Gatai Stall Scheme Maharashtra 2024 | गटई स्टॉल योजना मराठी |
Gatai Stall Scheme Maharashtra 2024 |
नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र शासना मार्फत वेगवेगळे योजना सतत राबवल्या जातात. या योजनांच्या माध्यमातून राज्यातील नागरिकांचा सामाजिक व आर्थिक विकास करणे व त्यांना एक विशिष्ट सामाजिक दर्जा प्राप्त करून देणे आहे, हा शासनाचा महत्त्वाचा उद्देश असतो.
राज्यातील अनुसूचित जातीतील, चर्मकार समाजातील गटाई कामगारांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी मोफत पत्र्याची स्टॉल देण्याच्या उद्देशाने एका अत्यंत महत्त्वपूर्ण योजनेची सुरुवात करण्यात आली आहे, ती योजना म्हणजे ” गटई स्टॉल योजना महाराष्ट्र “ होय.
महाराष्ट्र शासनाने राज्यातील अनुसूचित जातीतील चर्मकार समाजातील चर्मकार, ढोर, होलार आणि मोची इत्यादी समाजातील व्यक्तीना स्वताचे जीवनमान उंचावण्यासाठी, तसेच त्यांचा सामाजिक विकास करून, त्यांना समाजात मानाचे स्थान निर्माण करण्याच्या उद्देशाने या योजनेची सुरुवात करण्यात आली. या योजनेच्या माध्यमातून या समाजातील लोकांचे शैक्षणिक आर्थिक व सामाजिक विकास करण्यास मदत होईल.
राज्यातील अनुसूचित जाती, समाजातील बहुतांश लोक हे चामड्याच्या वस्तू व पादत्राणे तयार करण्याच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात दिसून येतात. ते या चामड्याच्या वस्तूंवर आपली उपजीविका करीत असतात.
या चर्मकार समाजातील लोक हे रस्त्याच्या कडेला बसून पात्रणे दुरुस्तीची काम करीत असतात. त्यांच्याकडे कोणतेही आपल्या व्यवसायासाठी कायमस्वरूपी ठिकाण नसते. ते लोक ऊन, वारा व पाऊस झेलत रस्त्याच्या कडेला बसून आपली सेवा लोकांना देत असतात.
त्यामुळे या चर्मकार समाजाचा ऊन, वारा व पाऊस यापासून संरक्षण करून कायमस्वरूपी त्यांच्या धंद्यासाठी स्टॉल उभे करून देण्याच्या उद्देशाने ग्रामपंचायत, नगरपालिका क्षेत्रात शंभर टक्के अनुदान देण्याची योजना शासन निर्णयानुसार करण्यात आली. दिनांक 14/ 3/ 2013 च्या शासन निर्णयानुसार स्टॉल उभारणीची कार्यवाही ही संत रोहिदास चर्मकार समाज मंडळ यांच्यामार्फत करण्यात येते.
Gatai Stall Scheme Maharashtra 2024 | वाचकांना नम्र विनंती |
मित्रांनो, समाजातील वेगवेगळ्या घटकांसाठी राज्य व केंद्र शासनामार्फत चालवण्यात येणाऱ्या वेगवेगळ्या योजनांची माहिती आता पर्यंत आपण घेतली आहे. त्याचप्रमाणे आज आपण राज्यातील अनुसूचित जातीतील चर्मकार समाजासाठी, प्रभागासाठी एका विशेष योजनेची सुरुवात करण्यात आली आहे. ती योजना म्हणजे ” गटई स्टॉल योजना महाराष्ट्र “ होय.
त्यासाठी तुम्ही हा लेख शेवटपर्यंत वाचा. तसेच तुमच्या आसपासच्या परिसरात कोणी अनुसूचीत जातीतील लोक राहत असतील व जे चामड्याच्या वस्तू बनवीत असतील, तर त्यांना या योजनेची माहिती सांगा. त्यासाठी हा लेख जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. त्यामुळे त्यांना या योजनेचा लाभ घेता येईल, ही विनंती.
योजनेचे नाव | गटई स्टॉल योजना महाराष्ट्र |
योजनेची सुरुवात | महाराष्ट्र राज्य 2013 |
योजनेचा विभाग | सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग |
लाभार्थी | चर्मकार समाजातील नागरिक |
लाभ | मोफत पत्र्याचे स्टॉल उपलब्ध करून देणे |
उद्देश | चर्मकार समाजाचा विकास करणे |
अर्ज करण्याची पध्दत | ऑफलाईन |
हे देखील वाचा –
चंदन कन्या योजना मराठी माहिती | New | Chandan Kanya Yojana Maharashtra 2024 | मुलींच्या भविष्यासाठी चंदन लागवाढ |
Good News | संजय गांधी निराधार अनुदान योजना | Sanjay Gandhi Niradhar Yojana 2024 | Good News | मानधनात वाढ, नोंदणी सुरु |
New | Pradhan Mantri Krishi Sinchai Yojana | प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना महाराष्ट्र 2024 | नोंदणी सुरु |
यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना | Good News | Yashvantrao Chavan Gharkul Yojana 2024 | घराचे स्वप्न होणार पूर्ण |
ताडपत्री अनुदान योजना मराठी | Good News | Tadpatri Anudan Yojana 2024 | जिल्हा परिषद मार्फात निधी उपलब्ध |
Gatai Stall Scheme Maharashtra 2024 | गटाई स्टॉल योजन मराठी उद्दिष्ट्ये |
- चर्मकार उद्योग हा चर्मकार समाजाचा पारंपारिक असल्यामुळे, त्यांना स्वतःचे स्थान निर्माण करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासनाने गटई स्टॉल योजनेची सुरुवात केली.
- राज्यातील आर्थिक दृष्ट्या मागास, दुर्बल आणि दारिद्र्यरेषेखाली जीवन जगणाऱ्या अनुसूचित जातीतील, चर्मकार समुदायांची जीवनमान उंचावणे, हा मुख्य उद्देश ठेवण्यात आला आहे.
- अनुसूचित जातीतील जे लोक चर्मकाराचा व्यवसाय करतात, त्यांच्या पाऊस, ऊन व वारा यापासून रक्षण करणे, हा गटाई स्टॉल योजनेचा उद्देश आहे.
- चर्मकार समाजातील कामगारांना स्वतःचे पत्र्याचे स्टॉल बांधण्यासाठी कोणत्याही आर्थिक समस्यांचा सामना करावा लागू नये, तसेच पैशासाठी कोणावरही अवलंबून राहावे लागू नये, हा या योजनेचा उद्देश आहे.
- या योजनेच्या माध्यमातून राज्यातील चर्मकार बांधवांच्या जीवनमान उंचावून, त्यांना स्वावलंबी व आत्मनिर्भर बनवणे.
- गटई स्टॉल योजनेच्या माध्यमातून राज्यातील गटई कामगारांची भविष्य उज्वल बनवणे.
Gatai Stall Scheme Maharashtra 2024 | गटाई स्टॉल योजन मराठीची वैशिष्ट्ये |
- राज्यातील गटई कामगारांना पत्र्याचे स्टॉल उभा करून देण्याच्या, उद्देशाने महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने गटई स्टॉल योजनेची सुरुवात करण्यात आली.
- या योजनेच्या माध्यमातून गटई कामगारांना शंभर टक्के अनुदान तत्त्वावर लोखंडी पत्र्याचे स्टॉल उपलब्ध करून देण्यात येतात, त्यामुळे या योजनेतील अर्जदारांना स्वतःकडील रक्कम भरावी लागत नाही.
- राज्यात गटाई स्टॉल योजना आयुक्त समाज कल्याण पुणे व महामंडळामार्फत संयुक्तपणे राबवण्यात येते.
- गटई स्टॉल योजना ची अर्ज करण्याची पद्धत अत्यंत सोपी ठेवण्यात आली आहे. त्यामुळे या योजनेच्या अर्जदारांना कोणत्याही समस्यांचा सामना करावा लागणार नाही.
- गटई स्टॉल योजनेअंतर्गत अपंग व्यक्तीस विशेष प्राधान्य दिले जाते.
- या योजनेअंतर्गत दिली जाणारी लाभाची रक्कम अर्जदाराच्या खात्यात थेट डीबीटी मार्फत जमा करण्यात येते.
- गटई स्टॉल योजनेच्या माध्यमातून राज्यातील अनुसूचित जातीतील चर्मकार समाजातील कामगारांचे जीवनमानात उंचावून त्यांना स्वातंत्र व आत्मनिर्भर बनवून आर्थिक व सामाजिक विकास करण्याच्या दृष्टीने ही योजना महत्त्वपूर्ण आहे.
Gatai Stall Scheme Maharashtra 2024 | गटाई स्टॉल योजन मराठी लाभार्थी |
राज्यातील अनुसूचित जातीतील चर्मकार समाजातील जे नागरीक, कामगार रस्त्याच्या कडेला बसून लोकांची सेवा करतात, ते सर्व गटई स्टॉल योजनेचे लाभार्थी आहेत.
Gatai Stall Scheme Maharashtra 2024 | गटाई स्टॉल योजन मराठी फायदे |
- गटाई स्टॉल योजनेच्या माध्यमातून गटई कामगारांना स्टॉल उभारणीसाठी शंभर टक्के अनुदान तत्वावर पत्र्याचे लोखंडी स्टॉल वाटप करण्यात येते. त्यामुळे ती स्वतःचा उद्योग सुरू करू शकतात.
- पत्र्याच्या स्टॉल बरोबरच या कामगारांना पाचशे रुपये रोख अनुदानही दिले जाते.
- या योजनेमुळे राज्यातील गटई कामगारांना ऊन, वारा व पाऊस यांचा सामना करावा लागणार नाही.
- गटई कामगार यांना पत्र्याचे स्टॉल उपलब्ध झाल्याने स्वतःचे हक्काचे स्थान काम करण्यासाठी उपलब्ध होईल.
- गटाई स्टॉल योजनेच्या माध्यमातून स्टॉल धारकांना परवाना सुद्धा दिला जातो, त्यामुळे त्यांना नंतर कुठल्याही समस्यांचा सामना करावा लागत नाही.
- गटई कामगार या योजनेमुळे स्वालंबी व आत्मनिर्भर बनतील.
- राज्यातील चर्मकार समाजातील गटई कामगारांना आपला स्वतःचा स्टॉल उभारण्यासाठी कोणाकडे पैशासाठी हात पसरावे लागणार नाही, तसेच कर्जही काढावे लागणार नाही.
- या योजनेमुळे चर्मकार समाजातील नागरिकांचे आर्थिक व सामाजिक विकास होऊन त्यांच्या जीवनमानाचा दर्जा उंचावे.
Gatai Stall Scheme Maharashtra 2024 | गटाई स्टॉल योजन मराठीची पात्रता |
- गटई स्टॉल योजनेचा अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा मूळ रहिवासी असणे गरजेचे आहे.
- गटई स्टॉल योजनेतील अर्जदार हा अनुसूचित जातीतील असला पाहिजे.
Gatai Stall Scheme Maharashtra 2024 | गटाई स्टॉल योजन मराठी नियम व आटी |
- गटाई स्टॉल योजनेचा अर्जदार हा अनुसूचित जातीतील चर्मकार समाजाचा असावा.
- अर्जदार महाराष्ट्र राज्याचा मूळ रहिवाशी असणे आवश्यक आहे.
- राज्याबाहेरील नागरिकांना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
- या योजनेसाठी अर्ज करणाऱ्या अर्जदाराने ज्या व्यवसायाची निवड केली आहे, त्या व्यवसायाचे संपूर्ण ज्ञान व अनुभव त्या अर्जदारास असणे गरजेचे आहे.
- या योजनेचा लाभ घेणाऱ्या अर्जदार कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न शहरी व ग्रामीण भागासाठी एक लाख रुपये पर्यंत असणे आवश्यक आहे.
- गटाई स्टॉल योजनेच्या लाभार्थ्यांकडे जातीचा दाखला आवश्यक आहे व तो तहसीलदार किंवा तत्सम सक्षम प्राधिकार्याने दिलेला असावा.
- या योजनेचा लाभ घेणाऱ्या अर्जदारांनी यापूर्वी कोणत्याही उपक्रमांतर्गत किंवा शासकीय उपक्रमांतर्गत या योजनेचा लाभ घेतलेला नसावा. अर्जदाराने अर्जासोबत लाभ न घेतल्याचे घोषपत्र देणे गरजेचे आहे.
- या योजनेचा लाभ एका कुटुंबात फक्त एकच व्यक्तीला स्टॉल मंजूर केला जातो.
- गटई स्टॉल योजनेअंतर्गत दिलेल्या स्टॉलची वाटप झाल्यानंतर विक्री करता येणार नाही.
- तसेच सदर स्टॉलचे हस्तांतर करता येणार नाही व भाडेतत्त्वावर ही देता येणार नाही.
- या योजनेच्या महामंडळांनी वेळोवेळी घालून दिलेल्या सर्व अटी व शर्ती लाभार्थ्यावर बंधनकारक असतात.
- या योजनेअंतर्गत स्टॉल वाटपाचे पत्र लाभार्थ्याचे छायाचित्रासह स्टॉलच्या दर्शनी भागावर लावने बंधनकारक आहे.
- या योजनेअंतर्गत वाटप झालेल्या स्टॉलची नंतर देखभाल व दुरुस्ती स्वतः लाभार्थ्याला करावयाची आहे.
- अर्जदारने गटई स्टॉल ची मागणी केलेली जागा ग्रामपंचायत, महानगरपालिका द्वारे भाड्याने भाडेपट्टीवर खरेदी केलेली अथवा मोफत उपलब्ध करून दिलेले असणे गरजेचे आहे किंवा अर्जदाराच्या स्वतःच्या मालकीची असावे.
Gatai Stall Scheme Maharashtra 2024 | गटाई स्टॉल योजन मराठीसाठी आवश्यक वयोमर्यादा |
गटाई स्टॉल योजनेसाठी अर्जदाराचे वय 18 वर्षे ते 50 वर्षापर्यंत असावे.
Gatai Stall Scheme Maharashtra 2024 | गटाई स्टॉल योजन मराठी आवश्यक कागदपत्रे |
- आधार कार्ड
- मतदान ओळखपत्र
- रेशन कार्ड
- उत्पन्नाचा दाखला
- रहिवासी दाखला
- अपंग असल्यास अपंगात्वाचे प्रमाणपत्र
- बँक पासबुक
- पासपोर्ट साईज फोटो
- मोबाईल नंबर
- ईमेल आयडी
- शपथ पत्र अथवा स्वयंघोष पत्र
Gatai Stall Scheme Maharashtra 2024 | गटाई स्टॉल योजन मराठी अर्ज रद्द होण्याची कारणे |
- गटई स्टॉल योजनेचा अर्जदर हा महाराष्ट्र राज्याचा मूळ रहिवाशी नसल्यास अर्ज रद्द होतो.
- अर्जदार हा अनुसूचित जातीतील नसल्यास अर्ज रद्द केला जातो.
- अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न ठरवून दिलेल्या पेक्षा जास्त असल्यास अर्ज होतो.
- अर्जदार शासकीय नोकरीत असल्यास त्याचा अर्ज रद्द केला जातो.
- या योजनेतील अर्जदाराचे वय 18 पेक्षा कमी व 50 पेक्षा जास्त असल्यास अर्ज रद्द केला जातो.
Gatai Stall Scheme Maharashtra 2024 | गटाई स्टॉल योजन मराठी अर्ज करण्याची पध्दत |
- आपल्याला जवळच्या जिल्हा कार्यालयातील समाज कल्याण विभागात जावे लागेल.
- तेथील कार्यालयातून गटाई स्टॉल योजनेचा अर्ज घ्यावा लागेल.
- अर्जात विचारलेली सर्व माहिती योग्य व अचूक भरावी.
- त्यानंतर अर्ज सोबत आवश्यक सांगितलेल्या कागदपत्रांच्या सत्यप्रत जोडाव्यात.
- नंतर तो अर्ज कार्यालयात जमा करावा.
- अर्ज जमा केल्याची पोच पावती घ्यावी.
- अशाप्रकारे आपले गटई स्टॉल योजना अंतर्गत अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल.
Gatai Stall Scheme Maharashtra 2024 |
गटई स्टॉल योजनेची शासनाची अधिकृत website CLICK HERE