किसान क्रेडिट कार्ड कर्ज योजना |
Kisan credit card 2024
Kisan credit card update
Kisan credit card loan scheme
Kisan credit card karj Yojana
Farmars loan scheme for government government
नमस्कार, Kisan credit card 2024 देशातील शेतकऱ्यांसाठी केंद्र आणि राज्य शासनाच्या वतीने विविध योजना सुरू करण्यात येतात. त्या योजनांच्या माध्यमातून अनुदान स्वरूपात मदत दिली जाते. शेतकर्यांना नैसर्गिक आपत्तीमुळे आलेल्या आर्थिक परिस्थितीचा सामना करण्यासाठी करण्यासाठी, त्यांना आर्थिकदृष्ट्या मजबूत बनवणे हा या योजनेचा उद्देश असतो.
तसेच, देशातील शेतकऱ्यांना कोणत्याही आर्थिक समस्येचा सामना करावा लागू नये. तसेच शेती किंवा इतर कोणत्याही कामासाठी आर्थिक अडचण भासू नये, यासाठी राज्य व केंद्र शासनाकडून राज्यातील पात्र शेतकऱ्यांना क्रेडिट कार्ड दिले जात आहे.
क्रेडीट कार्ड म्हणजे काय ? त्याचे फायदे कोणते असणार ? त्यासाठी अर्ज कसा करावा लागणार आहे ? याबद्दलची सविस्तर माहिती आपण या लेखात पाहणार आहोत. त्यासाठी तुम्ही हा लेख शेवटपर्यंत वाचा.
व्यवसायासाठी मिळणार बिनव्याजी 10 ते 50 लाख रुपयांचे कर्ज | जाणून घ्या संपूर्ण माहिती |
किसान क्रेडीट कार्ड म्हणजे नक्की काय ?
मित्रांनो, किसान क्रेडिट कार्ड म्हणजे केसीसी योजना आहे. ज्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना शेतीसंबंधीच्या कामासाठी आर्थिक मदत केली जाते. किसान क्रेडिट कार्डच्या माध्यमातून शेतकऱ्यांना बी- बियाणे आणि खत, कीटकनाशके इत्यादी शेतीच्या कामासाठी कर्ज दिले जाते.
किसान क्रेडिट कार्ड साठी सर्व शेतकरी अर्ज करू शकतात. यामध्ये स्वतःच्या मालकीची जमीन असणारे तसेच इतरांची जमीन भाडे तत्त्वावर करणाऱ्या शेतकऱ्यांचा समावेश करण्यात आलेला आहे.
याशिवाय 2018 – 19 च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनानुसार पशुपालन ( शेळीपालन,गाई -म्हैस पालन ), मत्स्यपालन करणाऱ्या शेतकऱ्यांचाही समावेश किसान क्रेडिट योजनेद्वारे लाभ देण्यामध्ये करण्यात आलेला आहे. Kisan credit card 2024
महाडीबीटी शिष्यवृत्ती योजनेचा अर्ज भारायचा आहे काय ? त्यासाठी शिक्षण विभागाकडून विशेष मोहीम | वाचा सविस्तर |
असे तयार करा किसान क्रेडिट कार्ड |
किसन क्रेडिट कार्ड बनवण्यासाठी पुढील पद्धतीचा वापर करा. :
- सर्वप्रथम तुम्हाला ज्या बँकेचे किसान क्रेडिट कार्ड तयार करायचा आहे, त्या बँकेच्या अधिकृत वेबसाईटवर जा.
- बँकेच्या अधिकृत वेबसाईटवर असणाऱ्या किसान क्रेडिट कार्ड या पर्यायावर क्लिक करा.
- त्यानंतर अर्जदाराचे नाव, मोबाईल नंबर, आधार क्रमांक इत्यादी सर्व माहिती भरा आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
- त्यानंतर सबमिट पडणार क्लिक करा.
- अशाप्रकारे तुमचा यशस्वी तयार बँकेकडे जमा होईल.
- त्यानंतर तुम्हाला बँकेकडून कॉल येईल आणि पुढची प्रक्रिया पूर्ण होतात किसान क्रेडिट कार्ड मिळेल. Kisan credit card 2024
राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना 3 हजार रुपये चा लाभ दिला जाणारा | आत्ताच चेक करा, आपले बँक खाते |
Kisan credit card | आवश्यक कागदपत्रे |
- सातबारा उतारा
- आठ अ उतारा
- शेतकऱ्यांचे आधार कार्ड
- पॅन कार्ड
- रेशन कार्ड
- उत्त्पन्नचा दाखला
- जात प्रमाणपत्र
- मोबाईल नंबर
- ईमेल आयडी
- पासपोर्ट साईझ फोटो
- बँक पासबुक
किसान क्रेडिट कार्ड वर किती कर्ज मिळते |
किसान क्रेडिट कार्ड या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना केवळ 4 % वार्षिक व्याजदरावर 3 लाख रुपयापर्यंत कर्ज मिळते. तसेच या योजनेत शेती व्यतिरिक्त मत्स पालन किंवा पशुपालन संबंधित लोकांचा समावेश करण्यात आलेला आहे. Kisan credit card 2024
या त्या अंतर्गत त्यांना दोन लाखापर्यंत कर्ज मिळते, तसेच या योजनेच्या माध्यमातून 1.6 लाख रुपये पर्यंत कर्ज कोणत्याही हमीशिवाय उपलब्ध आहे.
विशेष बाब म्हणजे या योजनेत शेतकऱ्यांना कमी वेळेत आणि फार कमी कागदपत्रांसह तीन लाख रुपये पर्यंतचे कर्ज देते.
2 thoughts on “किसान क्रेडिट कार्डवर मिळणार 3 लाख रुपये कर्ज | Kisan credit card 2024 | अर्ज कसा करायचा ? लाभ कोणाला मिळणार ? संपूर्ण माहिती, जाणून घ्या |”