पी एम किसान योजना |
PM kisan Yojana 19th installment date
PM kisan Yojana
PM kisan scheme for government
Pm kisan Yojana next installment
Pm scheme for farmars
नमस्कार, PM kisan Yojana 19th installment date पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेणारे शेतकऱ्यांसाठी महत्वाची, आनंदाची बातमी आलेले आहे. पी एम किसान च्या 19 व्या हप्त्याचे पैसे लवकरच त्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहेत. त्यांची ई- केवायसी पूर्ण करणे, आधाराने बँक खाते लिंक करणे आणि जमिनीचे नोंदणी ठेवणे आवश्यक आहे. अधिकृत वेबसाईटवर त्यांच्या हप्त्याची स्थिती तपासू शकतात.
संपूर्ण देशातील शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा अठरावा हप्ता राज्यातील विधा सभा निवडणुकीच्या आधी जमा करण्यात आलेला आहे. आता शेतकरी वाट पाहत आहेत ,ते म्हणजे 19 वा हप्ता कधी जमा होणार, तर मित्रांनो 19 वा हप्ता कधी जमा होणार ? कोणते तारखेला जमा होणार ? याबाबत सविस्तर माहिती आपण या लेखात पाहणार आहोत. त्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचा.
भारतीय हवाई दलात अग्निवीर वायू साठी मोठी भरती | 12 वी पास विद्यार्थ्यांना मिळणार संधी| लगेच करा अर्ज |
पी एम किसान योजना काय आहे ?
पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना भारत सरकारचा हा एक महत्त्वपूर्ण व महत्वकांक्षा उपक्रम आहे. हि योजना लहान आणि सीमांत शेतकऱ्यांना आर्थिक साह्य प्रदान करते. हि योजना फेब्रुवारी 2019 मध्ये सुरू करण्यात आली. शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पन्नात स्थिरता प्रदान करणे आणि त्यांच्या शेतीचे संबंधित खर्चामध्ये त्यांना मदत करणे, हा योजनेचा मुख्य उद्देश आहे. PM kisan Yojana 19th installment date
पी एम किसान योजनेचे मुख्य वैशिष्ट्य |
पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी 6 हजार रुपयांची मदत दिली जाते. ही रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 3 समान हप्त्यांमध्ये वर्ग केले जाते. दोन हेक्टर पर्यंत लागवड योग्य जमीन असलेले छोटे आणि अत्यल्प शेतकरी या योजनेसाठी पात्र आहेत. शेतकऱ्यांना मदतीची रक्कम थेट लाभ हस्तांतरण द्वारे दिली जाते. त्यामुळे प्रक्रिया पारदर्शक आणि जलद होते. लाभ घेण्यासाठी आधार कार्ड बँक खात्याची लिंक करणे अनिवार्य आहे. मिळालेल्या माहितीनुसार पी एम किसान चे पैसे फेब्रुवारी २०२५ मध्ये येऊ शकतात. मात्र, जसजशी तारीख जवळ येईल तसतशी सरकार पीएम किसान वेबसाइटवर ही माहिती देईल. आत्तापर्यंत ही माहिती अनुमानांच्या आधारे दिली जात आहे. त्याची अधिकृत घोषणा सरकारकडून अद्याप व्हायची आहे.
लाडक्या बहिणींसाठी ” आनंदाची बातमी “| डिसेंबरचा हप्ता कधी मिळणार ? मुख्यमंत्र्यांनी सांगितली तारीख |
पी एम किसान खात्याची ई – केवायसी करावी |
पी एम किसान निधी योजनेअंतर्गत ई – केवायसी करणे अनिवार्य आहे, हि ऑनलाईन आणि ऑफलाइन दोन्ही प्रकारे करता येते. PM kisan Yojana 19th installment date
- ऑनलाइन प्रक्रिया :
या पद्धतीने पी एम किसान योजनेची ई – केवायसी करण्यासाठी पीएम किसान च्या अधिकृत वेबसाईटवर login करा. तुम्हाला तिथे होमपेज वरील फार्मर कॉर्नर विभागात ई- केवायसी चा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करा, तुमचा बारा अंकी नंबर, आधार क्रमांक टाका, आणि शोधा बटनावर क्लिक करा. आधार लिंक केलेल्या मोबाईल नंबर वर मिळालेला ओटीपी इंटर करा. पडताळणी यशस्वी झाल्यास ई – केवायसी प्रक्रिया पूर्ण केली जाईल. - ऑफलाइन प्रक्रिया :
ऑफलाइन नोंदणी करण्यासाठी तुम्हाला जवळच्या कॉमन सर्विस सेंटर ( CSC ) मध्ये जावे लागेल. आधार कार्ड आणि नोंदणी क्रमांक द्या. ई – केवायसी केंद्रावर बायोमेट्रिक द्वारे पूर्ण केली जाईल, पूर्ण प्रक्रिया झाल्यानंतर तुम्हाला एक पावती दिली जाईल.
1 thought on “” आनंदाची बातमी ” पी एम किसान योजनेचा 19 वा हप्ता या तारखेला होणार जमा | Pm Kisan Yojana 19th Installment Date |”