घराचे स्वप्न होणार पूर्ण |
Gharkul scheme Maharashtra
PM aawas Yojana
Awas Yojana subsidy scheme
Awas Rural subsidy scheme
PM gharkul scheme
नमस्कार,Gharkul scheme Maharashtra प्रत्येक व्यक्तीचे एक स्वप्न असते, आपले स्वतःचे व हक्काचे, पक्के घर असावे. ते पूर्ण करण्यासाठी प्रत्येक व्यक्ती रात्र न दिवस कष्ट करत असते. पण प्रत्येकाला ते शक्य होत नाही. म्हणून राज्यातील शासनाकडून नागरिकांना पक्के व हक्काचे घर उपलब्ध करून देण्यासाठी नवीन नाव नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
घरकुल योजनेच्या माध्यमातून राज्यातील गरीब आणि मागासवर्गीय असणाऱ्या कुटुंबांना स्वतःचे घर मिळणार आहे. राज्यातील घरकुल योजनेचा लाभ देण्यासाठी राज्य शासनाने 20 लाख घरकुल मंजूर करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. या उद्दिष्टांना अनुसरूनच शासनाकडून पहिल्या टप्प्यात दहा लाख घरांना मंजुरी दिली जाणार आहे.
या घरकुल योजनेसाठी लाभार्थ्यांकडून अर्ज करण्यासाठी आव्हान केले आहे. योजनेमध्ये केलेले नवीन बदल आणि तंत्रज्ञानाच्या माध्यमातून लाभार्थ्यांना लवकरात लवकर दर्जेदार घर उपलब्ध करून दिले जाणार आहे. ते बदललेले नियम कोणते ? अर्ज कसा करायचा ? वाढीव अनुदान किती ? याबद्दलची सविस्तर माहिती आपण या लेखात पाहणार आहोत. त्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचा.
गाई / म्हशी, शेळ्या / मेंढ्या व कोंबड्यांसाठी ऑनलाईन अर्ज सुरू | 1 जून पर्यंत करता येणार अर्ज |
बेघर कुटुंबांना मिळणार लाभ |
केंद्रशासन देशातील नागरिकांना घरकुल देण्यासाठी कटिबद्ध आहे. घरकुल योजनेबाबत सध्या सरकार खूप मोठ्या प्रमाणावर मिशन राबवत आहे. प्रत्येक राज्य शासनाकडून देखील विशेष प्रयत्न योजनेसाठी केले जात आहेत. महाराष्ट्र राज्य शासन देखील या प्रयत्नामध्ये कुठेही कमी केलेली नाही.
राज्यातील खऱ्या गरजू लाभार्थ्यांना घरकुल देण्याचे शासनाचे ध्येय आहे. प्रत्येक पात्र व्यक्तीला योजनेमध्ये सहभाग नोंदविता यावा, यासाठी शासनाकडून सेल्फ सर्विस ची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. सरकारने हाती घेतलेल्या या मोहिमेमुळे राज्यातील प्रत्येक कुटुंबाला घरकुल योजना राबविता येणार आहे.Gharkul scheme Maharashtra
घर बांधण्यासाठी जागा मिळणार |
केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून आतापर्यंत अनेक नागरिकांना घरकुल योजनेअंतर्गत वितरीत केलेला आहे. परंतु असे असतानाही काही अडचणीमुळे शासनाच्या योजनेचा गोरगरीब जनता फायदा घेऊ शकलेले नाहीत. त्यातील महत्त्वाची अडचण म्हणजे शासनाच्या लक्षात आली , ती म्हणजे घरकुल बांधण्यासाठी जागा उपलब्ध नसल्याने घरकुल याचा लाभ घेता आलेला नाही.
या घरकुल योजनेतील अडचणी अधिवेशनात चर्चा करण्यात आली. त्याला पर्याय म्हणून राज्य शासनाने नागरिकांना घरकुल योजनेचा लाभ मिळाला, पण यासाठी जागा उपलब्ध नाही. अशा नागरिकांना राज्य सरकारकडून जागा देखील वाटप केली जाणार आहे. Gharkul scheme Maharashtra
राज्यातील घरकुल योजना लाभार्थ्याकडे जर स्वतःची शेतजमीन नसेल, अशा लाभार्थ्यांना गायरान जमीन, गावठाण वाढ किंवा दीनदयाळ योजनेतून जमीन उपलब्ध करून दिली जाणार आहे. राज्य शासनाने आखलेल्या या धोरण अत्यंत गरिबांनी पात्र कुटुंबांना हक्काचे घर उपलब्ध करून देण्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे. या शासनाच्या निर्णयाच्या माध्यमातून आतापर्यंत स्वतःचे घराचे स्वप्न पाहिलेल्या नागरिकांना हक्काचे व पक्के घर मिळणार आहे.
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी | सरकारी योजनांचे अनुदान ” या ” तारखेपर्यंत होणार खात्यावर जमा |
घरासाठी मिळणार वाढीव अनुदान |
राज्य शासनाकडून घरकुल योजनेमध्ये मागील काही दिवसापूर्वी अतिरिक्त वाढीव अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेच्या माध्यमातून घरकुल योजनेसाठी पात्र असणाऱ्या लाभार्थ्यांना राज्य शासनाकडून 50 हजार रुपये निधी वितरित केला जाणार आहे. या वाढीव निधीमुळे लाभार्थ्यांची घर चांगल्या पद्धतीने पूर्ण होण्यास मदत होणार आहे.
निश्चित केलेला रकमेपेक्षा जास्त अनुदान मिळाल्याने घरकुल योग्य पद्धतीने सुधारली जाणार आहेत. शासनाकडून वाढती महागाई, वाढता मजुरांचा खर्च पाहता हा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे या योजनेतून आता प्रत्येक लाभार्थ्यांना 50 हजार रुपये वाढीव अनुदान मिळणार आहे.
घरकुल योजना नवीन नाव नोंदणी |
घरकुल योजनेमध्ये नाव नोंदणी करण्यासाठी आता ऑनलाइन पद्धतीने प्रक्रिया उपलब्ध केली गेलेली आहे. आदी ग्राम पंचायतीच्या माध्यमातून लाभार्थ्यांची यादी सादर केली जात होती, मात्र आता सरकारच्या पारदर्शकपणे निवड प्रक्रिया म्हणून नागरिकांना आपले नाव नोंदणीसाठी ऑनलाईन पद्धतीचा वापर करता येणार आहे.
ऑनलाइन पद्धतीने नाव नोंदणी करण्यासाठी नागरिकांना आपला मोबाईलच्या माध्यमातून आपला सेल्फ सर्वे करणे आवश्यक आहे. सेल्फ सर्वेच्या माध्यमातून नागरिक पात्र असतील, तर त्या लाभार्थींची नावे प्रपत्र यादीमध्ये समाविष्ट केले जातील. Gharkul scheme Maharashtra
असं करा सर्वे |
घरकुलाच्या सर्वे करण्यासाठी प्रथम आपल्या मोबाईल मध्ये आवास प्लस 2024 आणि आधार फेस आरडी हे दोन मोबाईल ॲप इंस्टॉल करणे आवश्यक आहे. या दोन्ही ॲपच्या माध्यमातून आपण आपल्या राहत्या घरचा सर्वे करून शासनापर्यंत आपली माहिती पाठवू शकता.
या माहितीच्या आधारे शासन निर्णय घेऊन पात्र असणाऱ्या लाभार्थ्यांना घरकुल योजनेचा लाभ देणार आहे. आवास प्लस 2024 च्या आजच्या माध्यमातून सर्विस पूर्ण करू शकता.