Mukhyamntri Baliraja Mofat Vij Yojana 2024 | बळीराजा मोफत वीज योजना |
Mukhyamntri Baliraja Mofat Vij Yojana 2024 |
नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्रत महायुती सरकार निवडून आल्यानंतर त्यांनी आपला पहिला अंतरिम अर्थसंकल्प सदर केला.त्यामध्ये त्यांनी समाजातील विविध घटकांसाठी वेगवेगळ्या योजनांची घोषणा केली. त्यामध्ये प्रमुख्याने लाडकी बहिण योजना, लाडका भाऊ योजना तसेच अन्नपूर्णा योजना होय. राज्यातील तरुणांना आर्थिक सहाय्य देण्यासाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना होय.
त्याच बरोबर उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनीं शेतकऱ्यांसाठी एका मह्त्वपूर्ण योजनेची घोषणा केली ती म्हणजे ” मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना “ होय. या योजनेच्या माध्यमातून राज्यातील शेतकर्यांना मोफत वीज दिली जाणार आहे.
राज्यातील विशेषतः उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील शेतकरी वर्ग हा महायुती सरकार बाबत नाराजी दर्शवितो. असे राजकीय अभ्यासकाने म्हटले आहे. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांसाठी अर्थमंत्री अजित पवार यांनी मोफत वीज योजनेची घोषणा केली. cm free elecricity scheme
बळीराजा मोफत वीज योजना नेमकी काय आहे ? कोणत्या शेतकऱ्यांना वीज मोफत मिळणार आहे? या योजनेचा कालावधी किती असणार आहे ? राज्यातील किती शेतकऱ्यांना याचा फायदा होणार ? या सर्व प्रश्नांची उत्तरे आजच्या या लेखात आपाण जाणून घेणार आहोत. त्यासाठी तुम्ही हा लेख शेवटपर्यंत वाचा. तसेच तुमच्या परिसरातील शेतकऱ्यांपर्यंत जास्तीत – जास्त शेअर करा. त्यामुळे त्यांनाही योजनेच्या लाभ घेता येईल.
Mukhyamntri Baliraja Mofat Vij Yojana 2024 | बळीराजा मोफत वीज योजना नेमकी की आहे ?
राज्याचा अर्थसंकल्प अर्थमंत्री अजित पवार यांनी सादर केला. त्यामध्ये त्यांनी शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री बळीराजा मोफत योजना 2024 ची घोषणा केली होती.
ही घोषणा करताना त्यांनी म्हटले आहे की, आपल्या देशातील शेती प्रामुख्याने पावसावर अवलंबून आहे. या सर्वच गोष्टीची आपणाला जाणीव आहे. मात्र गेल्या काही वर्षात झालेल्या वातावरणीय बदलामुळे, मोसमी हवामानातील बदल झाल्याने शेती क्षेत्रावर मोठ्या प्रमाणावर परिणाम झालेला आहे.
त्यांनी पुढे म्हटले आहे की, राज्यातील शेतकरी बांधवांना मदतीची गरज आहे. त्यांना दिलासा देण्यासाठी मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यावर असणाऱ्या अतिरिक्त वीज बिलाचा भर उचलनु राज्यातील 44 लाख 3 हजार शेतकऱ्यांच्या 7.5 अश्वशक्ती क्षमतेपर्यंत शेती पंपांना पूर्णता मोफत वीज पुरवली जाईल. त्यासाठी 14 हजार 760 कोटी रुपये अनुदान स्वरूपात उपलब्ध करून दिले जातील.
महाराष्ट्रातील संपूर्ण राज्यात कृषी वाहिनीवरील शेतकऱ्यांच्या कृषी कंपन्या रात्रीचे वेळ 8 ते 10 तास किंवा दिवस थ्री फेज उपलब्धता चक्रधर पद्धतीने देण्यात येते.
शासनाच्या इतर योजना –
बियाणे अनुदान योजना महाराष्ट्र | MAHA DBT Biyane Anudan Yojana 2024 | 100 % अनुदान मिळणार असा करा ऑनलाईन अर्ज |
Online Ration Card | घरबसल्या काढा तुमचे नवीन रेशन कार्ड | आवश्यक कागदपत्रे, पात्रता व आटी | पहा सविस्तर माहिती |
Union Budget 2024-25 | केंद्रीय अर्थसंकल्पात महिलांसाठी तरतूद | नवीन होस्टेल, 3 कोटीच्या योजना आणि बरेच काही …..|
मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना | mukhyamntri ladki bahin yojana | या दिवशी फिक्स 3000 रु बँक खात्यात जमा होणार |
बळीराजा मोफत वीज योजना राज्यात कधीपासून लागू होईल ?
बळीराजा मोफत वीज योजनेचा शासन निर्णय अर्थसंकल्पामध्ये झाला होता. मात्र योजनेच्या अंमलबजावणी एप्रिल 2024 पासून केली जाणार आहे. त्यामुळे मागच्या तीन महिन्याचे वीज बिल राज्यातील पात्र शेतकऱ्यांना भरावे लागणार नाही.
मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजनेची घोषणा पुढील पाच वर्षासाठी घोषणा करण्यात आली आहे. एप्रिल 2024 ते मार्च 2019 पर्यंत मोफत योजना सुरू असणार आहे. baliraja mofat vij yojana marathi
प्रत्यक्षात राज्यात ही योजना सुरू झाल्यानंतर तीन वर्षांनी या योजनेचा कालावधी वाढवण्याबाबतचा विचार होणार आहे. त्यासाठी आढावा घेतला जाणार आहे.
बाळीराजा मोफत वीज योजनेसाठी पात्रता |
महाराष्ट्र राज्यातील 7.5 एच पी पर्यंत शेतीपंपाचा मंजूर भार असलेले सर्व शेती पंप ग्राहक या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र असतील.
baliraja free electricity scheme | या योजनेचे नियम व आटी |
- baliraja मोफत वीज योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी हा महाराष्ट्र राज्याचा मूळ रहिवासी असायला पाहिजे.
- महाराष्ट्र राज्य बाहेरील लाभार्थ्याला या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
- या योजनेअंतर्गत थकीत वीज बिल माफ केले जाणार नाही.
- इथून पुढचे वीज बिल मोफत असेल.
- मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजनेअंतर्गत ७.५ विद्युत क्षमतेपर्यंतच्या शेतीपंपांना मोफत वीज दिली जाणार आहे.
- या योजनेअंतर्गत 7.5 एचपी मोटर पेक्षा मोठ्या म्हणजे १० एचपी ची मोटर असणाऱ्या लाभ दिला जाणार नाही.
बळीराजा मोफत वीज योजनेचा शासन निर्णय ( GR ) पाहण्यासाठी click here
Mukhyamntri Baliraja Mofat Vij Yojana 2024 | अर्ज करण्याची पद्धत |
- बळीराजा मोफत वीज योजनेचा लाभ घेण्याकरता लाभार्थी व्यक्तींना अर्ज करण्याची गरज पडणार नाही.
- कृषी पंपाची वीज जोडणी घेताना ती जी जोडणी कृषी पंपाची आहे, याची माहिती विद्युत विभागाकडे नमूद असते.
- त्यामुळे कोणती वीज जोडणी कोणत्या पंपाची आहे व किती एचपी आहे याची माहिती शासनाकडे अगोदरच उपलब्ध असते
- यामुळे शेतकऱ्यांना स्वतः अर्ज करण्याची गरज पडणार नाही.
- 7.5 कृषी पंप त्यांच्याकडे अगोदरच उपलब्ध आहे, त्या माहितीनुसार मोफत विज दिली जाणार आहे.