Khavati Anudan Yojana Maharashtra | खावटी अनुदान योजना |
Khavati Anudan Yojana Maharashtra |
नमस्कार मित्रानो, महाराष्ट्र राज्य शासना मार्फत राज्यातील शेतकरी, मागास कष्टकरी व अनुसूचित जाती- जमाती प्रवर्गातील नागरिकांचा आर्थिक व सामाजीक विकास व्हावा, या उद्देशाने वेगवेगळ्या योजना नेहमीच राबवीत असते. या सर्व सामान्य लोकांना अपुर्या ज्ञानामुळे तसेच प्रशिक्षणाचा अभाव असल्यामुळे म्हणाव्या आशा रोजगाराच्या संधी उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे या कुटुंबावर उदरनिर्वाहा साठी मोलमजुरी केल्याशिवाय दुसरा पर्याय नसतो.
तसेच ग्रामीण भागात रोजगाराचे कोणतेही कायमस्वरूपी चे साधन उपलब्ध नसल्याने त्यांची आर्थिक परस्थितीत अत्यंत हलाखीची असते. त्यामुळे हि कुटुंबे मिळेल ती कामे करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत असतात. पण पावसाळ्याच्या दिवसात सर्वत्र कामे बंद असल्याने, उत्पनाचे साधन उपलब्ध नसल्याने या कुटुंबावर उपासमारीची वेळ येते.
या सर्व गोष्टींचा विचार करून महाराष्ट्र राज्य शासनाने अशा कुटुंबांवर उपासमारीची वेळ येवू नये म्हणून ” खावटी अनुदान योजना महाराष्ट्र “ या योजनेची सुरुवात केली आहे. राज्यातील आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबाना आर्थिक पाठबळ देण्याच्या उद्देश्ने या योजनेची सुरुवात करण्यात आली आहे.
आपत्कालीन परस्थितीमध्ये म्हणजेच कोरोना महामारीच्या काळात lockdown मुळे देशात सर्व कंपन्या, उद्योगधंदे बंद झाले. त्यामुळे हातचे रोजगार गेले. त्याचा मोठा फटका सर्वसामान्य कुटुंबियांना झाला. त्यांची आर्थिक स्थिती आणखीनच खालावली. दारिद्रेशेखालील जीवन जगात असलेल्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आली. अशी परिस्थिती दरिद्री आदिवासी कुटुंबावर येवू नये म्हणून, राज्य शासना मार्फत खावटी अनुदान योजना सुरु करण्याचा एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला.
Khavati Anudan Yojana Maharashtra | खावटी अनुदान योजनेबद्दल थोडक्यात ……|
मित्रानो, खावटी अनुदान योजना हि महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ, नाशिक यांच्या मार्फत राबविली जात आहे. त्यासाठी राज्य शासनाकडून आदिवासी विकास महामंडलास निधी उपलब्ध करून दिला जातो. सध्या या योजने अंतर्गत 11.55 लाख आदिवासी तसेच अनुसूचित जमातीच्या कुटुंबियांना आर्थिक मदत पुरविली जाते. त्यासाठी शासनाकडून 486 कोटी रुपयांचे बजेट निश्चित केले आहे.
खावटी अनुदान योजने अंतर्गत सन 1978 ते 2013 पर्यंत या आदिवासी कुटुंबीय नच्या संख्येनुसार 4 युनिट पर्यंत 2,000/-रुपये, 5 ते 8 युनिटसाठी 3,000/- रुपये, व 8 युनिटच्या पुढे 4,000/- रुपये या प्रमाणे निधीच्या वाटपाची प्रक्रिया राबविण्यात येत होती. तसेच या योजने अंतर्गत कर्जाचे वाटप 50% वस्तुरूपात व 50% रोख स्वरुपात करण्यात येत होते. त्याचे 70% कर्ज व 30% अनुदान असे स्वरूप होते.
सन 2013 च्या शासन निर्णयात बदल करून 100% रोख स्वरुपात खावटी अनुदान योजना राबविण्याचा निर्णय झाला. खावटी अनुदान कर्ज योजनेतील रक्कम हि लाभार्थी कुटुंबातील महिलेच्या बँक खात्यामध्ये जमा करण्याचे आदेश प्राप्त झाले.
Khavati Anudan Yojana Maharashtra | वाचकांना नम्र विनंती |
मित्रानो शासनाच्या वेगवेगळ्या योजनांची माहिती हि आपण रोजच्या लेखातून घेतच असतो. त्याचप्रमाणे आजही आपण शासनाच्या खावटी अनुदान योजनेची माहिती देणार आहोत. त्यासाठी तुम्ही हा लेख शेवटपर्यंत वाचा. तसेच तुमच्या परिसरात जर कोणी आदिवासी जमातीचे व आर्थिक दृष्ट्या दरिद्रेरेषेखालील कुटुंबे असतील तर त्यांना हि या योजनेची माहिती द्या. त्यासाठी आमचा हा लेख जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. त्यामुळे समाजातील जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा घेता येईल. हि विनंती.
योजनेचे नाव | खावटी अनुदान योजना महराष्ट्र |
योजनेची सुरुवात | महाराष्ट्र राज्य |
सुरु कधी झाली | सन 1978 |
विभाग | सहकारी आदिवासी विकास महामंडळ |
लाभार्थी | आदिवासी जाती – जमाती |
लाभ | 4000/- रुपयांची आर्थिक मदत |
उद्देश्य | आदिवासी कुटुंबांच्या जीवनावश्यक गरजा पुरवणे |
अर्ज करण्याची पद्धत | ऑफलाईन/ अधिकृत website |
हे पण वाचा –
Free Silai Machine Yojana In Maharashtra 2024 | Good News | मोफत शिलाई मशीनसाठी नाव नोंदणी सुरु | लगेच करा अर्ज |
Mukhyamantri Vayoshri Yojana In Marathi 2024 | New | मुख्यमंत्री वायोश्री योजना मराठी | नोंदणी सुरु |
Khavati Anudan Yojana Maharashtra | खावटी अनुदान योजनेची उद्दिष्ट्ये |
- खावटी अनुदान योजन अंतर्गत राज्यातील आदिवासी जाती – जमातींचा आर्थिक व सामाजिक विकास करणे हाच मुख्य उद्देश आहे.
- या योजनेअंतर्गत शासनाने आर्थिक साह्य केल्याने आदिवासी जमातींना दैनंदिन गरजांसाठी कोणावर अवलंबून राहण्याची आवश्यकता पडणार नाही.
- या योजनेअंतर्गत आदिवासी जमातींना सावकाराकडून कर्ज घेण्याची ही आवश्यकता भासणार नाही.
- खावठी अनुदान योजनेमुळेआदिवासी जमातीतील लोक स्वावलंबी व आत्मनिर्भर बनतील.
- खावटी अनुदान योजनेअंतर्गत राज्यातील गरीब कुटुंबांची जीवनमान सुधारणे व त्यांची उज्जवल भविष्याकडे वाटचाल सुरु करणे.
- महाराष्ट्र राज्यातील आर्थिक दृष्ट्या गरीब व मागास्लेल्या आदिवासी समाजाला या योजनेच्या माध्यमातून सक्षम करणे.
- महाराष्ट्र राज्यातील दारिद्र्यरेषेखाली जीवन जगत असलेल्या आदिवासींना ऐन पावसाळ्याच्या काळात येणारे उपासमारीची वेळ टाळण्यासाठी या योजनेची सुरुवात करण्यात आली.
Khavati Anudan Yojana Maharashtra | खावटी अनुदान योजनेची वैशिट्य |
- खावटी अनुदान योजना ही महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळात मार्फत चालवण्यात येत आहे.
- महाराष्ट्र राज्य शासनाकडून आदिवासी विकास महामंडळ निधी उपलब्ध करून दिला जातो.
- गावठी अनुदान योजना अंतर्गत अर्ज करण्याची पद्धत अत्यंत सोपी ठेवण्यात आली आहे, त्यामुळे आदिवासी लोकांना अर्ज करताना कोणत्याही अडचणी येणार नाही.
- खावटी अनुदान योजनेतील लाभार्थ्यांना शंभर टक्के अनुदान दिले जाते.
- या शंभर पैकी 50% रोख रक्कम स्वरूपात व 50 टक्के वस्तू स्वरूपात दिले जाते.
- या योजनेअंतर्गत महिलांना जास्त प्राधान्य दिले जाते, त्यामुळे ही रक्कम महिलांच्या खात्यावर बँकेत जमा केली जाते.
- जर एखाद्या ठिकाणी दारिद्र रेषेखाली कुटुंबातील महिलेचे बँकेमध्ये जर खाते नसेल तर त्यांना ही रक्कम पोस्टामार्फत प्रदान केली जाते.
- या योजने अंतर्गत राज्यातील 11 लाख 54 हजार कुटुंबांना लाभ दिला जाणार आहे.
- महाराष्ट्र राज्य शासना मार्फत या योजनेसाठी 486 कोटी रुपयांचे बजेट निश्चित करण्यात आले आहे.
Khavati Anudan Yojana Maharashtra | खावटी अनुदान योजनेचे लाभ |
- खावठी अनुदान योजनेअंतर्गत दारिद्र्य रेषेखालील व आदिवासी गरीब कुटुंबांना वस्तू स्वरूपात व रोख रकमेच्या माध्यमातून आर्थिक सहाय्य पुरविले जाते.
- या योजनेअंतर्गत पुरविलेल्या आर्थिक सहाय्यातून हे लोक आपल्या दैनंदिन गरजा पूर्ण करतात.
- या योजनेमुळे राज्यातील आदिवासी कुटुंबांचा जीवनस्तर उंचावेल.
- या योजनेमुळे दरिद्री गरीब व आदिवासी लोक आर्थिक व सामाजिक दृष्ट्या खंबीर बनतील.
- खावटी अनुदान योजनेमुळे दारिद्र रेषेखालील गरीब कुटुंबांना दैनंदिन गरजांसाठी कोणाच्याही भरोशावर अवलंबून राहण्याची गरज पडणार नाही.
- या योजनेमुळे हे आदिवासी लोक स्वतंत्र व सक्षम बनतील.
- तसेच या योजनेमुळे वस्तू स्वरूपात अन्नधान्य उपलब्ध झाल्याने या आदिवासी लोकांमधील कुपोषणाचे प्रमाण कमी होईल.
- या योजनेतील आर्थिक लाभांमुळे आदिवासी समाजातील लोकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी लागणारे भांडवल उपलब्ध झाल्याने ते स्वावलंबी बनतील.
Khavati Anudan Yojana Maharashtra | खावटी अनुदान योजनेतील लाभार्थी |
खावटी अनुदान योजने अंतर्गत महाराष्ट्र राज्य सरकारच्या आदिवासी विकास महामंडला कडून लाभास पात्र ठरविण्यात आलेल्या जाती पुढील प्रमाणे :
- आदिवासी जाती
- पारधी जमाती
- आदिम जमाती
- विधवा महिला
- घटस्फोटित महिला
- अपंग व्यक्ती
- अनाथ मुलांचे कुटुंब
- शेतमजूर
- आदिवासी वर्ग
- कातकरी वर्ग
- माडिया वर्ग
- कोलम वर्ग
Khavati Anudan Yojana Maharashtra | योजनेतील वस्तूंची गुणवत्ता तपासणी |
खावटी अनुदान योजने अंतर्गत राज्य शासना मार्फत वस्तूंचे वाटप करण्यात येते. त्याची पध्दत पुढीलप्रमाणे :
- शासना मार्फत लाभार्थ्यांना द्यावयाच्या वस्तूंची खरेदी करताना वस्तूंचा गुणवत्ता व दर्जा राखण्याची दक्षता घेण्यात येईल.
- या वस्तूंची तपासणी करण्याकरता नमुने शासनमान्य प्रयोगशाळेत पाठवण्यात येतील.
- तसेच तपासणी अंती दर्जेदार व गुणवत्ता पूर्ण वस्तूंचा पुरवठा करण्यात येईल.
- त्याशिवाय काही गावांमधून वस्तूंचे नमुने घेवून त्यांची सुद्धा तपासणी केली जाईल.
Khavati Anudan Yojana Maharashtra | जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्याची पद्धत |
- महाराष्ट्र शासनामार्फत पात्र लाभार्थी कुटुंबासाठी सर्व वस्तू पॅक करून एका बॅगमध्ये भरून त्या बॅगवर “विक्रीसाठी नाही (Not for Sale) असे छापण्यात येईल. नंतर या बॅगा गावोगावी पोहचविण्यात येतील.
- तसेच या वस्तूंचे वाटप कधी करण्यात येणार आहे याचे वेळापत्रक अगोदरच देण्यात येईल. नंतर सदर वस्तू त्या गोची सरपंच, उपसरपंच,महिला सदस्य तसेच अनुसूचित जमातीचे सदस्य यांच्या उपस्थितीत पात्र कुटुंबातील महिलेला हे सुपूर्द करण्यात येईल.
Khavati Anudan Yojana Maharashtra | खावटी अनुदान योजनेच्या पात्रता व आटी |
- खवटी अनुदान योजनेतील लाभ घेणारा लाभार्थी हा महाराष्ट्र राज्याचा मूळ रहिवासी असावा.
- या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्याकडे आदिवासी समाजाचे जात प्रमाणपत्र असावे.
- या योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी लाभार्थी कुटुंबातील महिलेचे आधार कार्ड बँकेशी लिंक असावे.
- महाराष्ट्र राज्या बाहेरील नागरिकांना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
- खावटी अनुदान योजनेअंतर्गत लाभ घेणारे लाभार्थी फक्त महाराष्ट्र शासनाने ठरवून दिलेल्या जातींमधून निवडले जातील.
- खावटी अनुदान योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी लाभार्थ्याने यापूर्वी केंद्र व राज्य शासनामार्फत चालवल्या जाणाऱ्या कोणत्याही अनुदान योजनेचा लाभ घेतलेला नसावा.
- खावटी अनुदान योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी लागणाऱ्या लाभार्थ्यांमध्ये कोणीही शासकीय नोकरीत असता कामा नये.
- या योजनेचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांकडे तत्सम सक्षम प्राधिकरणाने दिलेले जात प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
- या योजनेचा लाभ ग्रामीण भागातील दारिद्र्याची खालील आदिवासी कुटुंबांना दिला जाईल.
Khavati Anudan Yojana Maharashtra |आवश्यक कागदपत्रे |
- रेशन कार्ड
- आधार कार्ड
- पासपोर्ट साईज फोटो
- जात प्रमाणपत्र
- उत्पन्नाचा दाखला
- रहिवासी दाखला
- मोबाईल नंबर
- बँक पासबुक
- ई-मेल आयडी
- घटस्फोटीत असल्यास न्यायालयाचा घटस्फोट निकाल
- आपंग असल्यास अपंगत्वाचे प्रमाणपत्र
- दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र
- विधवा असल्यास पतीच्या मृत्यूचा दाखला
Khavati Anudan Yojana Maharashtra | खावटी अनुदान योजनेत अर्ज रद्द होण्याची करणे |
- या योजनेत लाभ घेण्या लाभार्थ्याला महाराष्ट्रचे मूळ रहिवाशी असल्यास अर्ज रद्द केला जावू शकतो.
- तसेच लाभार्थ्याकडे आदिवासींचे प्रमाणपत्र नसल्यास अर्ज रद्द होतो.
- या योजनेअंतर्गत लाभ घेणारी कुटुंब हे आदिवासी नसतील तर त्यांचा अर्ज रद्ध होतो.
- तसेच या योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या लाभार्थी जर एखादी शासकीय नोकरी करीत असेल किंवा कोणत्या शासकीय योजनेचा लाभ घेत असेल तर अर्ज रद्द होऊ शकतो.
Khavati Anudan Yojana Maharashtra | आर्ज करण्याची पध्दत |
शहरी भाग
- अर्जदार हा जर शहरी भागात राहत असेल तर त्याला आपल्या नगरपालिका, महानगरपालिका तसेच आदिवासी विकास आदिवासी विकास मंडळात जाऊन तेथे योजनेचा अर्ज घ्यावा लागेल.
- या अर्जामध्ये आवश्यक ती सर्व माहिती भरून त्याच्यासोबत कागदपत्रांच्या सत्यप्रत जोडाव्यात.
- आर्ज योग्य भरला गेल्यानंतर तो कार्यालयात जमा करावा व त्याची पोच घ्यावी.
- नंतर ते अधिकारी अर्जाचे छाननी करून या योजनेचा लाभ तुम्हाला देतील
ग्रामीण भाग
- अर्जदार हा जर ग्रामीण भागात राहणार असेल तर त्याला आपल्या गावातील ग्रामपंचायत कार्यालयात जाऊन तिथून या योजनेचा अर्ज घ्यावा लागेल.
- त्यानंतर या अर्जामध्ये आवश्यक ती सर्व सत्य माहिती भरावी.
- नंतर अर्जासोबत आवश्यक कागदपत्रांच्या सत्यप्रत जोडाव्यात व तो अर्ज कार्यालयात जमा करावा.
- तसेच अर्ज जमा केल्याची पोच अधिकार्याकडून घ्यावी.
- ते अधिकारी अर्जाची छाननी करून लाभार्थ्याला योग्य तो लाभ देतील
- अशाप्रकारे तुमची ऑफलाईन अर्ज करण्याची प्रोसेस पूर्ण होईल
1 thought on “Khavati Anudan Yojana Maharashtra | New | खावटी अनुदान योजना 2024 | नव्या स्वरुपात |”