Tar Kumpan Yojana Marathi 2024 | तार कुंपण योजना महाराष्ट्र |
Tar Kumpan Yojana Marathi 2024 |
नमस्कार मित्रांनो, देशातील नागरिकांचा आरोग्यपूर्ण, आर्थिक व सामाजिक दृष्ट्या विकास पूर्ण जीवन जगण्यासाठी देशाच्या केंद्र व राज्य शासनाकडून जनतेच्या कल्याणासाठी वेगवेगळे योजना राबवल्या जातात. या योजना समाजातील प्रत्येक घटकाला अनुसरून निश्चित केल्या जातात. त्यामध्ये ग्रामीण भागातील, अगदी तळागाळातील नागरिकांचा म्हणजेच, शेतकरी पासून शहरातील मजुरांपर्यंत सर्वांचा समावेश केलेला असतो.
या योजनांसाठी शासनामार्फत निधी पुरविला जातो. तसेच वेगवेगळ्या स्तरावर निधीचे वितरण करून शेतकरी, बांधकाम कामगार, घर कामगार, महिला, मुली, विधवा, जेष्ठ नागरिक व लहान बालके तसेच अनुसूचित जाती – जमाती, मागास प्रवर्ग, आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक सर्वांचा समावेश वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून केला जातो. त्यामुळे त्यांचा विकास होण्यासाठी हातभार लावला जातो.
त्याचप्रमाणे केंद्र व राज्य शासनामार्फत आपल्या देशातील जगाचा पोशिंदा असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी नेहमीच नवनवीन योजना आणल्या जातात. शेतकरी हा बळीराजा म्हणून ओळखला जातो आणि या शेतकऱ्यांची संख्या आपल्या देशात जवळपास 70 % पेक्षा जास्त आहे. त्यामुळे आपल्या देशाच्या महत्त्वाचा घटक हा शेतकरी मानला जातो.
जर हा बळीराजा, जगाचा पोशिंदा जर टिकवायचा असेल, तर त्याची शेती टिकवली पाहिजे. म्हणूनच केंद्र शासनाकडून व राज्याच्या नावीन्यपूर्ण योजनेची सुरुवात करण्यात आली आहे. ती योजना म्हणजे ” तार कंपनी योजना महाराष्ट्र “ होय.
जर शेतकऱ्यांनी धान्य पिकवले तरच देशातील जनता पोटभरून अन्न खाऊ शकेल, म्हणून शेतकऱ्याची शेती सुरक्षित राहिली पाहिजे. हा एक प्रयत्न आहे. त्याचबरोबर जमिनीचे रक्षण होणार आहे. या उद्देशाने तार कुंपण योजनेची सुरुवात करण्यात आली.
शेतकऱ्याच्या शेतीचे जंगली प्राणी यांच्यापासून संरक्षण करण्यासाठी व शेतीत पिकवला जाणारा शेतमाल आबाधित राखण्यासाठी या तार कंपनी योजनेची सुरुवात करण्यात आली. त्यामुळे शेतकरी या योजनेचा फायदा घेऊन आपली जमीन तसेच पीक सुरक्षित ठेवू शकतात.
ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी हे वन्य परिसर किंवा वन्य खात्याच्या हद्दीत आहेत, जवळपास आहेत. अशा शेतकऱ्यांना आपल्या शेतीसाठी रानटी प्राण्यांचा धोका जास्त असतो. तसेच शेतकरी पूर्वीपासून शेताला कुंपण करत आले आहेत, परंतु पारंपारिक पद्धतीने केलेली कुंपण पद्धती जास्त काळ टिकणारी नसल्याने त्यांच्या पिकाचे नुकसान हे तर होतेच, पण त्याचबरोबर त्यांना आर्थिक तोटाही सहन करावा लागतो.
या सर्व गोष्टी लक्षात घेता शेतकऱ्याच्या जमिनीचे तसेच पिकाचे संरक्षण कायमस्वरूपी करावे. त्यामुळे शेतकऱ्याला जंगली जनावरांपासून होणारा, प्राण्यापासून होणाऱ्या त्रास कमी व्हावा व त्यांची या त्रासातून मुक्तता करता यावी. यासाठी शासनामार्फत तार कंपनी योजनेसाठी 90 टक्के अनुदान दिले जाते.
तार कंपनी योजना महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात कुंपण करून शेती पिकाचे जनावरापासून रक्षण करता यावे, याकरिता तार कुंपण योजना हि डॉक्टर श्याम प्रसाद मुखर्जी जनवन विकास प्रकल्प अंतर्गत राबविण्यात येते. तसेच वन विकास प्राप्ती बॅग प्रकल्पाच्या अंतर्गत पिकांचे नुकसान टाळण्याकरता हे महत्वपूर्ण योजना राज्यात राबवता येते.
Tar Kumpan Yojana Marathi 2024 | वाचकांना नम्र विनंती |
मित्रांनो केंद्र व राज्य शासनामार्फत राज्यात राबविण्यात येणाऱ्या वेगवेगळ्या घटकांसाठीच्या विविध योजनांची माहिती आपण रोजच आपल्या लेखांच्या माध्यमातून घेत असतो. त्याचप्रमाणे आज महाराष्ट्र शासनाकडून शेतकऱ्यांसाठी राबवण्यात येणार्या एका योजनेची म्हणजेच तार कुंपण योजने विषयीची माहिती आपण घेणार आहोत. त्यासाठी तुम्ही हा लेख शेवटपर्यंत वाचा.
तसेच तुमच्या आसपासच्या परिसरात चे शेतकरी आहेत. ज्यांच्या शेतीला वन्य प्राण्यांपासून सतत धोका होतो, त्यांना या योजनेची माहिती सांगा. त्यासाठी आमचा हा लेख जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. त्यामुळे त्यांना या योजनेचा लाभ घेता येईल व आपल्या शेती पिकाचे नुकसान होण्यापासून वाचवता येईल, ही विनंती.
योजनेचे नाव | तार कुंपण योजना महाराष्ट्र |
योजनेची सुरुवात | महाराष्ट्र राज्य |
लाभार्थी | राज्यातील शेतकरी |
लाभ | हेक्टरी प्रमाणानुसार 40 % ते 90 % |
उद्देश | शेतकऱ्याच्या पिकांचे रक्षण करणे |
अर्ज करण्याची पद्धती | ऑफलाईन |
हे देखील वाचा –
Good News | Panchayat Samiti Yojana Maharashtra 2024 | पंचायत समिती योजना मराठी | थोडक्यात संपूर्ण माहिती |
Good News | मोफत स्कुटी योजना मराठी | Free Scooty Yojana Maharashtra 2024 | घरपोच मिळणार मोफत स्कुटी |
New | मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना | Mukhyamntri Mazi Ladki Bahin Yojana 2024 | पात्रता , लाभार्थी व अर्ज करण्याची पद्धत |
New | कुक्कुट पालन अनुदान योजना मराठी | Kukut Palan Yojana Maharashtra 2024 | ऑनलाईन अर्ज, पात्रता व कागदपत्रे |
Good News | अटल पेन्शन योजना 2024 | Atal Pension yojana ( APY ) In Marathi | APY संपूर्ण तपशीलवार माहिती |
तार कुंपण योजना महाराष्ट्र ची उद्दिष्ट्ये |
- राज्यातील शेतकऱ्यांच्या शेती पिकाचे वन्य, हिंस्र प्राण्यापासून होणारे नुकसान टाळण्याच्या उद्देशाने, राज्य शासनाने तारा कंपनी योजनेची सुरुवात केली.
- शेतकऱ्याला आपल्या शेतीला चारी बाजूनी तार कुंपण करता यावे, यासाठी अनुदान स्वरूपात आर्थिक सहाय्य दिले जाते.
- शेतकऱ्याची शेती जर अबाधित राहिली, तरच त्याचा आर्थिक विकास होऊ शकेल, या उद्देशाने या योजनेची सुरुवात करण्यात आली.
- शेतकऱ्याच्या शेतातील उत्पन्न व्यवस्थित बाजार पेठेपर्यंत पोहोचून, त्याच्या उत्पन्न वाढीस मदत व्हावी या उद्देशाने या योजनेची सुरुवात करण्यात आली.
- शेतकरी व वन्यप्राणी यांच्यामधील संघर्ष कमी व्हावा व शेतकऱ्याचे उत्पन्न वाढावे, तसेच वन्य प्राण्यांना कोणती इजा होऊ नये, हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.
- राज्यातील शेतकऱ्यांच्या शेतीची तसेच पिकाचे रक्षण करण्यासाठी तार कुंपण योजना सुरू करण्यात आली.
- तार कंपनी योजनेमुळे वन्य पशु, पक्षी शेतकऱ्यांच्या शेतात जाऊ शकणार नाहीत, त्यामुळे शेती पिकाचे होणारे नुकसान टाळता येईल, हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.
तार कुंपण योजना महाराष्ट्र ची वैशिष्ट्ये |
- महाराष्ट्र शासनाच्यावतीने कृषी विभाग मार्फत राज्यातील शेतकऱ्यांसाठी ही महत्त्वपूर्ण योजना सुरू करण्यात आली.
- या योजनेसाठी शासनाकडून 90 टक्के अनुदान तार कुंपण करण्यासाठी शेतकऱ्याला दिले जाते.
- या योजनेमुळे शेतकऱ्यांचा आर्थिक व सामाजिक विकास होण्यास मदत होणार आहे.
- शेतकऱ्याचे शेती पिकाचे नुकसान टाळल्यामुळे त्याचा आर्थिक नफा होऊन, त्याच्या जीवनमानाचा दर्जा उंचावणार आहे.
- या तार कुंपण योजनेअंतर्गत अर्ज करण्याची पद्धत अत्यंत सोपी ठेवण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्याच्या वेळ व पैशाची बचत होईल, तसेच त्याला नाहक त्रास सहन करावा लागणार नाही.
- या योजनेअंतर्गत दिली जाणारी लाभाची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यात डीबीटी मार्फत जमा करण्यात येते.
Tar Kumpan Yojana Marathi 2024 | तार कुंपण योजनेचे लाभार्थी |
महाराष्ट्र शासनाच्या वतीने राज्यातील ओबीसी, एससी, एसटी, अनुसूचित जाती – जमाती व मागास प्रवर्ग इत्यादींना या तार कुंपण योजनेअंतर्गत लाभार्थी आहेत.
Tar Kumpan Yojana Marathi 2024 | तार कुंपण योजने अंतर्गत दिला जाणारा लाभ |
शेतकऱ्याला आपल्या शेतात तार कुंपण करण्याकरिता महाराष्ट्र सरकारकडून 90 टक्के अनुदान देण्यात येते, तसेच उर्वरित दहा टक्के रक्कम ही शेतकऱ्याला स्वतःच्या स्वखर्चाने जमा करावी लागते. त्यातून शेतकऱ्याला काटेरी तार तसेच लोखंडी खांब खरेदी करण्यासाठी हे 90 टक्के अनुदान दिले जाते.
Tar Kumpan Yojana Marathi 2024 | तार कुंपण योजनेचे फायदे |
पिकाचे संरक्षण:
- शासनामार्फत पिकाचे संरक्षण करता येण्यासाठी तार कुंपण योजनेची सुरुवात केली.
- या योजनेमुळे जंगलातील भटक्या व वन्य प्राण्यांपासून पिकाचे संरक्षण करता येणार आहे.
- पीक व्यवस्थित आल्यास शेतकऱ्यांच्या उत्पन्नात भरघोस वाढ होईल.
- शेतकऱ्याला लागून राहिलेले आपल्या पिकाची चिंता या तार कुंपण योजनेमुळे मिटेल.
आर्थिक फायदे:
- महाराष्ट्र शासनाकडून अनुदान स्वरूपात 90% आर्थिक मदत ही तार कुंपण योजने अंतर्गत शेतकऱ्यांना दिली जाते.
- शेतीला तार कुंपण केल्याने शेतकऱ्याचे उत्पन्न वाढवून त्याचा आर्थिक नफा होईल.
- शेतकऱ्याचा आर्थिक फायदा झाल्याने त्याच्या जीवनमानाचा दर्जा उंचावेल.
- शेतीला तार कुंपण करण्यासाठी अनुदान मिळत असल्याने राज्यातील इतर शेतकरी शेती क्षेत्राकडे प्रोत्साहित होते होतील.
- तसेच राज्यातील नवयुवक शेती करण्यासाठी आकर्षित होतील.
- त्यामुळे राज्याती बेकारीची समस्या कमी होईल.
शेतीची सुरक्षितता:
- तार कंपनी योजनेमुळे राज्यातील शेतीचे संरक्षण होईल.
- शेतकऱ्यांच्या शेतीला मजबूत तारेचे कुंपण झाल्याने राज्यात वाढत जाणाऱ्या शेतीमालांच्या चोरीच्या प्रमाणात आळा बसेल.
- तार कुंपण योजनेमुळे शेतकरी आपल्या शेती पिकांच्या संरक्षणासाठी सुनिश्चिंत होईल.
मजबूत बांधणी:
- तार कुंपण योजनेअंतर्गत मिळणारे अनुदानाची रक्कम ही 90% असल्याने शेतकरी कुंपण करण्यासाठी उच्च प्रतीचे साहित्य खरेदी करेल.
- त्यामुळे पारंपारिक पद्धतीने होणाऱ्या कुंपण बंद होवून काटेरी तार व लोखंडी पोलच्या साह्याने मजबूत तार कुंपण तयार करता येईल.
- शेतकऱ्याला प्रत्येक वेळी आपल्या शेती पिकाचे रक्षण करणाऱ्या कुंपण बदलावे लागणार नाही.
Tar Kumpan Yojana Marathi 2024 | तार कुंपण योजनेचे लाभाचे स्वरूप |
- एक ते दोन हेक्टर शेतजमिनी साठी 90% अनुदान दिले जाते.
- दोन ते तीन हेक्टर शेतजमिनीसाठी 60 % अनुदान दिले जाते.
- तीन ते पाच हेक्टर शेत जमिनी साठी 50 % अनुदान दिले जाते.
- पाच पेक्षा जास्त शेती क्षेत्रासाठी 40 % अनुदान दिले जाते.
Tar Kumpan Yojana Marathi 2024 | तार कुंपण योजनेसाठी पात्रता |
- तार कुंपण योजनेचा अर्जादर शेतकरी हा महाराष्ट्र राज्याचा मूळ रहिवासी असावा.
- राज्या बाहेरील वास्तव्यास असलेल्या नागरिकास या योजनेअंतर्गत लाभ दिला जात नाही.
- तार कुंपण योजनेसाठी अर्ज करणाऱ्या लाभार्थ्याच्या नावे जमिनीचा 7/12 व 8 अ असणे आवश्यक आहे.
- तसेच अर्जदार शेतकऱ्यांनी राखीव जंगल क्षेत्रात अतिक्रमण केलेले नसावे.
- तसेच तार कुंपण योजनेच्या अर्जदार शेतकऱ्याची शेतजमीन ही वन्य प्राण्यांच्या नैसर्गिक भ्रमण कक्षात येणारी नसावी.
- ज्या शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत लाभ घ्यावयाचा आहे, त्यांनी वन्य प्राण्यांकडून हस्तक्षेप व नुकसान झाल्याचा ठराव अर्जासोबत जोडावा.
Tar Kumpan Yojana Marathi 2024 | तार कुंपण योजनेचे नियम व आटी |
- तार कुंपण योजनेसाठी अर्ज करणारा अर्जदार शेतकरी असावा.
- अर्जदार शेतकऱ्यांच्या नावावर स्वतःची शेतजमीन असल्याचा सातबारा व आठ अ उतारा असावा.
- या योजनेचा लाभ घेतल्यास पुढील 10 वर्ष या जमिनीमध्ये शेतीच केली जाईल, याची शपथपत्र शेतकऱ्याला सादर करावयाचे आहे.
- तार कुंपण योजनेअंतर्गत शेतकऱ्यास 2 क्विंटल तार व 30 खांब देण्यात येतात, उर्वरित खर्च स्वतः शेतकऱ्याला करावयाचा आहे.
- वन्य प्राण्यांकडून शेती पिकाला नुकसान असल्याचे प्रमाणपत्र शेतकऱ्याने सादर करावयाचे आहे.
- तार कुंपण योजनेचा अर्जदार शेतकरी हा अनुसूचित जाती – जमाती प्रवर्गातील असल्यास त्यांनी जात प्रमाणपत्र देणे गरजेचे आहे.
- या योजनेचा अर्जदार शेतकरी किंवा त्याच्या कुटुंबातील इतर कोणताही सदस्य शासकीय नोकरीत नसावा.
Tar Kumpan Yojana Marathi 2024 | तार कुंपण योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे |
- अर्जाचा नमुना
- शेतकऱ्याचे आधार कार्ड
- जमिनीचा 7/12 उतारा
- जमिनीचा 8 अ उतारा
- जात प्रमाणपत्र
- उत्पन्नाचा दाखला
- ग्रामपंचायतचा दाखला
- समितीचे ठराव प्रमाणपत्र
- वनपरिक्षेत्र अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र
- बँक खाते
- मोबाईल नंबर
- ईमेल आयडी
- पासपोर्ट साईज फोटो
Tar Kumpan Yojana Marathi 2024 | तार कुंपण योजने अंतर्गत अर्ज रद्द होण्याची कारणे |
- तार कुंपण योजनेच्या अर्जदाराने अर्जात चुकीची अथवा खोटी माहिती भरलेली असल्यास, त्याचा या योजनेतून अर्ज रद्द केला जातो.
- तार कुंपण योजनेचा अर्जदार हा शासकीय नोकरीत कार्यरत असेल, तर त्याला या योजनेअंतर्गत लाभ दिला जात नाही त्यामुळे त्याचा अर्ज रद्द केला जातो.
- अर्जदार व्यक्तींनी एका वेळी दोन अर्ज केलेले असतील, तर त्याचा अर्ज रद्द केला जातो.
- अर्जदार व्यक्तीने जंगल परिक्षेत्रामध्ये अतिक्रमण करून शेती केलेली असेल, तर त्याचा या योजनेतून अर्ज रद्द केला जातो.
- अर्जदार व्यक्तींनी यापूर्वी राज्य व केंद्र शासनाकडून राबवलेल्या तार कंपनी योजनेचा लाभ घेतलेला असल्यास, त्याचा या योजनेतून अर्ज रद्द केला जातो.
- अर्जदार यांनी आवश्यक कागदपत्रांची अर्जासोबत पूर्तता केलेली नसल्यास अर्ज रद्द केला जातो.
Tar Kumpan Yojana Marathi 2024 | अर्ज करण्याची पद्धत |
- तार कुंपण योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी ऑनलाइन पोर्टल अद्याप सुरू केलेली नाही, ते झाले तर सर्व माहिती आपणाला ऑनलाइन भरायचे आहे. तसेच जे आवश्यक कागदपत्रे आहेत ते ऑनलाईन सादर करावेच आहेत.
- तार कुंपण योजनेचा अर्ज करण्यासाठी प्रथम आपणाला पंचायत समिती मध्ये जाऊन तार कुंपण योजनेचा अर्ज घ्यावा लागेल.
- अर्ज तुम्हाला तुमच्या तालुक्याच्या पंचायत समितीमध्ये मिळेल.
- तिथून त्या योजनेचा अर्ज घ्या व अर्ज काळजीपूर्वक वाचा.
- नंतर तो अर्ज योग्य व अचूक रित्या भरा.
- अर्जामध्ये नमूद केलेले सर्व कागदपत्रांच्या झेरॉक्स अर्जासोबत जोडा.
- भरलेला अर्ज पंचायत समिती अधिकाऱ्याकडे जमा करा.
- जमा केलेल्या अर्जाची पोचपावती घ्या.
- अशाप्रकारे तुमची तार कुंपण योजनेसाठी ऑफलाईन प्रोसेस पूर्ण होईल.
Tar Kumpan Yojana Marathi 2024 |
तार कुंपण योजना श्याम प्रसाद मुखर्जी जनवन विकास प्रकल्प अधिकृत website CLICK HERE