Shabari Gharkul Yojana Maharashtra 2024 | Good News | शबरी घरकुल योजना मराठी |अर्ज सुरु |

Shabari Gharkul Yojana Maharshtra 2024 | शबरी घरकुल योजना मराठी |

shabari gharkul yojana maharashtra 2024
gharkul yojana maharashtra
shabari gharkul yojana marathi
maharashtra govt scheme
Mukhyamantri yojana

Shabari Gharkul Yojana Maharshtra 2024 |

नमस्कार मित्रानो, महाराष्ट्र शासना मार्फत राज्यातील दारिद्र्य, मागास व आर्थिकदृष्ट्या मागास घटकांच्या सामाजिक व आर्थिक विकासासाठी विविध योजना राबविल्या जात असतात. या योजनामार्फात राज्यातील जनतेच्य कल्याणाच्या म्हणजेच आरोग्या, शिक्षण, घरकुल व आर्थिक गरजा पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जातो. या योजनामध्ये कुटुंबातील प्रत्येक वयातील व्यक्तींचा समावेश असतो.

महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील अनुसूचित जाती- जमातीच्या लोकांकडे राहण्यासाठी पक्की घरे नसतात. ते लोक मातीच्या व तात्पुरत्या स्वरूपाच्या घरांमध्ये राहत असतात. त्यामुळे त्यांच्याकडे कायमस्वरूपी असा निवारा नसतो. त्यामुळे ते आदिवासी एका ठिकाणी राहून स्थिर जवान जगात नाहीत. त्यामुळे या लोकांच्या अनेक समस्या असतात, त्या म्हणजे शीक्षणिक, आरोग्याच्या व दळण वळणाच्या. या समस्या सोडवणे कठीण जाते.

या सर्व बाबींचा विचार करून या आदिवासी लोकांसाठी शासनाने एक योजना राबविण्याचा निर्णय घेतला. ती योजना म्हणजे ” शबरी घरकुल योजना “ होय. या योजने अंतर्गत अनुसूचित कुटुंबाला 269 चौ.फु. क्षेत्र असलेले पक्के घर बांधून दिले जाते. त्याचप्रमाणे या योजनेतील लाभार्थी कुटुंबाला स्वच्छ भारत मिशन अंतर्गत शौचालय बांधण्यासाठी 12,000/-रुपये आर्थिक सहाय्य म्हणून दिले जातात.

आदिवासी जमातीच्या कुटुंबाना, पारधी समाजाच्या कुटुंबाना, दुर्गम भागातील कुटुंबे, निराधार व विधवा महिला यांना या योजने अंतर्गत विशेष प्राधान्य दिले जाते. तसेच दिव्यांग व्यक्तींना 5% आरक्षणही दिले जाते. या योजनेच लाभ मिळविण्यासाठी अर्जदार व्यक्तीचे वार्षिक उत्पन शहरी भागासाठी 1.20 लाखापेक्षा व ग्रामीण भागासाठी 1 लाखापेक्षा जास्त नसावे.Shabari Gharkul Yojana Maharshtra 2024 |

आदिवासी विकास विभागाद्वारे 2024 साठी शबरी आवास योजने अंतर्गत 18544 घरे देण्याचा प्रयत्न केला आहे. या योजनेतील लाभार्थ्याची निवड हि प्रत्यक्ष तपसणी करूनच केली जाते. घराचे बांधकाम करताना लाभार्थी आपल्या आवडीनुसार आवश्यक ते बदल करू शकतात.

 

Shabari Gharkul Yojana Maharshtra 2024 | वाचकांना नम्र विनंती |

मित्रानो, राज्य शासना मार्फत लोकांच्या कल्याणासाठी चालवल्या जाणाऱ्या विविध योजनांची माहिती आता पर्यंत आपण घेतलीच आहे. त्याचप्रमाणे आज हि आपण शासनाच्या एका नाविन्यपूर्ण योजनेची माहिती घेणार आहोत. ती म्हणजे शबरी घरकुल योजना होय. या योजनेची संपूर्ण माहिती आम्ही या लेखामध्ये दिलेली आहे, त्यामुळे तुम्ही हा लेख शेवटपर्यंत वाचा. तसेच तुम्ह्च्या परिसरात जर कोणी आदिवासी राहत असतील तर त्याहाही या योजनेची माहिती सांगा. त्यासाठी आमचा हा लेख जास्तीत जास्त शेअर करा. हि विनंती.

योजनेची नाव शबरी आदिवासी घरकुल योजना 
योजनेची सुरुवातमहाराष्ट्र राज्य
लाभार्थीआदिवासी जमातीतील कुटुंबे
लाभपक्की घरे बांधण्यासाठी आर्थिक सहाय्य
अर्ज करण्याची पध्दतऑफलाईन

 

शासनाच्या इतर योजना –

                Rajamata Jijavu Cycle Yojana Maharashtra | Good News | राजमाता जीजाऊ मोफत सायकल वाटप योजना मराठी 2024 |

                 Mazi Kanya Bhagyashree Yojana Maharashtra | Good News | माझी कन्या भाग्यश्री योजना मराठी | पहा सर्व माहिती |

                 NEW | Rajiv Gandhi Sanugrah Anudan Yojana Maharashtra | राजीव गांधी विध्यार्थी अपघात विमा योजना 2024 |

habari Gharkul Yojana Maharshtra 2024 | शबरी घरकुल योजनेची उद्दिष्ट्ये |

  • राज्यातील अनुसूचित जाती- जमातीतील लोकांना पक्की घरी उपलब्ध करून देणे हाच या योजनेचा उद्देश आहे.
  • या योजने अंतर्गत माती पासून बनवलेल्या कच्च्या घरांमधून या समाजातील लोकांना पक्क्या घरांमध्ये नेने हाच उद्देश आहे.
  • आदिवासी जाती जमातीतील लोकांचा सामाजिक तसेच आर्थिक विकास करणे हा योजनेचा उद्देश आहे.
  • या योजनेतील लाभांमुळे या लोकांना कायमस्वरूपी चा निवारा उपलब्ध करून दिला जाणार आहे.
  • शबरी घरकुल योजनेअंतर्गत आदिवासी जाती जमातीतील लोकांच्या जीवनाला स्थैर्य प्राप्त करून देणे हा योजनेचा उद्देश आहे.

 

शबरी घरकुल योजनेची वौशिष्ट्ये |

  • महाराष्ट्र राज्यातील आदिवासी जाती- जमाती तसेच पारधी समाजातील लोकांसाठी महाराष्ट्र शासनाने शबरी घरकुल योजनेची सुरुवात केली.
  • शबरी घरकुल योजना राज्यातील आदिवासी समाजातील ज्या लोकांना पक्की घरे नाहीत  व जे मातीच्या झोपड्यांमध्ये राहतात त्यांना पक्की घरी देण्याच्या उद्देशाने करण्यात आले.
  • शबरी घरकुल योजनेची सुरुवात महाराष्ट्र राज्यातील आदिवासी समाजातील लोकांना सशक्त व स्वतंत्र बनवण्यासाठी करण्यात आली.
  • या आदिवासी समाजा तील लोकांसाठी या योजनेअंतर्गत शौचालय बांधण्यासाठी 12,000 हजारांचे आर्थिक साह्य केले जाते.
  • या योजनेअंतर्गत मिळणारी लाभार्थी रक्कम हि  लाभार्थ्याचे थेट बँक खात्यामध्ये डीबीटी मार्फत जमा केली जाते.
  • या योजनेअंतर्गत आदिवासी समाजातील एक लाख 7 हजार 99 कुटुंबांना घरी देण्याचे उद्दिष्ट 2023 24 चा अर्थसंकल्पात राज्य शासनाने ठेवले आहे.
  • या योजनेअंतर्गत अपंग व्यक्तींच्या कुटुंबाला 5% आरक्षण दिले जाईल.
  • या योजनेमुळे ग्रामीण भागातील आदिवासी लोकांचा विकास होण्यास मदत होणार आहे.

Shabari Gharkul Yojana Maharshtra 2024 | या योजने अंतर्गत अनुदानाची रक्कम |

आदिवासी विकास महामंडळा मार्फत राबविण्यात येणाऱ्या शबरी घरकुल योजने अंतर्गत देण्यात येणारी लाभाची रक्कम हि प्रत्येक क्षेत्रनुसार कमी -जास्त प्रमाणात आहे, ती पुढीलप्रमाणे :

ग्रामीण क्षेत्र1.32 लाख रुपये
नक्षलवादी व डोंगराळ क्षेत्र1. 42 लाख रुपये
नगरपरिषद क्षेत्र1. 50 लाख रुपये
नगरपालिका क्षेत्र2 लाख रुपये

 

Shabari Gharkul Yojana Maharshtra 2024 | शबरी घरकुल योजनेचे फायदे |

  1.  महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील आदिवासी जे मातीच्या कच्च्या घरांमध्ये राहतात त्यांना पक्के घरी देण्याचा प्रयत्न या योजनेतून होणार आहे.
  2. शबरी घरकुल योजनेतून या आदिवासींना घरांसाठी दोन लाखापर्यंत आर्थिक सहाय्य दिले जाते.
  3. स्वच्छ भारत मिशन अंतर्गत या आदिवासींना शौचालय बांधण्यासाठी 12,000/- रुपये आर्थिक आर्थिक सहाय्य म्हणून दिले जातात.
  4. या योजनेतील आदिवासी बांधवांसाठी 90 दिवसाचा मनरेगा मार्फत रोजगार उपलब्ध करून दिला जातो.
  5. शबरी घरकुल योजनेमुळे आदिवासी लोकांचे जीवनमान उंचावणार आहे.
  6. या योजनेमुळे आदिवासींची भविष्य उज्वल बनणार आहे.
  7. या योजनेच्या माध्यमातून आदिवासींच्या जीवनाला स्थैर्य प्राप्त होणार आहे.
  8. या योजनेमुळे आदिवासींचा आर्थिक व सामाजिक विकास होणार आहे.
  9. शबरी घरकुल योजनेच्या माध्यमातून ग्रामीण भागाचा विकास होणार आहे.
  10. या योजनेअंतर्गत आदिवासींना आर्थिक सहाय्य लाभल्यामुळे त्यांना पक्के घर बांधण्यासाठी कोणावर पैशासाठी अवलंबून राहावे लागणार नाही तसेच कर्जही घ्यावे लागणार नाही.

Shabari Gharkul Yojana Maharshtra 2024 | शबरी घरकुल योजनेचे नियम व आटी |

  • शबरी घरकुल योजनेसाठी अर्ज करणारा अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा मूळ रहिवासी असावा.
  • राज्याबाहेरील नागरिकांना या योजनेचा लाभ मिळणार नाही.
  • या योजनेसाठी अर्ज करणाऱ्या अर्जदार किमान 15 वर्ष महाराष्ट्रात वास्तव्यास असावा.
  • या योजनेतील अर्जदाराकडे स्वतःकडे किंवा कुटुंबातील इतर व्यक्तीकडे स्वतःचे पक्के घर नसावे.
  • शबरी घरकुल योजनेतील अर्जदाराकडे घर बांधण्यासाठी स्वतःच्या मालकीची किंवा शासनाकडून मिळालेली जमीन असावी.
  • या घरकुल योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराची शहरी भागासाठी 2 लाख व ग्रामीण भागात 1  लाख पेक्षा जास्त वार्षिक उत्पन्न असू नये.
  • शबरी घरकुल योजनेचा लाभ अनुसूचित जाती प्रवर्गातील नागरिकांनाच दिला जाईल.
  • 40% पेक्षा जास्त दिव्यांग असणाऱ्या अनुसूचित जातीतील नागरिकांना या योजनेचा लाभ दिला जाईल.
  • विधवा, अपंग, दारिद्र्य व मागास लोकांना या शबरी घरकुल योजनेत जास्त प्राधान्य दिले जाईल.
  • या योजनेचा लाभ घेणाऱ्या अर्जदारांनी पूर्वी राज्य शासनाच्या व केंद्र शासनाच्या कोणत्याही योजनेचा लाभ घेतलेला नसावा.

 

शबरी घरकुल योजनेसाठी आवश्यक पात्रता |

  1. शबरी घरकुल योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी हा महाराष्ट्र राज्याचा मूळ रहिवासी असावा.
  2. शबरी घरकुल योजनेसाठीचा लाभार्थी हा अनुसूचित जाती प्रवर्गातील असणे आवश्यक आहे.
  3. या योजनेअंतर्गत लाभार्थ्याची निवड 2011 च्या जात सर्वेक्षणातून करण्यात येईल.

Shabari Gharkul Yojana Maharshtra 2024 | आवश्यक कागदपत्रे |

  1.  आधार कार्ड
  2. मतदान ओळखपत्र
  3. रेशन कार्ड
  4. रहिवासी दाखला
  5. जातीचे प्रमाणपत्र
  6. स्वयंघोषपत्र
  7. उत्पन्नाचा दाखला
  8. वयाचा दाखला
  9. सातबारा उतारा
  10. मोबाईल नंबर
  11. ई-मेल आयडी
  12. पासपोर्ट साईज फोटो
  13.  दिव्यांगाचे प्रमाणपत्र

 

Shabari Gharkul Yojana Maharshtra 2024 | या योजने अंतर्गत अर्ज रद्द होण्याची करणे |

  • या योजनेतील लाभार्थी हा जर महाराष्ट्र राज्याचा मूळ रहिवाशी नसेल तर अर्ज रद्द केला जातो.
  • शबरी घरकुल योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्याकडे जात प्रमाणपत्र नसेल तर अर्ज रद्द केला जातो.
  • अर्जदाराचे वार्षिक उत्पन 2 लाखापेक्षा जास्त असेल तर अर्ज रद्द केला जातो.
  • अर्जात लाभार्थ्याने खोटी माहिती भरली असेल तर अर्ज रद्द होवू शकतो.

Shabari Gharkul Yojana Maharshtra 2024 | अर्ज करण्याची पध्दत |

  1. शबरी घरकुल योजनेचा अर्ज ग्रामीण भागात ग्रामपंचायत कार्यालयातून घ्यावा.
  2. किंवा जिल्हा कार्यालयातील आदिवासी विकास प्रकल्प विभागातून घ्यावा.
  3. नंतर अर्जात सर्व माहिती भरावी.
  4. अर्जासोबत आवश्यक कागदपत्रांच्या सत्यप्रत जोडाव्यात.
  5. नंतर तो अर्ज कार्यालयात जमा करावा व अर्ज ची पोचपावती घावी.

 

Shabari Gharkul Yojana Online Application |

मित्रानो शबरी घरकुल योजनेचे ऑनलाईन नोंदणी पोर्टल अद्याप सुरु झालेले नाही. त्यामुळे तुम्ही या योजनेसाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करू शकता.

शबरी घरकुल योजना अर्ज Click Here

शबरी घरकुल योजना PDF click here

 

 

 

 

 

 

 

 

 

 

2 thoughts on “Shabari Gharkul Yojana Maharashtra 2024 | Good News | शबरी घरकुल योजना मराठी |अर्ज सुरु |”

Leave a Comment