Good News | डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजना | Dr. Babasaheb Ambedkar Krushi Swavalamban Yojana 2024 |

Table of Contents

Dr. Babasaheb Ambedkar Krushi Swavalamban Yojana 2024 | डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजना |

Dr. Babasaheb Ambedkar Krushi Swavlamban Yojana 2024
krushi swavalambam yojana marathi
krushi yojana in maharashtra
maha shasan scheme
Dr. babasaheb Ambedkar krushi swavalamban yojana onlain form

Dr. Babasaheb Ambedkar Krushi Swavalamban Yojana 2024 |

नमस्कार मित्रांनो,  राज्यात केंद्र व राज्य शासनाच्या वतीने दरवर्षी वेगवेगळ्या योजनांची अंमलबजावणी केली जाते. या योजनांच्या माध्यमातून राज्यातील जनतेचा सामाजिक व आर्थिक विकास करणे, हा उद्देश्य या योजनांमागे असतो. प्रत्येक योजना हि लोकांच्या हिताची व कल्याणकारी असते.
या योजना राबवण्यासाठी शासनाकडून निधी पुरवला जातो. तसेच तिचे योग्य वितरण करण्याचे काम शासकीय कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून केले जाते. आपल्या देशातील जनतेला निरोगी आयुष्य प्रदान करण्याच्या उद्देशाने, तसेच त्यांचा विकास घडवून आणण्यासाठी या योजनांची सुरुवात केली जाते.
भारत कृषीप्रधान देश आहे. त्यामुळे भारतातील 70 टक्के जनता ही शेती करताना दिसून येते. शेती हा भारतीय नागरिकांचा पारंपारिक व्यवसाय आहे आणि शेती व्यवसाय हा त्यांच्या उदरनिर्वाहा चे साधन आहे. त्यामुळे जगाचा पोशिंदा असणाऱ्या व पारंपारिक पद्धतीने शेती व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी शासनामार्फत, त्यांची सामाजिक व आर्थिक सुधारण्यासाठी एका नवीन योजनेची सुरुवात करण्यात आली. ती योजना म्हणजे ” डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना “ होय.
या योजनेच्या माध्यमातून राज्यातील अनुसूचित जाती – जमाती व नवबौद्ध प्रवर्ग, घटकातील बांधवांची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी तसेच त्यांच्या व्यवसायाला बळकटी देण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेच्या माध्यमातून आर्थिक साह्य दिले जाते.
राज्य सरकारकडून या योजनेच्या माध्यमातून या अनुसूचित जाती – जमाती व नवबौद्ध बांधवांचे हित जोपासण्याचा प्रयत्न केला जातो. त्यातून त्यांचे कृषी उत्पन्न वाढवण्याचाही प्रयत्न होतो.

महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत 5 जानेवारी 2017 चे शासन निर्णय यातून या योजनेची सुरुवात करण्यात आली. या योजनेअंतर्गत अनुसूचित जाती – जमाती व नवबौद्ध समाजातील नागरिकांचा सामाजिक विकास करून त्यांच्या जीवनमानाचा दर्जा उंचावण्यासाठी 500 ते अडीच लाख रुपये पर्यंत कर्ज उपलब्ध करून दिले जाते.
या योजनेमुळे त्यांची आर्थिक स्थिती मजबूत होऊन, त्यांच्या जीवन जगण्यासाठी बळकटी निर्माण होते हे या योजनेचे मुख्य वैशिष्ट्य आहे.
राज्यातील अनुसूचित जाती जमाती व नाव बौद्ध घटकातील नागरिकांना शेती व्यवसायातील शेती संबंधित अवजारे, पिक संरक्षण अवजारे, जुने वीर दुरुस्ती, पाईपलाईन ,पंपसेट, शेतीची अवजारे, ठिबक सिंचन, तुषार सिंचन  नवीन विहीर, शेततळेआणि विज जोडणी, कृषी सौर पंप इत्यादींच्या कामासाठी शंभर टक्के अनुदान दिले जाते.

Dr. Babasaheb Ambedkar Krushi Swavalamban Yojana 2024 | वाचकांना नम्र विनंती |

मित्रांनो, राज्य शासनामार्फत तसेच कृषी विभागामार्फत सुरू करण्यात आलेल्या सर्व शेतकरी योजनांची माहिती आतापर्यंत आपण घेतलीच आहे. त्याचप्रमाणे आज आपण शासनामार्फत सुरू करण्यात आलेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेची माहिती घेणार आहोत. त्यासाठी तुम्ही हा लेख शेवटपर्यंत वाचा.
तसेच ही योजना राज्यातील अनुसूचित  जाती – जमाती व नावबौद्ध घटकातील, प्रवर्गातील नागरिकांसाठी सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे तुमच्या परिसरात जे कोणी या प्रवर्गातील शेतकरी नागरिक असतील. त्यांना या योजनेची माहिती सांगा. त्यासाठी आमचा हा लेख जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. त्यामुळे या मागास दुर्बल घटकाचा आर्थिक दृष्ट्या विकास होऊन, त्यांच्या जीवन मानाचा दर्जा उंचावेल, ही विनंती.

योजनेचे नाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना 
योजनेची सुरुवातमहाराष्ट्र राज्य
लाभार्थीअनुसूचित जाती – जमाती व नवबौद्ध घटकातील नागरिकांना
लाभ500  ते अडीच लाख रुपये पर्यंत कर्ज
अर्ज करण्याची पद्धतऑनलाईन /ऑफलाईन

हे देखील वाचा –

कृषी संजीवनी हॉरटीकल्चर योजना |New | Krushi Sanjivani Horticulture yojana maharashra 2024 | दिव्यांग शेतकऱ्यांसाठी अल्प दरात कर्ज उपलब्ध |

मोफत सायकल वाटप योजना महाराष्ट्र | New | Cycle Vatap Yojana 2024 In Marathi | शालेय मुलीना मिळणार सायकल |

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले अर्थसहाय्य योजना | Good News | Savitribai Phule Scholarship Yojana Maharashtra 2024 |

पंडित दीनदयाळ उपाध्याय स्वयंम योजना 2024 | Good News | Pandit Dindayal Upadhyay Swayam Yojana | मिळणार 43000/- रुपये भत्ता |

 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजनेची उद्दिष्ट्ये |

  •  राज्यातील अनुसूचित जाती – जमाती व नवबौद्ध घटकातील नागरिकांना आर्थिक सहाय्य करून, त्यांना स्वावलंबी बनवणे,हे या कृषी स्वावलंबन योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे. Dr. Babasaheb Ambedkar Krushi Swavalamban Yojana 2024 |
  • कृषी स्वावलंबन योजनेच्या माध्यमातून या प्रवर्गातील नागरिकांच्या सामाजिक व आर्थिक विकास करणे.
  • डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन या योजनेच्या माध्यमातून आर्थिक साह्य केल्याने राज्यातील नागरिक शेतीकडे आकर्षित होतील.
  • कृषी स्वावलंबन योजनेमुळे आर्थिक सहाय्य लाभल्याने मागास प्रवर्गातील नागरिक सशक्त होऊन आत्मनिर्भर बनतील.
  • या योजनेच्या माध्यमातून शेती क्षेत्राचा विकास करून, शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावणे.
  • राज्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या कमी करणे.
  •  या योजनेच्या माध्यमातून शेती क्षेत्राचे उत्पादक क्षमता वाढवून, शेती क्षेत्रामध्ये पाण्याचा मोबलक स्त्रोत निर्माण करणे, हे महत्वाचे उद्दिष्ट्य आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजनेची वैशिष्ट्ये |

  • महाराष्ट्र शासनामार्फत चालवण्यात येणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेच्या माध्यमातून राज्यातील शेतकऱ्यांच्या शेतीतील  उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न केले जाणार आहेत.
  • राज्यातील अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व नावबौद्ध घटकातील नागरिकांचा या योजनेच्या माध्यमातून विकास होणार.
  • महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत ही योजना सुरू करण्यात आली.
  • डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेच्या माध्यमातून राज्यातील सर्व शेतकरी वर्गाला शेती करण्यासाठी 5 लाखापर्यंत चे अनुदान दिले जाते. Dr. Babasaheb Ambedkar Krushi Swavalamban Yojana 2024 |
  • या आर्थिक सहाय्यातून शेतकरी आपल्या शेतीतील विविध अवजारे खरेदी तसेच सिंचन सुविधा इत्यादी कामे करू शकतात.
  • या योजनेसाठी नागरिक दोन प्रकारे म्हणजेच ऑनलाईन किंवा ऑफलाईन अर्ज करू शकतात. त्यामुळे शेतकऱ्याच्या वेळ व पैशाची बचत होणार आहे.
  • कृषी स्वावलंबन या योजनेत अंतर्गत दिली जाणारी आर्थिक लाभाची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यात डीबीटीमार्फत जमा केली जाते.
  • अनुसूचित जाती – जमाती व नवबौद्ध प्रवर्गासाठी सुरू करण्यात आलेली ही एक महत्त्वपूर्ण योजना आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजनेअंतर्गत समाविष्ट केलेल्या कृषी कार्याची यादी |

  1. नवीन विहिरी साठी अनुदान
  2. जुनी विहीर दुरुस्ती अनुदान
  3. शेततळे प्लास्टिक अस्तरीकरण अनुदान
  4. तुषार सिंचन अनुदान
  5. ठिबक सिंचन संच बसवण्यासाठी अनुदान
  6. शेती अवजारे खरेदीसाठी अनुदान
  7.  बोरवेल अनुदान
  8.  पी व्ही सी पाईप अनुदान
  9. पंप संच किट अनुदान
  10. परसबाग अनुदान

डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजनेअंतर्गत दिले जाणारे अनुदान |

 

योजनेतील समाविष्ट घटक दिले जाणारे अनुदान 
तुषार सिंचन25,000/-
ठिबक सिंचन संच50,000/-
पी व्ही सी पाईप30,000/-
जुनी विहीर दुरुस्ती50,000/-
नवीन विहीर2,50,000/-
शेततळे प्लास्टिक अस्तरीकरण1,00,000/-
परसबाग अनुदान500/-
इनवेल बोरिंग20,000/-
पंप संच20,000/-

डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजनेची कार्यपद्धती |

नवीन विहीर:

  • अर्जदाराच्या शेतात प्रत्यक्ष विहीर असल्यास याचा लाभ मिळणार नाही.
  • नवीन विहीर घ्यावयाच्या स्थळापासून 500 मीटर अंतरामध्ये दुसरी विहीर नसावी, अन्यथा या योजनेचा लाभ मिळणार नाही.
  • विहिरीचे काम पूर्ण झाल्यानंतर लाभार्थ्याच्या आधार संलग्न बँक खात्यात या योजनेअंतर्गत दिले जाणारे अनुदान जमा केली जाते.

जुनी विहीर दुरुस्ती :

  • या योजनेचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्याच्या 7/12 उताऱ्यावर जुन्या विहिरीची नोंद असावे.
  • जुन्या विहिरीच्या पाहणी मध्ये तांत्रिकदृष्ट्या अयोग्य असल्यास, त्याला या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
  • वीर दुरुस्तीसाठी अंदाजपत्रकापेक्षा जास्त रक्कम लागल्यास ती लाभार्थ्याला स्वतः भरावी लागेल.

इनवेल बोअरिंग:

  • या योजनेचा लाभ घेणाऱ्याला अर्जदाराने खर्चाचे अंदाजपत्रक व तांत्रिक निकषानुसार ठिकाणची भूजल सर्वेक्षण योग्यता प्राप्त करून घ्यावे.
  • इनवेल बोअरिंग ची मागणी केल्यास 20,000/- रुपयांच्या अनुदान देण्यात येते.

शेततळ्याचे प्लास्टिक अस्तरीकरण:

  • या घटकाचे अंदाजपत्रक निश्चित झाल्यानंतर 30 दिवसाच्या आत शेततळ्याचे प्लास्टिक अस्तरीकरण पूर्ण करणे बंधनकारक आहे.
  • त्याचा अहवाल सादर केल्यापासून पंधरा दिवसाच्या आत अनुदानाची रक्कम जमा केली जाते.

सोलर पंप:

  • ज्या शेतकऱ्यांना महावितरण कंपनीकडून पंप मंजूर असेल त्याला भारतीय 36 हजार रुपये अनुदानाची रक्कम महावितरण कंपनीला दिली जाईल.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजनेचे फायदे |

  • राज्यातील आर्थिक दृष्ट्या मागास, दुर्बल घटकातील शेतकऱ्यांच्या विकास करण्यासाठी या योजनेची सुरुवात करण्यात आली.
  • महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाकडून अनुसूचित जाती – जमाती व नवबौद्ध प्रवर्गासाठी, घटकासाठी ही योजना सुरू झाली.
  • या योजनेतून राज्यातील नागरिकांना आर्थिक सहाय्य केल्याने त्यांचा सामाजिक विकास होणार आहे.
  • कृषी स्वावलंबन योजने मुळे योजनेमुळे मागास प्रवर्गातील नागरिक सशक्त व आत्मनिर्भर बनतील.
  • या योजनेअंतर्गत सिंचन योजनेसाठी अनुदान मिळाल्याने नागरिकांच्या शेतीसाठीच्या पाण्याचा प्रश्न मिटेल.
  • शेती क्षेत्रात सिंचनामुळे उत्पन्नात वाढ झाल्याने, त्यांच्या जीवनमानाचा दर्जा उंचावेल.
  • डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेच्या सहाय्याने आत्मनिर्भर होतील.
  • या प्रवर्गातील शेतकऱ्यांना कोणाकडे पैशासाठी हात पसरावे लागणार नाहीत, तसेच कर्जही काढावे लागणार नाही.
  • कृषी स्वावलंबन योजनेमुळे राज्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या कमी होतील.

 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजनेसाठी आवश्यक पात्रता |

  1. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेच्या अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा मूळ रहिवासी असावा.
  2. या योजनेचा अर्जदार हा अनुसूचित जाती जमाती व नवबौद्ध घटकातील असावा.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजनेचे नियम व आटी |

  • डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेतील अर्जदार शेतकऱ्याचे स्वतःचे नावे शेतजमीन असावी.
  • तसेच या योजनेतील अर्जदर हा 15 वर्ष महाराष्ट्र राज्यात वास्तव्यास असलेला असावा.
  • तो अर्जदार हा मागास प्रवर्गातील असावा.
  • कृषी स्वावलंबन योजनेचा अर्जदार हा दारिद्र्यरेषेखालील असावा.
  • या अर्जदाराची वार्षिक उत्पन्न हे 5 लाखापेक्षा कमी असावे.
  • तसेच त्याने वार्षिक उत्पन्नाचा दाखला व सातबारा आठ अ उतारा सादर करणे आवश्यक आहे.
  • या योजनेचा लाभ एका कुटुंबातील एकाच व्यक्तीला दिला जाईल.
  • कृषी स्वावलंबन योजने अंतर्गत ज्या अर्जदाराने विहिरीसाठी अर्ज केला आहे, त्या अर्जदाराच्या उताऱ्यात पूर्वी विहिरीची नोंदणी झालेली नसावी.
  • या अर्जार्‍याने यापूर्वी केंद्र व राज्य शासनाच्या कोणत्या योजनेअंतर्गत लाभ घेतलेला असल्यास, त्या व्यक्तीला कृषी स्वावलंबन योजनेअंतर्गत लाभ दिला जाणार नाही. Dr. Babasaheb Ambedkar Krushi Swavalamban Yojana 2024 |
  • शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या नागरिकांना या योजनेचा लाभ मिळणार नाही.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे |

  1. आधार कार्ड
  2. मतदान ओळखपत्र
  3. रेशन कार्ड
  4. उत्पन्नाचा दाखला
  5. 7/12  व 8 अ उतारा
  6. अनुसूचित जाती – जमाती व नव बौद्ध प्रवर्गातील असल्याचे जात पडताळणी प्रमाणपत्र
  7. ग्रामपंचायत ठराव
  8. मोबाईल नंबर
  9. बँक पासबुक
  10. पासपोर्ट साईज फोटो
  11. ईमेल आयडी
  12. अर्जदाराचे प्रतिज्ञापत्र

Dr. Babasaheb Ambedkar Krushi Swavalamban Yojana 2024 | ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत |

  •  प्रथम अर्जदाराला  शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल.
  • त्यानंतर तिथे password व username टाकून login करावे.
  • त्यानंतर आपल्यासमोर एक मुखपृष्ठ open होईल.
  • त्यावर रजिस्ट्रेशन करावे त्यानंतर login करावे.
  • नंतर तुमच्यासमोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेचा अर्ज open होईल.
  • या अर्ज योग्य व अचूक रित्या भरावा.
  • नंतर या अर्जासोबत आवश्यक कागदपत्रांच्या झेरॉक्स apload करावेत.
  • यानंतर तुम्हाला 24 रुपये अर्ज नोंदणी शुल्क भरावयाचे आहे.
  • त्यानंतर submit पर्याय दिसेल त्यावर आपला अर्ज submit करावा.
  • अशाप्रकारे तुमची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजने अंतर्गत ऑनलाइन अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल.

Dr. Babasaheb Ambedkar Krushi Swavalamban Yojana 2024 | ऑफलाईन अर्ज करण्याची पद्धत |

  • प्रथम आपणाला जिल्हा कार्यालयातील कृषी विभागात जावे लागेल.
  • तिथून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेचा अर्ज घ्यावा.
  • तो अर्ज व्यवस्थित वाचून योग्य व अचूक भरावा.
  • या अर्जासोबत अवश्य कागदपत्रांच्या झेरॉक्स कॉपी जोडाव्यात.
  • नंतर तो अर्ज कार्यालयात जमा करावा.
  • अर्ज जमा केल्याची पोहोच पावती घ्यावी.
  • अशाप्रकारे ऑफलाईन अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल.

 

Dr. Babasaheb Ambedkar Krushi Swavalamban Yojana 2024 |

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना शासनाची अधिकृत website CLICK HERE

1 thought on “Good News | डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजना | Dr. Babasaheb Ambedkar Krushi Swavalamban Yojana 2024 |”

Leave a Comment