E – pik pahani 2024 | ई पिक पाहणी ( DSC ) वर्जन 3 |
E – pik pahani 2024 |
नमस्कार शेतकरी बांधवांनो, पूर्वी आपल्याला आपल्या शेती जमिनीचे उतारे काढण्यासाठी शासन दरबारी तासन तास रांगा लावाव्या लागत होत्या. ते कागदपत्रे उतारे मिळत होते. पण आताचे युग डिजिटल युग असल्यामुळे सर्व काही ऑनलाईन झाले आहे. त्यामुळे आपल्याल आपला सातबारा उतारा काढण्यासाठी वेबसाईटवर जाऊन तेथून काढता येतो.
त्या ठिकाणाहून आपल्याला आपल्या स्वतःच्या पिकाची पाहणी देखील करता येते. या सर्व ऑनलाईन प्रक्रियेमुळे लोकांचा वेळ व पैसा वाचलेला आहे. पूर्वी शेतकऱ्यांना आपल्या पिकाची इ पीक पाहणी करण्यासाठी तलाठी कार्यालय व तहसीलदार कार्यालयामध्ये रांगा लावाव्या लागत होत्या. पण आता त्यासाठी तुम्ही ई पीक पाहणी पोर्टलचा वापर करू शकता. E – pik pahani 2024 |
या पोर्टलवर तुम्हाला तुमच्या गावात किती क्षेत्र बागायती आहे ? किती शेतकऱ्यांना कर्ज मिळाले आहे ? या सर्वांची माहिती पाहू शकता.
E – pik pahani 2024 | ई – पिक पाहणी म्हणजे काय ?
ई पिक पाहणी नोंदणी सातबारा, उतारा तयार करून देण्याचे काम तलाठी कार्यालयात केली जात होती. परंतु आता महाराष्ट्र सरकारने इ पीक पाहणी हे नवीन माध्यम चालू केले आहे. म्हणजे इलेक्ट्रॉनिक्स पद्धतीने शेतातील पिकांची पाहणी करणे .असा त्याचा अर्थ होतो. ई पीक पाहणीच्या साह्याने शेतकऱ्यांना स्वतःच्या मोबाईल वरून त्यांच्या शेतामध्ये जाऊन पिकाची पाहणी करून त्यांची नोंदणी ई पिक पाहणीच्या साह्याने करता येणार आहे.
हे पण वाचा –
Online Apply For Pan Card | पॅन कार्ड काढण्यासाठी आवश्यक कागदपत्रे | जाणून घ्या सविस्तर माहिती |
E – pik pahani 2024 | ई पिक पाहणी चे फायदे |
महाराष्ट्रात कृषी विभागाकडून सुरू करण्यात आलेल्या पिक पाहणे या नोंदणीला शेतकरी वर्गातून मोठा प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे ई पिक पाहणी ॲप मध्ये शेतकरी बांधवांच्या सहभाग वाढला आहे. पिक पाहण्याचे फायदे काय आहेत ते पुढील प्रमाणे :
- ई पिक पाहणी सोप्या पद्धतीने कमी वेळात ऑनलाईन पद्धतीने केली जाते.
- ई पिकाची पाहणी ऑनलाईन प्रक्रियेमुळे झाल्याने शेतकऱ्यांच्या वेळ व पैशाची बचत होते.
- पिक विमा प्रक्रियेला आणि पीक पाहण्याचे दावे निकाल काढण्याची प्रक्रिया खूप सोप्या पद्धतीने होते.
- ई पीक पाहणी मुळे शेतकरी बांधवांना पिक कर्ज खूप सोप्या पद्धतीने मिळते. E – pik pahani 2024 |
- नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांच्या शेतात झालेल्या नुकसान याची भरपाई देण्यासाठी एक पीक पाहणी चा मोठा हातभार लावला जातो. त्यामुळे मदत मिळणे सोपे जाते.
- राज्यातील शेतकऱ्यांनी चालू वर्षी कोणकोणत्या पिकांची लागवड केलेली आहे आणि ती किती क्षेत्रावर केलेले आहेत या सर्वांची माहिती ई पिक पाहणी मुळे कळते.
- कृषी क्षेत्रातील योग्य नियोजन करण्यासाठी ई पीक पाहणी अतिशय महत्त्वपूर्ण आहे. E – pik pahani 2024 |
E – pik pahani 2024 | मोबाईल वरून ई पीक पाहणी कशी करावी ?
- प्रथम शेतकरी बांधवांना सर्वप्रथम आपल्या मोबाईल मधील प्ले स्टोअर ओपन करावे. त्याच्या सर्च बारमध्ये ई पीक पाहणे ॲप डाऊनलोड करावे.
- ॲप डाऊनलोड झाल्यानंतर त्याला ओपन करून त्यामध्ये तुम्हाला स्वतःचा जिल्हा तालुका गाव निवडायचे आहे.
- त्यानंतर तुमचा खाते क्रमांक निवडा किंवा गट क्रमांक टाका. E – pik pahani 2024 |
- ही सर्व माहिती बरोबर भरल्यानंतर तुमचा परिचय निवडायचा आहे, त्यानंतर होम पेज ओपन होईल.
- त्यानंतर तुमच्या मोबाईलवर एक ओटीपी येईल, त्यानंतर होम पेजवर तुम्ही जे पीक घेत असाल त्याची माहिती भरायची आहे.
- सर्व माहिती बरोबर भरल्यानंतर तुमच्या जमिनीचा खाते क्रमांक निवडायचा आहे किंवा गट क्रमांक निवडल्यानंतर तुमचे क्षिती क्षेत्र निवडायचे आहे.
- त्यानंतर हंगाम निवडायचा आहे.
- त्यानंतर तुम्ही जे पीक घेत असाल त्या पिकाचा प्रकार निवडायचा आहे. तुम्ही जर एक पीक घेत असाल तर सिंगल क्रोप हा पर्याय निवडायचा आणि जर तुम्ही एकापेक्षा जास्त पीक घेत असाल तर बहुपीक हा पर्याय निवडायचा.
- ही सर्व माहिती भरल्यानंतर तुमच्या पिकाचे नाव निवडा, सिंचन पद्धती निवडा किंवा कोरडवाहू असल्यास तसा प्रकार निवडा.
- त्यानंतर तुम्ही ज्या दिवशी पिक पेरणी केली असेल त्या पिकाच्या लागवडीची तारीख नोंद करायची आहे.
- वरील सर्व माहिती भरल्यानंतर आपल्या मोबाईल मध्ये जीपीएस किंवा लोकेशन हा पर्याय चालू करा. कारण तुम्ही कोणत्या ठिकाणाहून पीक पाहणी केली आहे, हे माहिती ॲप मध्ये असणार आहे. E – pik pahani 2024 |
- त्यानंतर तुमचा शेतीतील मुख्य पिकाजवळ उभे राहून फोटो काढून एक पिक पाहणे ॲप मध्ये तो अपलोड करा. त्यानंतर सबमिट बटनावर क्लिक करा.
अशाप्रकारे अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही आपल्या पिकाची ई पिक पाहणी ऑनलाईन पद्धतीने ॲपच्या साह्याने करू शकता. जर तुमच्याकडे अँड्रॉइड मोबाईल नसेल तर तुम्ही दुसऱ्याच्या मोबाईल वरून सुद्धा पिक पाहणी करू शकता. वीस खातेदारांची ई पीक पाहणे एका मोबाईल वरून करता येते.
3 thoughts on “E – pik pahani 2024 | ई पिक पाहणी ( DSC ) वर्जन 3 | अशी करा मोबाईल वरून ई पिक पाहणी |”