Panchayat Samiti Yojana Maharashtra 2024 | पंचायत समिती योजना मराठी |
Panchayat Samiti Yojana Maharashtra 2024 |
नमस्कार मित्रंनो, देशातील नागरिकांसाठी केंद्र व राज्य शासनामार्फत वेगवेगळ्या योजना राबवल्या जातात. त्या योजनेच्या माध्यमातून देशातील नागरिकांसाठी अनुदान स्वरूपात आर्थिक सहाय्य दिले जाते. या योजना राज्यातील वेगवेगळ्या घटकांसाठी राबवल्या जात असतात.
तसेच आर्थिक दृष्ट्या मागास, दुर्बल घटक, इतर मागास प्रवर्ग, अनुसूचित जाती – जमाती, कष्टकरी बांधव, शेतकरी, बांधकाम कामगार, आरोग्य सेविका व ज्येष्ठ नागरिक आणि महिला या सर्वांना या योजनेमध्ये समाविष्ट केले जाते. त्यातून त्यांचा विकास करून त्यांना एक परिपूर्ण जीवन प्रदान करण्याचा प्रयत्न होत असतो.
शासनाकडून नागरिकांच्या कल्याणासाठी या योजना नेहमीच राबवल्या जातात. त्यातून वेगवेगळ्या प्रकारे साह्य दिले जाते. राज्यातील नाग्कीकांचा सामाजिक व आर्थिक विकास मिळण्यास सहाय्य मिळते.
त्याचप्रमाणे राज्यातील नागरिकांसाठी शासनाकडून पशुसंवर्धन विभाग, महिला व बालकल्याण विकास विभाग, कृषी विभाग आणि समाज कल्याण विभाग इत्यादींच्या माध्यमातून विविध योजना राबवत असते. त्या योजना या तालुका व जिल्हा पातळीवर सुरू करण्यात येतात.
त्या योजनांची माहिती नागरिकांना त्या प्रमाणात होत नाही. तालुका व जिल्हा पातळीचे विविध विभागाच्या माध्यमातून योजनांची माहिती घेण्यासाठी किंवा मिळवण्यासाठी आज आपण या ” पंचायत समिती योजना 2024 “ या लेखाच्या माध्यमातून पाहणार आहोत.
शासनाकडून राबवण्यात येणारे योजनांची कारवाई करण्याचे काम पंचायत समिती आणि जिल्हा परिषद करत असते. ते छोट्या छोट्या गटांमध्ये या योजनांच्या कार्यवाहीची काम विस्तारलेले असतात. त्यातील पंचायत समिती हि आपल्या तालुका पातळीवर कार्यरत असते, तिच्या माध्यमातून तालुक्यातील जनतेला या योजना पोहोचवण्याचे काम केले जाते. परंतु समिती मार्फत राबविण्यात येणाऱ्या प्रत्येक योजनेची माहिती नागरिकांना नसते. त्यामुळे ते योजनांचा लाभ घेण्यापासून कायम वंचित राहतात.
या पंचायत समिती योजनांच्या माध्यमातून ग्रामीण भागात विकासाचे कार्य चालविले जाते. त्यामध्ये शिक्षण, अरोग्य, महिला व बालविकास विभाग, समाज कल्याण विभाग या विभागाद्वारे हे कार्य चालते. त्यातून समाजात विकास्भिमुख योजना राबविल्या जातात. त्यातून ग्रामीण भागातील जनतेच्या जीवनमानाचा दर्जा उंचावण्याचे कार्य केले जाते.
या योजनांच्या माध्यमातून आरोग्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रांची उभारणी करणे, औषध व गोळ्यांची माहिती देणे, तसेच आरोग्य शिबिरे आयोजित करणे ई. कामे केली जातात.तसेच मुलभूत सोयी-सुवूधा पुरविण्याचे काम या योजनांच्या माध्यमातून होत असते. हे पंचायत समितीचे महत्वाचे कार्य आहे.
Panchayat Samiti Yojana Maharashtra 2024 | वाचकांना नम्र विनंती |
मित्रांनो, राज्य व केंद्र शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या वेगवेगळ्या योजनांची माहिती आपण आपल्या लेखाद्वारे रोजच घेत असतो. त्या योजनातून आपण आपला विकास करण्याचा प्रयत्न करीत असतो. त्याचप्रमाणे आज आपण पंचायत समिती योजनांची माहिती घेणार आहोत. त्यासाठी तुम्ही हा लेख शेवटपर्यंत वाचा.
तसेच तुमच्या परिवारातील किंवा आसपासच्या परिसरातील नागरिकांनाही या योजनांची माहिती सांगा. या महत्वपूर्ण योजनांची माहिती सर्व नागरिकांपर्यंत पोहोचली पाहिजे. त्यामुळे त्यांना योजनांचा फायदा घेता येईल. त्यासाठी आमचा हा लेख जास्तीत जास्त शेअर करा, ही विनंती.
योजनेचे नाव | पंचायत समिती योजना |
लाभार्थी | राज्यातील सर्व नागरिक |
लाभ | आर्थिक सहय्य्य देणे |
उद्देश | ग्रामीण भागातील नागरिकांचा विकास करणे |
अर्ज करण्याची पद्धत | ऑफलाईन |
हे देखील वाचा –
Good News | मोफत स्कुटी योजना मराठी | Free Scooty Yojana Maharashtra 2024 | घरपोच मिळणार मोफत स्कुटी |
New | मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना | Mukhyamntri Mazi Ladki Bahin Yojana 2024 | पात्रता , लाभार्थी व अर्ज करण्याची पद्धत |
New | कुक्कुट पालन अनुदान योजना मराठी | Kukut Palan Yojana Maharashtra 2024 | ऑनलाईन अर्ज, पात्रता व कागदपत्रे |
Good News | अटल पेन्शन योजना 2024 | Atal Pension yojana ( APY ) In Marathi | APY संपूर्ण तपशीलवार माहिती |
New | ऊस तोडणी यंत्र अनुदान योजना महाराष्ट्र | Sugarcane Harvester Subsidy Scheme 2024 | मिळणार 35 लाख रुपये अनुदान |
पंचायत समिती योजना मराठी ची उद्दिष्ट्ये |
- पंचायत समिती योजनेच्या माध्यमातून राज्यातील गोरगरीब जनतेचे जीवनमान सुधारणे.
- पंचायत समितीच्या माध्यमातून योजना तळागाळापर्यंत पोहोचवून, त्यांचा सामाजिक व आर्थिक विकास करणे.
- राज्यातील सर्वसामान्य नागरिकांना सशक्त व आत्मनिर्भर बनवणे.
- राज्य शासनाकडून किंवा केंद्रशासनाकडून राबवण्यात येणाऱ्या सर्व योजनांची माहिती पंचायत समितीद्वारे नागरिकांना देणे.
- पंचात समिती योजनांच्या माध्यमातून राज्यातील कृषी विभागाला चालना देणे.
- या योजनेच्या माध्यमातून स्त्रीशक्तीकरणाला पाठबळ देणे..
- ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदत करणे.
- आपल्या तालुक्यातील शेतकऱ्यांना तसेच पशुपालकांना नवीन तंत्रज्ञान व साधनांचा वापर करण्यासाठी प्रोत्साहित करणे.
- शेतकऱ्यांच्या शेती उत्पन्नात वाढ करून, त्यांना विकासाच्या मार्गावर नेणे.
- ग्रामीण भागातील नागरिकांना निवारा व घर, पिण्यासाठी पाणी यासाठी आर्थिक सहाय्य पुरविणे.
- तालुका पातळीवरील रोजगार निर्मिती वाढण्यासाठी कार्य करणे.
- गरीब, गरजू व आर्थिक दृष्ट्या मागास लोकांसाठी पंचायत समिती मार्फत विविध कल्याणकारी योजना राबविणे.
- ग्रामीण भागातील महिला सशक्तीकरणासाठी आर्थिक सहाय्य देवून पाठबळ देण्याचा प्रयत्न कारणे.
- पंचायत समितीच्या माध्यमातून मुलींसाठी मोफत शिक्षणाची सुविधा निर्माण करणे.
- प्रत्येक तालुक्यातील लोकांच्या आरोग्य सुविधा मोफत उपलब्ध करून देण्यासाठी योजना राबवणे.
- ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी कर्ज व अनुदानाच्या सुविधा उपलब्ध करून देणे.
- पंचायत समितीच्या सामाजिक सुरक्षा योजनेच्या माध्यमातून विधवा, ज्येष्ठ नागरिक व अपंग व्यक्तींना मदत करणे.
पंचायत समिती योजना मराठी ची वैशिष्ट्ये |
- राज्य व केंद्र शासनामार्फत राबविण्यात येणारे योजनेची अंमलबजावणी करण्याचे काम पंचायत समिती मार्फत करण्यात येते.
- राज्यातील विविध विभागामार्फत सुरू करण्यात येणाऱ्या योजनांचा लाभ हा पंचायत समिती मार्फत तळागाळापर्यंत पोहोचवला जातो.
- या योजनेचे अर्ज प्रक्रिया अत्यंत सोपी ठेवण्यात आले आहे. त्यामुळे नागरिकांच्या वेळ व बचत पैशाची बचत होईल.
- या योजनांच्या माध्यमातून राज्यातील स्त्री सशक्तिकरणाला चालना मिळेल.
- तसेच शेती क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर झाल्याने त्याचा विकास होईल.
- सर्व योजनांची माहिती एकाच पोर्टलवर मिळाल्याने, नागरिकांच्या मध्ये संभ्रम निर्माण होणार नाही.
- या योजनेअंतर्गत दिली जाणारी लाभाची रक्कम ही लाभार्थ्याच्या बँक खात्यात ते DBT मार्फत जमा करण्यात येईल.
पंचायत समितीच्या विविध विभाग मार्फत राबविण्यात येणाऱ्या योजना |
पंचायत समिती च्या पशुसंवर्धन विभाग मार्फत चालवणाऱ्या योजना |
- राज्यातील पशुपालक यांना बैलजोडी खरेदी करण्यासाठी 75 टक्के अनुदान.
- महिलांना एक गाय व एक म्हैस खरेदी करण्यासाठी मैत्रिणी योजनेअंतर्गत 50 टक्के अनुदान.
- मिल्किंग मशीन खरेदी करण्यासाठी जिल्हा परिषद निधी उपयुक्त साहित्य खरेदी संदर्भात पंधरा हजार रुपयांच्या अनुदान.
- मुक्त संचार गाय गोटा तयार करण्यासाठी राज्यातील पशुपालकांना जिल्हा परिषद निधी उपयुक्त साहित्य या योजनेतून पंधरा हजार रुपयांच्या अनुदान.
- दहा रबर मॅट खरेदी करण्यासाठी जिल्हा परिषद निधी उपयुक्त साहित्य खरेदी अंतर्गत 15 हजार रुपये अनुदान पंचायत समिती देण्यात येते.
- राज्य शासनाच्या पंचायत समिती मार्फत कुक्कुटपालनासाठी पशुपालकांना 75 टक्के अनुदान दिले जाते.
- मुरघास तयार करण्यासाठी पंधरा हजार रुपयांच्या हाताने पंचायत समिती मार्फत शेतकऱ्यांना दिले जाते.
पंचायत समिती च्या महिला व बाल कल्याण विकास योजना |
- राज्यातील वय वर्ष 18 गुण असलेल्या महिलांना चार चाकी वाहन परवाना मिळवण्यासाठी तीन हजार रुपये आर्थिक सहाय्य पंचायत समिती मार्फत देण्यात येते.
- तसेच पंचायत समिती कार्यक्षेत्रातील दिव्यांग व्यक्तींना अनुदान तत्वावर झेरॉक्स मशीन दिली जाते.
- सातवी ते इयत्ता बारावी मध्ये शिक्षण घेत असणाऱ्या मुलींना क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले योजनेअंतर्गत संगणक प्रशिक्षणासाठी चार हजार रुपयांचे आर्थिक साह्य दिले जाते.
- आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबातील मुलींना पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर योजनेअंतर्गत बारावी नंतरचे उच्च शिक्षण घेण्यासाठी पाच हजार रुपयांची आर्थिक मदत केली जाते.
- तसेच साडेतीन हजार रुपयांच्या आर्थिक साहेब एम एस सी आय टी चे प्रशिक्षण पूर्ण केलेल्या मुलींच्या बँक खात्यात जमा केली जाते.
- ग्रामीण भागातील मुलांना पिठाची गिरणी खरेदी करण्यासाठी, तसेच शिलाई मशीन घेण्यासाठी 90 टक्के अनुदान देण्यात येते.
- पंचायत समिती योजनेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील महिलांना जीवन आवश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी, साडेबारा हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य दिले जाते.
- जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकणाऱ्या पाचवी ते सातवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना शाळेचे अंतर दूर असणार्यांना मुलींना साडेचार हजार रुपयांची सायकल खरेदीसाठी अनुदान दिले जाते.
पंचायत समिती च्या कृषी विभाग मार्फत राबविण्यात येणाऱ्या योजना |
- 5 एच पी इंजन खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांना पंचायत समितीच्या माध्यमातून अनुदान दिले जाते.
- राज्यातील नागरिकांना ताडपत्री खरेदी करण्यासाठी पंचायत समिती मार्फत अनुदान दिले जाते दिले जाते.
- 2.5 एक इंचाची पाईपलाईन करण्यासाठी पंचायत समिती मार्फत शेतकऱ्यांना अनुदान दिले जाते.
- तीन इंचाचे पीव्हीसी पाईप शेतात करण्यासाठी पंचायत समिती मार्फत अनुदान दिले जाते.
- पंचायत समितीमार्फत च्या 200 एच पी च्या सोलर वाटर हीटर साठी अनुदान मिळते.
- पाच एच पी विद्युत ओपन व वेल खरेदी करण्यासाठी अनुदान दिले जाते.
- गायींच्या किमतीच्या 75 टक्के किंमत शेतकऱ्यांना दिली जाते.
Panchayat Samiti Yojana Maharashtra 2024 | आवश्यक पात्रता |
पंचायत समिती योजनेचा अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा मूळ रहिवाशी असावा.
Panchayat Samiti Yojana Maharashtra 2024 | पंचायत समिती योजनांचे विशेष प्रकार |
- कृषी योजना:
या मार्फत शेतकऱ्यांच्या विकासासाठी योजना राबवल्या जातात, त्यामध्ये बी-बियाणे, खते आणि उपलब्ध शेतीविषयक साहित्य खरेदी करण्यासाठी अनुदान, गांडूळ खत प्रकल्प अशा योजनांचा समावेश होतो. - महिला व बालकल्याण योजना:
या अंतर्गत महिलांच्या सशक्तिकरणाला तसेच नवजात बालकांच्या विकासासाठी विविध योजना राबवल्या जातात. त्यामध्ये महिलांना आर्थिक स्वातंत्र्य लाभावे, यासाठी शिलाई मशीन योजना, मोफत पिठाची गिरणी योजना व बचत गटाच्या योजना यांचा समावेश होतो. - शिक्षण योजना:
या अंतर्गत ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळांची गुणवत्ता सुधारण्यासाठी व भौतिक सुविधा पुरवण्यासाठी योजना राबवल्या जातात. त्यामध्ये शाळा बांधणी, माझी शाळा सुंदर शाळा, विद्यार्थी शिष्यवृत्ती आणि शिक्षक प्रशिक्षणे या सर्वांचा समावेश केला जातो. - आरोग्य योजना:
यामध्ये ग्रामीण भागातील आरोग्यासाठी सुविधांची अंमलबजावणी केली जाते. त्यामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्रांची तपासणी व उभारणी, ग्रामीण भागात स्वच्छतेच्या कार्यशाळा, गर्भवती महिलांसाठी शिबिरे व साथीच्या रोगांविषयी जागरूकता कार्यक्रम यांचा समावेश होतो. - पायाभूत सुविधा योजना:
या अंतर्गत पंचायत समिती मार्फत तालुका पातळीवरील पूल ,रस्ते, विद्युत पुरवठा, पाणीपुरवठा यासारख्या भौतिक सुविधा देण्याचा प्रयत्न केला जातो किंवा योजना राबवल्या जातात. - रोजगार निर्मितीस चालना:
या मार्फत ग्रामीण भागातील रोजगार निर्मिती वाढावी, यासाठी कौशल्य प्रशिक्षण योजना, लघुउद्योग लोकांना प्रशिक्षण यासारख्या गोष्टींचा अवलंब केला जातो. त्यामुळे ग्रामीण भागातील तरुणांचा शहराकडे जाणारा लोंढा कमी होईल ,यासाठी प्रयत्न केले जातात.
पंचायत समिती योजना मराठीचे लाभार्थी |
राज्यातील त्या त्या पंचायत समितीच्या कार्यक्षेत्रात येणारे सर्व नागरिक या योजनांचा लाभ मिळवण्यासाठी लाभार्थी आहेत.
Panchayat Samiti Yojana Maharashtra 2024 | या योजनेचे फायदे |
- पंचायत समिती योजनांच्या माध्यमातून राज्यातील शेती क्षेत्राचा विकास होईल.
- या योजनांमुळे नागरिकांचे जीवनमान सुधारणे.
- राज्यातील नागरिकांचा सामाजिक व आर्थिक विकास करण्यासाठी पंचायत समितीच्या माध्यमातून प्रयत्न केले जातील.
- या योजनेच्या माध्यमातून आर्थिक सहाय्य पुरवले जाते.
- या योजनांमुळे औद्योगिक क्षेत्राचा विकास होऊन रोजगार निर्मितीस चालना मिळेल.
- पंचायत समिती मार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांमुळे शेतकरी सशक्त व आत्मनिर्भर बनतील.
- या योजनांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील शाळांची गुणवत्ता सुधारण्यासाठी प्रयत्न केले जातात.
- स्थानिक पातळीवर भौतिक सोयी सुविधा पुरविण्याचे काम पंचायत समितीच्या माध्यमातून केले जाते.
Panchayat Samiti Yojana Maharashtra 2024 | पंचायत समिती योजनेचे आटी व नियम |
- पंचायत समिती योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्यातील मूळ नागरिकांना लाभ दिला जाईल.
- या योजनेअंतर्गत राज्याबाहेरील वास्तव्यास असलेल्या नागरिकांना लाभ दिला जाणार नाही.
- या योजनेतील अर्जदाराचे वय हे 18 ते 60 असणे आवश्यक आहे.
- या अर्जदाराने पंचायत समिती योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करणे गरजेचे आहे.
- या योजनेचा लाभ घेणाऱ्या नागरिक हा अपंग असल्यास अपंगत्वाचे प्रमाणपत्र आवश्यक आहे.
- तसेच या योजनेचा लाभार्थी नागरिका अनुसूचित जाती – जमाती प्रवर्गातील असल्यास, त्याने जात प्रमाणपत्र सादर करणे गरजेचे आहे.
- या योजनेचा लाभ घेणाऱ्या अर्जदारांनी मागील 3 वर्षापासून पंचायत समिती योजनेचा कोणत्याही प्रकारचा लाभ घेतलेला नसावा.
- या योजनेचा लाभ घेणाऱ्या अर्जदाराची वार्षिक उत्पन्न 50 हजाराच्या आत असावे.
- पंपासाठी अर्ज केला असल्यास जल सुविधा उपलब्ध असल्याचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.
Panchayat Samiti Yojana Maharashtra 2024 | आवश्यक कागदपत्रे |
- आधार कार्ड
- रेशन कार्ड
- मतदान ओळखपत्र
- रहिवासी दाखला
- जात प्रमाणपत्र
- अपंगत्वाचे प्रमाणपत्र
- बँक पासबुक
- मोबाईल नंबर
- ईमेल आयडी
- योजनेचा अर्ज
- उत्पन्नाचा दाखला
- हमीपत्र
- जन्माचा दाखला
- जमिनीचा 7/12 व 8 अ उतारा
Panchayat Samiti Yojana Maharashtra 2024 | अर्ज करण्याची पद्धत |
- प्रथम अर्जदाराला आपल्या क्षेत्रातील पंचायत समिती कार्यालयात जाऊन या योजनेचा अर्ज घ्यावा लागेल.
- अन्यथा पुढे दिलेले लिंक वरून योजनेचा अर्ज डाऊनलोड करावा लागेल.
- अर्जात विचारलेली माहिती योग्य व अचूक प्रकारे भरावी.
- त्याच्यासोबत आवश्यक कागदपत्रांच्या झेरॉक्स जोडाव्यात.
- नंतर तो अर्ज पंचायत समिती कार्यालयात जमा करावा व जमा केलेले अर्जाची पोच पावती घ्यावी.
- अशाप्रकारे तुमची या योजनेसाठी अर्ज करण्याची प्रोसेस पूर्ण होईल.
Panchayat Samiti Yojana Maharashtra 2024 |
पंचायत समिती योजना शासनाची अधिकृत website click here
1 thought on “Good News | Panchayat Samiti Yojana Maharashtra 2024 | पंचायत समिती योजना मराठी | थोडक्यात संपूर्ण माहिती |”