केंद्रीय अर्थसंकल्प 2025 |
Union budget 2025
Union budget
Union budget for government
Kendriya budget
Nirmala sitaraman
नमस्कार, Union budget 2025 केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमन यांनी काल संसदेत सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील 8 अर्थसंकल्प सादर केला. यावेळी सितारमन यांनी अनेक मोठ्या घोषणा केलेल्या आहेत. त्यामध्ये सरकारने शेतकऱ्यांसाठी पीएम धनधान्य कृषी योजनेची घोषणा केली आहे.
त्याचबरोबर किसान क्रेडिट कार्डची मर्यादा ही वाढवलेली आहे. तसेच कृषी क्षेत्र, उद्योग, शिक्षणाच्या विविध क्षेत्रासाठी महत्त्वाच्या घोषणा या अर्थसंकल्पात करण्यात आलेल्या आहेत. त्यापैकी महत्त्वाच्या दहा घोषणा कोणकोणत्या आहेत ? त्यातून कोण कोणाला लाभ मिळणार आहे ? कोणाला याचा फायदा होणार आहे ? याबद्दल सविस्तर माहिती आपण या लेखात पाहणार आहोत. त्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचा.
ट्रॅक्टर मळणी यंत्रासाठी मिळणार 50 % अनुदान | आजच करा महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाईन अर्ज |
अर्थसंकल्पातील 10 महत्त्वाच्या घोषणा |
निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर करताना त्यामध्ये महत्त्वाच्या अशा 10 घोषणा केलेले आहेत, त्या पुढील प्रमाणे :
RTE Admission 2025 – 26 | आरटीई प्रवेशासाठी मुदतवाढ | अर्ज करण्याची संधी मिळणार | पहा, वयोमर्यादा किती ?
- अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी वैद्यकीय विद्यार्थ्यांसाठी मोठी घोषणा केली आहे. पुढील वर्षापासून मेडिकल कॉलेजमध्ये दहा हजार जागा वाढविण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
- अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना मोठी भेट देत किसान क्रेडिट कार्डची मर्यादा 5 लाख रुपये करण्यात आली आहे, आतापर्यंत शेतकऱ्यांना शेतीसाठी किसान क्रेडिट कार्डवर केवळ तीन लाख रुपयांची मर्यादा मिळत होती. Union budget 2025
- त्याचबरोबर स्टार्टअप साठी सरकारच्या 10 हजार कोटी रुपयांच्या योगदानातून निधीची व्यवस्था केली जाईल, पाच लाख महिला एससी आणि एसटी उद्योजकांना सरकार प्रथमच 2 कोटी रुपयांचे कर्ज देणार आहे.
- मत्स्य व्यवसाय क्षेत्राचे उत्पन्न टिकवून ठेवण्यासाठी एक कार्यक्षम फ्रेमवर्क आणण्यात येणार आहे.
- मॅन्युफॅक्चरिंग मशीन लहान, मध्यम आणि मोठ्या उद्योगांना धोरण समर्थन आणि तपशीलवार फ्रेमवर्कद्वारे मेक इन इंडिया कार्यक्रमाला पुढे नेण्यासाठी कव्हर करेल.
- आय आय टी ची क्षमता वाढवण्यात येणार आहे. देशातील पाच आयआयटीमध्ये अतिरिक्त पायाभूत सुविधा निर्माण केल्या जातील, तसेच आयआयटी पॅटर्नचा विस्तार करण्यात येणार आहे.
- कर्करोगाच्या सर्व औषधी पूर्णपणे करमुक्त करण्यात येणार आहेत, कर्करोगासारख्या गंभीर आजाराशी संबंधित 36 औषधे पूर्णपणे करमुक्त करण्यात आली आहेत. तसेच इतर जीवनावश्यक औषधांच्या किमती कमी करण्यात येणार आहेत.
- पोस्ट इंडियाचे एका मोठ्या सार्वजनिक लॉजिस्टिक संस्थेत रूपांतर करण्यात येणार आहे.
- पादत्राणे आणि चमड्याच्या क्षेत्रासाठी मदती व्यतिरिक्त चमड्या शिवाय पात्रणांसाठी एक योजना आहे. 22 लाख रोजगार आणि 4 लाख कोटी रुपयांची उलाढाल तसेच 1.1 लाख कोटी रुपये अधिक निर्यात अपेक्षित आहे.
- सूक्ष्म उद्योगासाठी एम एस एम ए क्रेडिट गॅरंटी कव्हर 5 कोटी रुपये वरून 10 कोटी रुपये पर्यंत वाढवले जाणार आहे. पुढील पाच वर्षात 1.5 लाख कोटी रुपयांचे अतिरिक्त कर्ज प्रदान केले जाईल, किसान क्रेडिट कार्ड अंतर्गत कर्ज मर्यादा 3 लाख रुपयांवरून 5 लाख रुपये करण्यात येणार असल्याची माहिती अर्थमंत्र्यांनी सांगितले. Union budget 2025