदी – विक्री टाळण्यासाठी तसेच कृत्रिम तुटवडा भासून शेतकऱ्यांकडून चढ्या दराने किमती आकारणी या सर्व गोष्टींना आळा घालण्यासाठी केंद्र सरकारकडून साथी या संकेतस्थळाची निर्मिती करण्यात आलेली आहे. प्रमाणित बियाणांसाठी पूर्वीपासून कार्यरत असणारी ही व्यवस्था आता सत्यप्रत बियाणांसाठी सुरू करण्यात येणार आहे.
राज्य सरकार च्या कृषी विभागाने याबाबतचा एक शासन निर्णय शुक्रवारी प्रसिद्ध केला आहे. त्यानुसार केंद्र सरकारने बियाणांच्या उत्पादनापासून विक्रीपर्यंतच्या नियंत्रणासाठी ‘ साथी ‘ संकेतस्थळ विकसित केली आहे. यासाठी संकेतस्थळाची अंमलबजावणी ही दोन टप्प्यांमध्ये करण्यात येते.
यामध्ये कशा कशाचा समावेश आहे ? याची कार्यवाही कशी होते ? उद्देश काय आहेत ? याबाबतची सविस्तर माहिती आपण या लेखात पाहणार आहोत. त्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचा.
फक्त ‘ याच ‘ बांधकाम कामगारांना मिळणार 12000 रुपये निवृत्ती वेतन | कोणाला मिळणार लाभ | वाचा सविस्तर |
साथी पोर्टल कार्यवाही |
महाराष्ट्र शासनाने राज्यामध्ये सत्यप्रत बियाणे विक्री आणि वितरण प्रक्रिया करण्यासाठी साथी पोर्टलवरून करण्यास मान्यता दिलेली आहे. हंगाम खरीप 2025 पासून या पोर्टलवरून विक्री करता येणार आहे. या पोर्टलच्या माध्यमातून प्रत्येक बियाणांची या ठिकाणी सत्यता प्रत करून ती बियाणे विक्रीस उपलब्ध केले जाईल. Seed sathi portal
साथी पोर्टलच्या माध्यमातून 2023 पासून बीज प्रमाणीकरण प्रक्रिया राबवली जात आहे. कंपन्यांचे उगवण क्षमता, पायाभूत व प्रामाणिक बीज प्रक्रिया यांची तपासणी व नोंद केली जाते. खरीप हंगाम 2024 पासून कृषी विभागाने उत्पादित केलेल्या प्रमाणित बियांची देखील वितरण याच पोर्टलच्या माध्यमातून करण्यात येत आहे.
यंदाच्या खरीप हंगाम 2025 पासून सर्व क्रमाने बियांची विक्रीसाठी पोर्टलच्या माध्यमातून केली जाणार आहे. या पोर्टलच्या माध्यमातून वितरण व विक्री केल्यानंतर शेतकऱ्यांची होणारी फसवणूक कमी प्रमाणात होईल. पोर्टलवर नोंदणी केलेल्या बियाणांची शेतकऱ्यांना खरेदी करण्यासाठी उपलब्ध करून देण्यात येणारे आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची फसवणूक थांबेल व प्रत्येक बियाणांची तपासणी केल्याचे स्पष्ट दिसून येईल.
कृषी विभागाअंतर्गत कांदा चाळ अनुदान आणि ट्रॅक्टर अनुदान योजनेमध्ये दुप्पट वाढ करण्यात आली | वाचा सविस्तर |
सत्यप्रत बियाणे साथी पोर्टलवर घेण्याचे उद्देश |
- सत्यप्रत बियाणे मुख्यतः खाजगी आणि उत्पादक संस्थांमार्फत उत्पादित केलेली संशोधित वाणाची बियाणे असते.
- शेतकऱ्यांना उपलब्ध होणाऱ्या बियाण्यांमध्ये 70 ते 80 टक्के सहभाग सत्यप्रत बियाणांचा आहे.
- बियाणे वितरण प्रणाली मध्ये शोधण्या योग्यता वाढवण्यास मदत होईल. Seed sathi portal
- बियाण्यांच्या संपूर्ण प्रवासावर नियंत्रण ठेवता येते, त्यामुळे पारदर्शकता वाढले.
- बनावट कालबाह्य तसेच अनाधिकृत ज्ञानाच्या विक्रीस प्रतिबंधक घातल्याने, बियाणे व्यवसायातील अपप्रवृत्ती व गैर व्यवहारांना आळा बसेल.
- बियाणे उत्पादन कंपन्या वितरक आणि विक्रेते यांच्यातील समन्वय वाढवून त्यांचे व्यवस्थापन सोपे होईल.
- परराज्यात उत्पादित परंतु महाराष्ट्रात विक्री होणाऱ्या बियाणांवर नियंत्रण ठेवता येईल.
- यामुळे शेतकऱ्यांना योग्य व खात्रीशीर प्रतीचे बियाणे उपलब्ध होण्यास मदत होईल.
अशी असेल प्रक्रिया |
- प्रत्येक दुकानदाराला बियाण्याची विक्री करण्यासाठी साती पोर्टलवर नोंद करणे आवश्यक आहे.
- दुकानदाराला बियाणे कोणत्या डीलर करून खरेदी केली, याची देखील माहिती पोर्टलवर देणे आवश्यक आहे.
- बियाणावरील टॅग नंबर आणि बियाणांची सर्व माहिती या पोर्टलच्या माध्यमातून बिलावर नमूद करणे आवश्यक आहे.
- या पोर्टलच्या माध्यमातून कंपनीने तयार केलेले, प्रत्येक बियाणाची बॅग कोणत्या शेतकऱ्यापर्यंत विक्री झाली. असा तपशील या पोर्टलच्या माध्यमातून साठवण्यात येईल.
- ज्यामुळे कोणत्या शेतकऱ्यांना ? कोणते बियाणे ? कोणत्या दुकानदाराने विक्री केले ? याचा सर्व तपशील शेतकऱ्याकडे उपलब्ध असेल.
- या प्रकारामुळे शेतकऱ्यांची बियाणे मधून होणारी फसवणूक पूर्णतः बंद होईल.
- शेतकऱ्यांनी बियाणे खरेदी करताना या पोर्टलच्या माध्यमातून नोंदणी केलेली पावती मागणे करणे, आवश्यक आहे.