Mukhyamntri Mazi Ladki Bahin Yojana 2024 | मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना |
Mukhyamntri Mazi Ladki Bahin Yojana 2024 |
नमस्कार मित्रांनो, देशातील नागरिकांसाठी केंद्र व राज्य शासनामार्फत वेगवेगळ्या योजना राबवल्या जातात. त्या योजनेच्या माध्यमातून देशातील नागरिकांसाठी अनुदान स्वरूपात आर्थिक सहाय्य दिले जाते. या योजना राज्यातील वेगवेगळ्या घटकांसाठी राबवल्या जात असतात.
तसेच आर्थिक दृष्ट्या मागास, दुर्बल घटक, इतर मागास प्रवर्ग व अनुसूचित जाती – जमाती, कष्टकरी बांधव, शेतकरी, बांधकाम कामगार, आरोग्य सेविका, ज्येष्ठ नागरिक व महिला या सर्वांना या योजनेमध्ये समाविष्ट केले जाते, त्यातून त्यांचा विकास करून त्यांना एक परिपूर्ण जीवन प्रदान करण्याचा प्रयत्न होत असतो
शासनाकडून नागरिकांच्या कल्याणासाठी या योजना नेहमीच राबवल्या जातात. त्यातून वेगवेगळ्या प्रकारे साह्य दिले जाते. त्याचप्रमाणे सध्या महाराष्ट्राच्या लोकसभा निवडणूक झालेल्या आहेत व महायुती सरकारने या लोकसभा निवडणूकंच्या पराभवामुळे येणाऱ्या काळातील विधानसभा निवडणुकांच्या प्रचारासाठी कंबर कसली आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी रक्षाबंधनापूर्वीच महाराष्ट्रतील महिलांना एका नक्की भेट देण्याचा निर्णय घेतलाय आहे.
या सर्वांचाच एक भाग म्हणून समाजातील विविध घटकांसाठी निर्णय व आकर्षक योजना आणण्याची तयारी सुरू केली. विशेषता राज्यातील महिला, तरुण मतदारांवर लक्ष ठेवून त्यांना खुश करण्यासाठी दोन मोठे योजनांची सुरुवात केली. त्यातील एक म्हणजे राज्यत महिलांची मते जिंकण्यासाठी मध्यप्रदेश धरतीवर महाराष्ट्र सरकारने राज्यात ” मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना “ सुरू करण्याचा निर्णय घेतला.
29 जून 2024 रोजी लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतरचा महायुती सरकारचा विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरचा सरकारच्या अर्थसंकल्प उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी सादर केला. त्या अर्थसंकल्पात सर्वांचे लक्ष वेधून घेणारी घोषणा म्हणजे मुख्यमंत्री लाडकि बहिण योजना होय.
राज्यातील महिलांना व मुलींना स्वावलंबी बनवण्यासाठी तसेच महिला व त्यांच्यावर अवलंबून असलेल्या मुलांच्या आरोग्य आणि पोषणाचे आर्थिक स्थिती सुधारावी, यासाठी राज्य सरकारने या महत्त्वपूर्ण योजनेची घोषणा केली.
तसेच राज्यातील श्रमबळ पाहणीनुसार पुरुषांची रोजगाराची टक्केवारी हि 59.10 % व स्त्रियांची टक्केवारी हि 28. 70 % आहे. हि वास्थुस्थिती लक्षात घ्येऊन महिलांच्या आर्थिक व आरोग्य परस्थिती मध्ये सुधारणा करण्यासाठी आणि राज्यात स्त्री – पुरुष समानता आणण्यासाठी हि योजना महत्व पूर्ण आहे.
राज्यात महिलांचे आरोग्य व पोषण आणि त्यांच्या आर्थिक स्वल्बानासाठी विविध योजना राबविण्यात येत असतात. महिलांचा श्रम सहभाग हा पुरुषांच्या तुलनेत अत्यंत कमी आहे, ज्यामुळे त्यांच्या आर्थिक स्वातंत्र्यावर परिणाम होतो. सादर परस्थिती लक्षात घेवून, राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांची कुटुंबातील निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री माझी बहिण लाडकी योजना सुरु करण्याचा निर्णय घेतला.
Mukhyamntri Mazi Ladki Bahin Yojana 2024 | वाचकांना नम्र विनंती |
मित्रांनो, 29 जून 2024 रोजी महायुती सरकारने आपला लोकसभा निवडणुकीनंतर चा पहिला अर्थसंकल्प जाहीर केला. त्यामध्ये राज्यातील महिलांसाठी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना या योजनेची घोषणा केली. या योजनेबद्दल आपण संपूर्ण माहिती आजच्या लेखात पाहणार आहोत. त्यासाठी तुम्ही हा लेख शेवटपर्यंत वाचा.
तसेच तुमच्या परिवारात किंवा असपासच्या परिसरात ज्या कोणी 21 ते 60 वर्ष वयोगटातील महिला असतील, त्यांना योजनेची माहिती सांगा. त्यासाठी आमचा हा लेख जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. तसेच या योजनेसाठी लागणारी कागदपत्रे, नियम, अटी व अर्ज करण्याची प्रक्रिया सर्वांची माहिती आपण पाहणार आहेत. त्यामुळे आलेख शेवटपर्यंत वाचा, ही विनंती.
योजनेचे नाव | मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना |
योजनेची सुरुवात | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे , महाराष्ट्र |
लाभार्थी | 21 ते 60 वर्ष वयोगटातील सर्व महिला |
लाभ | दरमहा 1500/-रुपयांचे आर्थिक सहाय्य |
उद्देश | महिलांना आरोग्य, आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी बनवणे |
अर्ज करण्याची पद्धत | ऑनलाईन |
हे देखील वाचा –
New | कुक्कुट पालन अनुदान योजना मराठी | Kukut Palan Yojana Maharashtra 2024 | ऑनलाईन अर्ज, पात्रता व कागदपत्रे |
Good News | अटल पेन्शन योजना 2024 | Atal Pension yojana ( APY ) In Marathi | APY संपूर्ण तपशीलवार माहिती |
New | ऊस तोडणी यंत्र अनुदान योजना महाराष्ट्र | Sugarcane Harvester Subsidy Scheme 2024 | मिळणार 35 लाख रुपये अनुदान |
New | पीएम सूर्य घर मोफत वीज योजना | PM Surya Ghar Mofat Vij Yojana 2024 | 300 युनिट वीज मिळणार मोफत |
Good News | शेळी मेंढी पालन योजना 2024 | Sheli Mendhi Palan Yojana Maharashtra | मराठीमध्ये संपूर्ण माहिती |
मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेची उद्दिष्ट्ये |
- मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण या योजनेच्या माध्यमातून राज्यातील महिला व मुलींना पुरेशा सोयी सुविधा उपलब्ध करून, रोजगार निर्मितीस चालना देणे.
- राज्यातील महिलांना स्वावलंबी व आत्मनिर्भर बनविणे.
- मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतून महिलांचे आर्थिक व सामाजिक पुनर्वसन करणे.
- लाडकी बहिणी योजनेच्या माध्यमातून राज्यातील महिला व मुलींना सशक्तिकरणाला चालना मिळेल.
- राज्यातील महिला व त्यांच्यावर अवलंबून असणाऱ्या मुलांच्या आरोग्य व पोषणाची स्थिती सुधारणे, हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.
मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेची वैशिष्ट्ये |
- मुख्यमंत्री लाडके बहन योजनेच्या माध्यमातून महिलांना आर्थिक स्वातंत्र तसेच त्यांना आरोग्याची काळजी घेण्यासाठी, राज्यातील गरीब महिलांना आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी बनवणे, या उद्देशाने या योजनेची सुरुवात करण्यात आली.
- या योजनेच्या अंतर्गत दारिद्र्यरेषेखालील महिलांना दरमहा 1500/- रुपये पर्यंत आर्थिक सहाय्य दिले जाणार आहे.
- या योजनेच्या माध्यमातून राज्यातील स्त्री-पुरुष समानता राखण्यासाठी मदत होणार आहे.
- या योजनेअंतर्गत दारिद्र्यरेषेखालील 21 ते 60 वर्ष वयोगटातील विवाहित, विधवा, तसेच घटस्फोटीत महिलांना समाविष्ट करण्यात आले आहे.
- योजनेअंतर्गत दिली जाणारी आर्थिक लाभाची रक्कम थेट महिलांच्या बँक खात्यात जमा करण्यात येईल.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजन नेमकी आहे काय ?
- मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज चव्हाण यांच्या सरकारने 26 जानेवारी 2019 पासून या योजने अंतर्गत महिलांना प्रतिमहा 1000 रुपये मिळणार असल्याच जाहीर करण्यात आलं होतं.
- शिवराज चव्हाण यांनि सुरु केलेली हि योजना चर्चेत राहिली, तसेच या योजनेच्या यश नंतर त्यांना मामा, भैया हि लोकप्रियता ही मिळाली होती. त्याच धर्तीवर महाराष्ट्र सरकारने लडकी बहिण योजना सुरू केली आहे.
- यासाठी अजित पवार यांनी अर्थसंकल्पात 46 हजार कोटी रुपये मंजूर केला आहेत.
- मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने अंतर्गत 21 ते 60 वयोगटातील पात्र महिलांना राज्य सरकार मार्फत दर महिन्याला 1500 हजार रुपये दिले जाणार आहेत.
- यासाठी वर्षाला 2,50500/- रुपये पेक्षा कमी उत्पन्नाचा निकष लावण्यात आला आहे.
- मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेची अंमलबजावनी सध्या राज्यात जुलै 2024 पासून करण्यात येणार आहे.
- तसेच राज्यातील महिलांसाठी अन्नपूर्णा योजनेअंतर्गत आर्थिक दुर्बल घटकातील महिलांना वर्षाला तीन गॅस सिलेंडर मोफत येणार असल्याचे या अर्थसंकल्पात जाहीर करण्यात आला आहे.
- त्यामध्ये राज्यातील 52 लाख 16 हजार 412 कुटुंबीय योजनेअंतर्गत सहभागी करून घेतले जाणार आहे.
Mukhyamntri Mazi Ladki Bahin Yojana 2024 | या योजनेचे स्वरूप |
आत्ताच राज्य शासनाचा महायुती सरकारचा अर्थसंकल्प जाहीर झाला. त्यामध्ये सुरू करण्यात आलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील पात्र महिलेला, त्याच्या स्वतःच्या आधार लिंक केलेल्या बँकेत थेट लाभ हस्तांतरण बँकेत दरमहा 1500/- रुपये इतकी रक्कम दिली जाईल, तसेच केंद्र शासनाच्या किंवा राज्य शासनाच्या अन्य कोणत्याही आर्थिक लाभ योजनेच्या कमी लाभ रक्कम घेत असेल, तर ती फरकाची रक्कम या योजनेद्वारे पात्रत्यास मिळण्यास देण्यात येईल.
राज्यातील 21 ते 60 वर्ष वयोगटातील महिलांना या योजनेअंतर्गत लाभ दिला जाणार आहे. त्यामध्ये विवाहित, विधवा, घटस्फोटीत आणि निराधार अशा महिलांचा समावेश करण्यात आलेला आहे.
Mukhyamntri Mazi Ladki Bahin Yojana 2024 | मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेसाठी पात्रता |
- मुख्यमंत्री माझी लाडकि बहीण योजनेसाठी अर्जदार महिला महाराष्ट्र राज्याची मूळ रहिवाशी असणे आवश्यक आहे.
- अर्जदार महिला ही विवाहित, विधवा, घटस्फोटीत किंवा निराधार असावे.
- मुख्यमंत्री माझी लाडकी बहिन योजनेअंतर्गत किमान 21 वर्षे पूर्ण केलेली व कमाल 60 वर्षापर्यंत या योजनेअंतर्गत लाभ दिला जातो.
- या योजनेचा लाभ घेणाऱ्या अर्जदार महिलेचे बँक खाते असणे आवश्यक आहे, तसेच ते आधार कार्ड ची लिंक असावे.
- अर्जदार महिलेच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे 2.50 लाखापेक्षा जास्त असू नये.
Mukhyamntri Mazi Ladki Bahin Yojana 2024 | मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेचे लाभार्थी |
- मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेमध्ये विवाहित असणाऱ्या महिलांना दरमहा दीड हजार रुपये मिळणार आहेत.
- या योजनेअंतर्गत शाळेमध्ये शिकत असणाऱ्या किंवा कॉलेजमध्ये शिक्षण घेणाऱ्या महिलांना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
- या योजनेअंतर्गत राज्यातील सर्व प्रवर्गातील महिलांसाठी लाभ दिला जाईल.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचे फायदे |
- मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेच्या माध्यमातून महिलांना दरमहा आर्थिक सहाय्य पुरवले जाते.
- या योजनेच्या माध्यमातून महिलांना आर्थिक स्वातंत्र्य बहाल करणे.
- कुटुंबामधील निर्णायक भूमिका घेण्यास महिलांना सशक्त बनवणे.
- महिलांना त्यांचे आरोग्य व त्यांच्या अंगावर असणारी मुले यांचे पोषण करण्यासाठी महिलाना स्वावलंबी करणे.
- महिलांचा सामाजिक व आर्थिक विकास करणे.तसेच त्यांना उच्च जीवनमान प्रधान करणे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेसाठी अपात्रता |
महाराष्ट्र सरकारने सुरू केलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांसाठी आवश्यक पात्रता ही सांगितले आहे. त्याचप्रमाणे कोण अपात्र असेल हे या योजनेअंतर्गत निश्चित केले आहे, ते पुढील प्रमाणे :
- ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त आहे.
- अर्जदार महिलेच्या कुटुंबातील प्रमुख व्यक्ती ही आयकर दाता असल्यास.
- अर्जदार महिलेच्या कुटुंबातील व्यक्ती शासकीय कर्मचारी असल्यास किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत असल्यास त्या महिलेस या योजनेअंतर्गत लाभ दिला जाणार नाही.
- अर्जदार महिलाही शासनाच्या इतर कोणत्याही विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या योजनेद्वारे दीड हजार पेक्षा जास्त रुपयांचा लाभ घेत असल्यास ती अपात्र ठरेल.
- अर्जदार महिलेच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माझी आमदार या खासदार असल्यास.
- ज्या कुटुंबातील सदस्यांची संयुक्तपणे पाच एकर पेक्षा जास्त शेत जमीन असल्यास, त्या महिलेला या योजनेअंतर्गत लाभ दिला जाणार नाही.
- ज्या महिलेच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर चार चाकी वाहन ( ट्रॅक्टर वगळून ) नोंदणीकृत असल्यास ती महिला या योजनेचा लाभ घेण्यास अपात्र ठरेल.
Mukhyamntri Mazi Ladki Bahin Yojana 2024 | या योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे |
- या योजनेसाठी चा ऑनलाईन अर्ज
- लाभार्थी महिलेचे आधार कार्ड
- मतदान ओळखपत्र
- राज्याचे रहिवासी असल्याचा रहिवासी दाखला
- जन्माचा दाखला सक्षम प्राधिकरण यांनी दिलेला कुटुंब उत्पन्नाचा दाखला
- बँक खाते
- पासबुक झेरॉक्स
- पास पोर्ट साईज फोटो
- रेशन कार्ड
- या योजनेच्या अटी व नियमांचे पालन करण्याबाबतचे हमीपत्र
- ईमेल आयडी
- मोबाईल नंबर
Mukhyamntri Mazi Ladki Bahin Yojana 2024 | या योजनेसाठी अर्ज करण्याची पद्धत |
राज्य शासनामार्फत नुकत्याच जाहीर करण्यात आलेल्या, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना या योजनेचा अर्ज पोर्टल किंवा मोबाईल ॲप द्वारे सेतू सुविधा केंद्रावर ऑनलाईन भरले जाऊ शकतात, त्याची प्रक्रिया पुढील प्रमाणे :
- राज्यातील पात्र लाभार्थी महिलेच्या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करता येईल.
- ज्या महिलेस ऑनलाईन अर्ज करता येत नसेल, त्यांच्यासाठी अर्ज भरण्याची सुविधा अंगणवाडी केंद्रात/बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालय ग्रामपंचायत सेतू सुविधा केंद्र येथे उपलब्ध असेल.
- वरील प्रमाणे भरलेला फॉर्म अंगणवाडी केंद्रात किंवा बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालय या सेतू सुविधा केंद्र मध्ये नियुक्त कर्मचाऱ्यांद्वारे ऑनलाईन प्रविष्ट केला जाईल.
- प्रत्येक यशस्वीरित्या दाखल केलेल्या अर्जासाठी येता योग्य पोचपावतीही दिली जाईल.
- मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी ची अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण विनामूल्य आहे.
- अर्जदार महिलेने स्वतः अर्ज भरण्याच्या ठिकाणी उपस्थित राहणे आवश्यक असेल, जेणेकरून तिचा तिथे फोटो काढता येईल आणि एक केवायसी करता येईल, यासाठी महिलेने खालील माहिती सोबत ठेवणे आवश्यक आहे: कुटुंबाचे पूर्ण ओळखपत्र असलेले रेशन कार्ड, स्वतःचे आधार कार्ड
Mukhyamntri Mazi Ladki Bahin Yojana 2024 | या योजनेसाठी महत्वाच्या तारखा |
- अर्ज प्राप्त करण्यास सुरुवात 1 जुलै 2024
- अर्ज प्राप्त करण्याचा शेवटचा दिनांक 15 जुलै 2024
- तात्पुरती यादी प्रकाशन दिनांक 16 जुलै 2024
Mukhyamntri Mazi Ladki Bahin Yojana 2024 |
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना शासन GR click here
1 thought on “New | मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना | Mukhyamntri Mazi Ladki Bahin Yojana 2024 | पात्रता , लाभार्थी व अर्ज करण्याची पद्धत |”