Madh Kendra Yojana 2024 | मध केंद्र योजना महाराष्ट्र |
Madh Kendra Yojana 2024 |
नमस्कार मित्रांनो, भारत हा कृषिप्रधान देश आहे. त्यामुळे 70 टक्के जनता ही शेती व्यवसाय करताना दिसून येते. हे भारतीय लोक पारंपरिक पद्धतीने शेती व्यवसाय करत आहेत. पूर्वपार चालत आलेल्या रूढी परंपरा शेती व्यवसायामध्ये अजून तशाच जोपासल्या जातात. त्यामुळे शेती व्यवसाय आर्थिक नफ्याचा न होता तोट्यात दिसून येतो.
त्यामुळे शासनामार्फत शेतकऱ्यांसाठी विविध योजनांची अंमलबजावणी करताना दिसून येते. त्या योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा सामाजिक व आर्थिक विकास करणे हा शासनाचा उद्देश असतो.
त्याचप्रमाणे शासनाकडून शेतकऱ्यांसाठी एका नाविन्यपूर्ण योजनेची सुरवात करण्यात आली आहे. ती योजना म्हणजे ” मध केंद्र अनुदान योजना “ होय. या मध केंद्र योजनेसाठी शासनाकडून 50 टक्के अनुदान शेतकऱ्यांना दिले जाते. हा व्यवसाय शेतीला जोडधंदा म्हणून न करता शेतकऱ्यांनी तो प्रमुख व्यवसाय म्हणून करावा हा शासनाचा उद्देश आहे.
या योजनेमुळे राज्यात ग्रामीण भागामध्ये रोजगार निर्मितीत वाढ होईल. तसेच मध पेट्या शेतात, बागेत, फळबागायतीत ठेवल्याने मत माशांच्या परागीभवनामुळे व पिकांच्या शेतीच्या उत्पन्नात 5 ते 45% वाढ होऊन याचे शक्यता असते. हे वाढ मधविक्री किंवा मेन विक्री पेक्षा दहा ते पंधरा टक्क्यांनी जास्त असते.
मध केंद्र योजना हा एक वैशिष्ट्यपूर्ण उद्योग आहे. त्यामध्ये मध संकलन, पराग संकलन, मधमाशा वसाहती यांची वाढ करणे, यांचा समावेश होतो. तसेच ज्या ठिकाणी फळ पिकांचे निर्मिती, पूर्ण निसर्ग क्षेत्र असलेली जंगले आहेत, अशा ठिकाणी हा व्यवसाय करण्यास अधिक वाव मिळतो.
ग्रामीण भागातील रोजगार निर्मितीला चालना देण्यासाठी हा उद्योग अत्यंत महत्वपूर्ण असा आहे. त्यामुळे अनुदान तत्वावर सर्व राज्यात ही योजना सुरू करण्यात आली आहे.
मधमाशी पालन व्यवसाय करण्यासाठी त्यासाठी लागणारे मध काढण्याचे यंत्र, लोखंडे स्टॅन्ड व इतर सर्व साहित्याची आवश्यकता असते व हे साहित्य खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांकडे पुरेसे भांडवल उपलब्ध नसते. त्यासाठी शासनाकडून 50 टक्के अनुदान उपलब्ध करून दिले जाते.
उर्वरित पन्नास टक्के खर्च हा पात्र शेतकऱ्यांनी स्वखर्चतून करावयाचा आहे. तसेच मुद्रा कर्ज योजनेतूनही कर्ज उपलब्ध करून दिले जाते.
महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग महामंडळामार्फत राज्यात मध केंद्र योजनेची सुरुवात करण्यात आली. तसेच महाबळेश्वर येथे मध संचालनालय सुरू करण्यात आले आहे. आज प्रत्येक जिल्ह्यात जिल्ह्याच्या ठिकाणी मंडळाचे कार्यालय असून, ही योजना खाते व ग्रामोद्योग महामंडळामार्फत राबवण्यात येते.
Madh Kendra Yojana 2024 | वाचकांना नम्र विनंती |
मित्रांनो, शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या वेगवेगळ्या योजनांची माहिती आतापर्यंत आपण घेतलीच आहे. त्यामध्ये शेतकरी कष्टकरी आणि बांधकाम कामगार, शालेय विद्यार्थी, महिला व मुली या सर्वांसाठीच्या वेगवेगळ्या योजना आपण पाहिले आहेत. त्याचप्रमाणे आज आपण शेतकऱ्यांसाठी सुरू करण्यात आलेल्या योजनेची माहिती पाहणार आहोत.
त्यासाठी तुम्ही हा लेख शेवटपर्यंत वाचा. तसेच तुमच्या परिसरात जे कोणी शेतकरी असतील, त्यांना शेतीशी सोबत जोडधंदा करावयाचा आहे. त्यांना या योजनेची माहिती सांगा. त्यासाठी आमचा लेख जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. त्यामुळे त्यांना मध केंद्र आपल्या शेतात सुरू करता येईल, ही विनंती.
योजनेचे नाव | मध केंद्र अनुदान योजना |
विभाग | खाडी व ग्राम उद्योग |
लाभार्थी | राज्यातील सर्व नागरिक |
लाभ | 50 % अनुदान उपलब्ध करून देणे |
उद्देश | मधमाशी केंद्र उभारणीसाठी प्रोत्साहन देणे |
अर्ज करण्याची पद्धत | ऑफलाईन |
हे देखील वाचा –
रमाई आवास घरकुल योजना | Good News | Ramai Awas Yojana maharashtra 2024 | 1.5 लाख अनुदान घरासाठी मिळणार |
बालिका समृद्धी योजना महाराष्ट्र 2024 | New | Balika Samridhi Yojana In Marathi | मुलींना मिळणार प्रति महिना 1000 रुपये
बेटी बचाओ बेटी पढाओ योजना मराठी | New | Beti Bachao Beti Padhao yojana 2024 | ऑनलाईन करा अर्ज | मुलींसाठी महत्त्वाची |
हातमाग विणकर मोफत वीज योजना महाराष्ट्र | New | Hatmag Vinkar Mofat Vij Yojana 2024 | मिळणार 200 युनिट प्रतिमाह मोफत वीज |
Madh Kendra Yojana 2024 | मध केंद्र योजना महाराष्ट्र ची उद्दिष्ट्ये |
- राज्यातील शेतकऱ्यांचा मध केंद्रातून मधमाशी वसाहत निर्माण करून, तसेच राज्यात मध व्यवसाय यासाठी प्रशिक्षित मधपाळ निर्माण करण्याच्या उद्देशाने, या योजनेची सुरुवात करण्यात आली.
- मध केंद्र योजनेतून शेतकऱ्याचा आर्थिक व सामाजिक विकास करणे.
- शेतकऱ्यांच्या आर्थिक उत्पन्नात वाढ करून त्यांच्या जीवनमानाचा दर्जा उंचावणे.
- शेतीसोबत जोडधंदा म्हणून केंद्र सुरू केल्याने त्यांच्या आर्थिक उत्पन्नात वाढ होणार आहे.
- या योजनेमुळे शेतकरी सशक्त व आत्मनिर्भर बनतील.
- ग्रामीण भागातील बेरोजगारीचे प्रमाण खूप कमी करून रोजगार निर्मितीला चालना देणे.
- तसेच शेतकऱ्यांना मध केंद्र सुरू करण्यासाठी प्रोत्साहित करून अनुदान देणे.
Madh Kendra Yojana 2024 | मध केंद्र योजना महाराष्ट्र ची वैशिष्ट्ये |
- महाराष्ट्र राज्यात शासनामार्फत मध केंद्र योजनेची सुरुवात करण्यात आली.
- जिल्हास्तरावर या योजनेचे अंमलबजावणी हि महाराष्ट्र शासनाच्या खादी व ग्रामोद्योग विकास महामंडळामार्फत केली जाते.
- मध केंद्र योजनेचा लाभ राज्यातील सर्व जाती धर्मातील शेतकऱ्यांसाठी देण्यात येणार आहे.
- या योजनेचा लाभ राज्यातील तरुण तसेच तरुणीही घेऊ शकतात.
- या योजनेचे अर्ज प्रक्रिया अत्यंत सोपी ठेवण्यात आली आहे, त्यामुळे नागरिकांना कोणत्याही समस्येचा सामना करावा लागणार नाही.
- मध केंद्र योजनेअंतर्गत दिली जाणारी लाभाची रक्कम हे डीबीटी मार्फत थेट लाभार्थ्याच्या खात्यात जमा केली जाते.
Madh Kendra Yojana 2024 | मध केंद्र योजना महाराष्ट्र साठी लाभार्थी |
महाराष्ट्र राज्यातील सर्व इच्छुक नागरिक व सर्व जाती, धर्माचे शेतकरी या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र आहेत.
Madh Kendra Yojana 2024 | मध केंद्र योजना महाराष्ट्रचे फायदे |
- मध केंद्रे योजनेअंतर्गत मध केंद्र सुरू करण्यासाठी महाराष्ट्र शासनाकडून राज्यातील नागरिकांना 50 टक्के अनुदान स्वरूपात रक्कम दिली जाते.
- या योजनेमुळे राज्यातील बेरोजगारीचे प्रमाण कमी होऊन रोजगार उपलब्ध होईल.
- या योजनेअंतर्गत मध केंद्र चालवण्यासाठी मध पाळ प्रशिक्षण हे दिले जाते, तसेच जिल्हास्तरावर मार्गदर्शनही दिले जाते.
- या योजनेच्या माध्यमातून तरुणांना रोजगार उपलब्ध झाल्याने, ते स्वतःच्या पायावर उभे राहून आत्मनिर्भर होतील.
- या योजनेमुळे नागरिकांच्या जीवनमानाचा दर्जा उंचावणार आहे.
- मध केंद्र योजनेच्या साह्याने शेतकरी स्वतःच्या उत्पन्नात वाढ करू शकतील.
- मध केंद्र योजनेच्या साह्याने शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावून, त्यांचे भविष्य उज्वल बनवण्यासाठी योजना महत्वपूर्ण ठरणार आहे.
Madh Kendra Yojana 2024 | मध केंद्र योजना अंतर्गत केंद्रचालक मधपाळची कामे |
- राज्यात शासनामार्फत सुरु करण्यात आलेले मधपालन केंद्र प्रभावीपणे चालवणे.
- मध केंद्र योजनेच्या लाभार्थ्यांना प्रशिक्षण देणे, मार्गदर्शन करणे, आशी विविध कामे केंद्र चालक मत करीत असतात.
- प्रजनन आधारित माशांच्या पुरेशा वसाहती निर्माण करणे.
- मधमाशा पालन केंद्र सुरू करणाऱ्या तरुण तरुणींना लाभार्थ्यांना प्रशिक्षण देणे.
- मधमाशांच्या वसाहती मंडळ ठरवून दिले किमतीमध्ये लाभार्थ्यांना उपलब्ध करून देणे.
- या योजनेचा लाभ घेतलेला सर्व नागरिकांना मार्गदर्शन व साह्य करणे.
- या लाभार्थ्यांच्या केंद्रांमधून तयार झालेल्या मधाचे संकलन करणे.
Madh Kendra Yojana 2024 | मध केंद्र योजनेसाठी नियम व आटी |
- महाराष्ट्र राज्यातील मूळ रहिवाशी नागरिकांनाच मध केंद्र योजनेचा लाभ दिला जाईल.
- राज्याबाहेरील नागरिकांना या योजनेअंतर्गत लाभ दिला जाणार नाही.
- अर्जदाराने या पूर्वी केंद्र व राज्य शासनाच्या कोणत्या योजनेअंतर्गत मधमाशी पालन योजनेचा लाभ घेतलेला नसावा.
- एका घरातील एकाच सदस्यास या योजनेचा लाभ दिला जाईल.
Madh Kendra Yojana 2024 | मध केंद्र योजने अंतर्गत वैयक्तिक केंद्र चालकासाठी आटी |
- या योजनेसाठीचा अर्जदार हा किमान दहावी पास असणे आवश्यक आहे.
- अर्जदाराचे वय 21 वर्षे पूर्ण असणे आवश्यक आहे.
- अर्जदार व्यक्तीकडे स्वतःच्या नावे एक एकर जमीन किंवा भाडेतत्त्वावर घेतलेली असावी.
- त्याच्याकडे नवीन लाभार्थ्यांना प्रशिक्षण देण्याची सुविधा व क्षमता असावी.
Madh Kendra Yojana 2024 | संस्था चालकांसाठी पात्रतेच्या आटी |
- मध केंद्र योजने अंतर्गत अर्ज करणारी संस्था हि नोंदणीकृत असावी.
- त्या संस्थेच्या नावे मध केंद्र सुरु करण्यासाठी स्वतःची अथवा भाडेतत्त्वावर घेतलेली दहा वर्षासाठी एक एकर शेत जमीन आवश्यक आहे.
- या संस्थेकडे प्रशिक्षण केंद्रासाठी एक हजार चौरस फूट जागेची इमारत असावे.
- ही संस्था ही मग केंद्र चालक व शेतकरी यांच्यामधील दुवा म्हणून काम करणारी असावी, त्यामुळे त्यांच्या अडीअडचणी समजून घेणे, माहिती गोळा करणे व मार्गदर्शन करणे, इत्यादी कामे करावी लागतात.
Madh Kendra Yojana 2024 | मध पाळ लाभार्थीच्या निवडीसाठी आटी व निकष |
- या योजनेचा अर्जदार साक्षर असावा.
- तसेच त्या व्यक्तीकडे स्वतःचे शेतजमीन असावे.
- अर्जदार मध पाळ चे वय १८ पेक्षा जास्त असावे.
- तसेच त्याने अर्ज आणि संस्थेच्या मान्यता प्रशिक्षण केंद्रात दहा दिवसाचे प्रशिक्षण घेणे अनिवार्य राहील.
Madh Kendra Yojana 2024 | या योजने अंतर्गत निवड झालेल्या व्यक्तीस / संस्थ्येस देण्यात येणारे प्रशिक्षण |
मध केंद्र योजने अंतर्गत निवड झालेल्या व्यक्तीस / संस्थेच्या सभासदास मध संचनालय, महाबळेश्वर येथे प्रशिक्षण देण्यात येथे, ते पुढीलप्रमाणे :
प्रशिक्षणाचे नाव | कालावधी / दिवस |
मध पाळ प्रशिक्षण | 10 दिवस |
प्रगतशील मध पाळ प्रशिक्षण | 20 दिवस |
मधमाशा पालन छंद व्यवसाय प्रशिक्षण | 5 दिवस |
Madh Kendra Yojana 2024 | मध केंद्र योजने अंतर्गत आवश्यक कागदपत्रे |
- आधार कार्ड
- मतदान कार्ड
- रेशन कार्ड
- रहिवाशी दाखला
- उत्पनाचा दाखला
- मधमाशी पालन प्रशिक्षण प्रमाणपत्र
- बँक पास बुक
- मोबाईल नंबर
- जन्माचा दाखला
- शाळेचा दाखला
Madh Kendra Yojana 2024 | मध केंद्र योजने अंतर्गत अर्ज रद्द होण्याची कारणे |
- मध केंद्र योजनेचा अर्जदार महाराष्ट्र राज्याचा मूळ रहिवाशी नसल्याल त्याचा अर्ज रद्द होतो.
- अर्जदार व्यक्तीने अर्जात खोटी अथवा चुकीची माहिती भरल्यास अर्ज रद्द होतो.
- यापूर्वी अर्जदाराने शासनाच्या कोणत्याही योजने अंतर्गत मधमाशी पालन योजनेचा लाभ घेतलेला असल्यास, त्याचा अर्ज रद्द होतो.
Madh Kendra Yojana 2024 | मध केंद्र योजने अंतर्गत अर्ज करण्याची पध्दत |
- प्रथम आपणाला जवळच्या जिल्हा कार्यालयातील खाडी व ग्रामुद्योग विभागात जावे लागेल.
- तिथून आपणाला मध केंद्र अनुदान योजनेचा अर्ज घ्यावा लागेल.
- त्या अर्जात विचारलेली सर्व माहिती योग्य व अचूक भरावी लागेल.
- त्यानंतर अर्जासोबत आवश्यक कागदपत्रांच्या सत्यप्रत जोडाव्या लागतील.
- नंतर तो अर्ज कार्यालयात जमा करावा लागेल.
- अशा प्रकारे तुमची ऑफलाईन अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल.
1 thought on “Good News | Madh Kendra Yojana 2024 | मध केंद्र योजना महाराष्ट्र | मध केंद्र सुरु करण्यासाठी 50 % अनुदान मिळणार |”