Mahila Samman Yojana In Marathi 2024 | महिला सन्मान योजना महाराष्ट्र |
Mahila Samman Yojana In Marathi 2024 |
नमस्कार मित्रानो, महाराष्ट्र शासन आपल्या कल्याणासाठी वेगवेगळ्या अंतरावर वेगवेगळ्या योजनांच्या अंमलबजावणी करत असते. त्या सर्व योजना राबवण्यासाठी राज्य व केंद्र शासन यांच्यामार्फत संयुक्तपणे अनुदान दिले जाते. ही अनुदान रक्कम छोट्या छोट्या स्वरुपात करून प्रत्येकाच्या खात्यावर दिली जाते.
त्यातून समाजातील प्रत्येक नागरिक आपपल्या पद्धतीने आपल्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करीत असतो. त्यातून आपला सामाजिक व आर्थिक विकास करण्याचा प्रयत्न करतो. या समाजातील प्रत्येक नागरिकाचा जीवनमानाचा दर्जा उंचावणे व त्याला आपला उदरनिर्वाह करण्यासाठी हातभार लावणे, हाच या योजना मागे महत्त्वाचा उद्देश असतो.
राज्य शासनामार्फत राबवल्या जाणाऱ्या योजना वेगवेगळ्या घटकांसाठी वेगवेगळ्या टप्प्यावरती राबवल्या जात असतात. त्यामध्ये समाजातील शेतकरी, बांधकाम कामगार, आर्थिक दृष्ट्या मागास, अनुसूचित जाती – जमाती प्रवर्ग, शेतकरी महिला, विधवा महिला, ज्येष्ठ नागरिक, अपंग व्यक्ती, अंगणवाडी सेविका, नवजात बालके, मुली व शालेय विद्यार्थी प्रत्येकासाठी योजनांची अंमलबजावणी होत असते.
महाराष्ट्र शासनामार्फत आपल्या राज्यातील महिलांच्या आरोग्यासाठी उन्नतीसाठी तसेच त्यांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी सतत प्रयत्नशील असते. त्यासाठी राज्य शासन वेळोवेळी विविध योजनांची अंमलबजावणी करत असते.त्याचप्रमाणे आज आपण महाराष्ट्र अर्थसंकल्प 2023 मध्ये महिलांसाठी एका नाविन्यपूर्ण योजनेची सुरुवात करण्यात आली. त्या योजनेचे नाव ” महिला सन्मान योजना महाराष्ट्र “ आहे. राज्यात सुरू करण्यात आलेला महिला सन्मान योजनेअंतर्गत राज्यातील सर्व महिलांना एसटीच्या सर्व प्रकारच्या बसेस मध्ये तिकीट दरक 50 टक्के सवलत दिली आहे. त्यामुळे महिला आता 50% दरात प्रवास करू शकतात.
2023 24 च्या अर्थसंकल्पामध्ये महिलांसाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या सर्व प्रकारच्या बस प्रवास भाड्यामध्ये ही सवलत लागू करण्यात आली आहे. सदर योजनेची घोषणा 17 मार्च 2023 पासून महिलांना राज्याच्या हद्दी पर्यंत प्रवास भाड्यामध्ये सूट देण्याचे मान्य करते.
Mahila Samman Yojana In Marathi 2024 | वाचकांना नम्र विनंती |
मित्रांनो, राज्य शासनामार्फत राबवल्या जाणाऱ्या प्रत्येक योजनेची माहिती आतापर्यंत आपण घेतली आहे. त्या योजना प्रत्येक घटकासाठी आहेत. हे अप्नला माहित आहे. त्याचा लाभ पण आपण घेत आहोत. त्याचप्रमाणे आज आपण राज्य शासनामार्फत महिलांसाठी चालवल्या जाणाऱ्या एका महत्त्वपूर्ण योजनेची माहिती घेत आहोत. ती योजना म्हणजे महिला सन्मान योजना होय.
या योजनेअंतर्गत राज्यातील सर्व महिलांना एसटीच्या सर्व प्रकारच्या बसेस मध्ये 50% सवलत दिली गेली आहे. त्यामुळे तुम्ही हा लेख शेवटपर्यंत वाचा. तसेच तुमच्या परिवारातील व परिसरातील ज्या कोणी महिला असतील, त्यांना या योजनेची माहिती सांगा व त्यांना या योजनेचा लाभ घेण्यास मदत करा. ही विनंती.
योजनेचे नाव | महिला सन्मान योजना महाराष्ट्र |
योजनेची सुरुवात | 17 मार्च 2023 महाराष्ट्र |
विभाग | महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ |
लाभार्थी | राज्यातील सर्व महिला |
लाभ | ST प्रवासात 50 % सूट |
उद्देश | महिलांना स्वतान्र व स्वावलंबी बनविणे |
अर्ज करण्याची पध्दत | अर्ज करण्याची गरज नाही |
हे देखील वाचा –
कन्यादान योजना महाराष्ट्र | Good News |Kanyadan Yojana Maharashtra 2024 | मुलीच्या लग्नाची चिंता सोडा | सरकार देत आहे मदत |
युवकांना व्यावसायिक प्रशिक्षण योजना महाराष्ट्र | Good News | Vyavsayik Prashikshan Yojana 2024 | नोंदणी सुरु |
विधवा पेन्शन योजना 2024 | Good News | Vidhwa Pension Yojana Maharashtra | ऑनलाईन अर्ज सुरु |
Mahila Samman Yojana In Marathi 2024 | महिला सन्मान योजना महाराष्ट्रची उद्दिष्ट्ये |
- महाराष्ट्र राज्यातील सर्व जाती धर्माच्या महिलांना एसटीमध्ये प्रवास करण्यासाठी आकर्षित करण्याच्या उद्देशाने तसेच प्रोत्साहित करण्यासाठी महाराष्ट्र शासनाकडून महिला सन्मान योजनेची सुरुवात करण्यात आली.
- महिला सन्मान योजनेच्या माध्यमातून महिलांना स्वतंत्र व आत्मनिर्भर बनवण्याच्या उद्देशाने या योजनेची सुरुवात करण्यात आली.
- महिला सन्मान योजनेच्या माध्यमातून महिलांचा सामाजिक व आर्थिक विकास करणे.
- राज्यातील महिलांचे जीवनमानचा दर्जा सुधारणे हा या योजनेचा उद्देश आहे.
- महिलांना रोजच्या धावपळीच्या आयुष्यातून थोडाफार विरंगळा मिळावा या उद्देशाने या योजनेची सुरुवात झाली.
Mahila Samman Yojana In Marathi 2024 | महिला सन्मान योजना महाराष्ट्र ची वैशिष्ट्ये |
- महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळा द्वारे राज्यातील सर्व महिलांसाठी महिला सन्मान योजनेचे खास सुरुवात करण्यात आली.
- राज्यातील सर्व महिलांना परिवहन महामंडळाच्या सर्व प्रकारच्या बसेस मध्ये 50% सूट तिकीट दरामध्ये दिल्याने सवलती मध्ये प्रवास करता येणार आहे.
- महिला सन्मान योजनेच्या माध्यमातून राज्यातील महिलांचा सामाजिक तसेच आर्थिक विकास करून त्यांना स्वतंत्र व आत्मनिर्भर बनवण्यासाठी ही योजना महत्वपूर्ण ठरणार आहे.
- या योजनेसाठी महिलांना कुठल्याही प्रकारचे अर्ज करण्याची आवश्यकता नाही, तसेच कोणत्याही कार्यालयात जाण्याची गरज पडणार नाही.
- या योजनेमुळे महिलांच्या वेळ व पैशाची बचत होणार आहे.
- महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळामार्फत सुरू करण्यात आलेली एक महत्त्वपूर्ण योजना आहे. की ज्या योजनेमध्ये सर्व जाती-धर्माच्या महिलांना 50% सल्ला दरात प्रवेश दिला जात आहे. त्यासाठी कुठल्याही प्रवर्गाची आट ठेवण्यात आलेली नाही.
- या योजनेच्या माध्यमातून राज्यातील महिलांचे जीवनमानाचा दर्जा उंचावून, त्यांना स्वच्छंदी जीवन जगण्यास सहकार्य करणे.
Mahila Samman Yojana In Marathi 2024 | महिलांना पुढील गाड्यांमध्ये सवलत दिली जाणार आहे |
- महाराष्ट्र राज्याच्या राज्यमार्ग परिवहन महामंडळाच्या सर्व प्रकारच्या बसेस मध्ये सर्व जाती – धर्माच्या स्त्रियांना 50 टक्के सवलत लागू करण्यात आली आहे.
- त्यामध्ये साधी व शिवशाही, शिवनेरी, रात्र आणि मिनी, निमआराम, साधी आणि वातानुकूलित, अश्वमेध या सर्व बसेस मध्ये ही सवलत लागू आहे.
- तसेच महामंडळाच्या ताब्यात पुढे ज्या गाड्या नवीन गाड्या उपलब्ध होतील, त्यामध्येही ही सवलत दिली जाणार आहे.
Mahila Samman Yojana | 50% सवलतीबाबत निर्देश प्राप्त झाले त्यानुसार पुढील सूचना देण्यात आल्या |
- सर्व महिलांना परिवहन महामंडळाच्या सर्व प्रकारच्या साधी, निमआरामी, शिवनेरी, शिवशाही अशा सर्व बसेस मध्ये 50% सवलती दिनांक 17 मार्च 2013 पासून देण्याचा निर्णय करण्यात आला.
- ही योजना भविष्यात राज्य शासनाने राज्य परिवहन महामंडळाच्या ताब्यामध्ये ज्या काही नवीन बसेस येतील त्या सर्व प्रकारच्या बसेस करताही लागू राहील.
- ” महिला सन्मान योजना ” या नावाने ही योजना ओळखली जाईल.
- महिला सन्मान योजना ही योजना शहरी वाहतुकीस अनुज्ञय नाही.
- महिला सन्मान योजना अंतर्गत दिले जाणारे सर्व सवलत सर्व महिलांना महाराष्ट्र राज्याच्या हद्दीपर्यंतच राहील.
- ज्या महिलांनी बसेसच्या प्रवासाचे आगाऊ आरक्षण तिकीट घेतलेले आहे, अशा महिलांना 50 टक्के सवलतीचा परतावा मिळणार नाही.
- राज्यातील जे नागरिक प्रवासी संगणकीय आरक्षण सुविधा द्वारे, विंडो बुकिंग द्वारे, ऑनलाईन, मोबाईल ॲप द्वारे आरक्षणासाठी तिकीट घेतील, अशा प्रवाशांकडून प्रति सेवा प्रकारनुसार लागू असलेल्या आरक्षण आकार वसूल करण्यात येईल.
- तसेच ” अमृत ज्येष्ठ नागरिक योजने ” अंतर्गत 75 वर्षांवरील महिलांसाठी सूचनेनुसार शंभर टक्के सवलत अनुज्ञय राहील.
- वयाच्या 65 ते 75 गटातील महिलांना महिला सन्मान योजना उपलब्ध राहील.
- पाच ते बारा वयोगटातील मुलींना यापूर्वी प्रमाणे 50% सवलत चालूच राहील.
Mahila Samman Yojana In Marathi 2024 | महिला सन्मान योजनेचे लाभार्थी |
राज्यातील सर्व जाती धर्मातील सर्व महिला या महिला सन्मान योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी आहेत.
Mahila Samman Yojana In Marathi 2024 | महिला सन्मान योजनेचे फायदे |
- महिला सन्मान योजनेच्या माध्यमातून राज्यातील सर्व महिलांना एसटीच्या सर्व बसेस मध्ये 50% सवलत दरात प्रवास राज्यात कुठे प्रवास करता येणार आहे.
- या योजनेमुळे राज्यातील महिला स्वतंत्र आत्मनिर्भर बनतील.
- राज्यातील महिलांचा सामाजिक व आर्थिक विकास होण्याच्या या योजनेमुळे मदत होणार आहे.
- राज्यातील महिलांचे जीवनमान सुधारण्यासाठी महिला सन्मान योजनेचा हातभार होईल.
- राज्यातील महिला स्वच्छंदीपणे जगण्यास व इतरत्र एसटीने प्रवास करण्यास प्रोत्साहित होतील.
- बसेस मध्ये पन्नास टक्के सवलत मिळाल्याने महिला राज्यभर प्रवास करू शकतील.
Mahila Samman Yojana In Marathi 2024 | महिला सन्मान योजनेची पात्रता |
महिला सन्मान योजनेचा लाभ घेण्यासाठी राज्यातील सर्व महिला या महाराष्ट्र राज्याच्या मूळ रहिवासी असणे आवश्यक आहे.
Mahila Samman Yojana In Marathi 2024 | महिला सन्मान योजनेचे नियम व आटी |
- महिला सन्मान योजनेचा लाभ फक्त महाराष्ट्र राज्यातीलच मूळ रहिवाशी महिलांन दिला जाईल.
- महाराष्ट्र राज्य बाहेरील महिलांना महिला सन्मान योजना अंतर्गत लाभ दिला जाणार नाही.
- महिला सन्मान योजना अंतर्गत महिलांना एस टी मध्ये 10 टक्के सवलत दिली जाणार नाही, तिकिटाची किमान 50 टक्के रक्कम भरणे सर्व महिलांना बंधनकारक आहे.
- या योजनेअंतर्गत महिलांना महाराष्ट्र राज्य बाहेर प्रवास करता येणार नाही.
- वय वर्ष 75 वर्षावरील महिलांना तिकीट दरामध्ये शंभर टक्के सवलत दिली जाईल.
- सर्व जाती धर्मातील, प्रवर्गातील महिलांसाठी या महिला सन्मान योजनेअंतर्गत लाभ दिला जाईल.
- महिला सन्मान योजनेचा लाभ शहरी वाहतुकीसाठी दिला जाणार नाही.
Mahila Samman Yojana In Marathi 2024 | महिला सन्मान योजना आवश्यक कागदपत्रे |
- महिला सन्मान योजनेचा लाभ घेण्यासाठी राज्यातील महिलांना कोणत्याही कागदपत्रांची आवश्यकता नाही.
- जर महिला 75 वर्षांवरील असेल तर तिच्या आधार कार्ड किंवा ज्येष्ठ नागरिक कार्ड प्रवासादरम्यान सोबत आणणे बंधनकारक आहे.
Mahila Samman Yojana In Marathi 2024 | महिला सन्मान योजना महाराष्ट्र |
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ अधिकृत website click here
1 thought on “महिला सन्मान योजना महाराष्ट्र | Good News | Mahila Samman Yojana In Marathi 2024 | ST प्रवासात 50 % सूट |”