Cycle Vatap Yojana 2024 In Marathi | मोफत सायकल वाटप योजना महाराष्ट्र |
Cycle Vatap Yojana 2024 In Marathi |
नमस्कार मित्रांनो, राज्यात केंद्र व राज्य शासनाच्या वतीने दरवर्षी वेगवेगळ्या योजनांची अंमलबजावणी केली जाते. या योजनांच्या माध्यमातून राज्यातील जनतेचा सामाजिक व आर्थिक विकास करणे, हा उद्देश्य योजनांमध्ये असतो. प्रत्येक योजना लोकांच्या हिताची व कल्याणकारी असते.
या योजना राबवण्यासाठी शासनाकडून निधी पुरवला जातो. तसेच तिचे योग्य वितरण करण्याचे काम शासकीय कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून केले जाते. आपल्या देशातील जनतेला निरोगी आयुष्य प्रदान करण्याच्या उद्देशाने, तसेच त्यांचा विकास घडवून आणण्यासाठी, या योजना राबविल्या जातात.
आपल्या समाजात होणारी स्त्री-पुरुष विषमता लक्षात घेऊन शासनाकडून त्यामध्ये समानता आणण्यासाठी, मुलींना शिक्षणासाठी मदत करण्याच्या उद्देशाने एका योजनेची सुरुवात करण्यात आली. ती योजना म्हणजे ” सायकल वाटप योजना महाराष्ट्र “ होय.
या सर्व गोष्टींचा विचार करून राज्य शासनाकडून सायकल योजनेची सुरुवात करण्यात आली. या योजनेच्या माध्यमातून राज्यातील दुर्गम भागातील शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थिनींना सायकल घेण्यासाठी आर्थिक सहाय्य केले जाते.
राज्यातील बहुतांश कुटुंबे दारिद्र रेषेखाली जीवन जगत असतात. घरची परिस्थिती बेताची असल्याने तसेच उत्पन्नाचे कोणतेही स्थायी साधन नसल्याने, कुटुंबांमध्ये मुलांप्रमाणे मुलींना शिक्षण दिले जात नाही. तर काही कुटुंबांमध्ये मुलांप्रमाणे मुलींना शिक्षण देण्याची इच्छा असते.
परंतु कुटुंबाचे आर्थिक स्थिती हालाखीची असल्याने ते मुलींना शिक्षण देण्यासाठी असमर्थ ठरतात. त्यामुळे मुलींची प्रगती होत नाही. तसेच त्यांचा सामाजिक व आर्थिक विकास करून घेण्यास संधी मिळत नाही. त्यामुळे मुलींचे लहान वयात लग्न केले जाते व मुलींच्या विकासात अडथळा निर्माण होतो.
राज्यातील अत्यंत दुर्गम भागात, जिथे रस्त्याची सुविधा नाही. तसेच वाहतुकीचे व्यवस्थाही नाही. अशा भागातील मुलींना शाळेत जाण्यासाठी, तसेच शाळेतून घरी येण्यासाठी अतिशय कष्ट घ्यावे लागतात. तसेच उन्हात, पावसात व वाऱ्यात खूप दूरवर अंतर चालत जावे लागते. त्यामुळे भरपूर वेळ वाया जातो आणि त्यामुळेच मुली शिक्षण सोडून देतात.
ज्या पालकांकडे आपल्या मुलींना सायकल घेण्यासाठी पुरेसे पैसे नाहीत. त्यांच्यासाठी या योजनेची सुरुवात करण्यात आली. या सर्व गोष्टींचा विचार करून महाराष्ट्र शासनाने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या घर व शाळेमधील अंतर 5 किलोमीटर आहे. अशा ठिकाणच्या मुलींना सायकल खरेदी करण्यासाठी आर्थिक सहाय्य करण्याच्या उद्देशाने योजनेची सुरुवात केली.
Cycle Vatap Yojana 2024 In Marathi | वाचकांना नम्र विनंती |
मित्रांनो, आपल्या राज्यात केंद्र व राज्य शासनाच्या मार्फत सुरू करण्यात येणाऱ्या, राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती आपण रोजच आपल्या लेखांच्या माध्यमातून घेत असतो. या योजना आपल्या हिताच्या असतात. त्याचप्रमाणे आज मुलींच्या शिक्षणासाठी राज्य शासनाकडून राबविण्यात येणाऱ्या मोफत सायकल वाटप योजनेची माहिती आपण घेणार आहोत. त्यासाठी तुम्ही हा लेख शेवटपर्यंत वाचा.
तसेच तुमच्या परिसरात ज्या कोणी मुली पायपीट करून आपल्या शाळेपर्यंत जात असतील, ज्यांना शाळेत ये-जा करण्यासाठी कोणतीच वाहतुकीची सुविधा उपलब्ध नाही. अशा मुलींना या योजनेची माहिती सांगा. त्यासाठी आमचा हा लेख जास्तीत जास्त मुलींपर्यंत शेअर करा. त्यामुळे त्यांना सायकल योजनेचा लाभ घेता येईल व आपले शिक्षण अर्थवट सोडावे लागणार नाही, ही विनंती.Cycle Vatap Yojana 2024 In Marathi |
योजनेचे नाव | सायकल वाटप योजना महाराष्ट्र |
विभाग | नियोजन विभाग, महाराष्ट्र |
लाभार्थी | राज्यातील गरजू विध्यार्थिनी |
लाभ | 5000/- रुपयांचे आर्थिक सहाय्य |
अर्ज करण्याची पद्धत | ऑफलाईन |
हे देखील वाचा –
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले अर्थसहाय्य योजना | Good News | Savitribai Phule Scholarship Yojana Maharashtra 2024 |
पंडित दीनदयाळ उपाध्याय स्वयंम योजना 2024 | Good News | Pandit Dindayal Upadhyay Swayam Yojana | मिळणार 43000/- रुपये भत्ता |
महिला बचत गट कर्ज योजना महाराष्ट्र | Good News | Mahila Bachat Gat Loan Scheme 2024 | नोंदणी सुरु |
रमाई आवास घरकुल योजना | Good News | Ramai Awas Yojana maharashtra 2024 | 1.5 लाख अनुदान घरासाठी मिळणार |
मोफत सायकल वाटप योजना महाराष्ट्र ची उद्दिष्ट्ये |
- राज्यातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल व मागास घटकातील मुलींना घरातून शाळेत व शाळेतून घरी येण्यासाठी सायकल देण्याच्या उद्देशाने या योजनेची सुरुवात करण्यात आली.
- मुलींचे शिक्षणासाठी होणारी दूरवरची पायपीट कमी व्हावी व त्यांचे शिक्षण अर्धवट सोडावी लागू नये, या उद्देशाने या योजनेची सुरुवात करण्यात आली.
- मुलींना शाळेत जाण्यासाठी प्रोत्साहित करण्याच्या उद्देशाने, ही मोफत सायकल वाटप योजना सुरू झाली.
- शिक्षणातील मुलींचे प्रमाण कमी होऊ नये, तसेच त्यांना वेळेचे बचत करता यावी, यासाठी महाराष्ट्र शासनाकडून दुर्गम भागात राहणाऱ्या मुलींसाठी ही योजना सुरू केली.
- या योजनेमुळे मुलींना शिक्षण अर्धवट सोडावे लागणार नाही, तसेच त्यांचे शिक्षणातील प्रमाण वाढवून, त्या स्वावलंबी बनतील.
- राज्यातील मुलींचे जीवनमानाचे या सायकल वाटप योजनेमुळे उंचावेल. Cycle Vatap Yojana 2024 In Marathi |
मोफत सायकल वाटप योजना महाराष्ट्र ची वैशिष्ट्ये |
- सायकल वाटप योजना राज्यातील मुलींसाठी महाराष्ट्र शासनाकडून सुरू करण्यात आली आहे.
- दुर्गम भागात राहणाऱ्या व इयत्ता आठवी ते बारावी मध्ये शिकत असणाऱ्या मुलींना सायकल खरेदी करण्यासाठी आर्थिक सहाय्य करण्याच्या हेतूने, ही योजना सुरू झाली.
- या योजनेमुळे आर्थिक सहाय्य मिळाल्याने मुली आपले शिक्षण पूर्ण करू शकतील व भविष्यात नोकरी करून स्वतःच्या पायावर उभ्या राहू शकतील.
- या मुली शिक्षणाच्या जोरावर स्वंय रोजगार स्थापन करून इतरांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण करतील.
- या योजनेअंतर्गत आर्थिक सहाय्य मिळाल्याने मुलीच्या कुटुंबांना सायकल घेण्यासाठी कोणावर अवलंबून राहावे लागणार नाही, तसेच कर्जही काढावे लागणार नाही.
- या योजनेअंतर्गत अर्ज प्रक्रिया अत्यंत सोपी ठेवण्यात आली आहे. त्यामुळे मुलींच्या वेळ व पैशाची बचत होईल व तसेच त्यांना कोणत्याही कार्यालयात फेऱ्या मारण्याची गरज भासणार नाही. Cycle Vatap Yojana 2024 In Marathi |
- या योजनेअंतर्गत मिळणारी आर्थिक लाभाची राशी डीबीटी च्या साह्याने मुलींच्या बँक खात्यात सायकल वाटप योजना अंतर्गत जमा केली जाते.
मोफत सायकल वाटप योजना महाराष्ट्र चे फायदे |
- महाराष्ट्र शासनाकडून 5000/- रुपये सायकल वाटप योजना अंतर्गत मुलींना आर्थिक मदत दिली जाते. त्यामुळे मुलींना सायकल घेण्यासाठी इतर पैशांची जुळवाजुळव करावी लागत नाही.
- या योजनेमुळे ग्रामीण भागातील मुलींना शिक्षण घेण्यासाठी प्रोत्साहन मिळेल, त्यामुळे त्यांचे शिक्षण अर्धवट राहणार नाही.
- मुली शिक्षण घेऊन स्वतःच्या पायावर उभ्या राहतील, तसेच स्वावलंबी व आत्मविश्वासाने जीवन जगतील.
- सायकलीमुळे मुलीच्या वेळेची बचत होईल, त्यामुळे त्यांचे शिक्षणात मन रमले.
- या योजनेमुळे मुलींना त्यांचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी मदत होईल.
- सायकल वाटप योजनेअंतर्गत सायकल मिळाल्याने, शिक्षण पूर्ण झाल्याने मुलींचे भविष्य उज्वल होईल.
- सायकल वाटप योजनेतील आर्थिक साहाय्याने स्वावलंबी व आत्मनिर्भर बनतील.
मोफत सायकल वाटप योजनेचे नियम व आटी |
- सायकल वाटप योजनेचा लाभ महाराष्ट्र राज्यातील दुर्गम भागातील मुलींनाच दिला जाईल.
- अर्जदार विद्यार्थिनी या 8 वी ते 12 वी इयत्ता मध्ये शिकत असणाऱ्या असाव्यात.
- सायकल वाटप योजनेचा लाभ घेणाऱ्या विद्यार्थ्यांनीचे घर ते शाळा अंतर 5 किलोमीटर किंवा त्यापेक्षा जास्त असावे.
- लाभार्थी विद्यार्थिनींना या योजनेअंतर्गत या शैक्षणिक वर्षामध्ये एकदाच लाभ दिला जाईल.
- या योजनेअंतर्गत फक्त पाच हजार रुपयांची आर्थिक सहाय्य केले जाते, उर्वरित रक्कम लाभार्थ्याला स्वतःकडील भरावी लागेल.
- या सायकल वाटप योजना अंतर्गत फक्त मुलींनाच लाभ दिला जातो मुलांना नाही.
- या योजनेअंतर्गत मिळालेल्या सायकलीचे देखभाल व दुरुस्तीचा खर्च लाभार्थ्याला स्वतः करावयाचा आहे.
- सायकल वाटप योजनेअंतर्गत ज्या मुली गाव, वाड्या, टेकड्याव तांडे अशा डोंगराळ व अतिदुर्गम भागात राहतात, जिथे वाहतुकीची सोय नाही अशा ठिकाणच्या आर्थिक दृष्ट्या मागास घटकातील गरजू मुलींना योजना अंतर्गत लाभ दिला जातो.
Cycle Vatap Yojana 2024 In Marathi | आवश्यक पात्रता |
- अर्जदार विद्यार्थीनि महाराष्ट्र राज्यातील दुर्गम भागातील रहिवासी असावे.
- तसेच अर्जदार विद्यार्थीनि महाराष्ट्र राज्याची मूळ रहिवासी असावी.
- ती विद्यार्थिनी इयत्ता आठवी ते बारावी या वर्गामध्ये शिक्षण घेणारी असावी. Cycle Vatap Yojana 2024 In Marathi |
Cycle Vatap Yojana 2024 In Marathi | सायकल वाटप योजने अंतर्गत समाविष्ट शाळा |
- शासकीय शाळा
- शासकीय अनुदानित शाळा
- निमशासकीय शाळा
- जिल्हा परिषद शाळा
- आश्रम शाळा
- तसेच ज्यांना दररोज घरापासून ये-जा करावी लागते, अशा शाळेतील मुलींना योजनेअंतर्गत लाभ दिला जातो.
Cycle Vatap Yojana 2024 In Marathi | सायकल वाटप योजनेतील अनुदानाचे टप्पे |
- टप्पा एक – या योजनेअंतर्गत दिली जाणारी रक्कम ही मुलीच्या नावे राष्ट्रकृत बँक खात्यात DBT मार्फत 3500/- रुपये रक्कम जमा करण्यात येते.
- टप्पा दोन – लाभार्थी मुलींनी सायकल खरेदी केल्याची पावती व इतर कागदपत्रे सादर केल्यानंतर उर्वरित रक्कम दीड हजार रुपये ही नंतर बँक खात्यात जमा करण्यात येते.
सायकल वाटप योजन महाराष्ट्रसाठी आवश्यक कागदपत्रे |
- आधार कार्ड
- मतदान कार्ड
- रेशन कार्ड
- उत्पन्नाचा दाखला
- रहिवासी दाखला
- इयत्ता आठवी ते बारावी मध्ये शिकत असल्याचे प्रमाणपत्र
- मोबाईल नंबर
- पासपोर्ट साईज फोटो
- जन्माचा दाखला
- ईमेल आयडी
- बँक पासबुक
- सायकल खरेदी केल्याची पावती
Cycle Vatap Yojana 2024 In Marathi | या योजनेसाठी अर्ज करण्याची पद्धत |
- प्रतःम अर्जदार विध्यार्थिनी न आपल्या शाळेच्या मुख्याध्यापकाकडे जावून सायकल वाटप योजनेचा अर्ज घ्यावा लागेल.
- अथवा आपल्या जिल्ह्याच्या जिल्हा कार्यालयातील नियोजन विभागातून या योजनेचा अर्ज घ्यावा लागेल.
- सायकल योजनेचा अर्ज योग्य व अचूक भरावा.
- भरलेल्या अर्ज सोबत आवश्यक कागदपत्रांच्या सत्यप्रत जोडाव्यात.
- नंतर तो अर्ज कार्यालयात जमा करावा.
- त्या नंतर जमा अर्जाची पोच पावती घ्यावी. Cycle Vatap Yojana 2024 In Marathi |
- अशा प्रकारे तुमची सायकल वाटप योजनेसाठी अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल.
Cycle Vatap Yojana 2024 In Marathi |
सायकल वाटप योजन महाराष्ट्र शासन निर्णय CLICK HERE