Acharya Jambhekar Patrkar Sanman Yojana 2024 | आचार्य बाळशास्त्री जांभेकर पत्रकार सन्मान योजना मराठी |
Acharya Jambhekar Patrkar Sanman Yojana 2024 |
नमस्कार मित्रांनो, राज्यात महाराष्ट्र शासनामार्फत विविध योजना राबवून समाजातील लोकांचा सामाजिक व आर्थिक विकास करण्याचा प्रयत्न केला जातो. राज्य व केंद्र सरकार मार्फत राबविण्यात येणाऱ्या योजना लोककल्याणकारी व लोकहितकारी असतात.
या योजनेच्या माध्यमातून समाजातील प्रत्येक घटकाला समान न्याय हक्क देण्याचा प्रयत्न केला जात असतो. त्यासाठी प्रत्येक घटक या योजनांमध्ये समाविष्ट केला जातो. प्रत्येक क्षेत्राचा विकास करण्याचा प्रयत्न या योजनांच्या माध्यमातून होत असतो.
राज्यातील पत्रकारांना निवृत्तीवेतन देण्यासंदर्भात होणाऱ्या मागण्या, विविध संघटना सदस्य यांच्याकडून सतत होणारे प्रयत्न या सर्वांचे विचार करून, त्या अनुषंगाने त्याच्यात त्यांना आर्थिक सहाय्य करण्याच्या उद्देशाने ” आचार्य बाळशास्त्री जांभेकर पत्रकार सन्मान योजना “ या योजनेची सुरुवात करण्यात आली.
समाजातील लोकहिताची व लोकउपयोगी जी कामे सरकार करते, त्याची कारवाई व्यवस्थित झाली का नाही व ती कामे करून घेण्याचे कार्य प्रसार माध्यमे पत्रकार करीत असतात. ते आपले काम अत्यंत निरपेक्ष भावनेने, सामाजिक हेतूने करीत असतात.
राज्यातील प्रसारमाध्यमे व पत्रकार हि लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ आहेत. अशा घटकांना सामाजिक सुरक्षा देण्यासाठी तसेच त्यांच्या प्रति आदर भाव प्रतीत करण्यासाठी व त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून या योजनेची सुरुवात करण्यात आली. या योजनेअंतर्गत पत्रकारांना दरमहा 11000/- रुपये इतके आर्थिक सहाय्य देण्यात येते.
महाराष्ट्रातील ज्येष्ठ पत्रकार यांच्यावर त्यांच्या उतारवयात हेळसांड होऊ नये, म्हणून त्यांना आर्थिक सहाय्य देण्यासाठी 35 कोटी रुपये इतकी रक्कम मुंबईतील इंडियन बँकेमध्ये जमा करण्यात आली आहे.
Acharya Jambhekar Patrkar Sanman Yojana 2024 | वाचकांना नम्र विनंती |
मित्रांनो, महाराष्ट्र शासनाच्या वेगवेगळ्या योजनांची माहिती आपण रोजच घेतच असतो. त्या योजना समाजातील प्रत्येक घटकासाठी लोकउपयोगी असतात. त्यासाठी शासनामार्फत आर्थिक सहाय्य देण्यात येते.
त्याचप्रमाणे आज आपण आचार्य बाळशास्त्री जांभेकर पत्रकार सन्मान योजनेची संपूर्ण माहिती या लेखक पाहणार आहोत. त्यासाठी तुम्ही हा लेख शेवटपर्यंत वाचा. तसेच तुमच्या आसपासच्या परिसरात जे कोणी पत्रकार असतील व ते या योजनेचा लाभ घेऊन पाहतात असतील, त्यांना या योजनेची माहिती द्या. त्यासाठी तुम्ही हा लेख जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. हि विनंती.
योजनेचे नाव | आचार्य जांभेकर पत्रकार सन्मान योजना मराठी |
योजनेची सुरुवात | महाराष्ट्र शासन |
लाभार्थी | राज्यातील जेष्ठ पत्रकार |
लाभ | दरमहा 11000/- रुपये |
उद्देश | पत्रकारांना आर्थिक सहाय्य करणे |
अर्ज करण्याची पध्दत | ऑफलाईन |
हे देखील वाचा –
SBI Stree Shakti Yojana Maharashtra 2024 | Good News | SBI स्त्री शक्ती योजना मराठी 2024 | महिला उद्योजकांना सुवर्णसंधी |
डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजना | New | Dr Panjabrao Deshmukh Vastigruh Nirvah Bhatt Yojana 2024 |
New | पोस्ट ऑफिस ग्राम सुरक्षा योजना महाराष्ट्र | Gram Suraksha Yojana 2024 | रोज जमा करा 50 रुपये, मिळणार 35 लाख रुपये |
मोटार वाहन चालक प्रशिक्षण योजना मराठी | Motar Vahan Chalak Prashikshan Yojana 2024 | Good News | बहुजन समाजातील तरुणांना मिळणार लाभ |
Acharya Jambhekar Patrkar Sanman Yojana 2024 | आचार्य जांभेकर पत्रकार सन्मान योजनेची उद्दिष्ट्ये |
- समाजामध्ये निरपेक्ष भावनेने काम करणाऱ्या ज्येष्ठ पत्रिकांना त्यांच्या वृद्धावस्थेत त्यांची होणारी हेळसांड थांबवण्यासाठी त्यांना आर्थिक सहाय्य करण्याच्या उद्देशाने या योजनाची सुरुवात करण्यात आली.
- पत्रकार सन्मान योजनेच्या माध्यमातून राज्यातील पत्रकारांच्या सामाजिक व आर्थिक विकास करण्याची उद्देश्याने या योजनेची सुरुवात करण्यात आली आहे.
- पत्रकार सन्मान योजनेच्या माध्यमातून पत्रकार यांचे जीवनमान सुधारणा हे योजनेची मुख्य ध्येय आहे.
- पत्रकार सन्मान योजनेमुळे पत्रकार हे आत्मनिर्भर व सशक्त बनतील.
- या पत्रकार सन्मान योजनेच्या माध्यमातून जेष्ठ पत्रकारांना त्यांच्या वृद्ध अवस्थेमध्ये त्यांच्या दैनंदिन गरजांसाठी पैशासाठी कुणावर हि अवलंबून राहवे लागणार नाही.
- आचार्य जांभेकर पत्रकार सन्मान योजनेमुळे राज्यातील पत्रकारांना आदरभाव व सन्मान होणार आहे.
Acharya Jambhekar Patrkar Sanman Yojana 2024 | आचार्य जांभेकर पत्रकार सन्मान योजनेची वैशिष्ट्ये |
- महाराष्ट्र राज्यातील जेष्ठ पत्रकारांच्या सन्मानासाठी आचार्य बाळशास्त्री जांभेकर पत्रकार सन्मान योजनेची सुरुवात करण्यात आली.
- आचार्य बाळशास्त्री जांभेकर पत्रकार सन्मान योजना हि दरमहा आर्थिक सहाय्य करून सर्व ज्येष्ठ पत्रकारांसाठी पेन्शन योजनेचे कार्य करते.
- या योजनेच्या माध्यमातून 11 हजार रुपये प्रमाणे आर्थिक सहाय्य जेष्ठ पत्रकारांना दिले जाणार आहे.
- या योजनेअंतर्गत दिले जाणारे आर्थिक सहाय्य थेट DBT मार्फत पत्रकारांच्या बँक खात्यात जमा करण्यात येते.
- पत्रकार सन्मान योजने अंतर्गत अर्ज करण्याची पद्धत अत्यंत सोपी ठेवण्यात आली आहे, त्यामुळे लाभार्थ्याच्या पैशाची व वेळेची बचत होईल.
- या योजनेमुळे राज्यातील जेष्ठ पत्रकार स्वावलंबी व सशक्त बनतील.
Acharya Jambhekar Patrkar Sanman Yojana 2024 | आचार्य जांभेकर पत्रकार सन्मान योजने अंतर्गत दिला जाणारा लाभ व लाभार्थी |
- आचार्य बाळशास्त्री जांभेकर पत्रकार सन्मान योजने अंतर्गत राज्यातील सर्व पात्र ज्येष्ठ नागरिकाना दरमहा अकरा हजार रुपयांचे आर्थिक साह्य देण्यात येते.
- महाराष्ट्र राज्यातील सर्व ज्येष्ठ व अनुभवी पत्रकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर पत्रकार सन्मान योजनेसाठी लाभार्थी आहेत.
Acharya Jambhekar Patrkar Sanman Yojana 2024 | आचार्य जांभेकर पत्रकार सन्मान योजनेचे फायदे |
- आचार्य जांभेकर पत्रकार सन्मान योजनेतील आर्थिक सहाय्यामुळे ज्येष्ठ पत्रकारांना त्यांचे दैनंदिन जीवन जगताना कोणत्याही आर्थिक गोष्टींचा सामना करावा लागणार नाही.
- या योजनेतील आर्थिक सहाय्य च्या माध्यमातून राज्यातील पत्रकारांच्या जीवनमानाचा दर्जा उंचावणार आहे.
- आश्चर्य जांभेकर पत्रकार सन्मान योजनेमुळे पत्रकारांचा आर्थिक व सामाजिक विकास होण्यास मदत होईल.
- या योजनेतील आर्थिक सहाय्यामुळे राज्यातील पत्रकार सशक्त व आत्मनिर्भर होतील.
- या योजनेमुळे पत्रकारांना आर्थिक गोष्टीसाठी कोणावरही अवलंबून राहण्याची गरज पडणार नाही.
- तसेच कोणापुढेही पैशासाठी हात पसरावा लागणार नाही.
- या पत्रकार सन्मान योजनेमुळे पत्रकारांचा सन्मान वाढल्याने त्यांचा आत्मविश्वास वाढण्यास मदत मिळेल.
Acharya Jambhekar Patrkar Sanman Yojana 2024 | आचार्य जांभेकर पत्रकार सन्मान योजनेसाठी पात्रता |
- आचार्य बाळशास्त्री जांभेकर पत्रकार सन्मान योजनेसाठी लाभार्थी हा महाराष्ट्र राज्याचा मूळ रहिवाशी असावा.
- या योजनेसाठी लाभार्त्यास कमीत कमी 30 वर्ष पत्रकारितेचा अनुभव असावा.
Acharya Jambhekar Patrkar Sanman Yojana 2024 | आचार्य जांभेकर पत्रकार सन्मान योजनेसाठी नियम व आटी |
- आचार्य बाळशास्त्री जांभेकर पत्रकार सन्मान योजनेसाठी राज्यातील जेष्ठ पत्रकार, संपादक , लेखक , छायाचित्रकार तसेच श्रमिक पत्रकार हे सर्व वयाची 60 वर्ष पूर्ण झालेली असतील तर ते या योजनेसाठी पात्र असतील.
- या योजने अंतर्गत वृतपत्रे व इतर वृत्प्रसार मध्यम या मध्ये किमान 30 वर्षे संपादक म्हणून काम केलेले असावे.
- या योजनेअंतर्गत पत्रकार व छायाचित्रकार म्हणून किमान 30 वर्षे केलेले अर्जदार पत्र असतील.
- या योजनेचा लाभ घेण्यासाठी किमान 10 वर्षे सलग अधिस्वीकृतीधारक असलेले पत्रकार पत्र असतील.
- राज्यातील ज्या पत्रकारांना कर्मचारी भविष्य निर्वाह निधी व्यतिरिक्त इतर कोणत्याही स्त्रोतातून लाभ मिळत नसेल तर ते या योजनेसाठी अर्ज करण्यास पत्र असतील.
- ज्या पत्रकारांना गंभीर गुन्ह्यामध्ये गुन्हा सिद्ध झालेला असेल तर त्यास या योजने अंतरगत लाभ दिला जाणार नाही.
- या योजनेसाठी अर्ज करणारा पत्रकार हा आयकर भरणारा नसावा.
- या योजनेंतर्गत दिला जाणारा लाभ हा ती व्यक्ती जीवित आहे तोपर्यंतच दिला जातो, मृत्युनंतर दिला जात नाही.
Acharya Jambhekar Patrkar Sanman Yojana 2024 | पत्रकार सन्मान योजनेसाठी आवश्यक पात्रता |
- आचार्य बाळशास्त्री जांभेकर पत्रकार सन्मान योजनेसाठी अर्ज
- वयाचा दाखला [ शाळा सोडल्याचा दाखला किंवा जन्माचा दाखला ]
- आधार कार्ड
- रेशन कार्ड
- मतदान ओळखपत्र
- शैक्षणिक प्रमाणपत्र
- पॅन कार्ड झेरॉक्स
- बँक पासबुक
- अनुभवाचा पुरावा
- माध्यमांमध्ये काम करताना मिळालेल्या वेतनाचा पुरावा
- वार्षिक उत्पन्नाचा दाखला
- स्वयंघोषपत्र
Acharya Jambhekar Patrkar Sanman Yojana 2024 | पत्रकार सन्मान योजनें अंतरगत अर्ज रद्द होण्याची कारणे |
- पत्रकार सन्मान योजनेसाठी अर्ज करणारा अर्जदार व्यक्ती ही महाराष्ट्र राज्याचे मूळ रहिवासी नसल्यास अर्ज रद्द होतो.
- या योजनेतील अर्जदार हा ज्येष्ठ नागरिक नसेल तर त्याचा अर्ज रद्द केला जातो.
- अर्जदार पत्रकार व्यक्तीने अर्जात खोटी माहिती भरली असेल, तर त्या व्यक्तीचा अर्ज रद्द होतो.
- अर्जदार व्यक्ती ही महाराष्ट्र किंवा केंद्र शासनाच्या एखादया योजने अंतर्गत लाभ घेत असेल, तर त्या व्यक्तीला या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
- या योजनेत अंतर्गत अर्ज करणारी व्यक्ती ही पत्रकार नसेल तर अर्ज रद्द केला जातो.
- एकाच व्यक्तीने दोन अर्ज केल्यास त्या व्यक्तीचा अर्ज रद्द होतो.
- अर्जदार व्यक्तीस पत्रकारितेचा 30 वर्षाचा अनुभव नसेल तर त्या पत्रकार व्यक्तीचा अर्ज रद्द केला जात.
- अर्ज करणारी पत्रकार व्यक्ती ही साठ वर्षे पूर्ण केलेली नसेल तर त्या व्यक्तीचा अर्ज रद्द होतो.
Acharya Jambhekar Patrkar Sanman Yojana 2024 | पत्रकार सन्मान योजनेसाठी अर्ज करण्याची पध्दत |
- सर्वप्रथम आपणाला या योजनेचा अर्ज अधिकृत वेबसाईटवरून डाऊनलोड करावा लागेल.
- या योजनेसाठी संबंधित जिल्हा उपसंचालक, वृत्त विभाग, मुंबई यांच्याकडे अर्ज करावा.
- त्या अर्जासोबत आवश्यक कागदपत्रांच्या सत्यप्रत जोडाव्यात.
- सादर केलेला अर्ज माहिती व जनसंपर्क कार्यालयात यातील जनसंपर्क अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली पडताळणी केली जाईल व तुम्हाला या योजनेचा लाभ दिला जाईल.
- अशाप्रकारे या योजनेसाठी अर्ज करण्याची पद्धत पूर्ण होईल.
Acharya Jambhekar Patrkar Sanman Yojana 2024 |
आचार्य बाळशास्त्री जांभेकर पत्रकार सन्मान योजना शासन निर्णय click here
1 thought on “आचार्य बाळशास्त्री जांभेकर पत्रकार सन्मान योजना मराठी | NEW | Acharya Jambhekar Patrkar Sanman Yojana 2024 | मिळणार आर्थिक सहाय्य |”