Pipe Line Anudan Yojana Marathi 2024 | पाईपलाईन अनुदान योजना महाराष्ट्र |
Pipe Line Anudan Yojana Marathi 2024 |
नमस्कार मित्रांनो, आपला भारत देश हा कृषीप्रधान देश आहे. आपल्या देशातील बहुतांशी लोक हे शेती हा व्यवसाय करतात. राज्यात वेगवेगळ्या प्रकारची शेती करून ते आपल्या उदरनिर्वाह करत असतात, त्यामध्ये व्यापारी तत्त्वावर केली जाणारी शेती, उदरनिर्वाहासाठी केली जाणारी शेती, तसेच पारंपारिक व्यवसाय म्हणून केली जाणारी शेती असे वेगवेगळे प्रकारे शेती केली जाते.
राज्यात वेगवेगळ्या आठ नैसर्गिक हवामान विभाग पहिला मिळतात. त्यामुळे त्या ठिकाणी पाण्याच्या वेगवेगळ्या समस्या निर्माण होतात. त्यामुळे त्याचा परिणाम शेती क्षेत्रावर होताना दिसून येतो. काही ठिकाणी पाणथळ, तर काही ठिकाणी डोंगराळ जमिनी आहेत.
पाण्याचे स्त्रोत किंवा सिंचन योजना जर व्यवस्थित असेल, तर त्याचा परिणाम म्हणून शेती क्षेत्र आर्थिक दृष्ट्या फायदेशीर ठरते. पण जर सिंचन व्यवस्थाच नसेल तर शेतीतून उत्पन्न मिळणार नाही, त्यामुळे शेतकरी हा कायम आर्थिक दृष्ट्या मागासलेलाच राहील,
या सर्व गोष्टींचा विचार करून त्या अनुषंगाने सरकारने सिंचन करण्यासाठी एका नवीन योजनेची सुरुवात केली आहे. त्या योजनेचे नाव ” पाईपलाईन अनुदान योजना महाराष्ट्र “ होय. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आपल्या शेतात पाईपलाईन करण्यासाठी 50 टक्के अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे.
पाईपलाईन अनुदान योजनेअंतर्गत सिंचन करण्यासाठी 50 टक्के म्हणजेच जास्तीत जास्त पंधरा हजार रुपयांपर्यंत अनुदान दिले जाते. त्यातून 428 मीटर पर्यंत 35 रुपये प्रती मीटर प्रमाणे अनुदान देण्यात येते. त्यातून शेतकऱ्याला आपल्या शेतात पाईप लाईन करण्यास हातभार लागतो.
महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत हे अनुदान देण्यात येते. तसेच ज्या शेतकऱ्याच्या शेतात पाण्याचा स्तोत उपलब्ध आहे म्हणजेच ज्या शेतकर्याकडे शेतीला पाणी देण्यासाठी विहीर, शेततळे किंवा बोरवेल उपलब्ध आहे अशा शेतकऱ्यांनाच शेतात पाईप लाईन करण्यासाठी 50 % अनुदान दिले जाते.
Pipe Line Anudan Yojana Marathi 2024 | वाचकांना नम्र विनंती |
मित्रांनो, राज्य शासनाच्या कृषी क्षेत्राशी सबंधित वेगवेगळ्या योजनांची ही माहिती आपण घेतच आहोत. त्या योजना शेतकऱ्यांसाठी अत्यंत फायदेशीर आणि उपयुक्त आहेत, हे आपणाला ठाऊकच आहे. त्याचप्रमाणे आज आपण राज्यातील शेतकऱ्यांसाठी सुरू करण्यात आलेल्या पाईपलाईन अनुदान योजनेची माहिती पाहणार आहोत.
त्यासाठी तुम्ही आमचा हा लेख शेवटपर्यंत वाचा. तसेच तुमच्या परिसरात असणारे आर्थिक दृष्ट्या मागा शेतकरी यांना सिंचन करण्यासाठी पाईपलाईन अनुदान योजनेची माहिती सांगा. त्यासाठी आमचा हा लेख जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा. त्यामुळे त्यांना त्याचा फायदा घेता येईल, ही विनंती.
Pipe Line Anudan Yojana Marathi 2024 |
योजनेचे नाव | पाईप लाईन अनुदान योजना महाराष्ट्र |
योजनेची सुरुवात | महाराष्ट्र शासन |
विभाग | कृषी विभाग |
लाभार्थी | राज्यातील शेतकरी |
लाभ | पाईप लाईनसाठी 50% अनुदान |
उद्देश | शेतकऱ्याचा अर्थी विकास करणे |
अर्ज करण्याची पध्दत | ऑनलाईन |
हे देखील वाचा –
New | ई- श्रम कार्ड पेन्शन योजना मराठी | Good News | E Shram Card Pension Yojana 2024 | मिळणार 2 लाखाचे विमा संरक्षण |
महिला सन्मान योजना महाराष्ट्र | Good News | Mahila Samman Yojana In Marathi 2024 | ST प्रवासात 50 % सूट |
विधवा पेन्शन योजना 2024 | Good News | Vidhwa Pension Yojana Maharashtra | ऑनलाईन अर्ज सुरु |
युवकांना व्यावसायिक प्रशिक्षण योजना महाराष्ट्र | Good News | Vyavsayik Prashikshan Yojana 2024 | नोंदणी सुरु |
Pipe Line Anudan Yojana Marathi 2024 | पाईप लाईन अनुदान योजनेची उद्दिष्ट्ये |
- राज्यातील आर्थिक दृष्ट्या मागास शेतकऱ्यांचे शेतीचे जास्तीत जास्त क्षेत्र सिंचनाखाली आणण्याच्या उद्देशाने राज्य शासनाने पाईप लाईनअनुदान योजनेची सुरुवात केली.
- राज्यातील शेतकऱ्यांचा आर्थिक व सामाजिक विकास करणे, हा या पाईप लाईन अनुदान योजनेचा उद्देश आहे.
- शेतात सिंचनाची सुविधा उपलब्ध झाल्याने जास्तीत जास्त उत्पन्न काढून शेतकऱ्याला आर्थिक नफा मिळवून देणे, या उद्देशाने ही योजना सुरू करण्यात आली.
- शेतीच्या पाण्यासाठी शेतकऱ्याला कोणावर हि अवलंबून राहावे लागू नये, तसेच सावकाराकडून कर्ज काढावे लागू नये, यासाठी आर्थिक मदत म्हणून या योजने अंतर्गत सबसिडी दिली जाते.
- शेतकऱ्याला स्वतंत्र व आत्मनिर्भर या पाईप लाईन अनुदान योजनेमुळे बनवता येते.
- राज्यातील कोरडवाहू क्षेत्र कमी होऊन जास्तीत जास्त सिंचन क्षेत्र निर्माण करणे.
- पाण्याच्या सिंचनामुळे उत्पन्नात वाढ झाल्याने आर्थिक नफा वाढवून शेतकऱ्याच्या जीवनमानाचा दर्जा उंचावणे.
Pipe Line Anudan Yojana Marathi 2024 | पाईप लाईन अनुदान योजना महाराष्ट्रची वैशिष्ट्ये |
- पाईपलाईन अनुदान योजना महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाकडून राज्यातील शेतकऱ्यांसाठी सुरू करण्यात आली आहे.
- पाईप लाईन अनुदान योजनेअंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना शेतात पाईपलाईन करण्यासाठी 50 टक्के अनुदान राज्य शासनामार्फत देण्यात येते.
- या योजने अंतर्गत 428 मीटर पर्यंत पाईपलाईन करण्यासाठी प्रति मीटर 35 रुपये याप्रमाणे या योजनेअंतर्गत अनुदान मिळते.
- पाईपलाईन अनुदान योजनेअंतर्गत अर्ज प्रक्रिया अत्यंत सोपी ठेवण्यात आली आहे.
- या ऑनलाईन अर्ज प्रक्रियेमुळे शेतकऱ्याच्या वेळ व पैशाची बचत होणार आहे.
- पाईपलाईन अनुदान योजनेअंतर्गत दिले जाणारे आर्थिक सहाय्य डीबीटी मार्फत थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले जाते.
Pipe Line Anudan Yojana Marathi 2024 | पाईप लाईन अनुदान योजनेचे फायदे |
- राज्य शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या पाईपलाईन अनुदान योजनेमुळे शेतकरी आर्थिक दृष्ट्या समृद्ध बनतील.
- राज्यातील शेतकऱ्यांना पाईपलाईन करण्यासाठी कोणाकडून हे कर्ज घेवून कर्जबाजारी होण्याची गरज पडणार नाही.
- पाईपलाईन अनुदान योजनेमुळे राज्यातील शेतकऱ्यांचा आर्थिक फायदा झाल्याने त्यांचा आर्थिक व सामाजिक विकास होण्यास मदत होणार आहे.
- या योजनेमुळे राज्यातील शेतकरी स्वतःचा व कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यास समर्थ होतील.
- शासनाकडून पाईपलाईन करण्यासाठी अनुदान दिल्याने शेतकऱ्याचा कर्जाचा बोजा कमी झाल्याने आत्महत्यांचे प्रमाण कमी होईल.
- राज्यात राबवण्यात येणाऱ्या पाईपलाईन अनुदान योजनेमुळे तरुण पिढी शेती क्षेत्राकडे आकर्षित होईल.
- पाईपलाईन अनुदान योजनेमुळे शेतकरी स्वावलंबी झाल्याने त्यांच्या जीवनमानाचा दर्जा उंचावणार आहे.
- या योजनेमुळे शेतकऱ्यांच्या उत्पनात वाढ झाल्याने त्यांची मुले अर्धवट शिक्षण सोडणार नाहीत, तसेच ते शिक्षणापासून वंचित हि राहणार नाहीत.
Pipe Line Anudan Yojana Marathi 2024 | पाईप लाईन अनुदान योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे |
- मतदान ओळखपत्र
- आधार कार्ड
- रेशन कार्ड
- जमिनीचा सातबारा / 8 अ
- पीव्हीसी पाईप खरेदी केल्याचे बिल / कोटेशन
- बँक पासबुक
- उत्पन्नाचा दाखला
- मोबाईल नंबर
- ईमेल आयडी
- पाणी उपलब्ध असल्याचे प्रमाणपत्र
Pipe Line Anudan Yojana Marathi 2024 | पाईप लाईन अनुदान योजनेसाठी आवश्यक पात्रता |
- पाईपलाईन अनुदान योजना महाराष्ट्र साठी राज्यातील सर्व शेतकरी पात्र असतील.
- ज्या शेतकऱ्यांच्या सातबारा उताऱ्यावर सिंचन किंवा पाण्याचा स्त्रोत उपलब्ध आहे असे सर्व शेतकरी या पाईपलाईन अनुदान योजनेचे लाभार्थी आहेत.
- तसेच राज्यातील आर्थिक दृष्ट्या मागास व गरीब शेतकरी या योजनेसाठी पात्र आहेत.
Pipe Line Anudan Yojana Marathi 2024 | पाईप लाईन अनुदान योजनेसाठी नियम व आटी |
- महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना पाईपलाईन अनुदान योजनेचा लाभ घेण्यासाठी स्वतःच्या नावावरती सातबारा उतारा असणे आवश्यक आहे.
- त्यासोबतच त्या शेतकऱ्याच्या शेतामध्ये पाण्याचा स्त्रोत उपलब्ध असावा.
- लाभार्थी शेतकरी जर दारिद्र्यरेषेखालील असेल, तरच त्याला पाईपलाईन अनुदान योजनेचा लाभ दिला जाईल.
- पाईपलाईन अनुदान योजनेचा लाभ घेण्यासाठी जे शेतकरी अर्ज करणार आहेत, त्यांच्याकडे एक हेक्टर किंवा कमीत कमी एक एकर जमीन असणे गरजेचे आहे.
- या योजनेअंतर्गत शासनाकडून पाईप खरेदीसाठी 50% अनुदान दिले जाते, उर्वरित रक्कम शेतकऱ्याला स्वतःकडील भरावे लागेल.
- शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत एचडी पी पाईप साठी 50 रुपये प्रति मीटर प्रमाणे जास्तीत जास्त 300 मीटर पर्यंत च्या पाईप साठी अनुदान मंजूर केले जाते.
- जर शेतकरी पीव्हीसी पाईप साठी अर्ज केला असेल तर त्याला 35 रुपये प्रमाणे जास्तीत जास्त 500 मीटर पर्यंतच्या पाईप साठी अनुदान दिले जाते.
- पाईपलाईन अनुदान योजनेचा लाभ घेणार शेतकरी महाराष्ट्र राज्याचा मूळ रहिवासी असावा.
- राज्याबाहेरील शेतकऱ्याला या पाईप लाईन अनुदान योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
Pipe Line Anudan Yojana Marathi 2024 | पाईप लाईन अनुदान योजनेअंतर्गत अर्ज रद्द होण्याची कारणे |
- पाईप लाईन अनुदान योजनेचा अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा मूळ रहिवासी नसल्यास त्याचा अर्ज रद्द केला जातो.
- या अर्जदाराकडे त्याच्या शेतामध्ये पाण्याचा स्त्रोत उपलब्ध नसल्यास त्याचा अर्ज रद्द केला जातो.
- या योजनेसाठी अर्जदाराची स्वतःची मालकीची जमीन उपलब्ध नसल्यास त्या शेतकऱ्याचा अर्ज रद्द होतो.
- अर्जदाराने अर्जात चुकीची अथवा खोटी माहिती भरल्यास अर्ज रद्द केला जातो.
Pipe Line Anudan Yojana Marathi 2024 | ऑनलाईन अर्ज करण्याची पध्दत |
- प्रथम आपणाला शासनाच्या अधिकृत वेबसाईट महाडीबीटीवर पोर्टल वरती जावे लागेल.
- आता आपल्या समोर एक new page open होईल.
- या वेबसाईटच्या होम पेजवर आल्यानंतर आपल्याला नोंदणी पर्यायावर click करावे लागेल.
- त्यानंतर username व password टाकून login करावे.
- आत्ता सर्व माहिती योग्य व अचूक भरावे.
- नंतर सिंचन साधने व सुविधा ही बाब त्यामधील निवडून त्यावर click करावे.
- त्यानंतर पाईप संच किंवा पाईप लाईन या ऑप्शन वर click करावे.
- त्यानंतर पाईपलाईन अनुदान योजनेचा अर्ज आहे, त्यामध्ये सर्व माहिती भरावी.
- सर्व आवश्यक कागदपत्रे apload करावीत.
- नंतर तो अर्ज submit करावा.
- अशाप्रकारे तुमच्या पाईपलाईन अनुदान योजनेची ऑनलाईन प्रोसेस पूर्ण होईल.
Pipe Line Anudan Yojana Marathi 2024 | पाईप लाईन अनुदान योजनेची निवड प्रक्रिया |
- पाईप लाईन अनुदान योजनेसाठी शेतकऱ्याला प्रथम ऑनलाईन अर्ज करायचा आहे.
- पाईप लाईन अनुदानासाठी आलेल्या अर्जावर छाननी प्रक्रिया पूर्ण करण्यात येते.
- त्यानंतर लाभार्थ्याची लॉटरी पद्धतीने निवड करण्यात येते.
- निवड झालेल्या शेतकर्यांना एसएमएस प्राप्त होईल.
- त्यानंतर त्यांना अनुदान वितरीत करण्यात येईल.
- नंतर निवड झालेल्या शेतकर्यांनी महाडीबीटी पोर्टलवर सर्व कागदपत्रे apload करावीत.
Pipe Line Anudan Yojana Marathi 2024 |
पाईप लाईन अनुदान योजना महाराष्ट्र अधिकृत website click Here
पाईप लाईन अनुदान योजना महाराष्ट्र हेल्प लाईन नंबर – 022-61316429
1 thought on “New |पाईपलाईन अनुदान योजना महाराष्ट्र | Good News | Pipe Line Anudan Yojana Marathi 2024 |मिळणार 50% अनुदान |”