दूध उत्पादकांसाठी आनंदाची बातमी |
Cow milk rate news
Milk rate Maharashtra
Sonai milk rate
Cow milk rate update
Amul milk rate news
नमस्कार, Cow milk rate news राज्यातील दूध उत्पादक गेल्या काही महिन्यांपासून सुरु असलेल्या दुध दर घसरणीमुळे हैराण झालेले होते, या परस्थितीमुळे दुग्ध व्यवसायाकडे लोकांनी पाठ फिरवल्याचे चित्र पाहायला मिळत होते. सातत्याने होणारी दुध दरातील घसरण आणि जनावरांच्या चारापाण्याचा खर्च, याचा ताळमेळ शेतकऱ्याला बसवता येत नव्हता.
याच दुध उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आलेली आहे. दुध खरेदी दारात वाढ झालेली आहे. ही वाढ 26 फेब्रुवारीपासून करण्याचा निर्णय घेण्यात आलेला असल्याने, दुध उत्पादकांना मोठा दिलासा मिळालेला आहे.
गाईच्या दुधात 26 फेब्रुवारीपासून एक रुपयांची वाढ करण्याचे निर्णय घेण्यात आलेला आहे. हा निर्णय सोनाई सह राज्यातील संघाने घेतलेले तर आता शेतकऱ्यांना प्रति लिटर 33 रुपये तर दूध संघाने देण्याचे ठरवलेली आहे.
लाडक्या बहिणीसाठी आणखी एक गिफ्ट | होळीनिमित्त महिलांना रेशन दुकानातून मिळणार साडी भेट |
दोन महिन्यात पाच वेळा दरवाढ |
डिसेंबर 2024 या महिन्यापासून आत्तापर्यंत दूध खरेदी दरत पाच वेळा दरवाढ करण्यात आलेली आहे. फेब्रुवारी महिन्यातील हि दुसरी दर वाढ असणार आहे. जागतिक बाजारात बटर आणि दूध पावडरच्या किमती कमी झाल्यामुळे मागील काही काळात दूध खरेदी घरात मोठी घसरण झालेले होती. त्यामुळे उत्पादक शेतकऱ्यांमध्ये नाराजी निर्माण झाली होती, त्यानंतर मग राज्य शासना कडून उत्पादक शेतकऱ्यांसाठी प्रति लिटर पाच रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आलेला होता.
विधानसभा निवडणूक झाल्यानंतर अनुदान बंद झाले, मग त्यानंतर दूध खरेदी दारात हळूहळू वाढ करण्यास सुरुवात झाली, ज्यावेळेस इंदापूरच्या सोनाई दूध संघाने एक – एक रुपयाची वाढ केल्यानंतर. राज्यातली इतर हि संघाने दुध दारात वाढ करायला सुरुवात केलेली आहे. Cow milk rate news
स्वतःच घर बांधायचं आहे ? मग जाणून घ्या, घरकुल योजनेसाठी अर्ज कसा करायचा ? पात्रता काय ? कागदपत्रे कोण – कोणती असणार आहेत ? संपूर्ण माहिती |
फेब्रुवारी नंतर खरेदी दरात वाढ शक्य |
फेब्रुवारी महिन्यात दुधाबरोबर पावडर व बटरची मागणी वाढते, याचा अंदाज घेऊन दूध खरेदी दारात वाढ होते. मागील वर्षापासून गाय दूध उत्पादक आणि संघ यांच्यात मोठा संघर्ष सुरू आहे, येत्या महिन्याभरात वाढ अपेक्षित आहे. Cow milk rate news
शासनाने 1 डिसेंबर पासून अनुदान बंद केल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होऊ लागले आहे. दूध दरात वाढ करावयाच्या मागणी दूध उत्पादक शेतकऱ्याकडून होत आहे. यात गेल्या महिन्याभरा पासून देशांतर्गत बाजारपेठेत दूध पावडरच्या दरात थोडीशी वाढ झाली आहे, त्यामुळे संघाने खरेदी दरात वाढ करण्याचा निर्णय घेतलेला आहे.
सध्याचे दर आणि पुढील अंदाज |
नोव्हेंबर महिन्यात दुध खरेदी दर प्रती लिटर 28 रुपये होता, 11 फेब्रुवारीपासून दुध दर वाढवण्यात आलेला आहे. मात्र मागील वर्षी उन्हाळ्यात दूध खरेदी तर अचानक कमी करण्यात आला होता. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठे नुकसान सहन करावे लागले. त्यावेळी दुध संघाने सरकारकडे बोट दाखवत, अनुदान मागितले होते, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकारने अनुदान दिले होते. मात्र यंदा उन्हाळ्यात दूध खरेदी दर चार महिने स्थिर राहील, अशी शक्यता वर्तवली जात आहे.