जिव्हाळा कर्ज योजना मराठी 2024 | Good News | Jivhala Karj Yojana Maharashtra | कैद्यांना मिळणारा 50,000/- रुपये कर्ज |

Table of Contents

Jivhala Karj Yojana Maharashtra | जिव्हाळा कर्ज योजना मराठी 2024 |

Jivhala Karj Yojana Maharashtra
jivhala karj yojana 2024
jivhala karj yojana marathi
kaidyansathi yojana
maha shasan yojana

Jivhala Karj Yojana Maharashtra |

नमस्कार मित्रानो, विविध महाराष्ट्र शासनाकडून राज्यात विविध योजनांची सुरुवात केली जाते. राज्यातील प्रत्येक घटकासाठी म्हणजेच चांदया पासून बांद्यापर्यंत सर्वांचा विचार या योजनांमध्ये केला जातो. या योजना या जनतेच्या कल्याणाच्या व हिताच्या असतात.
प्रत्येक योजनेच्या मागे विशिष्ट एका समाजातील घटकाचा विचार करून त्याची अंमलबजावणी केली जाते. त्याचा सर्वांगीण तसेच सामाजिक व आर्थिक विकास करून त्याचे जीवन जगण्यास हातभार या योजनाच्या माध्यमातून लावण्याचा प्रयत्न केला जातो.
त्याचप्रमाणे राज्यातील कारागृहांमध्ये शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांच्या कुटुंबासाठी म्हणून शासनाकडून एका योजनेची सुरुवात करण्यात आली आहे. ती योजना म्हणजे ” जिव्हाळा कर्ज योजना “ होय.
महाराष्ट्र राज्यात कारागृहांमध्ये हजारो कैदी सध्या शिक्षा भोगत आहेत. पण प्रत्येक कैदी हा गंभीर गुन्हा केलेला आहे असे नाही. त्यामुळे त्यांच्यासाठी या जिव्हाळा कर्ज योजनेची सुरुवात करण्यात आली.
बहुतांश कैदी हे कौटुंबिक वादातून छोट्या मोठ्या वादातून शिक्षा भोगत आहे. त्यामुळे त्यापैकी त्यांच्या कुटुंबातील कमवते व्यक्ती त्या स्वत आहेत. या व्यक्ती कारागृह टाकल्यामुळे त्यांच्या कुटुंबाची होणारी वाताहत थांबावी हा या योजने मागील महत्त्वाचा उद्देश आहे.
महाराष्ट्र राज्यात शासनाकडून या सर्व गोष्टींचा आढावा घेऊन राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी 1 मे 2022 रोजी महाराष्ट्र दिनाच्या दिवशी राज्य सहकारी बँकेच्या वतीने जिव्हाळा योजनेची सुरुवात करण्याचा निर्णय घेतला.
जिव्हाळा कर्ज योजनेअंतर्गत दीर्घकाळ कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांच्या कुटुंबांना सात टक्के व्याजदराने 50 हजार रुपयांची कर्ज उपलब्ध करून जाते. त्याच्या साह्याने ते आपल्या दैनंदिन गरजा पूर्ण करून, काहीतरी जोडधंदा सुरू करता यावा. हा या योजनेमधील उद्देश आहे. त्यामुळे त्यांचे कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यास मदत होणार आहे.
तसेच शिक्षा भोगत असलेल्या लाभार्थी कैद्यांची बँक खाते राज्य बॅंकेत उघडण्यात येणार आहेत. त्यामध्ये कैद्यांची उत्पन्न जमा करून प्रशासनाकडून त्यातून कर्जाची परतफेड घेण्यात येईल.

Jivhala Karj Yojana Maharashtra | वाचकांना नम्र विनंती |

मित्रांनो, राज्यात केंद्र व राज्य शासनामार्फत विविध योजना राबवल्या जात असतात. समाजाची हितासाठीच या योजना राबविल्या जातात. त्या योजनांची माहिती आपण रोजच आपल्या लेखातून घेत आहोत. त्याचप्रमाणे आज आपण जिव्हाळा कर्ज योजनेची माहिती पाहणार आहोत.
त्यासाठी तुम्ही हा लेख शेवटपर्यंत वाचा. तसेच तुमच्या परिवारात व आसपासच्या परिसरात जे कोणी कैदी शिक्षा भोगत आहेत. त्यांच्या कुटुंबांना या योजनेची माहिती द्या. त्यासाठी हा लेख जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. त्यामुळे त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करताना कोणत्याही अडचणी येणार नाहीत, ही विनंती.

योजनेचे नावजिव्हाळा कर्ज योजना, महाराष्ट्र
योजनेची सुरुवातमहाराष्ट्र
विभागसमाज कल्याण विभाग, महाराष्ट्र
लाभार्थीदीर्घ काळासाठी शिक्षा भोगत असलेले कैदी
लाभ50,000/- रुपये रोख रक्कम
उद्देशकैद्याच्या कुटुंबाना आर्थिक सहाय्य करणे

हे देखील वाचा –

  गटई स्टॉल योजना मराठी | Good News | Gatai Stall Scheme Maharashtra 2024 | गटई कामगारांना मिळणार पत्र्याचे स्टॉल |

  चंदन कन्या योजना मराठी माहिती | New | Chandan Kanya Yojana Maharashtra 2024 | मुलींच्या भविष्यासाठी चंदन लागवाढ |

Good News | संजय गांधी निराधार अनुदान योजना | Sanjay Gandhi Niradhar Yojana 2024 | Good News | मानधनात वाढ, नोंदणी सुरु |

New | Pradhan Mantri Krishi Sinchai Yojana | प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना महाराष्ट्र 2024 | नोंदणी सुरु |

Jivhala Karj Yojana Maharashtra | जिव्हाळा कर्ज योजना मराठी ची उद्दिष्ट्ये |

  • राज्यातील कुटुंबामधील कर्ती व्यक्ती कारागृहात असल्यामुळे त्या कुटुंबाच्या दैनंदिन गरजांसाठी आर्थिक सहाय्य करण्याच्या उद्देशाने, जिव्हाळा कर्ज योजनेची सुरुवात करण्यात आली.
  • या कुटुंबांना दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी तसेच उद्योग व्यवसायासाठी कर्ज उपलब्ध करून देणे, हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.
  • जिव्हाळा योजनेच्या माध्यमातून कैदी यांच्या कुटुंबांचे जीवनमान उंचावून त्यांना स्वातंत्र्य बनवणे.
  • या योजनेच्या माध्यमातून कैदी यांच्या कुटुंबाच्या सामाजिक व आर्थिक विकास करणे.
  • कारागृहातील या कैद्यांच्या कुटुंबांना पैशासाठी कोणावरही अवलंबून राहावे लागू नये, तसेच कर्ज काढावे लागू नये, या उद्देशाने जिव्हाळ योजनेची सुरुवात करण्यात आली.

 

Jivhala Karj Yojana Maharashtra | जिव्हाळा कर्ज योजना मराठी वैशिष्ट्ये |

  • जिव्हाळा कर्ज योजना महाराष्ट्र सरकारकडून कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या कायद्याच्या कुटुंबांना आर्थिक मदत करण्याच्या उद्देशाने, सुरू करण्यात आलेली एक महत्त्वाची योजना आहे.
  • कारागृहात  शिक्षा भोगत असलेल्या कैदी यांची मानसिकता बदलण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करण्यासाठी जिव्हाळा कर्ज योजना महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
  • जिव्हाळा कर्ज योजनेची प्रायोगिक तत्त्वावर सुरुवात येरवडा कारागृहातून करण्यात आली.
  • या योजनेची सुरुवात राज्यातील सर्व कारागृहात करण्यात आली आहे.
  • या योजनेमुळे कायद्यांमध्ये आपलेपणाची भावना निर्माण होण्यास मदत होईल.
  • या योजनेअंतर्गत दिले जाणारे कर्ज कैद्याच्या कुटुंबातील सदस्याच्या बँक खात्यात डीव्हीडी मार्फत जमा करण्यात येईल.

 

Jivhala Karj Yojana Maharashtra | जिव्हाळा कर्ज योजना मराठी लाभार्थी |

महाराष्ट्रात जिव्हाळा कर्ज योजनेची सुरुवात राज्यातील कारागृहात एखाद्या गुन्ह्यात दीर्घकाळ शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांच्या कुटुंबासाठी सुरू करण्यात आली आहे.

Jivhala Karj Yojana Maharashtra | जिव्हाळा कर्ज योजने अंतर्गत दिला जाणारे कर्ज व आकारला जाणारा व्याजदर |

राज्य शासनामार्फत कारागृहातील कैद्यांच्या कुटुंबासाठी राबवण्यात येणाऱ्या लाभार्थी कुटुंबाला 50 हजार रुपयांचे कर्ज दिले जाते. त्या कर्ज रकमेवर 7 टक्के व्याजदर या जिव्हाळा कर्ज योजनेअंतर्गत आकारला जातो.

Jivhala Karj Yojana Maharashtra | जिव्हाळा कर्ज योजन मराठी चे फायदे |

  1. कारागृहात दीर्घकालीन शिक्षा भोगत असलेल्या राज्यातील कैद्यांच्या कुटुंबांना 7 टक्के व्याज दराने पन्नास हजार रुपयांचे कर्ज मंजूर केले जाते.
  2. जिव्हाळा कर्ज योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या कर्जाला अर्जदार व्यक्तीला जामीन ठेवण्याची किंवा कोणतीही वस्तू गहाण ठेवण्याची आवश्यकता नाही.
  3. या योजनेअंतर्गत कर्ज मिळवण्यासाठी अर्जदाराला कोणतेही शुल्क भरावे लागत नाही.
  4. या योजनेमुळे राज्यातील कैद्यांची कुटुंबे सशक्त व आत्मनिर्भर बनतील.
  5. या योजनेतील लाभांमुळे ते समाजात मानाने जगू शकतील.
  6. जिव्हाळा योजनेच्या माध्यमातून कैदी यांच्या कुटुंबाचा आर्थिक व सामाजिक विकास होईल.
  7. या योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या कर्जावर अत्यंत कमी व्याजदर आकारला जातो.
  8. तसेच या योजनेतील कर्ज परतफेडीचा कालावधी निश्चित केला नाही, त्यामुळे अर्जदार त्याच्या सोयीनुसार कर्ज फेडू शकतो.
  9. या योजनेतील आर्थिक साह्यामुळे अर्जदार कुटुंबांना पैशासाठी वणवण भटकण्याची गरज पडणार नाही, तसेच सावकाराकडून कर्ज घ्यावे लागणार नाही.
  10. कर्जाच्या परतफेड रकमेतील एक टक्का निधी हा कैऱ्यांच्या कल्याणी दिलेला देण्यात येतो.

 

Jivhala Karj Yojana Maharashtra | जिव्हाळा कर्ज योजन मराठीचे नियम व आटी |

  • जिव्हाळा कर्ज योजनेअंतर्गत फक्त महाराष्ट्र राज्यातील कैद्यांच्या कुटुंबीयांनाच लाभ दिला जातो.
  • राज्याबाहेरील कैद्याच्या कुटुंबांना या योजनेचा लाभ दिला जात नाही.
  • या योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या कर्जाच्या परतफेड ची जबाबदारी ही राज्य शासनाची असणार नाही.
  • या योजनेअंतर्गत दिला जाणारा लाभ हा कैद्याच्या शिक्षेचा कालावधी व त्याची कारागृहातील उत्पन्न स्थिती बघूनच दिला जातो.
  • या योजनेअंतर्गत कुटुंबाला देण्यात येणाऱ्या खर्चासाठी कैद्याची संमती असणे आवश्यक आहे, अन्यथा त्या कुटुंबांना लाभ दिला जात नाही.

 

Jivhala Karj Yojana Maharashtra | जिव्हाळा कर्ज योजन मराठी आवश्यक पात्रता |

  • महाराष्ट्र राज्याचे मूळ रहिवासी असलेले शिक्षा भोगत असलेले सर्व कैदी या योजनेसाठी पात्र आहेत.
  • दीर्घकालीन शिक्षा झालेल्या कैद्यांची कुटुंबिक या योजनेसाठी पात्र ठरतील.

Jivhala Karj Yojana Maharashtra | जिव्हाळा कर्ज योजन मराठी आवश्यक कागदपत्रे |

  • आधार कार्ड
  • रेशन कार्ड
  • मतदान ओळखपत्र
  • रहिवासी दाखला
  • उत्पन्नाचा दाखला
  • मोबाईल नंबर
  • ईमेल आयडी
  • पासपोर्ट साईज फोटो
  • शपथपत्र
  • बँक पासबुक

Jivhala Karj Yojana Maharashtra | जिव्हाळा कर्ज योजने अंतर्गत अर्ज रद्द होण्याची कारणे |

  • अर्जदार महाराष्ट्र राज्याचा मूळ रहिवासी नसल्यास या योजनेतून अर्ज रद्द केला जातो.
  • कैद्याला जर दीर्घकालीन शिक्षा झालेली नसेल, तर त्याचा अर्ज रद्द होतो.
  • शिक्षा भोगत असलेल्या कैऱ्यांची कारागृहात जर उत्पन्न नसेल, तर त्याचा पण अर्ज रद्द केला जातो.

Jivhala Karj Yojana Maharashtra | जिव्हाळा कर्ज योजन मराठी अर्ज करण्याची पध्दत |

  •  राज्यात ही योजना शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांच्या कुटुंबासाठी सुरू करण्यात आली आहे.
  • त्यामुळे या कुटुंबांनी कारागृहाशी संपर्क साधावा.
  • तिथून जिव्हाळा कर्ज योजनेचा अर्ज घ्यावा.
  • अर्जात विचारलेली सर्व माहिती योग्य व अचूक भरा.
  • नंतर आवश्यक कागदपत्रांच्या सत्यप्रत जोडून अर्ज कारागृह प्रशासनकडे जमा करावा.
  • नंतर सदर अधिकारी हे अर्ज तपासणीसाठी पाठवतात.
  • अधिकारी माहिती व कागदपत्रांची तपासणी करतात व शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांची उत्पन्न त्यांच्या कालावधी पाहून, या योजनेसाठी निवड करण्यात येते.

ivhala Karj Yojana Maharashtra |

जिव्हाळा कर्ज योजना महाराष्ट्र अधिकृत website CLICK HERE

1 thought on “जिव्हाळा कर्ज योजना मराठी 2024 | Good News | Jivhala Karj Yojana Maharashtra | कैद्यांना मिळणारा 50,000/- रुपये कर्ज |”

Leave a Comment