New | ई- श्रम कार्ड पेन्शन योजना मराठी | Good News | E Shram Card Pension Yojana 2024 | मिळणार 2 लाखाचे विमा संरक्षण |

Table of Contents

E Shram Card Pension Yojana 2024 | ई- श्रम कार्ड पेन्शन योजना मराठी |

E- Shram card penshan yojana 2024 penshan yojana marathi e-shram card yojana maharashtra central Govt scheme e-shram card yojana

E Shram Card Pension Yojana 2024 |

नमस्कार मित्रानो, भारतामध्ये ग्रामीण भागातील लोकसंख्या चे प्रमाण लक्षणीय आहे. त्यातच भारता हा एक कृषीप्रधान देश असल्याने शेतकरी मोठ्या प्रमाणात आहेत. कष्टकरी वर्ग हा भरपूर प्रमाणात आहे. या कष्टकरी वर्गामध्ये बहुतांश लोक हे अंग मेहनतीचे काम करत असतात. तसेच  शारीरिक कष्टाची कामे करत असतात.

राज्यात अनेक प्रकारचे कष्टकरी लोक राहतात. त्यामध्ये बांधकाम कामगार मजूर आहेत. रस्त्यावर काम करणारे मजूर, शेतात राबणारे शेतमजूर,  वीट भट्टीकाम काम करणारे कामगार, सिमेंट कारखाने अशा विविध ठिकाणी अनेक कामगार आहेत. जे रोज कष्टाची कामे करतात आणि आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. त्यांची परिस्थिती अत्यंत हलाखीची असते. त्यामुळे ते मिळेल ते काम करण्यास तयार असतात. त्यांच्याकडे कामाचे कायमस्वरूपी असे  कोणतीही स्थायी साधन उपलब्ध नसते.
तसेच या कष्टकरी लोकांचे कोणतेही संघटन नसते. कारण ते एका ठिकाणी कामाला नसतात. अशा देशातील कष्टकरी, मागास व आर्थिक दृष्ट्या गरीब असंघटित कामगारांसाठी राज्य शासन व केंद्र शासनामार्फत ” ई- श्रम कार्ड पेन्शन योजना “ या योजनेची सुरुवात करण्यात आली.
आपल्या देशात विकास करण्यामध्ये कामगार वर्गाचा व कष्टकरी वर्गाचा मोलाचा वाट आहे. हे कष्टकरी लोक असंघटित असतात. त्यामुळे त्यांना अनेक गोष्टींचा, अडचणीचा सामना करावा लागतो.
केंद्र शासनाने या सर्व गोष्टींचा विचार करून 2020 पासून असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या गरजू कामगारांना आर्थिक सहाय्य देण्याच्या विचाराने ई-श्रम कार्ड पेन्शन योजनेचे सुरुवात केली.
ई-श्रम कार्ड पेन्शन योजने अंतर्गत असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांना वयाची साठ वर्षे पूर्ण झाल्यानंतर दरमहा तीन हजार रुपये पेन्शन दिली जाते. म्हणजेच दरवर्षी 36 हजार रुपयाची रक्कम आर्थिक सहाय्य म्हणून यांना दिली जाते. तसेच दोन लाख रुपयांचा अपघात विमा देखील या कार्ड योजनेअंतर्गत कामगारांना दिला जातो.

 

E Shram Card Pension Yojana 2024 | वाचकांना नम्र विनंती |

मित्रानो, शासनाच्या प्रत्येक योजनेची माहिती आपण घेतच आहोत. रोज एका नवीन योजनेची माहिती आपल्याला मिळते. त्यातून आपल्याला फायदाच होतो, तसेच आपल्या परिसरातील लोकांनाही त्याचे फायदे होत असतात.

त्याचप्रमाणे आज आपण एका नवीन योजनेची म्हणजेच ई-श्रम कार्ड पेन्शन योजनेची माहिती या लेखामध्ये घेणार आहोत. त्यासाठी आमच्या हा लेख  शेवटपर्यंत वाचा. तसेच तुमच्या परिसरात कोणी असंघटित क्षेत्रात काम करणारे कामगार असतील, तर त्यांनाही योजनेची माहिती सांगा. तसेच या योजनेचा फायदा घ्यायला सांगा. त्यासाठी आमचा हा लेख जास्तीत जास्त शेअर करा. त्यांना मदत होईल, हि विनंती.

E Shram Card Pension Yojana 2024 |

योजनेचे नाव ई – श्रम कार्ड पेन्शन योजना मराठी 
योजनेची सुरुवातकेंद्र शासन
विभागश्रम आणि रोजगार मंत्रालय
लाभार्थीदेशातील असंघटीत कामगार
लाभप्रती महीन 3000/- रुपये
उद्देशअसंघटीत कामगारांना आर्थिक सहाय्य करणे
अधिकृत websitehttps://maandhan.in/

 

हे पण वाचा – 

 महिला सन्मान योजना महाराष्ट्र | Good News | Mahila Samman Yojana In Marathi 2024 | ST प्रवासात 50 % सूट |

कन्यादान योजना महाराष्ट्र | Good News |Kanyadan Yojana Maharashtra 2024 | मुलीच्या लग्नाची चिंता सोडा | सरकार देत आहे मदत |

युवकांना व्यावसायिक प्रशिक्षण योजना महाराष्ट्र | Good News | Vyavsayik Prashikshan Yojana 2024 | नोंदणी सुरु |

E Shram Card Pension Yojana 2024 | ई- श्रम कार्ड योजनेची उद्दिष्ट्ये |

  •  देशातील कष्टकरी कामगार लोकांना आर्थिक सहाय्य करणे, हे या योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे.
  • या योजनेच्या माध्यमातून असंघटित क्षेत्रातील कामगारांचा आर्थिक व सामाजिक विकास करणे.
  • ई श्रम कार्ड पेन्शन योजनेच्या माध्यमातून श्रमिकांना उतारवयात स्वतःच्या गरजा भागवण्यासाठी होण्यासाठी समर्थ बनवणे.
  • ई- श्रम कार्ड पेन्शन योजनेच्या माध्यमातून असंघटित कामगारांना स्वतंत्र व स्वावलंबी बनविणे.
  • असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी ही योजना महत्वाची भूमिका बजावते.
  • या योजनेच्या माध्यमातून कामगारांना सेवानिवृत्तीच्या काळात उत्पन्नाचा एक स्त्रोत उपलब्ध करून देणे.

E Shram Card Pension Yojana 2024 | ई- श्रम कार्ड पेन्शन योजनेची वैशिष्ट्ये |

  • देशात असंघटित क्षेत्रात काम करणारया कामगारांना आर्थिक सहाय्य करण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने ई- श्रम कार्ड पेन्शन योजनेची सुरुवात केली.
  • या योजने अंतर्गत वयाची साठ वर्षे पूर्ण केलेल्या कामगारांना प्रतिमाह 3000/- रुपये पेन्शन म्हणून आर्थिक सहाय्य मिळते.
  • या योजनेमुळे उतारत्या वयात अशा कामगार लोकांना स्वतःचा उदरनिर्वाह करण्यासाठी आर्थिक सहाय्य दिले जाते.
  • या योजनेअंतर्गत प्रत्येक कामगाराला वर्षभरात 36 हजार रुपये ची आर्थिक मदत केंद्र सरकार मार्फत दिली जाते.
  • ई- श्रम कार्ड पेन्शन योजनेसाठी अर्ज करण्याची पद्धत किंवा नोंदणी करण्याची पद्धत अत्यंत सोपी ठेवण्यात आलेली आहे.
  • ऑनलाईन नोंदणी असल्याने कामगारांना कोणत्याही सरकारी कार्यालयात हेलपाटे मारण्याची आवश्यकता नाही.
  • सर्व कार्यवाही हि संगणकीय केल्याने श्रमिकांच्या वेळ व पैशाची बचत होणार आहे.

E Shram Card Pension Yojana 2024 | ई- श्रम कार्ड पेन्शन योजनेचे फायदे |

  •  असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या देशातील सर्व कामगारांना ई- श्रम कार्ड पेन्शन योजना अंतर्गत आर्थिक सहाय्य केले जाते.
  • ई- श्रम कार्ड पेन्शन योजनेमुळे या कामगारांचा आर्थिक व सामाजिक विकास होणार आहे.
  • या योजनेअंतर्गत नोंदणी केलेल्या कामगाराला केंद्र सरकार मार्फत प्रति महिना 3000/- रुपयांची पेन्शन म्हणून आर्थिक मदत दिली जाते.
  • ई- श्रम कार्ड पेन्शन योजनेअंतर्गत कामगारांना प्रतिवर्षी 36,000/- हजार रुपये पेन्शन म्हणून आर्थिक सहाय्य दिले जाते.
  • या योजनेअंतर्गत दिली जाणारी रक्कम हे थेट लाभार्थ्याच्या खात्यात जमा केली जाते.
  • या योजनेअंतर्गत प्रत्येक कामगाराला दोन लाख रुपयांचा विमा संरक्षण देखील दिले जाते.
  • शासनाच्या ई- श्रम कार्ड योजनेत नोंदणी केलेल्या नोंदणीकृत कामगाराला अपंगत्व आल्यास एक लाख रुपयांची आर्थिक मदत दिली जाते.
  • ई- श्रम कार्ड पेन्शन योजनेच्या माध्यमातून कामगारांना मोफत उपकरणे पुरविली जातात, त्यामुळे त्यांचा विकास होण्यास हातभार लागतो.
  •  या योजनेच्या माध्यमातून नोंदणीकृत कामगारांना घर बांधून देण्यासाठी केंद्र सरकार मार्फत निधी उपलब्ध करून दिला जातो.

E Shram Card Pension Yojana 2024 | ई- श्रम कार्ड पेन्शन योजने अंतर्गत आवश्यक असणारी पात्रता |

  1.  ई- श्रम कार्ड पेन्शन योजनेत कार्ड काढण्यासाठी अर्जदार कामगार हा भारताचा मूळ रहिवासी असावा.
  2. अर्जदार हा देशातील असंघटित क्षेत्रात कार्य करणारा मजूर असावा.
  3. या योजनेअंतर्गत नोंदणी करण्यासाठी त्या कामगाराची वय 18 ते 60 वर्ष दरम्यान असावे.
  4. या योजनेतील अर्जदाराचे मासिक उत्पन्न हे 15000/-हजार रुपयानपेक्षा जास्त असू नये.
  5. ई- श्रम कार्ड पेन्शन योजनेत नोंदणी करणारा किंवा याचा लाभ घेणारा अर्जदार कामगार आयकर भरणारा नसावा.

E Shram Card Pension Yojana 2024 | ई- श्रम कार्ड योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे |

  • मतदान ओळखपत्र
  • आधार कार्ड
  • रेशन कार्ड
  • उत्पन्नाचा दाखला
  • वयाचा दाखला
  • रहिवासी पुरावा
  • मोबाईल नंबर
  • पासपोर्ट साईज फोटो
  • बँक पासबुक
  • असंघटित क्षेत्रात काम करत असल्याचे प्रमाणपत्र

 

E Shram Card Pension Yojana 2024 | ई- श्रम कार्ड योजने अंतर्गत कोण-कोण नोंदणी करू शकतो |

ई-श्रम कार्ड पेन्शन योजने अंतर्गत असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांचा समावेश केला जातो. ते कामगार पुढीलप्रमाणे दिले आहेत :

  •  दुकानात काम करणारे कर्मचारी
  • सेल्समन
  • वायरमन
  • पंचर काढणारे कामगार मजूर
  • पशुपालक
  • मेंढपाळ
  • डिलिव्हरी बॉय
  • रिक्षा चालक
  • सेल्समन
  • दुग्ध व्यवसाय करणारे
  • फेरीवाले
  • वीट भट्ट्यांवर काम करणारे मजूर

E Shram Card Pension Yojana 2024 | ई-श्रम कार्ड पेन्शन योजनेंतर्गत मिळणारे लाभ |

  • प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना
  • पीएम जीवन ज्योती विमा योजना
  • अटल पेन्शन योजना
  • पीएम सुरक्षा विमा योजना
  • पीएम रोजगार निर्मिती योजना
  • राष्ट्रीय सामाजिक सहाय्य योजना
  • आयुष्मान भारत योजना
  • कौशल्य विकास योजना

E Shram Card Pension Yojana 2024 | ई-श्रम कार्ड पेन्शन योजनेंतर्गत अर्ज रद्द होण्याची करणे |

  1. अर्जदारांनी जर ई- श्रम कार्ड योजनेच्या फॉर्ममध्ये चुकीची माहिती भरली असेल, तर अर्ज रद्द केला जातो.
  2. या योजनेतील अर्ज व्यक्तीचे वय 18 वर्षापेक्षा कमी किंवा 60 वर्षापेक्षा जास्त असेल, तर त्या व्यक्तीचा अर्ज रद्द केला जातो.
  3. या योजनेसाठी अर्ज करणारे अर्जदार व्यक्ती ही जर असंघटित क्षेत्रातील कामगार नसेल, तर त्या व्यक्तीचा अर्ज रद्द केला जातो.
  4. योजनेसाठी अर्ज करणाऱ्या अर्जदार व्यक्तीचे वार्षिक उत्पन्न हे 15000/- पेक्षा जास्त असेल, तर त्या व्यक्तीचा अर्ज रद्द केला जातो.

E Shram Card Yojana 2024 | ई- श्रम कार्ड पेन्शन योजनेंतर्गत ऑनलाईन रजिस्ट्रेशन करण्याची पध्दत |

  • ई-श्रम कार्ड पेन्शन योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी आपणाला प्रथम शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल.
  • या वेबसाईटवर तुम्हाला स्वयं नोंदणी करणे आवश्यक आहे.
  • त्यानंतर तुम्हाला home page वरील Scheme यावर click करावे लागेल.
  • त्यानंतर PM-SYM च्या पर्यायावर click करावे.
  • नंतर login वर click केल्यास एक नवीन page open होईल.
  • त्यातील सेल्फ enrollment वर click करावे.
  • त्यानंतर तुमचा mobail नंबर टाकून proceed या पर्यायावर click करावे.
  • नंतर मोबाईलवर OTP तो टाकावा लागेल.
  • आता योजनेचा अर्ज open होईल.
  • त्यात आवश्यक माहिती अचूक भरावी.
  • त्यानंतर आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करावी लागतील.
  • शेवटी submit वर click करावे लागेल.
  • त्यानंतर तुम्हाला अर्जाची पावती मिळेल.
  • अशापाकारे तुमचे ई-श्रम कार्ड योजनेमध्ये ऑनलाईन रजिस्ट्रेशन पूर्ण होईल.

E Shram Card Pension Yojana 2024 | ऑफलाईन अर्ज करण्याची पध्दत |

  • सर्वप्रथम आपणाला जवळच्या लोकसेवा केंद्रात म्हणजे CSC मध्ये जाऊन तुम्हाला ई- श्रम कार्ड पेन्शन योजनेचा फॉर्म घ्यावा लागेल.
  • त्या केंद्रातील अधिकाऱ्यांना या योजनेअंतर्गत तुम्हाला फॉर्म भरायचा आहे, हे अगोदर सांगावे लागेल.
  • त्यानंतर अर्ज सोबत तुम्हाला महत्त्वाची कागदपत्रे लोकसेवा केंद्रात जमा करावी लागतील.
  • अर्ज जमा केल्यानंतर तुम्हाला एक पावती दिली जाईल.
  • त्यानंतर तुम्हाला तेथील ऑपरेटिंग अधिकाऱ्याकडे ठरवून दिलेली विहित रक्कम भरावी लागेल.
  • अशाप्रकारे तुमची कामगार कल्याण योजनेमध्ये ई- श्रम कार्ड पेन्शन योजनेसाठी कार्ड काढण्यासाठी ची ऑफलाइन प्रोसेस पूर्ण होईल.

1 thought on “New | ई- श्रम कार्ड पेन्शन योजना मराठी | Good News | E Shram Card Pension Yojana 2024 | मिळणार 2 लाखाचे विमा संरक्षण |”

Leave a Comment