Mazi Ladki Bahin Yojana No New Form Accepted |
Mazi Ladki Bahin Yojana
नमस्कार मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत फॉर्म भरण्याची प्रक्रिया बंद झालेले आहे. मित्रांनो राज्यातील एक कोटी पेक्षा जास्त महिलानि मुख्यमंत्र्यांनी माझी लाडकी बहिणी योजनेअंतर्गत आपले अर्ज सादर केले आहेत. या सादर केलेल्या अर्जाची सध्या तपासणी सुरू करण्यात आलेले आहे.
पण फॉर्म भरायचे बंद का झालेत ? नक्की काय प्रॉब्लेम झालेले आहे? हा सर्वांना पडलेला एक महत्त्वाचा प्रश्न आहे. बरेच जणांचे फॉर्म अपलोड झालेले आहेत. तर काही जणांचे फॉर्म रिजेक्ट झालेले आहेत. तर नक्की काय करायचं ? हे सर्वजणांन पडलेला एक प्रश्न आहे. त्याविषयी आपण थोडक्यात माहिती या लेखाच्या माध्यमातून पाहणार आहोत.
Mazi Ladki Bahin Yojana
आपल्या अर्जचे स्टेटस नक्की काय सांगते?
Ladki bahin yojana states यामध्ये अर्जाची स्थिती दाखवीत आहे ? ते नेमके दाखवीत असलेल्या अर्जाच्या स्थितीचा अर्थ काय आहे ? हे आता आपण समजून घेणार आहोत. ते पुढील प्रमाणे:
SMS verification done :
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत आपण भरलेला अर्ज आहे आणि आपला अर्ज भरताना दिलेला आपण मोबाईल नंबरचे आपण वेरिफिकेशन पूर्ण केले आहे. असा याचा अर्थ होतो. Mazi Ladki Bahin Yojana
In pending to submitted :
आपण माझी लाडकी बहिणी अंतर्गत आपलाच अर्ज सादर केला आहे. परंतु आपला अर्ज अजून तपासणीसाठी पुढे पाठवण्यात आलेला नाही. याचा अर्थ इन पेंडिंग टू सबमिटेड
Approved :
आपण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत सादर केलेला अर्ज मान्य करण्यात आला आहे. आता आपणास काही करण्याची आवश्यकता नाही, सरकारकडून आपणाला लाभ देण्यात येईल.
In review :
आपण सादर केलेला मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेचा अर्ज तपासणीसाठी पुढे पाठवण्यात आला आहे. लवकरच आपल्या अर्जावर तपासणी कार्य सुरू होईल व आपणास आपले स्टेटस दिसून येईल.
Disapproved :
आपण सादर केलेला मुख्यमंत्री लाडके बहिणी योजनेचा अर्ज नामंजूर करण्यात आला आहे. तो कोणत्या कारणामुळे Disapproved अपलोड करण्यात आला. याची कारण देखील दाखवण्यात येईल, त्यामुळे आपणास अर्जात बदल करून अर्ज परत तपासण्यासाठी पाठवावा लागेल.
Rejected :
आपल्या अर्जामध्ये असा पर्याय दिसत असेल, तर मुख्यमंत्री लाडकी बहिण योजने अंतर्गत आपण केलेला अर्ज नाकारण्यात आला आहे. त्याचे कारण आपल्याला अर्जामध्ये दाखवण्यात येते. जर आपण ते दिलेल्या घटकाचे पूर्तता करत असाल, तर आपण परत नव्याने अर्ज करू शकता. अन्यथा आपल्याला या योजनेचा लाभ मिळणार नाही. Mazi Ladki Bahin Yojana
हे पण वाचा-
Mukhyamntri Annpurna Yojana Apply Online | मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना 2024 | करा ऑनलाईन अर्ज |
E – pik pahani 2024 | ई पिक पाहणी ( DSC ) वर्जन 3 | अशी करा मोबाईल वरून ई पिक पाहणी |
Mazi Ladki Bahin Yojana List 2024 | माझी लाडकी बहिण योजना यादी | निवडलेल्या लाभार्थीचे नाव शोधा |
फॉर्म भरणे बंद कारण काय?
Mazi Ladki Bahin Yojana
मित्रांनो, जे कोणी नवीन फॉर्म भरत आहेत. त्यांना फॉर्म भरताना NO NEW FORM Accepted असा ऑप्शन दिसत असेल, तर मित्रांनो आता ॲप मधून तुम्ही फॉर्म भरू शकत नाही. नवीन फॉर्म भरायचा असेल, तर तुम्हाला ॲप मधून फॉर्म भरता येणार नाही. असं सांगण्यात आलेला आहे. ॲप मधून फॉर्म भरणे बंद करण्यात आलेले आहेत. Mazi Ladki Bahin Yojana
ॲप मधून फॉर्म का बंद करण्यात आलेले आहे? तर कारण document VERIFICATION चालू आहे, फॉर्म चेकिंग चालू आहे, त्यामुळे जे नवीन फॉर्म आहेत, ते फॉर्म भरतात येणार नाहीत. बंद करण्यात आले आहे.
त्यामुळे तुम्ही वेबसाईट पोर्टलवर जाऊन पोर्टल वरती नवीन form भरावा लागेल. तुम्हाला ॲप मधून भरता येणार नाहीत. ॲप मध्ये तुम्ही काय करू शकता? तर जे काही स्टेटस आहेत ते तुम्ही ॲप मध्ये पाहू शकता.
जर तुमचे ॲप चालत नसेल तर रात्री उशिरा प्रयत्न करा. स्टेटस काय आहे ते पहा. Mazi Ladki Bahin Yojana
तसेच, मित्रांनो जर तुम्हाला नवीन form भरायचा असेल तर तो तुम्हाला पोर्टल वर जाऊनच नवीन फॉर्म भरू शकता. हे पोर्टल सुद्धा चालत नसेल तर सकाळी लवकर उठून किंवा रात्री उशिरा तुम्ही ट्राय करू शकता. हा पूर्णपणे सर्वर चा प्रॉब्लेम आहे. तो कुणाच्याही आपल्या हातात नाही. त्यामुळे तुम्ही नवीन फॉर्म भरण्यासाठी पोर्टल वर ट्राय करू शकता व पोर्टल वर तुमचे नवीन फॉर्म भरू शकता.
तसेच ज्या लोकांनी आपले फॉर्म भरले आहेत. त्यांनी आपले स्टेटस चेक करीत रहा. जो काही स्टेटस येईल, त्यानुसार तू एडिट करण्याचा प्रयत्न करा. त्यासाठी थोड्या दिवस तुम्हाला वाट पहावी लागणार आहे. सध्या तुम्ही त्यात काहीही बदल करू शकत नाही आहात.
1 thought on “Mazi Ladki Bahin Yojana No New Form Accepted | लाडकी बहिण योजना | फॉर्म बंद झाले ? जाणून घ्या अर्जाचे स्टेटस |”