पी एम किसान योजना |
PM kisan Yojana 19th installment
PM kisan Yojana
Kisan Sanman nidhi Yojana
Farmars scheme
PM kisan scheme
नमस्कार, PM kisan Yojana 19th installment राज्यातील शेतकरी वाट पाहत असणाऱ्या पीएम किसान योजनेचा 19 वा हप्ता लवकरच मिळणार असल्याने शेतकऱ्यांची या हप्त्याची प्रतीक्षाता संपली आहे. अनेक दिवसापासून पी एम किसान योजनेचे लाभार्थी या तारखेची वाट पाहत होते.
देशातील कोट्यावधी जनतेच्या, शेतकऱ्यांच्या खात्यात प्रत्येकी दोन हजार रुपये या तारखेला जमा होणार आहेत. पंतप्रधान मोदींनी या योजनेचा 18 वा हप्ता शेवटचा 5 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्रातील वाशीम जिल्ह्यातून वितरणास सुरुवात केली होती. त्यावेळी पंतप्रधान यांनी शेतकऱ्यांच्या खात्यात वीस हजार कोटी रुपयाहून अधिक रक्कम हस्तांतरित केली होती. पंतप्रधान किसान योजनेचा 19 वा हप्ताह 24 फेब्रुवारी रोजी जारी केला जाईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी बिहार मधून दोन हजार रुपये लाभार्थ्यांच्या खात्यात हस्तांतरित करतील.
मिनी ट्रॅक्टर खरेदीसाठी मिळणार 90% अनुदान | ” या ” जिल्ह्यात अर्ज करण्यास झाली सुरुवात | पहा अंतिम तारीख |
आतापर्यंत शेतकऱ्यांना मिळाली इतके पैसे |
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना अंतर्गत 2019 पासून डीबीटी द्वारे शेतकऱ्यांच्या खात्यात 3.46 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम पाठवण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत 19 कोटीहून अधिक शेतकऱ्यांना 18 हप्त्यांमध्ये हा लाभ मिळाला आहे, तसेच केंद्र सरकारच्या महत्वपूर्ण प्रयत्नमुळे 18 व्या हप्त्याचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांची संख्या 9.58 कोटी झाली आहे.
एसटी प्रवास महागला | महिलांना 50 % सवलत मिळणार की नाही ? स्पष्टच बोलले परिवहन मंत्री …..|
योजनेचे पैसे आलेत की नाही ? असे करा चेक |
- पी एम किसान च्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
- होमपेज वरील फार्मर्स कॉर्नर या पर्यायावर क्लिक करा.
- तुमची स्थिती जाणून घ्या, हा पर्याय निवडा.
- तुमचा नोंदणीकृत क्रमांक आणि कॅपच्या कोड टाका.
- Get OTP वर क्लिक करा आणि तुमचा मोबाईल वर पाठवलेला ओटीपी टाका.
- त्यानंतर तुमचे पेमेंट तपशील स्क्रीनवर दिसतील. PM kisan Yojana 19th installment
19 व हप्ता मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना ई केवायसी पूर्ण करावी लागेल, यासाठी पीएम किसान च्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊन शेतकरी त्यांची ई केवायसी पूर्ण करू शकतात, तसेच त्यांचे बँक खाते आधार लिंक आहे का ? याची त्यांना खात्री करणे गरजेचे आहे.
अशी करा ई – केवायसी |
- सर्वात प्रथम पीएम किसान च्या अधिकृत वेबसाईटवर जा.
- फार्मर्स कॉर्नर वर जा आणि एक पर्यायावर क्लिक करा.
- तुमच्या आधार क्रमांक आणि नोंदणीकृत मोबाईल क्रमांक टाका.
- तुमच्या मोबाईलवर मिळालेला ओटीपी टाकून प्रक्रिया पूर्ण करा.
- या पद्धतीने ई केवायसी पूर्ण होईल. PM kisan Yojana 19th installment