पशुसंवर्धन विभाग योजना |
Pashu savardhan Yojana online apply
Pashu savardhan subsidy Scheme
Subsidy scheme apply
Maha dbt scheme
Cow subsidy scheme
नमस्कार,Pashusavardhan Yojana Online Apply | ग्रामीण भागातील नागरिकांना स्वतःचा रोजगार उपलब्ध करून देऊन, स्वयंरोजगाराचे संधी उपलब्ध करून देऊन, त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न मार्गी लावण्याचा उद्देशाने शासनाकडून विविध योजना राबवल्या जातात. स्वतःचा रोजगार उपलब्ध झाल्याने शेतकऱ्यांचे स्थलांतर कमी होते. त्याचबरोबर त्याचं जीवनमान योग्य पद्धतीने चालू राहते, यासाठी या योजना राबवल्या जातात.
याच उद्देशाने शेतीसाठी, शेतकऱ्यांसाठी उपयुक्त असणारी योजना, पशुसंवर्धन विभागाकडून राबवली जाते. यामध्ये पशुसंवर्धन विभागाकडून शेतकऱ्यांना गाई / म्हशीचे, शेळ्या / मेंढ्या व कोंबड्यांच्या साठी अनुदान वाटप केले जाते. या घटकांचा लाभ मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना ऑनलाइन अर्ज करणे गरजेचे आहे. पशुसंवर्धन विभागाकडून या योजनेसाठी या घटकांसाठी ऑनलाईन अर्ज मागवणे सुरू झालेले आहे.
या पशुसंवर्धन विभाग अंतर्गत कोणाला लाभ मिळणार ? किती लाभ मिळणार ? पात्रता काय ? कागदपत्रे कोणती लागणार ? अर्ज कसा करायचा ? याबद्दलची सविस्तर माहिती आपण या लेखात पाहणार आहोत. त्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचा.
पशुसंवर्धन विभाग अंतर्गत मिळणाऱ्या लाभ |
पशुसंवर्धन विभागाकडून वैयक्तिक लाभाच्या विविध योजनांसाठी पशुपालक, शेतकरी व सुशिक्षित बेरोजगार युवक – युवती व महिलांकडून एक जून 2025 पर्यंत ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. या योजनेअंतर्गत दुधाळ गाई – म्हशीचे गट वाटप करणे, शेळी मेंढी गट वाटप करणे, 1000 मांसल कुकुट पक्षांच्या संघटनासाठी निवारा उभारणीस अर्थसहाय्य देणे. 100 कुक्कुटपिलांची वाटप, व 25 अधिक तीन तलांगा गट वाटप करण्यात येत आहे.
- गाई म्हशी खरेदीसाठी अनुदान
- 1000 कोंबड्या खरेदीसाठी अनुदान
- शेळी मेंढी गट खरेदीसाठी अनुदान
- तलांगा गट खरेदीसाठी अनुदान Pashusavardhan Yojana Online Apply |
कोणत्या घटकाला किती अनुदान मिळणार
दुग्धजन्य प्राणी वाटप योजना :
लाभार्थी – अनुसूचित जाती, जमाती, इतर मागासवर्गीय लघु व अल्पभूधारक शेतकरी, सुशिक्षित बेरोजगार, महिला स्वयंसहाय्यता गट.
लाभ – दोन देशी क्रॉस ब्रेड गाई किंवा दोन म्हशीचे वाटप
अनुदान – अनुसूचित जाती जमातीसाठी 75 टक्के अनुदान
युनिट किंमत – गाय 70000, म्हैस 80 हजार
यंदाच्या खरीप हंगामापासून सर्व प्रकारच्या बियाणांची विक्री ‘ साथी ‘ पोर्टलवरून होणार | संपूर्ण माहिती |
शेळी मेंढी पालन योजना |
लाभार्थी – अनुसूचित जाती, जमाती लघु व अल्पभूधारक शेतकरी, सुशिक्षित बेरोजगार, महिला स्वयंसहाय्यता गट
लाभ – दहा शेळ्या – मेंढ्या आणि एक बोकड / मेंढा युनिटचे वाटप
अनुदान – अनुसूचित जाती जमातीसाठी 75 टक्के अनुदान
युनिट किंमत – उस्मानाबादी शेळी युनिट 13545
कुक्कुटपालन योजना |
लाभार्थी – गरीब भूमिहीन मागासवर्गीय लघु व अल्पभूधारक शेतकरी
लाभ – शंभर दिवसांचे कोंबडे किंवा 25 अधिक तीन बुलेट चे वाटप
अनुदान – सर्व श्रेणीसाठी 50 टक्के अनुदान
युनिट किंमत – शंभर दिवसाचे कोंबडे 29 हजार 500 रुपये
अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे |
- अर्जदार व्यक्तीचे आधार कार्ड
- मोबाईल क्रमांक
- ई-मेल आयडी
- जात प्रमाणपत्र
- दिव्यांग प्रमाणपत्र
- बँक पासबुक
- रेशन कार्ड
- अर्जदाराचा पासपोर्ट साईज फोटो
- अर्जदाराचे सही
महत्वपूर्ण सूचना |
- ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करण्यासाठी अर्जदाराकडे आधार कार्ड असणे आवश्यक आहे.
- अर्जदाराचे वय 18 ते 65 दरम्यान असणे आवश्यक आहे.Pashusavardhan Yojana Online Apply |
- अर्जदाराची वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांच्या आत असणे आवश्यक आहे.
- अर्जदार अनुसूचित जाती – जमाती मधील अर्ज करीत असल्यास जात प्रमाणपत्र आवश्यक आहे.
- एकाच कुटुंबातील एकाच व्यक्तीला या योजनेचा लाभ घेता येईल.
- राशन कार्ड नुसार सर्व सदस्यांची नावे भरणे आवश्यक आहे.
- विचारलेली सर्व माहिती खरी असणे बंधकारक आहे.
- अर्जदाराचा फोटो हा 80kb पर्यंत साईज मध्ये असावा.
- अर्जदाराची स्वाक्षरी 40 Kb पर्यंत असावे.
अर्ज करण्याची अंतिम तारीख |
पशुसंवर्धन विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांसाठी अर्ज करण्यासाठी अर्जदाराला 3 मे 2025 ते 2 जून 2025 या काळामध्ये कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करणे आवश्यक आहे. या एक महिन्याच्या कालावधीमध्ये जे शेतकरी अर्ज करतील, त्या शेतकऱ्यांना या योजनेमध्ये समाविष्ट केली जाईल. या योजनेची तपासणी करून यामध्ये लाभार्थ्याची निवड प्रक्रिया पूर्ण केली जाईल.
असं करा अर्ज |
शासनाच्या वरील सर्व योजना अर्ज करण्यासाठी शासनाच्या mahabms.com या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे. शासनाने निर्गमित केलेल्या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावा लागेल.