Good News | शेळी मेंढी पालन योजना 2024 | Sheli Mendhi Palan Yojana Maharashtra | मराठीमध्ये संपूर्ण माहिती |

Table of Contents

Sheli Mendhi Palan Yojana Maharashtra | शेळी मेंढी पालन योजना 2024 |

Sheli Mendhi Palan Yojana Maharashtra
panchayt samiti sheli  palan yojana 2024
sheli mendhi palan yojana marathi
raje yashvant holkar mahamesh yojana
maha shasan yojana

Sheli Mendhi Palan Yojana Maharashtra |

नमस्कार मित्रांनो,  देशातील नागरिकांचा आरोग्यपूर्ण आणि आर्थिक व सामाजिक दृष्ट्या विकास पूर्ण जीवन जगण्यासाठी देशाच्या राष्ट्रीय व राज्य शासनाकडून जनतेच्या कल्याणासाठी वेगवेगळे योजना राबवल्या जातात. या योजना समाजातील प्रत्येक घटकाला अनुसरून निश्चित केल्या जातात. त्यामध्ये ग्रामीण भागातील शेतकार्य पासून ते शहरातील मजुरांपर्यंत सर्वांचा समावेश केलेला असतो.
या योजनांसाठी शासनामार्फत निधी पुरविला जातो. तसेच वेगवेगळ्या स्तरावर निधीचे वितरण करून शेतकरी, बांधकाम कामगार, घर कामगार, महिला, मुली, विधवा व जेष्ठ नागरिक, लहान बालके तसेच अनुसूचित जाती – जमाती, मागास प्रवर्ग आणि आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक सर्वांचा समावेश वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून केला जातो. त्यामुळे त्यांचा विकास होण्यासाठी हातभार लावला जातो.
आपला भारत देश हा कृषीप्रधान देश आहे. आपल्या देशातील 70 टक्के जनता ही कृषी व्यवसाय/ शेती व्यवसाय करताना दिसून येते. तसेच हे लोक पारंपरिक पद्धतीने शेती करत असल्याने, त्यांची शेती अधिक समृद्ध नसते. म्हणून देशातील शेतीला आधारित जोडधंदा करण्यावर भर देतात.
या जोडधंदातून त्यांना अतिरिक्त उत्पन्न मिळते व त्यातून त्यांना आर्थिक लाभ होतो. शासनामार्फत शेतकऱ्यांचा आर्थिक व सामाजिक विकास व्हावा म्हणून एका नाविन्यपूर्ण योजनेची सुरुवात करण्यात येत आहे. ती योजना म्हणजे ” शेळी मेंढी पालन योजना “ होय.
शेळी ही गरिबांची गाय समजली जाते. शेळीपालन योजनेतून शेतकऱ्यांना आर्थिक लाभ होतो. तसेच कमी कालावधीमध्ये अधिक उत्पन्न प्राप्त होते, तसेच मेंढी पालन हा तर महाराष्ट्र धनगर समाजा, या लोकांचा पारंपारिक व्यवसाय आहे. हा व्यवसाय ते आपला आवडीने जोपासत असतात.
शेळी मेंढी पालन करण्यासाठी अधिक भांडवलाची गरज लागत नाहि. तसेच शेळ्या रानातील पालापाचोळा व झाडे- झुडपे खाऊन जगतात. तर मेंढपाळ हे गावोगावी फिरून डोंगराळ भागात आपल्या मेंढ्या चरायला नेतात व त्यांना जगवतात.
शेली मेंढी पालन हा व्यवसाय टिकून ठेवण्यासाठी व शेतकऱ्यांचा विकास करण्यासाठी शासनामार्फत या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य दिले जाते.
शेळी व मेंढी पालन योजनेच्या माध्यमातून राज्यातील शेतकरी, शेळी मेंढी पालक व पशुपालक यांना अनुदान देऊन, त्यांच्या आर्थिक विकास करून रोजगाराच्या संधी निर्माण करणे, हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.
या योजनेअंतर्गत उस्मानाबादी अथवा संगमनेरी किंवा स्थानिक वातावरणात तग धरून राहतील अशा प्रजननक्षम पैदासक्षम 10 शेळ्या व 1 बोकड आणि  मडग्याळ प्रजातीच्या किंवा दख्खनी किंवा अन्य स्थानिक वातावरणात तग धरून राहणाऱ्या पैदासक्षम 10 मेंढ्या व 1 नरमेंढा असे गट वाटप करण्यात येतात.

Sheli Mendhi Palan Yojana Maharashtra | वाचकांना नम्र विनंती |

मित्रांनो, केंद्र व राज्य शासनामार्फत देशात राबवल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या योजनांची माहिती आपण आपल्या लेखांच्या माध्यमातून घेतच असतो. त्या योजना या कधी शेतकऱ्यांसाठी राबवल्या जातात, कधी कामगारांसाठी. तर कधी आर्थिक दृष्ट्या मागास प्रवर्गासाठी असतात. या योजनांच्या माध्यमातून त्यांचा विकास करणे, हेच उद्दिष्ट असते. त्याचप्रमाणे आज आपण शेळी मेंढी पालन योजनेची माहिती पाहणार आहोत.
त्यासाठी तुम्ही हा लेख शेवटपर्यंत वाचा. तसेच तुमच्या परिसरात जे कोणी शेतकरी, शेळी मेंढी पालक व  पशुपालक राहत असतील. त्यांना या योजनेची माहिती सांगा. त्यामुळे त्यांनाही या योजनेचा लाभ घेता येईल. त्यासाठी आमचा हा लेख जास्तीत जास्त शेतकर्यान पर्यंत शेअर करा, ही विनंती.

योजनेचे नाव शेळी मेंढी पालन योजना 
योजनेचे लाभार्थीराज्यातील शेतकरी, पशुपालक व इतर नागरिक
लाभशेळी व मेंढीचे गट वाटप करणे
उद्देशशेळी मेंढी पालनासाठी प्रोत्साहन देणे
अर्ज करण्याची पद्धतऑनलाईन / ऑफलाईन

हे देखील वाचा –

Good News | थेट कर्ज योजना महाराष्ट्र 2024 | Thet Karj Yojana Marathi | संपूर्ण माहिती |

Good News | वीरभद्रकाली ताराराणी महिला स्वयंसिद्धी योजना महाराष्ट्र | Mahila Swayam Siddhi Yojana 2024 |

Good News | डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजना | Dr. Babasaheb Ambedkar Krushi Swavalamban Yojana 2024 |

कृषी संजीवनी हॉरटीकल्चर योजना |New | Krushi Sanjivani Horticulture yojana maharashra 2024 | दिव्यांग शेतकऱ्यांसाठी अल्प दरात कर्ज उपलब्ध |

शेळी मेंढी पालन योजना 2024 ची उद्दिष्ट्ये |

  • राज्यातील शेतकऱ्यांच्या शेळी मेंढी पालन व्यवसायाला चालना मिळावी, या उद्देशाने या योजनेची सुरुवात करण्यात आली.
  • राज्यातील लोकांना शेळी पालन करण्यासाठी प्रोत्साहित करण्याच्या उद्देशाने, या योजनेची सुरुवात करण्यात आली.
  • शेळी पालन योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आर्थिक हातभार लावणे.
  • शेळी मेंढी पालन योजनेतून रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध करणे.
  • शेळी मेंढी पालनासाठी अनुदान देऊन राज्यातील बेकारीचे प्रमाण कमी होईल.
  • शेळी मेंढी पालनामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न वाढवून त्यांच्या जीवनमानाचा दर्जा उंचावणे.
  • या योजनेतील आर्थिक सहाय्यामुळे शेतकऱ्यांचा सामाजिक व आर्थिक विकास होईल.
  • शेतकरी करीत असलेल्या शेळी मेंढी पालन या जोडधंद्याला बळकटी देणे, हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.
  • या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी बनवणे.

शेळी मेंढी पालन योजना 2024 ची वैशिष्ट्ये |

  • राज्यातील शेतकऱ्यांच्या जोडधंद्याला आर्थिक सहाय्य देण्यासाठी महाराष्ट्र शासनामार्फत या योजनेची सुरुवात करण्यात आली.
  • राज्यातील शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारण्यासाठी एक अत्यंत महत्त्वपूर्ण योजना आहे.
  • राज्यात कमी होत चाललेल्या शेळ्या मेंढ्यांचे प्रमाण वाढीसाठी या योजनेच्या माध्यमातून चालना मिळेल.
  • या योजनेमुळे राज्यातील शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ झाल्याने त्यांचा विकास होईल.
  • योजनेतील आर्थिक सहाय्यामुळे शेतकऱ्यांच्या विकास होऊन त्यांचे जीवनमान उंचावणे
  • पारंपरिक पद्धतीने चालत आलेला हा व्यवसाय कायमस्वरूपी सुरू ठेवण्यासाठी सहाय्य करणे, हे या योजनेचे मुख्य वैशिष्ट्य आहे.
  • या योजनेची अर्ज प्रक्रिया अत्यंत सोपी ठेवण्यात आली आहे, त्यामुळे नागरिकांच्या वेळ व पैशाची बचत होईल.

शेळी मेंढी पालन योजनेचे स्वरूप |

  • महाराष्ट्र शासनाकडून शेळी मेंढी पालन योजनेअंतर्गत लाभार्थ्याला उस्मानाबादी अथवा संगमनेरी किंवा स्थानिक वातावरणात तग धरून राहणाऱ्या पैदासक्षम अशा 10 शेळ्या व 1 बोकड तसेच मडग्याळ प्रजातीच्या किंवा दख्खानी प्रजातीच्या अथवा स्थानिक वातावरणात तग धरून राहणाऱ्या पैदासक्षम अशा 10 मेंढ्या व 1 नरमेंढा असे गट देण्यात येतात.
  • या योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या शेळ्या मेंढ्यांची निवड करण्याचा पूर्ण अधिकार हा लाभार्थी व्यक्ती दिलेला आहे.
  • या योजनेतील खुला व इतर मागास प्रवर्गातील लाभार्थ्यांना 50 टक्के अनुदान देण्यात येईल, उर्वरित रक्कम लाभार्थ्यांनी स्वतः किंवा बँकेकडून उपलब्ध करावयाचे आहे.
  • तसेच अनुसूचित जाती – जमाती साठी या योजनेअंतर्गत 75 टक्के अनुदान दिले जाते व उरलेली उर्वरित 25% रक्कम लाभार्थ्याने स्वतः किंवा कोणत्याही बँकेकडून उपलब्ध करावे याचे आहे.
  • तसेच बँकेकडून या योजने साठी कर्ज घेतल्यास 5 टक्के रक्कम ही लाभार्थ्यांनी स्वतःकडे भरावयाची आहे.
  • या योजनेतील शेळ्या-मेंढ्यांच्या वाहतुकीचा खर्च स्वतः लाभार्थीला करावयाचा आहे, त्यासाठी शासनाकडून कोणतीही अनुदान मिळणार नाही.
  • या योजनेअंतर्गत शेळ्या ठेवण्याचे शेड तसेच त्यांचा औषध उपचार या सर्वांच्या खर्चासाठी कोणतेही अनुदान दिले जात नाही.

Sheli Mendhi Palan Yojana Maharashtra | या योजनेंतर्गत लाभार्थी निवडीचा प्राधान्यक्रम |

  1. दारिद्र्य रेषेखालील लाभार्थी
  2. इतर मागास प्रवर्ग
  3. अनुसूचित जाती – जमातीतील लाभार्थी
  4. अल्प व अत्यल्प भूधारक
  5. अल्पभूधारक
  6. बेरोजगार तरुण ज्यांनी स्वयंरोजगार केंद्रात नाव नोंदणी केली आहे
  7.  महिला बचत गटातील लाभार्थी

Sheli Mendhi Palan Yojana Maharashtra | शेळी मेंढी गट खरेदी करण्याची समिती पुढीलप्रमाणे |

  • पशुधन विकास अधिकारी
  • पशुधन विकास अधिकारी ( पशुवैद्यकीय दवाखाना )
  • विमा कंपनीचे प्रतिनिधी
  • राष्ट्रीयकृत बँकेचे प्रतिनिधी
  •  स्वतः लाभार्थी

शेळी मेंढी पालन योजना 2024 या योजनेचे लाभार्थी |

महाराष्ट्र राज्यातील सर्व शेतकरी, पशुपालक, शेळी पालक व मेंढपाळ तसेच इतर सर्व नागरिक या योजनेसाठी लाभार्थी आहेत.

शेळी मेंढी पालन योजना 2024 या योजनेचे फायदे |

  • शेळी मेंढी पालन योजनेच्या माध्यमातून राज्यातील पशुपालकांच्या जीवनमानाचा दर्जा उंचावणे.
  • या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा सामाजिक व आर्थिक विकास साध्य करणे शक्य होईल.
  • राज्यातील शेतकरी करीत असलेल्या जोडधंद्यास बळकटी देणे.
  • शेळी पालन योजनेतून शेतकऱ्यांच्या आर्थिक उत्पन्नात वाढ करणे.
  • या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या सुखी व समृद्ध जीवनाचा मार्ग खुला करणे.
  • शेळी मेंढी पालन योजनेतून शेतकऱ्याना स्वावलंबी बनविणे.
  • शेळी पालन योजनेतून राज्यात नवीन रोजगाराच्या संधी निर्माण करणे.
  • या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य दिल्याने त्यांना कोणाकडूनही कर्ज घ्यावे लागणार नाही.

Sheli Mendhi Palan Yojana Maharashtra | या योजनेसाठी आवश्यक पात्रता |

महाराष्ट्र शासनामार्फत राज्यात राबविण्यात येणाऱ्या शेळी मेंढी पालन योजनेचा अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा मूळ रहिवासी असावा.

Sheli Mendhi Palan Yojana Maharashtra | शेळी मेंढी पालन योजनेसाठी आवश्यक नियम व आटी |

  • शेळी मेंढी पालन योजनेचा लाभ महाराष्ट्र राज्यातील मूळ रहिवाशांना दिला जाईल.
  • राज्य बाहेरील नागरिकांना शेळी मेंढी पालन योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
  • शेळी मेंढी पालन योजनेच्या अर्जदाराचे वय 18 वर्षे पूर्ण असावे.
  • अर्जदार अनुसूचित जाती – जमातीचा असल्यास त्यांनी तहसीलदारचा जात प्रमाणपत्राचा दाखला जोडणे आवश्यक आहे.
  • शेळी मेंढी पालन योजनेच्या अर्जदाराकडे स्वतःची शेतजमीन असावी, त्याचा 7/12 व 8 अ अर्जासोबत जोडणे गरजेचे आहे.
  • तसेच अर्जदाराने स्वखर्चाने शेळी ठेवण्यासाठी शेड बांधलेले असणे गरजेचे आहे.
  • यापूर्वी केंद्र व राज्य शासनाच्या कोणत्या योजनेअंतर्गत अर्जदाराने शेळी किंवा मेंढी योजनेचा लाभ घेतलेला नसावा.
  • तसेच या योजनेच्या अर्जदाराकडे शेळी मेंढी पालनाचा अनुभव असावा.
  • या योजनेचा अर्जदार किंवा त्याच्या कुटुंबातील कोणतीही व्यक्ती शासकीय नोकरीत कार्यरत नसावी.
  • या योजनेचा लाभार्थी अर्जदार याने शेळी मेंढीच्या वाहतुकीचा सर्व खर्च स्वतः करण्यास पात्र असावा.
  • शेळी मेंढी पालन योजनेचा अर्ज एका कुटुंबातील एकाच व्यक्तीस दिला जातो.

शेळी मेंढी पालन योजना 2024 साठी आवश्यक कागदपत्रे |

  • अर्जदाराचे रेशन कार्ड झेरॉक्स
  • तहसीलदार उत्पन्नाचा दाखला
  • अनुसूचित जाती जमातीचा असल्यास जात प्रमाणपत्र
  • शेळी पालन प्रशिक्षण घेतल्याचे प्रमाणपत्र
  • ज्या बँकेतून कर्ज घेणार आहोत त्या बँकेचे हमीपत्र
  • आधार कार्ड
  • आधार संलग्न बँक पासबुक
  • मतदान ओळखपत्र
  • बचत गटाच्या सदस्य असल्यास चे प्रमाणपत्र
  • स्वतःची शेतजमीन असल्याचा 7/12 व 8 अ उतारा
  • मोबाईल नंबर
  • ईमेल आयडी
  • पासपोर्ट साईझ फोटो
  • शपथपत्र
  • लाभार्थ्याचे पॅन कार्ड

शेळी मेंढी पालन योजना 2024 अंतर्गत अर्ज रद्द होण्याची कारणे |

  • राज्यातील शेळी मेंढी पालन योजनेतील अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा मूळ रहिवासी नसल्यास अर्ज रद्द केला जातो.
  • अर्जदारांनी यापूर्वी केंद्र व राज्य शासनाच्या कोणत्या हि योजनेअंतर्गत शेळीपालनाचा लाभ घेतलेला असल्यास अर्ज रद्द होतो.
  • या योजनेसाठी एकाच व्यक्तीने दोन वेळा अर्ज केलेला असल्यास अर्ज रद्द केला जातो.
  • अर्जदाराचे वय 45 पेक्षा जास्त असल्यास त्याचा अर्ज रद्द होतो.

Sheli Mendhi Palan Yojana Maharashtra | अर्ज करण्याची ऑनलाईन पद्धत |

  • प्रथम आपणाला शासनाच्या अधिकृत website वर जावे लागेल.
  • तिथे home page open  झाल्यानंतर त्यावर शेळी मेंढी पालन योजनेचा अर्ज दिसेल.
  • त्या योजनेच्या अर्जाच्या पर्यायावर click करावे.
  • आता तुमच्यासमोर अर्ज open होईल, त्यामध्ये विचारलेली सर्व माहिती योग्य व अचूक भरावे.
  • त्या अर्जासोबत आवश्यक कागदपत्रांच्या सत्यप्रत apload कराव्यात.
  • सर्व माहिती भरून झाल्यानंतर submit बटनावर click करावे.
  • अशाप्रकारे तुमचे शेळी मेंढी पालन योजना अंतर्गत ऑनलाईन प्रोसेस पूर्ण होईल.

Sheli Mendhi Palan Yojana Maharashtra | अर्ज करण्यची ऑफलाईन पद्धत |

  1. प्रथम आपणाला आपल्या जवळच्या जिल्हा कार्यातलयातील पशुसंवर्धन विभागात जावे लागेल.
  2. या पशुसंवर्धन विभागातून शेळी मेंढी पालन योजनेचा अर्ज घ्यावा.
  3. अर्जात विचारलेली सर्व माहिती नीट वाचून योग्य व अचूक लिहावी.
  4. त्या अर्जासोबत आवश्यक कागदपत्रांच्या झेरॉक्स जोडाव्यात.
  5. नंतर तो अर्ज सदर कार्यालयात जमा करावा.
  6. अर्ज जमा केल्याची पोच पावती पशुसंवर्धन विभागातून घ्यावी.
  7. अशाप्रकारे तुमची ऑफलाईन अर्ज करण्याची प्रोसेस पूर्ण होईल.

Sheli Mendhi Palan Yojana Maharashtra |

शेळी मेंढी पालन योजनेची शासनाची अधिकृत website CLICK HERE

पंचायत समिती शेळी पालन योजना अर्ज CLICK HERE

2 thoughts on “Good News | शेळी मेंढी पालन योजना 2024 | Sheli Mendhi Palan Yojana Maharashtra | मराठीमध्ये संपूर्ण माहिती |”

Leave a Comment