Free Silai Machine Yojana In Maharashtra 2024 | मोफत शिलाई मशीन योजना |
Free Silai Machine Yojana In Maharashtra 2024 |
नमस्कार, महाराष्ट्र शासनामार्फात राबविल्या जाणाऱ्या योजना या कल्याणकारी व जनतेच्या हिताच्या असतात. या योजनाच्या माध्यमातून शासन दिन-दुबळ्या, गरीब, मागासलेले जाती-जमातीचे लोक यांचा आर्थिक व सामाजिक विकास करण्याचा प्रयत्न करीत असते. त्यासाठी आवश्यक आशा गरजेच्या वस्तू मोफत पुरविल्या जात असतात.
महाराष्ट्र राज्यात ग्रामीण भागात अधिकतर कुटुंबे हि रोजगाराच्या संधी उपलब्ध नसल्याने त्यांचे जीवन हे दारिद्र्यरेषे खाली जगात असतात. त्यामुळे ग्रामीण भागातील हे लोक हलाखीचे जीवन जगात असतात. त्यामुळे या कुटुंबातील महिलांना घर सांभाळताना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. आपल्या दैनदिन गरजांसाठी इतरांवर अवलंबून राहावे लागते.
या ग्रामीण भागातील महिलांना एखादा व्यवसाय सुरु करावा म्हटले तरी भांडवल उपलब्ध होत नाही. आणि भांडवल उपलब्ध करण्यासाठी कोणाकडून तरी कर्ज घावे लागते. त्यामुळे अनेक लोक व्यवसाय सुरु करीत नाहीत. त्यामुळे आहे त्या परिस्थितीत काटकसरीने आपले जीवन जगात असतात.
ग्रामीण भागातील आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबातील व्यवसाय करण्याची इच्छा असलेल्या महिलां साठी ” मोफत शिलाई मशीन योजना “ हि योजना महाराष्ट्र शासना मार्फत राबविली जात आहे. ज्या महिलांना घर सोडून रोजगारासाठी बाहेर जाता येत नाही. आशा महिलांना या योजने अंतर्गत मशीन मिळाल्याने शिवणकाम करून स्वताच्या पायावर उभ्या राहू शकतील. तसेच त्यांच्या कुटुंबाला आर्थिक हातभार लागेल.
मोफत शिलाई मशीन या योजनेचा उद्देश म्हणजे या महिलांना घर बसल्या हाताला काम मिळाल्याने त्या आर्थिक दृष्ट्य स्वतंत्र होवून स्वताचा व स्वताच्या कुटुंबाचा सांभाळ करू शकतील.
Free Silai Machine Yojana In Maharashtra 2024 | वाचकांना नम्र विनंती |
मित्रानो, आज पर्यंत आपण शासनाच्या विविध योजनांची माहिती पहिलीच आहे.त्याचप्रमाणे आजही आपण शासनाच्या एका नवीन योजनेची माहिती पाहणार आहोत. त्यासाठी तुम्ही हा लेख शेवटपर्यंत वाचा. तसेच त्तुमच्या परिसरातील गरीब, गरजू महिला असतील तर त्यांना या योजनेची माहिती द्या. तसेच जास्तीत जास्त लोकांपर्यंत आमचा हा लेख शेअर करा. त्यामुळे त्यानाही या योजनेचा लाभ घेता येईल व आर्थिक मदत होईल. हि विनंती.
योजनेचे नाव | मोफत शिलाई माशीन योजना महाराष्ट्र 2024 |
लाभाथी | गरीब कुटुंबातील महिला |
लाभ | मोफत शिलाई मशीन |
उद्देश | महिलांना रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध करून देणे |
अर्ज करण्याची पद्धत | ऑफलाईन / ऑनलाईन अर्ज ( PDF ) |
हे पण वाचा –
Mukhyamantri Vayoshri Yojana In Marathi 2024 | New | मुख्यमंत्री वायोश्री योजना मराठी | नोंदणी सुरु |
Pradhanmantri Mudra Loan Yojana 2024 | New | प्रधानमंत्री मुद्रा लोन योजना मराठी | ऑनलाईन अर्ज मराठी |
Maharashtra Berojgari Bhatta Yojana 2024 | Good News | महाराष्ट्र बेरोजगारी भत्ता योजना मराठी | नोंदणी सुरु |
Free Silai Machine Yojana In Maharashtra 2024 | शिलाई मशीन योजनेची उद्दिष्टे |
- मोफत शिलाई मशीन योजनेच्या माध्यमातून राज्यातील महिलांना आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी बनविणे.
- या योजनेच्या माध्यमातून या गरीब महिलांच्या अंगी असणार्या कौशल्याचा विकास करणे. त्यांच्या सुप्त गुणांना बाहेर काढणे.
- या योजनेतून राज्यातील महिलांचा आर्थिक व सामाजिक विकास करून, त्यांना आत्मनिर्भर बनविणे.
- आर्थिक दृष्ट्या मागास कुटुंबातील महिलांना स्वताचा लघु उद्योग सुरु करता यावा, या उद्देशाने महाराष्ट्र शासनाने या योजनेची सुरुवात केली.
- या योजनेमुळे महिलांच्या जीवनमानाचा स्तर उंचावणार आहे.
- या योजनेच्या माध्यमातून या महिला स्वताचा व कुटुंबाचा आर्थिक भर उचलण्यास सक्षम होतील.
- या योजनेमुळे बेरोजगारी कमी होवून, रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होतील.
- या योजने अंतर्गत शिलाई मशीन मोफत मिळत असल्याने या महिलांना कोण कडून कर्ज घेण्याची आवशकता पडणार नाही.
- त्यामुळे या लोकांमध्ये वाढणारा कर्जबाजारीपणा कमी होईल.
Free Silai Machine Yojana In Maharashtra 2024 | शिलाई मशीन योजनेची वैशिष्ट्ये |
- मोफत शिलाई मशीन योजना या योजनेची सुरुवात महाराष्ट्र शासना मार्फत आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबातील महिलांसाठी करण्यात आली आहे.
- या योजने अंतर्गत राज्यातील 50 हजाराहून अधिक महिलांना मोफत शिलाई मशीन वाटप करण्याचे निश्चित करण्यात आले आहे.
- या योजनेमुळे महिलांच्या अंगी असणार्या कौशल्यांचा विकास होवून रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होणार आहेत.
- या योजनेमुळे बेकारी कमी झाल्याने समाजात असणारी आर्थिक विषमता कमी होईल.
- मोफत शिलाई मशीन योजनेचा लाभ शहरी व ग्रामीण भागातील गरीब व गरजू महिलांना दिला जाईल.
- राज्यात या योजनेसाठी महिलांना अर्ज करण्यासाठी एकदम सोपी पध्दत ठेवण्यात आली आहे.
- त्यामुळे या महिलांचा वेळ व पैसा दोन्हीची बचत होईल.
- या योजनेमुळे महिला सक्षम झाल्याने कुटुंबांचा आर्थिक स्थर उंचावेल.
Free Silai Machine Yojana In Maharashtra 2024 | या योजनेचे फायदे |
- मोफत शिलाई मशीन योजनेमुळे राज्यातील महिलांना रोजगार मिळेल.
- या योजनेमुळे महिला आर्थिक दृष्ट्या सक्षम झाल्याने, त्यांचे व्यवहार ज्ञान वाढेल.
- या योजने अंतर्गत राज्यातील आर्थिकदृष्ट्या गरीब व गरजू बेरोजगार महिलांना मोफत शिलाई मशीन चे वाटप करण्यात येईल.
- या योजनेमुळे अनेक महिलांना नवीन उद्योग करण्यास प्रोत्सहान मिळेल.
- या योजनेमुळे अनेक रोजगाराच्या नव्या संधी निर्माण झाल्याने बेकारीचे प्रमाण कमी होईल.
- या योजने अंतर्गत मोफत शिलाई मशीन मिळत असल्याने या गरीब कुटुंबातील महिलांना कोण कडून पैसे कर्ज म्हणून घेण्याची आवशकता पडणार नाही.
- या शिलाई मशीन मुळे महिला स्वताच्या गरजा पूर्ण करू शकतील, तसेच कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यास सक्षम होतील.
- शिलाई मशीन योजनेमुळे महिलांचे जीवनमान सुधारेल.
- या योजनेमुळे महिला आत्मनिर्भर व सशक्त होतील.
- या योजनेमुळे महिला स्वताच्या पायावर उभ्या राहिल्याने, त्यांचा आत्मविश्वास वाढेल.
Free Silai Machine Yojana In Maharashtra 2024 | या योजनेचे लाभार्थी व पात्रता |
- महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण व शहरी भागातील मूळ रहिवासी असलेल्या आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबातील महिला या योजनेचा लाभ घेण्यास पात्र असतील.
- तसेच गरीब, निराधार महिलांना मोफत शिलाई मशीनचे वाटप करण्यात येईल. जेणेकरून महिला कपडे शिवून पैसे शिवून स्वताचा व कुटुंबाचा उदरनिर्वाह करू शकतात.
Free Silai Machine Yojana In Maharashtra 2024 | शिलाई मशीन योजनेच्या आटी व शर्ती |
- मोफत शिलाई मशीन योजनेचा लाभ फक्त महाराष्ट्र राज्यातीलआर्थिक दृष्ट्या गरीब व बेरोजगार महिलांनाच दिला जाईल.
- मोफत शिलाई मशीन योजनेचा लाभ महाराष्ट्र राज्य बाहेरील महिलांना दिला जाणार नाही.
- या योजनेसाठी अर्ज करणारी अर्जदार महिला आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबातील बेरोजगार महिला असावी.
- या योजनेअंतर्गत अर्ज करणाऱ्या महिलेचे वय 20 ते 40 वर्षाच्या दरम्यान असावे.
- मोफत शिलाई मशीन योजनेअंतर्गत आर्थिक दृष्ट्या गरीब महिलांनाच लाभ दिला जाईल, पुरुषांना नाही.
- या योजनेअंतर्गत अपंग व विधान महिलांना जास्त प्रमाणात प्राधान्य दिले जाईल.
- या योजनेचा लाभ घेण्यासाठी विधवा महिलांना त्यांच्या पतीचे मृत्यूचे प्रमाणपत्र सादर करणे गरजेचे आहे.
- या योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी अपंग महिलांना अपंगत्वाचे प्रमाणपत्र सादर करावे लागेल.
- मोफत शिलाई मशीन योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार महिलेचे वार्षिक उत्पन्न वार्षिक उत्पन्न 1.2 लाख वर असू नये.
- या योजनेचा लाभ एका कुटुंबातील एकाच महिलेला दिला जाईल.
- या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार महिलेकडे शिवणकामाचे प्रमाणपत्र असणे गरजेचे आहे.
- या योजनेतील लाभार्थी अर्जदार व्यक्ती कोणत्याही शासकीय नोकरीत असू नये.
- या योजनेत अर्ज करणाऱ्या महिलेने यापूर्वी कोणत्याही राज्य व केंद्र शासनाच्या योजनेचा लाभ घेतलेला नसावा.
Free Silai Machine Yojana In Maharashtra 2024 | आवश्यक कागदपत्रे |
- आधार कार्ड
- मतदान ओळखपत्र
- रेशन कार्ड
- शिवणकामाचे प्रमाणपत्र
- पतीच्या मृत्यूचा दाखला
- अपंगत्वाचा दाखला
- वयाचा दाखला
- मोबाईल नंबर
- ईमेल आयडी
- पासपोर्ट साईज फोटो
- वार्षिक उत्पनाचा दाखला
Free Silai Machine Yojana In Maharashtra 2024 | अर्ज रद्द होण्याची करणे |
- मोफत शिलाई योजनेसाठी अर्जदार महिलेने जर अर्जामध्ये खोटी माहिती भरली असेल तर त्या महिलेचा अर्ज रद्द केला जातो.
- अर्जदार महिलेचे वय 40 पेक्षा जास्त असेल, तर त्या महिलेचा अर्ज रद्द होतो.
- अर्जदार महिला ही महाराष्ट्र राज्याबाहेरील रहिवासी असेल तर अर्ज रद्द केला जाऊ शकतो.
- अर्जदार महिलेने यापूर्वी कोणत्या शासकीय योजनेचा लाभ घेतलेला असल्यास त्या महिलेचा अर्ज रद्द होतो.
- मोफत शिलाई मशीन योजनेसाठी अर्ज करणाऱ्या महिलेकडे शिवणकामाचे प्रमाणपत्र नसेल तर अर्ज रद्द होतो.
- या योजनेसाठी अर्ज करणारी महिलाही जर आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबातील नसेल तर अर्ज रद्द केला जाऊ शकतो.
Free Silai Machine Yojana In Maharashtra 2024 | अर्ज करण्याची पध्दत |
- आपल्याला जवळच्या नगरपालिका किंवा जिल्हा कार्यालयात जाऊन महिला व बाल कल्याण विभागाला भेट द्यावी लागेल.
- तिथे आपल्याला मोफत शिलाई मशीन योजनेसाठीचा अर्ज घ्यावा लागेल.
- त्या अर्जामध्ये विचारलेली सर्व माहिती व्यवस्थित भरावी.
- तसेच अर्जासोबत आवश्यक कागदपत्रांच्या सर्व सत्यप्रत जोडाव्यात.
- मग तो अर्ज कार्यालयात जमा करून अर्जाची पोच घ्यावी.
- नंतर ते अधिकारी अर्जाची छाननी करून आपल्याला कळवतील व मोफत शिलाई मशीनचे वाटप करतील.
Free Silai Machine Yojana In Maharashtra 2024 | ऑनलाईन पध्दत |
मोफत शिलाई मशीन योजना महाराष्ट्र या योजनेचे ऑनलाईन अर्ज करण्याचे पोर्टल अजून सुरु झालेले नाही. त्यामुळे तुम्ही सर्वांनी ऑफलाईन पद्दतीने अर्ज कराव आणि या योजनेचा लाभ घ्यावा.
1 thought on “Free Silai Machine Yojana In Maharashtra 2024 | Good News | मोफत शिलाई मशीनसाठी नाव नोंदणी सुरु | लगेच करा अर्ज |”