Sanjay Gandhi Niradhar Yojana 2024 | संजय गांधी निराधार अनुदान योजना |
Sanjay Gandhi Niradhar Yojana 2024 |
नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र शासनामार्फत राज्यातील नागरिकांच्या हितासाठी व कल्याणासाठी वेगवेगळ्या योजना राबवल्या जात असतात. या योजनेच्या माध्यमातून दिनदुबळ्या, गरीब नागरिकांचा सामाजिक व आर्थिक विकास करणे, हा मुख्य उद्देश असतो.
राज्यातील प्रत्येक क्षेत्रातील, प्रत्येक घटकासाठी या योजनांची अंमलबजावणी होत असते. केंद्र व राज्य शासनामार्फत अनुदान तत्वावर या योजना राबवल्या जात असतात. प्रत्येक घटक हा योजनेचा केंद्रबिंदू मांडला असतो.प्रत्येक घटकाला समान न्याय व हक्क देण्याचा प्रयत्न या योजनांच्या माध्यमातून होत असतो.
त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्यातील निराधार, अपंग, अनाथ मुले, अंध व्यक्ती, मोठे आजार असणार्या व्यक्ती, दुर्लक्षित , घटस्फोटीत महिला, वेश्याव्यवसायातून मुक्त झालेल्या महिला, अत्याचारित महिला व ट्रांसजेंडर इत्यादी घटकांना इत्यादी व्यक्तींना मदत करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासनाकडून एका महत्त्वपूर्ण योजनेची सुरुवात करण्यात आली. त्या योजनेचे नाव आहे. ” संजय गांधी निराधार अनुदान योजना “ होय.
या योजनेच्या माध्यमातून प्रत्येक लाभार्थी व्यक्तीस दरमहा दीड हजार रुपये तसेच एकापेक्षा अधिक लाभार्थी असलेल्या कुटुंबात तर महिन 3000/- हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य संजय गांधी निराधार योजनेच्या माध्यमातून दिले जाते.
संजय गांधी निराधार योजनेसाठी राज्यातील पात्र लाभार्थ्याची 65 वर्षे वय झाल्यानंतर त्याला भारताला राज्यात सुरू असलेल्या श्रवण बाळ योजना व इंदिरा गांधी राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना या योजनांमध्ये सामावून घेतले जाते.
संजय गांधी राष्ट्रीय निराधार योजनेच्या माध्यमातून अपंग आहेत किंवा असाह्य आहेत, त्यांना आर्थिक मदत देवून त्यांच्या जीवनमनाचा दर्जा उंचावणे हा मुख्य उद्देश आहे. तसेच त्यांना जीवन जगताना त्यांना कोणत्याही आर्थिक अडचणींचा सामना करावा लागू नये, यासाठी या योजनेची सुरुवात करण्यात आली.
Sanjay Gandhi Niradhar Yojana 2024 | वाचकांना नम्र विनंती |
मित्रांनो, शासनामार्फत चालवल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या योजनांची माहिती आपण रोजच मिळवत असतो. त्याचप्रमाणे आज आपण एका नवीन योजनेची माहिती घेणार आहेत. त्या योजनेचे नाव आहे, ” संजय गांधी निराधार अनुदान योजना “ होई. त्यासाठी तुम्ही हा लेख शेवटपर्यंत वाचा.
तसेच तुमच्या परिसरात कोणी निराधार, अपंग, अनाथ मुले, घटस्फोटीत, दुर्लक्षित महिला, वेश्या व्यवसायातील महिला, अत्याचार पिडीत महिला इत्यादी कोणी असेल, तर त्यांना या योजनेची माहिती द्या. त्यासाठी आमच्या हा लेख जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. त्यामुळे त्यांना या योजनेचा लाभ मिळू शकेल, ही विनंती.
योजनेचे नाव | संजय गांधी निराधार अनुदान योजना |
योजनेची सुरुवात | महाराष्ट्र राज्य |
लाभार्थी | राज्यातील निराधार व्यक्ती |
लाभ | प्रतिमहिना 3000/-रुपयांचे आर्थिक सहाय्य |
उद्देश | निराधारांना आर्थिक सहाय्य करणे |
अर्ज करण्याची पध्दत | ऑनलाईन |
हे पण वाचा –
New | Pradhan Mantri Krishi Sinchai Yojana | प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना महाराष्ट्र 2024 | नोंदणी सुरु |
यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना | Good News | Yashvantrao Chavan Gharkul Yojana 2024 | घराचे स्वप्न होणार पूर्ण |
ताडपत्री अनुदान योजना मराठी | Good News | Tadpatri Anudan Yojana 2024 | जिल्हा परिषद मार्फात निधी उपलब्ध |
शुभमंगल सामुहिक विवाह योजना महाराष्ट्र | New | Samuhik Vivah Yojana Marathi 2024 | मुलीच्या लग्नासाठी मिळणार 10,000/-रुपये |
Sanjay Gandhi Niradhar Yojana 2024 | संजय गांधी निराधार योजनेची उद्दिष्ट्ये |
- महाराष्ट्र राज्यातील असहाय्य, निराधार व्यक्तींना आर्थिक सहाय्य करण्याच्या उद्देशाने संजय गांधी निराधार योजनेची सुरुवात करण्यात आली.
- संजय गांधी निराधार योजनेच्या माध्यमातून निराधार व्यक्तीने 1500/-चे आर्थिक सहाय्य दिले जाते.
- या योजनेमुळे राज्यातील निराधार व्यक्तींच्या आत्मविश्वास वाढवून ते आत्मनिर्भर होतील.
- या योजनेमुळे राज्यातील त्या निराधार यांचे जीवनमान सुधरेला.
- निराधार व्यक्तींच्या सामाजिक व आर्थिक विकास योजनांच्या माध्यमातून होईल.
- संजय गांधी निराधार योजनेच्या आर्थिक सहाय्यातून या व्यक्तींना आपल्या दैनंदिन खर्चासाठी कोणावर अवलंबून राहण्याची आवश्यकता पडणार नाही.
- तसेच कोणाकडून पैसे कर्जदार घ्यावे लागणार नाही, हा या योजनेच्या मुख्य उद्देश आहे.
Sanjay Gandhi Niradhar Yojana 2024 | संजय गांधी निराधार अनुदान योजनेची वैशिष्ट्ये |
- महाराष्ट्र राज्यात संजय गांधी निराधार योजनेची सुरुवात केंद्र शासनामार्फत करण्यात आली आहे.
- या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी अर्जदारांना त्यांच्या अपत्य संख्येची अट राहणार नाही, हे या योजनेचे मुख्य वैशिष्ट्ये आहे.
- या योजनेच्या माध्यमातून अनाथ मुले, अनाथाश्रमत राहत असणारी मुले – मुले, घटस्फोटीत महिला तसेच व्यवसाय वेश्याव्यवसायातील महिला यांना या योजनेचा लाभ मिळेल.
- या योजनेचे अर्ज प्रक्रिया ऑनलाईन व ऑफलाईन ठेवण्यात आली आहे, त्यामुळे अर्जदार घरी बसूनही अर्ज भरू शकतो.
- त्यामुळे अर्जदाराच्या वेळ व पैशाची बचत होणार आहे.
- या योजनेअंतर्गत येणारी लाभाची राशी थेट अर्जदाराच्या बँक खात्यातील DBT मार्फत जमा करण्यात येते.
Sanjay Gandhi Niradhar Yojana 2024 | संजय गांधी निराधार अनुदान योजने अंतर्गत वार्षिक उत्त्पन |
संजय गांधी निराधार अनुदान योजनेसाठी अर्ज करणाऱ्या व्यक्तीचे वार्षिक उत्पन्न हे 21000/- रुपयान पेक्षा जास्त असू नये.
Sanjay Gandhi Niradhar Yojana 2024 | संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे लाभार्थी |
- अनाथ
- अपंग
- कर्णबधिर मुले
- घटस्फोटीत महिला
- दुर्लक्षित महिला
- मोठ्या आजाराने ग्रस्त असलेल्या व्यक्ती
- तुरुंगात शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांच्या पत्नी
- देवदासी
- अनाथ मुले
- आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या पत्नी
- अत्याचार पीडित महिला
- वेश्या व्यवसायातून मुक्त झालेल्या महिला
- तसेच क्षयरोग, कुष्ठरोग, एडस यासारख्या दुर्धर आचारामुळे स्वतःचे पोट भरण्यास असमर्थ असणारे महिला व पुरुष
Sanjay Gandhi Niradhar Yojana 2024 | संजय गांधी निराधार अनुदान योजने अंतर्गत वयाची आट |
संजय गांधी निराधार अनुदान योजनेअंतर्गत शासनाने नेमून दिलेल्या वयाची आट अर्जदार व्यक्तीची 60 वर्षापेक्षा कमी ठेवण्यात आलेले आहे.
Sanjay Gandhi Niradhar Yojana 2024 | संजय गांधी निराधार अनुदान योजनेची तपासणी प्रक्रिया |
- संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना, ज्या बँकेमध्ये त्यांचे बँक खाते असेल, तेथे जाऊन 1 जानेवारी ते 31 मार्च दरम्यान दरवर्षी हयात असल्याचे प्रमाणपत्र द्यावे लागेल.
- जर एखादी व्यक्ती बँकेत हजर राहून शकत नसेल, तर निश्चित कालावधीमध्ये त्या व्यक्तीला आपल्या जवळच्या ठिकाणी तहसीलदार, नायब तहसीलदार व उपविभागीय अधिकारी यांच्यासमोर प्रत्यक्ष हजर राहून हयात असल्याचे जाणीव करून द्यावे लागेल.
- या योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या लाभार्थ्याची तपासणी दर वर्षातून एकदा करण्यात येते. जर त्यावेळेस एखाद्या लाभार्थीच्या कारणासाठी पात्र ठरला असेल ती जर कारण स्पष्ट जाणवत नसतील किंवा त्यांच्या परस्थिती मध्ये सुधारणा जाणवत असेल, तर त्या लाभार्थ्यांचा लाभ या योजनेतून बंद केला जाईल.
Sanjay Gandhi Niradhar Yojana 2024 | संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे फायदे |
- संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत दरवर्षी पात्र लाभार्थ्यास 1500/- रुपये एवढी रक्कम दिली जात होती, परंतु आता त्यामध्ये वाढ करून ते 3000/- रुपये करण्यात आले आहे.
- एका कुटुंबातील एकापेक्षा अधिक पात्र लाभार्थी असल्यास याबद्दल त्यांना तीन हजार रुपयांच्या आर्थिक सहाय्य दिले जाते.
- या योजनेतील निराधार व्यक्ती सशक्त व आत्मनिर्भर बनतील.
- या योजनेमुळे राज्यातील निराधार व्यक्तींच्या जीवनमानाचा दर्जा उंचावून ते स्वाभिमानाणे जीवन जगू शकतील.
- संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील पत्र लाभार्थी व्यक्तींना स्वतःच्या दैनंदिन गरजांसाठी कोणाकडे पैशासाठी अवलंबून राहावे लागणार नाही.
- या योजनेमुळे राज्यातील निराधारांना आधार मिळणार आहे.
Sanjay Gandhi Niradhar Yojana 2024 | संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे नियम व आटी |
- संजय गांधी निराधार योजना साठी अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा मूळ रहिवासी असावा.
- राज्या बाहेरील नागरिकांना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
- या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार व्यक्तीचे वय 65 वर्षापेक्षा कमी असावे.
- संजय गांधी निराधार योजनेचे अर्जदार व्यक्ती दारिद्र्य रेषेखालील कुटुंबातील असावी.
- या योजनेच्या अर्जदार व्यक्तीकडे मिळकतीची कोणतेही स्थायी साधन उपलब्ध नसावे.
- तसेच या अर्जदार व्यक्तीच्या नावे जमीन असू नये.
- या योजनेअंतर्गत अनाथ मुले किंवा मुलींना देण्यात येणारे आर्थिक सहाय्य हे ते सज्ञान होईपर्यंत त्यांच्या संबंधित पालकांना देण्यात येईल.
- तसेच या योजनेतील अनाथ मुली या 25 वर्षाच्या होईपर्यंत किंवा अविवाहित आहेत, तोपर्यंतच लाभ दिला जातो.
- या योजनेतील लाभार्थ्याने यापूर्वी केंद्र व राज्य शासनाच्या कोणत्या योजनेअंतर्गत पेन्शनचा लाभ घेतला असेल, तर त्या व्यक्तीस संजय गांधी निराधार योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
- या योजनेतील अर्जदार अपंग, कर्णबधिर, मूकबधिर व दृष्टिहीन असणार्यांना किमान 40 टक्के अपंगत्व असल्यास या योजनेअंतर्गत लाभ दिला जाईल.
- या योजनेचा लाभ घटस्फोटीत, परंतु पोटगी न मिळालेल्या महिलांनाच लाभ दिला जातो.
Sanjay Gandhi Niradhar Yojana 2024 | संजय गांधी निराधार अनुदान योजानेसाठी आवश्यक कागदपत्रे |
- योजनेचा अर्ज
- शाळेचा दाखला
- जन्माचा दाखला
- रहिवासी दाखला
- उत्पन्नाचा दाखला
- अपंग असल्यास अपंगत्वाचा दाखला
- जात प्रमाणपत्र
- घटस्फोटीत असल्यास घटस्फोट प्रमाणपत्र
- अत्याचार पीडित असल्यास त्या संबंधीचे कागदपत्रे
- पासपोर्ट साईझ फोटो
- ईमेल आयडी
- मोबाईल नंबर
- बँक पासबुक
- रेशन कार्ड
- आधार कार्ड
- मतदान ओळखपत्र
Sanjay Gandhi Niradhar Yojana 2024 | संजय गांधी निराधार अनुदान योजान अर्ज करण्याची पध्दत |
- प्रथम आपणाला शासनाच्या अधिकृत website/ पोर्टलवर जावे लागेल.
- त्यातील home page वरील शेतकरी योजनावर click करावे.
- त्यानंतर username व password टाकून login करावे.
- आता तुमच्यासमोर एक new page open होईल, त्यातील सिंचन साधने व सुविधा वर click करावे.
- आता तुमच्यासमोर एक new page वर योजनेचा अर्ज open होईल, त्यामध्ये आवश्यक सर्व माहिती भरा.
- आता तुमच्या समोर एक नवीन page open होईल, तिथे तुम्हाला 23 रुपये भरायचे आहेत.
- त्यानंतर आवशयक कागदपत्रांच्या सत्यप्रत apload करायच्या आहेत.
- त्यानंतर submit बटनावर click करून अर्ज submit करा.
- अशाप्रकारे तुमची अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल.
Sanjay Gandhi Niradhar Yojana 2024 |
संजय गांधी निराधार अनुदान योजना अधिकृत website click here
संजय गांधी निराधार अनुदान योजना शासन निर्णय click here
1 thought on “Good News | संजय गांधी निराधार अनुदान योजना | Sanjay Gandhi Niradhar Yojana 2024 | Good News | मानधनात वाढ, नोंदणी सुरु |”