रब्बी पिक विमा योजना |
Rabbi Pik vima Yojana
Rabbi pik Pera download PDF
Pik vima Yojana Maharashtra
Rabbi pik vima scheme
Rabbi pik vima
नमस्कार शेतकरी मित्रांनो, Rabbi Pik vima Yojana महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांसाठी ‘ सर्वसमावेशक ‘ पीक विमा योजना सुरू केली असून, खरीप पिक विमा योजनेप्रमाणे रब्बी हंगामातील पिकांसाठी पिक विमा भरणे सुरू झाले आहे. तरी रब्बी पिकासाठीच्या पिक विमा योजनेचा शेतकऱ्याने मोठ्या प्रमाणात या योजनेचा लाभ घ्यावा, असे कृषी विभागाकडून आव्हान करण्यात आले आहे.
जर काही नैसर्गिक आपत्तीने शेतकऱ्याच्या पिकाचे नुकसान झाले, तर शेतकऱ्यांना पीक विमा योजनेतून आर्थिक लाभ दिला जातो. या योजनेसाठी शेतकऱ्याने ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करावयाचे आहेत. त्याचबरोबर आपला पीक पेरा ही भरून द्यावा लागणार आहे, कृषी विभागाकडून ठिकठिकाणी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे.
मागील खरीप हंगामात नैसर्गिक आपत्तीमुळे अनेक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. त्यांना पीक विमा योजनेच्या माध्यमातून आर्थिक नुकसान भरपाई मिळाली होती. अशाच प्रकारे रब्बी हंगामासाठी शेतकऱ्यांनी वेळेत पिक विमा अर्ज भरावा, असे आव्हान कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.
प्रधानमंत्री आवास योजनेसाठी पात्रता काय ? अर्ज कसा करायचा ? कोण – कोणती कागदपत्रे लागणार | संपूर्ण माहिती |
पिकांना विमा संरक्षण |
रब्बी हंगामातील गहू, हरभरा पिकांना विमा संरक्षण दिले जाणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी मुदतीच्या आत पिक विमा भरणे गरजेचे आहे. राज्य शासनाने 2023 मध्ये ‘ सर्व समावेशक ‘ पिक विमा योजना राबवण्याचा निर्णय घेतला.
त्याप्रमाणे गावाचे प्रति अर्ज एक रुपयात पिक विमा योजनेत शेतकऱ्यांना सहभागी होता येणार आहे. नैसर्गिक आपत्ती, कीड आणि रोगामुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना विमा संरक्षण मिळणार आहे.
तसेच कर्जदार, बिगर कर्जदार शेतकऱ्यांना एच एफ तेप्रमाणे योजनेत सहभागी होता येईल. पीक विमा योजना अधिसूचित पिकांसाठी केवळ अधिसूचित क्षेत्रासाठी लागू राहणार आहे. Rabbi Pik vima Yojana
रब्बी पिक पेरा ( स्वयंघोषणापत्र ) इथे डाऊनलोड करा | रब्बी हंगाम पिक विमा योजना अर्ज भरणे झाले सुरु |
रब्बी हंगामातील पिक विमा |
रब्बी हंगाम हा ऑक्टोबर ते मार्चपर्यंत चालतो. या हंगामात कमी पाऊस आणि थंड हवामानामुळे वेगवेगळे धोके निर्माण होऊ शकतात. रब्बी पिकांसाठी विमा योजनेत थंडी, गारपीट, दुष्काळ आणि पिकाच्या गुणवत्तेत आलेली घट यापासून शेतकऱ्यांना संरक्षण मिळते.
- रब्बी पिके – गहू, हरभरा, ज्वारी, मसूर, भुईमू इत्यादी
- धोके – थंडी, गारपीट, दुष्काळ, कमी पाऊस
- विमा संरक्षण – रब्बी हंगामात नुकसान झाल्यास विमा कंपनी नुकसान भरपाई देते.
अर्ज करण्यासाठी अंतिम मुदत |
रब्बी पिक विमा योजनेत अर्ज भरण्यास एक नोव्हेंबर पासून सुरुवात झालेली आहे. या योजनेत सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांना 15 डिसेंबर पर्यंत ची अंतिम तारीख देण्यात आलेली आहे. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांनी वेळेत अर्ज करून आपले पीक नैसर्गिक आपत्ती पासून सुरक्षित ठेवा आणि संभाव्य नुकसानीसाठी आर्थिक मदतीचा लाभ घ्यावा. Rabbi Pik vima Yojana
रब्बी पिक विमा अर्ज भरणे सुरू | पात्रता, कागदपत्रे व अर्ज करण्याची पद्धत संपूर्ण माहिती |
CSC केंद्रावर भरता येणारा अर्ज |
रब्बी पिक विमा योजनेचा भाग घेण्यासाठी शेतकऱ्यांना एकदम सहज सोप्या पद्धतीनि ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. शेतकरी स्वतःहून अधिकृत वेबसाईटवर तसेच विमा, बँक प्रतिनिधी, ई – सेवा केंद्र यांच्यामार्फत देखील ऑनलाइन अर्ज करू शकतात.