पी एम किसान योजना |
Pm kisan Samman Nidhi Yojana
PM kisan Yojana
Pm kisan scheme for government
Pm kisan nidhi
Pm kisan 19th installment
नमस्कार, Pm kisan Samman Nidhi Yojana केंद्र सरकार मार्फत देशातील सर्वसामान्य लोकांसाठी, शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवल्या जातात. या योजनांच्या माध्यमातून लोकांना आर्थिक पाठबळ देण्याचा प्रयत्न केला जातो. त्यातीलच एक योजना म्हणजे ” पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना ” होय.
या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दरवर्षाला सहा हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. आतापर्यंत या योजनेअंतर्गत 18 हप्ते जमा झालेले आहेत. परंतु शेतकरी आता वाट पाहत आहेत, ते 19 वा हप्ता कधी मिळणार ? याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे, तर 19 वा हप्ता कधी मिळणार ? यासाठी कोणकोणते शेतकरी पात्र आहेत ? या सर्वांची सविस्तर माहिती आपण या लेखात पाहणार आहोत. त्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचा.
रब्बी हंगाम ई – पिक पाहणीला झाली सुरुवात | ” या ” तारखेपर्यंत करता येणार ई – पीक पाहणी |
किसान सन्मान निधी 19 वा हप्ता |
पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत आतापर्यंत सर्व शेतकऱ्यांना 18 हप्त्ये बँक खात्यात जमा झाले आहेत. लवकरच 19 वा हप्ता शेतकऱ्यांना मिळणार असल्याची माहिती मिळत आहे. पी एम किसान सन्मान योजना चा अठरावा हप्ता 5 ऑक्टोबर रोजी लाखो शेतकऱ्यांना मिळाला होता. त्यानंतर 19 वाप्ता देखील लवकरच मिळणार असल्याची चर्चा सुरू आहे.
प्रत्येक चार महिन्याला दोन हजार रुपयांचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला जातो. त्यानुसार डिसेंबरच्या शेवटी किंवा जानेवारी महिन्याच्या सुरुवातीला पी एम किसान योजनेचा 19 वा हप्ता जमा होण्याची शक्यता आहे. Pm kisan Samman Nidhi Yojana
शेतकऱ्यांना ठिबक सिंचनासाठी 80 टक्के अनुदान मिळणार | mahadbt पोर्टलवर असा करा अर्ज
या शेतकऱ्यांना मिळणार 19 वा हप्ता |
- पी एम किसान योजनेचा लाभ मिळवण्यासाठी पात्र शेतकऱ्यांनी पूर्ण कामे करणे आवश्यक आहे.
- डीबीटी सक्रिय असणे, शेतकऱ्यांचे बँक खात्यात डीबीटी सुविधा असणे आवश्यक आहे.
- योजनेची संबंधित प्रत्येक शेतकऱ्यांनी आपली ई – केवायसी करणे बंधनकारक आहे.
- जमिनीचे दस्तावे योग्यरीत्या पडताळले असतील, तरच त्या शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा 19 वा हप्ता मिळेल.
- प्रत्यक्ष शेतकऱ्यांनी आपले आधार आपल्या बँक खात्याची लिंक असल्याची खात्री करा.
पुढील शेतकऱ्यांना मिळणार नाही लाभ |
- खासदार, आमदार, मंत्री किंवा नगरपालिकेचे अध्यक्ष असे कोणतेही घटनात्मक पद भूषवणाऱ्या शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत लाभ दिला जाणार नाही.
- जे शेतकरी आयकर भरतात, ते देखील या योजनेचा लाभ घेऊ शकत नाहीत.
- कोणत्याही संस्थात्मक जमिनीचे धारक शेतकरी देखील या योजनेचा लाभ घेऊ शकत नाहीत.
किसान क्रेडिट कार्डवर मिळणार 3 लाख रुपये कर्ज |