कलाकार मानधन अनुदान योजना मराठी | Good News | Kalakar Mandhan Yojana Maharashtra | पहा कसा करायचा अर्ज |

Table of Contents

Kalakar Mandhan Yojana Maharashtra | कलाकार मानधन अनुदान योजना मराठी |

Kalakar Mandhan Yojana Maharashtra kalakar mandhan yojana 2024 kalakar mandhan yojana marathi vrudh kalakar mandhan yojana kalakar sanman yojana

Kalakar Mandhan Yojana Maharashtra |

नमस्कार मित्रानो, राज्य शासनामार्फत राज्यातील प्रत्येक घटकातील नागरिकांच्या आर्थिक व सामाजिक विकास करण्याच्या दृष्टीने विविध योजना राबवल्या जात असतात. कृषी क्षेत्र, आरोग्य क्षेत्र, शिक्षण क्षेत्र तसेच जेष्ठ नागरिक भविष्य निर्वाह निधी अशा विविध क्षेत्रातील घटकांच्या समावेश या योजनांमध्ये केलेला असतो.
प्रत्येक घटकातील नागरिकांच्या गरजा व समस्या ओळखून त्यांना आर्थिक सहाय्य करणाच्या उद्देशाने योजना राबवल्या जात असतात. या योजना राबविण्यामागे नागरिकांना आपले जीवन जगताना कोणत्याही आर्थिक अडचणी सहन कराव्या लागू नयेत, हा त्यामागील उद्देश असतो.
त्याप्रमाणेच राज्यातील साहित्य व कलाक्षेत्रात आपले आयुष्य घालवलेल्या कलावंतांना त्यांच्या उतारवयात आर्थिक बाबीमुळे त्यांची हेळसांड होऊ नये, म्हणून राज्य शासनामार्फत एका महत्वपूर्ण योजनेची सुरुवात करण्यात आली. ती योजना म्हणजे ” वृद्ध कलावंत मानधन योजना “ होय. या योजनेअंतर्गत कलाकारांना प्रतिमाह  3,150 रुपयांची आर्थिक सहाय्य पेन्शन स्वरूपात दिले जाते.
एक कलाकार त्यांच्या आयुष्यात आयुष्यभर आपली कला सादर करून राज्यातील लोकांचे मनोरंजन करीत असतात. ते फक्त लोकांना आनंद देण्याचा प्रयत्न करीत असतात. त्यामुळे त्यांच्याकडे जीवन जगण्यासाठी आर्थिक दृष्ट्या कोणताच भक्कम असा आधार नसतो. त्यामुळे त्यांना वृद्धापकाळात जीवन जगणे अत्यंत मुश्किलीचे होते.
त्यामुळे या सर्व कलाकारांच्या समस्यांचा विचार करून राज्य शासनाने वृद्ध कलाकार व साहित्य मानधन योजना 1954 – 55 पासून राज्यात सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. त्या माध्यमातून दरवर्षी शंभर कलाकारांची निवड करण्यात येते. या योजने अंतर्गत 24,000/- रुपये वार्षिक उत्पन आहे, ते कलाकार या योजनेसाठी पत्र आहेत.

कलाकार मानधन योजनेसाठी राज्यातील 50 वर्षावरील सर्व जेष्ठ कलाकार पात्र ठरविण्यात आले आहेत. या योजनेमुळे राज्यातील नागरिकांना जीवन जगण्यास आर्थिक सहाय्य करते. या मुळे कलाकारांचा आर्थिक व सामाजिक विकास होण्यास मदत होणार आहे.

 

Kalakar Mandhan Yojana Maharashtra | वाचकांना नम्र विनंती |

मित्रांनो, केंद्र व राज्य शासनामार्फत राज्यातील जनतेच्या हितासाठी व कल्याणासाठी राबविण्यात येणाऱ्या वेगवेगळ्या योजनांची माहिती आपण रोज घेतच असतो. त्या योजनांचाही लाभ आपण घ्यावा, ही आमची इच्छा आहे. त्याचप्रमाणे आज आपण राज्यशासानामार्फात कलाकारांसाठी राबवण्यात येणाऱ्या कलाकार मानधन योजनेची माहिती पाहणार आहोत.

त्यासाठी तुम्ही हा लेख शेवटपर्यंत वाचा. तसेच तुमच्या परिवारात किंवा आसपासच्या परिसरात जे पण कलाकार असतील. ज्यांना त्यांच्या उतारवयात काम करणे शक्य नसल्याने आर्थिक समस्यांचा सामना करावा लागत आहे. आशा कलाकार या योजनेची माहिती सांगा. त्यासाठी आमचा हा लेख जास्तीत जास्त शेअर करा, ही विनंती.

 

योजनेचे नाव कलाकार मानधन योजना महाराष्ट्र 
योजनेची सुरुवातमहाराष्ट्र शासन
लाभार्थीराज्यातील वृद्ध कलाकार
लाभप्रतिमाह 3,150/- रुपयांचे आर्थिक सहाय्य
उद्देशकलाकारांना पेन्शन स्वरुपात आर्थिक सहाय्य देणे.
अर्ज करण्याची पद्धतऑनलाईन / ऑफलाईन

 

हे हि वाचा –

जननी सुरक्षा योजना मराठी | Good News | Janani Suraksha Yojana 2024 | महिलांना मिळणार मदत |

Good News | ट्रॅक्टर अनुदान योजना महाराष्ट्र | Tractor Anudan Yojana 2024 | ऑनलाईन करा अर्ज |

आचार्य बाळशास्त्री जांभेकर पत्रकार सन्मान योजना मराठी | NEW | Acharya Jambhekar Patrkar Sanman Yojana 2024 | मिळणार आर्थिक सहाय्य |

SBI Stree Shakti Yojana Maharashtra 2024 | Good News | SBI स्त्री शक्ती योजना मराठी 2024 | महिला उद्योजकांना सुवर्णसंधी |

Kalakar Mandhan Yojana Maharashtra | कलाकार मानधन योजनेची उद्दिष्ट्ये |

  •  राज्यातील आयुष्यभर कला सादर केलेल्या कलाकारांचे त्यांच्या उतारवयात हेळसांड होऊ नये, या उद्देशाने कलाकार मानधन योजना ची सुरुवात करण्यात आली.
  • या योजनेच्या माध्यमातून वृद्ध कलाकारांचा सामाजिक व आर्थिक विकास करणे.
  • राज्यातील वृद्ध कलाकारांना त्यांच्या वृद्धकाळात पैशासाठी कोणावरही अवलंबून राहावे लागू नये, या उद्देशाने कलाकार मानधन योजनेची सुरुवात करण्यात आली.
  • या योजनेच्या माध्यमातून कलाकारांना सशक्त व आत्मनिर्भर बनवणे.
  • राज्यातील कलाकार मानधन योजनेमुळे इतर तरुण या क्षेत्राकडे आकर्षित होतील, तसेच त्यांना प्रोत्साहन मिळेल.

Kalakar Mandhan Yojana Maharashtra | कलाकार मानधन योजना महाराष्ट्र वैशिष्ट्ये |

  • महाराष्ट्र राज्यातील कलाकार मानधन योजनेअंतर्गत विधवा तसेच वृद्ध कलाकार महिलांना विशेष प्राधान्य देण्यात येईल.
  • कलाकार मानधन योजनेअंतर्गत अर्ज प्रक्रिया अत्यंत सोपे ठेवण्यात आली आहे, त्यामुळे वृद्ध कलाकारांना याचा लाभ घेणे सुलभ होईल.
  • या योजनेअंतर्गत दिले जाणारे आर्थिक लाभाची रक्कम ही थेट कलाकारांच्या बँक खात्यात डीबीटी मार्फत जमा करण्यात येईल.
  • राज्यातील कलाकार मानधन योजनेअंतर्गत कोणताही एक प्रवर्ग निश्चित केलेला नाही, त्यामुळे सर्व जाती धर्मातील कलाकार या योजनेसाठी अर्ज करू शकतात.
  • कलाकार मानधन योजना राज्यातील कलाकारांसाठी एक महत्त्वपूर्ण योजना ठरणार आहे.

Kalakar Mandhan Yojana Maharashtra | कलाकार मानधन योजना महाराष्ट्र अंतर्गत दिले जाणारे मानधन |

महाराष्ट्र राज्यातील कलाकार मानधन योजने अंतर्गत वृद्ध कलाकारांना श्रेणी अंतर्गत मानधन दिले जाते, त्या श्रेणीची वर्गवारी पुढीलप्रमाणे :

       वर्गवारी            दरवर्षी मानधन            दरमहा मानधन 
    अ वर्ग       3,150/- रुपये    37,800/- रुपये
    ब वर्ग      2,700/- रुपये    32,400/- रुपये
   क वर्ग      2,250/- रुपये    27,000/- रुपये

 

Kalakar Mandhan Yojana Maharashtra | कलाकार मानधन योजना महाराष्ट्र अंतर्गत समाविष्ट कलाकार |

  • गोंधळी
  • भजनी
  • कीर्तन करणारे
  • तमाशा
  • साहित्यिक
  • गायक
  • कवी
  • लेखक
  • वादक
  • महिला
  • दिव्यांग कलाकार
  • नृत्यक
  • आराधी
  • डोंबारी

 

Kalakar Mandhan Yojana Maharashtra | कलाकार मानधन योजनेच्या अर्ज सोबत सादर करावयाचे पुरावे |

  1.  राज्यातील कलाक्षेत्रात सहभागाचे कार्य केल्याचे पुरावे
  2. कार्यक्रमाच्या पत्रिका, निमंत्रण पत्रिका, आकाशवाणी वरील जाहिराती, वर्तमानपत्रातील बातम्यांची कात्रणे, ऑडिओ – व्हिडिओ रेकॉर्डिंग, कार्यक्रमाचे फोटो व प्रकाशित झालेले साहित्य अशा पुराव्यांच्या प्रती
  3. केंद्र व राज्य शासन सांस्कृतिक विभागामार्फत देण्यात आलेली पुरस्कार, त्याची प्रमाणपत्रे, मानधनाची पत्रके
  4. केंद्र व राज्य शासनामार्फत आयोजित कार्यक्रमातील सहभागाची पुरावे जसे, नाटक अकॅडमी, संगीत अकॅडमी
  5. आपापल्या जिल्ह्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी निश्चित केलेले कला संगीत विषयक नोंदणीकृत संस्थांची शिफारस पत्र

Kalakar Mandhan Yojana Maharashtra | कलाकार मानधन योजनेचे फायदे |

  • कलाकार मानधन योजनेअंतर्गत राज्यातील वृद्ध कलाकारांना दरमहा 3150/- रुपयांचे आर्थिक सहाय्य दिले जाणार आहे.
  • या मानधन योजनेमुळे कलाकारांना पैशासाठी कोणावरही अवलंबून राहावे लागणार नाही, तसेच आपल्या गरजांसाठी कोणाकडून कर्ज काढावे लागणार नाही.
  • या योजनेतील आर्थिक लाभांमुळे कलाकारांच्या जीवनाचा दर्जा उंचावणार आहे.
  • राज्यातील कलाकार मानधन योजनेमुळे हे कलाकार सशक्त व आत्मनिर्भर बनतील.
  • या योजनेमुळे कलाकारांना स्वावलंबी होण्यास मदत मिळेल.
  • या योजनेतील मानधनामुळे राज्यातील इतर तरुण वर्ग कलाक्षेत्राकडे प्रोत्साहित होईल.
  • राज्य शासनामार्फत दिल्या जाणाऱ्या या मानधन योजनेमुळे कलाक्षेत्रातील कलाकारांना सन्मान मिळेल

 

Kalakar Mandhan Yojana Maharashtra | कलाकार मानधन योजनेचे लाभार्थी व पात्रता |

महाराष्ट्र राज्यातील कला क्षेत्रातील 50 वर्षावरील जेष्ठ कलाकार या योजनेसाठी लाभार्थी असतील. तसेच 15 वर्षापासून महाराष्ट्रात राज्यात रहिवासी असणारे कलाकार या योजनेसाठी पात्र असतील.

Kalakar Mandhan Yojana Maharashtra | कलाकार मानधन योजनेचे नियम व आटी |

  • महाराष्ट्र राज्यातील कलाकारांनाच कलाकार मानधन योजनेचा लाभ दिला जाईल.
  • राज्य बाहेरील कलाकारांना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
  • कलाकार मानधन योजनेचा लाभ फक्त 50 वर्षावरील जेष्ठ कलाकारांना दिला जातो.
  • या योजनेसाठी अर्ज करणाऱ्या कलाकाराने 15 ते 20 वर्ष या क्षेत्रात काम करणे बंधनकारक राहील.
  •  कुष्ठरोग, अर्धांग वायू, नैसर्गिक आजार असणाऱ्या व्यक्तींसाठी वयाची अट राहणार नाही.
  • तसेच 40% पेक्षा जास्त अपंगत्व असणाऱ्या किंवा अपघातात 40% पेक्षा जास्त व्यंगत्व आलेल्या व्यक्तींसाठी वयाची अट शिथिल करण्यात आली आहे.
  • दरवर्षी मानधनाची रक्कम घेण्यापूर्वी हयात प्रमाणपत्र सादर करणे गरजेचे आहे.
  • अर्जदार कलाकार राज्य व केंद्र शासनामार्फत राबवण्यात येणाऱ्या इतर कोणत्याही योजनेअंतर्गत मानधन घेत असेल, तर तो या योजनेअंतर्गत मानधनास पात्र राहणार नाही.
  •  अर्ज मध्ये ज्या कलाक्षेत्राचे उल्लेख केला असेल, त्यासंबंधीचे पुरावा म्हणून व्हिडिओ रेकॉर्डिंग, कात्रण, प्रमाणपत्र आशे पुरावे सादर करणे आवश्यक आहे.

 

Kalakar Mandhan Yojana Maharashtra | कलाकार मानधन योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे |

  1. योजनेचा अर्ज
  2. आधार कार्ड
  3. रेशन कार्ड
  4. रहिवासी दाखला
  5. 15 ते 20 वर्ष कलाक्षेत्रात काम केल्याचा पुरावा
  6. अपंग असल्यास अपंगत्वाचा पुरावा
  7. उत्पन्नाचा दाखला
  8. बँक पासबुक
  9. ईमेल आयडी
  10. मोबाईल नंबर
  11. पासपोर्ट साईज फोटो
  12. वयाचा दाखला

 

Kalakar Mandhan Yojana Maharashtra | कलाकार मानधन योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत |

  • प्रथम आपणाला शासनाच्या या योजनेच्या अधिकृत पोर्टलवर जावे लागेल.
  • तेथे आपणाला home page वर नवीन युजर म्हणून login करावे लागेल.
  • आता तुमच्यासमोर एक new page open होईल त्यामध्ये तुम्ही click करावे.
  • नंतर तुमच्यासमोर योजनेचा अर्ज open होईल त्यामध्ये विचारलेली सर्व माहिती योग्य व अचूक भरा.
  • या अर्जासोबत आवश्यक कागदपत्रांच्या सत्यप्रत apload करा.
  • नंतर submit  या बटनावर click करून आपला अर्ज सबमिट करा.
  • अशाप्रकारे तुमची ऑनलाईन नोंदणी पूर्ण होईल.

Kalakar Mandhan Yojana Maharashtra | कलाकार मानधन योजनेसाठी ऑफलाईन अर्ज करण्याची पद्धत |

  • अर्जदाराला आपल्या जिल्ह्यातील, जिल्हा कार्यालयातील मुख्य विकास अधिकारी किंवा अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडून या योजनेचा अर्ज घ्यावा लागेल.
  • त्यानंतर तो अर्ज भरून त्यासोबत आवश्यक कागदपत्रे जोडावे लागतील.
  • नंतर तो अर्ज जमा करून त्याची पोच पावती घ्यावी.
  • अशाप्रकारे तुमची ऑफलाइन नोंदणी पूर्ण होईल.

Kalakar Mandhan Yojana Maharashtra |

वृद्ध कलाकार मानधन योजना महाराष्ट्र form CLICK HERE

2 thoughts on “कलाकार मानधन अनुदान योजना मराठी | Good News | Kalakar Mandhan Yojana Maharashtra | पहा कसा करायचा अर्ज |”

Leave a Comment