कृषी विभागाअंतर्गत कांदा चाळ अनुदान आणि ट्रॅक्टर अनुदान योजनेमध्ये दुप्पट वाढ करण्यात आली | Kanda Chal Subsidy Scheme 2025 | वाचा सविस्तर |

                            कृषी विभाग अनुदान योजना |

Kanda chal subsidy scheme 2025
Krushi vibhag scheme
Tractor anudan Yojana
Kanda chal anudan Yojana
Kanda chal and tractor anudan Yojana

Kanda chal subsidy scheme 2025
Krushi vibhag scheme
Tractor anudan Yojana
Kanda chal anudan Yojana
Kanda chal and tractor anudan Yojana

नमस्कार, महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाअंतर्गत कांदा चाळ अनुदान योजना, त्याचबरोबर ट्रॅक्टर अनुदान योजना राबविल्या जातात. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना त्यांच्या गरजेनुसार कांदाचाळ उभारणीसाठी अनुदान दिले जाते.
एकात्मिक फलोत्पादन विकास अंतर्गत सध्या या योजनेत कांदा चाळ योजनेसाठीची मर्यादा ही वाढवण्यात आली आहे. या अनुदानामध्ये दहा वर्षानंतर बदल करण्यात आले आहेत. कृषी विभागाच्या राज्य फलोत्पादन आणि औषधी मंडळाने एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानाच्या नव्या मार्गदर्शक सूचना प्रसिद्ध केलेल्या आहेत.

कृषी विभागाच्या एकात्मिक फलोत्पादन विकास योजनेअंतर्गत अनेक योजनांसाठी लाभ दिला जातो. या योजनेसाठी अनुदान दिले जाते. मागील पाच वर्षापासून या योजनेचा लाभ घेण्यासाठी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करावा लागतो. या एकाच पोर्टलवर अनेक योजनांचा लाभ दिला जातो.

सध्या वाढत्या महागाईमुळे अनेक साहित्याचे दर वाढल्यामुळे या अनुदान मध्ये वाढ करण्याची मागणी करण्यात येत होती. त्याचा अनुषंगाने कांद्याचा व ट्रॅक्टर अनुदान योजनेमध्ये वाढ करण्यात आलेली आहे. त्याबद्दलची सविस्तर माहिती आपण या लेखात पाहणार आहोत. त्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचा. Kanda chal subsidy scheme 2025

लाडकी बहीण योजनेअंतर्गत मिळणार 3 हजार रुपये | ‘ याच ‘ महिलांना मिळणार लाभ | पहा यादी |

कांदा चाळ उभारणीसाठी अनुदान वाढ |

कांदा हा महाराष्ट्रातील अत्यंत महत्त्वाचे नगदी पीक असून साठवणूकी अभावी दरवर्ष हजारो टन कांदा वाया जातो. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागते. यावर उपाय म्हणून कांद्याचा उभारणीसाठी मिळणाऱ्या अनुदानात मोठी वाढ करण्यात आली आहे. यापूर्वी 25 टनापर्यंत कांदा साठवणुकीसाठी प्रति टन 7000 रुपयांचा खर्च गृहीत धरून प्रति टन 3500 हजार रुपयांच्या अनुदान मिळत होते.

मात्र आता या अनुदानात वाढ करण्यात आलेली आहे. आता हेच अनुदान प्रति टन पाच हजार रुपये करण्यात आले आहे. याशिवाय कांदाचा उभारणीचे मर्यादा 25 टनावरून पाचशे टनापर्यंत वाढवण्यात आली आहे.

25 ते 500 टन साठवणुकीसाठी 8 हजार रुपये प्रति टन खर्च गृहीतून 4 हजार रुपये प्रति टन अनुदान दिले जाणार आहे. विशेष म्हणजे आता क्षमतेच्या कांदा चाळीसाठी शेतकरी पात्र ठरणार आहेत.
यामध्ये 6 हजार रुपये प्रति टन खर्च गृहीत 3 हजार रुपये प्रति टन अनुदान दिले जाणार आहे. या नव्याने दिलेल्या अनुदानामुळे मोठ्या प्रमाणावर कांदा उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी कांदा साठवणीसाठी आधार मिळणार आहे. Kanda chal subsidy scheme 2025

फक्त ‘ याच ‘ बांधकाम कामगारांना मिळणार 12000 रुपये निवृत्ती वेतन | वाचा सविस्तर |

ट्रॅक्टर आणि पावर टिलर च्या अनुदानात वाढ |

महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाअंतर्गत कांदा चाळ अनुदान योजनेबरोबरच ट्रॅक्टर आणि पावर टिलर च्या अनुदानात वाढ करण्यात आली आहे. शेतकऱ्यांच्या यांत्रीकरणाला चालना देण्यासाठी हा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे. अनुसूचित जाती, जमाती आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी 20 BHP क्षमतेच्या ट्रॅक्टर साठीचे अनुदान 1 लाखावरून थेट 2 लाख रुपये पर्यंत वाढवण्यात आले आहे.

तर अन्य सर्वसामान्य शेतकऱ्यांसाठी हीच अनुदान 75 हजार रुपयांवरून 1 लाख 60 हजार रुपये इतकी करण्यात आले आहे. पावर टिलर साठी देखील अनुसूचित जाती, जमाती व अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी 75 हजार आणि 1 लाख रुपये अनुदान करण्यात आले, असून इतर शेतकऱ्यांसाठी ते 65 हजार रुपये वरून 80 हजार रुपये इतकी करण्यात आले आहे. Kanda chal subsidy scheme 2025

अर्ज करण्याची सुलभ प्रक्रिया |

या सर्व योजनाचा लाभ हा महाडीबीटी पोर्टलवरून एकाच अर्ज द्वारे मिळवता येतात. त्यामुळे प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि सुलभ झालेली आहे. अलीकडच्या काळात साहित्य आणि यंत्रसामुग्रीच्या दरात मोठी वाढ झाल्याने शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक परिस्थितीचा सामना करावा लागतो. त्यासाठी ही अनुदान वाढ झालेली आहे. शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. विशेषता कांदा उत्पादनात आघाडीवर असलेल्या शेतकऱ्यांना याचा थेट लाभ होणार आहे.

त्याचबरोबर कृषी विभागाचा अनुदान वाढीचा हा निर्णय शेतकऱ्यांच्या अर्थकारणाला बळकटी देणारा ठरणार असून, साठवणूक – सुविधा आणि यांत्रिकरण यामुळे उत्पादन वाढण्या सोबतच बाजाराच्या मागणीनुसार मालाची विक्री करून जास्त नफा मिळवण्याची संधी वाढणार आहे. शासनाच्या या पुढाकार आणि शेतकऱ्यांच्या अडचणी काही प्रमाणात कमी होतील आणि शेती अधिक शाश्वत आणि फायदेशीर होईल.

 खुशखबर ! ” या ” तारखेला लाडक्या बहिणीच्या खात्यात एप्रिलचा हप्ता जमा होणार 1500 हजार रुपये |

Leave a Comment