प्रधानमंत्री जण आरोग्य योजना |
Pmjay Scheme 2024
Pradhanmantri Jan arogya Yojana
Pmjay Scheme for government
Ayushman Bharat Yojana
Jan arogya Yojana Maharashtra
नमस्कार, Pmjay Scheme 2024 देशातील आर्थिक दृष्ट्या गरीब जनतेला आरोग्य उपचार मोफत मिळवण्यासाठी केंद्र शासनाकडून आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना राबवली जात आहे. या योजनेअंतर्गत प्रत्येक कुटुंबाला प्रतिवर्षी पाच लाख रुपये पर्यंत मोफत आरोग्य विमा मिळत असतो, ही योजना देशातील गरिब, आर्थिक दृष्ट्या मागास दुर्बल घटकांसाठी आहे.
या योजनेतून लाभार्थ्याला 5 लाख रुपये पर्यंत मोफत उपचार दिले जातात. केंद्र शासनाने 2018 पासून या योजनेला सुरुवात केली आहे. या
योजनेचे उद्दिष्ट बारा कोटीहून अधिक गरिबांना, असुरक्षित कुटुंबांना सुमारे 55 कोटी लोकांना मोफत आरोग्य सुविधा पुरवण आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी कुटुंबातील सदस्य वय किंवा लिंग यावर कोणतीही मर्यादा नाही. या योजनेच्या माध्यमातून संपूर्ण कॅशलेस उपचार मिळतात.
मुलांच्या शिक्षणासाठी मिळणार 51 हजार रुपयांची शिष्यवृत्ती | अर्ज कसा करायचा ? जाणून घ्या संपूर्ण माहिती |
सरकारकडून मिळणार गोल्डन कार्ड |
देशातील कोणतीहि व्यक्ती या योजनेसाठी ऑनलाईन आणि ऑफलाइन अशा पद्धतीने अर्ज करू शकते. आयुष्यमान भारत योजना ही भारत सरकारची आरोग्य योजना आहे. या योजनेअंतर्गत सरकार लोकांना आयुष्मान भारत गोल्डन कार्ड प्रदान करते. या योजनेअंतर्गत आयुष्मान गोल्डन कार्ड वर कोणत्येही नागरिक पाच लाख रुपये पर्यंत मोफत उपचार मिळवू शकतात.
तसेच रुग्णालयात दाखल होण्यापूर्वी तीन दिवस आणि रुग्णांना दाखल झाल्यानंतर पंधरा दिवसाचा खर्चाचा या योजनेत समावेश केला जातो. या योजनेंतर्गत शासनाने निश्चित केलेल्या दवाखान्यात व्यक्ती कोणत्याही आजारावर मोफत उपचार मिळवू शकते. Pmjay Scheme 2024
घरबसल्या 1 मिनिटात डाऊनलोड करा जन्माचा दाखला | Birth Certificate Download In Marathi | डाउनलोड करण्याची संपूर्ण प्रक्रिया |
आयुष्मान कार्ड कसे बनवायचे ?
या योजनेचा लाभ घेण्यासाठी आयुष्मान कार्ड महत्वाचे आहे. त्यासाठी आधार कार्ड ची लिंक करा. आयुष्मान कार्ड बनवण्यासाठी आरोग्य केंद्रावर ‘ सार्वजनिक सेवा केंद्रचा ‘ तिथे अर्ज भरणे. आधार कार्ड आणि पासपोर्ट आकाराच्या फोटोस अपडेट करा. कागदपत्रे तपासल्यानंतर संबंधित अधिकारी तुम्हाला आयुष्मान कार्ड बनवून देतील.
Pmjay Scheme 2024 | असा करा ऑनलाईन अर्ज |
- सर्वात आधी https://mera.pmjay.gov.in/ यादी करून वेबसाईटवर लॉगिन करा.
- त्यानंतर तुमचा मोबाईल क्रमांक आणि स्क्रीनवर दिलेला कॅपच्या कोड टाका.
- तुमच्या रजिस्टर मोबाईल क्रमांकवर ओटीपी येईल, तो स्क्रीनवर दिलेल्या रकान्यांमध्ये भरा.
- आता तुमच्या स्क्रीनवर एक नवीन पेज ओपन होईल.
- तिथे तुम्ही जर राज्यातून अर्ज करत आहात, त्या राज्याचा पर्याय निवडा.
- तुमची पात्रता तपासण्यासाठी मोबाईल क्रमांक, नाव, रेशन कार्ड नंबर टाका.
- जर तुमचं नाव समोर ओपन असेल, तर पेजवर दिसत असेल तर तुम्ही त्या योजनेसाठी पात्र आहात.
- तुम्ही फॅमिली नंबर वर टॅप करून, क्लिक करून योजने संदर्भात तपशील देखील तपासू शकता.
- याशिवाय तुम्ही जवळच्या जनसेवा केंद्राला भेट देऊन तुमची पात्रता तपासू शकता. Pmjay Scheme 2024