लाडक्या बहिणींच्या खात्यात फेब्रुवारी चा 8 वा हप्ता जमा होण्यास झाली सुरुवात | Ladki Bahin Yojana | तुमच्या खात्यात पैसे आले का ? असे तपासा स्टेटस |

                                    लाडकी बहिण योजना |

Ladki Bahin Yojana
Ladki Bahin Yojana next installment
Ladki Bahin Yojana February installment
Ladki Bahin Yojana news

Ladki Bahin Yojana
Ladki Bahin Yojana next installment
Ladki Bahin Yojana February installment
Ladki Bahin Yojana news

नमस्कार, Ladki Bahin Yojana महाराष्ट्र शासनाने सुरू केलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचा फेब्रुवारी चा हप्ता कधी मिळणार ? याकडे सर्व राज्यातील महिला वर्गाचे लक्ष लागून राहिलेले होते. पण आता या महिलांची प्रतीक्षा संपलेली आहे. कारण आजपासून लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे. यासाठी राज्याच्या वित्त विभागाकडून 3490 कोटी रुपये वर्ग करण्यात आल्याची माहिती मिळालेली आहे.

त्यामुळे तुमच्या खात्यात पैसे आले का ? लगेच चेक करा. ते चेक करण्यासाठी, ते स्टेटस कसे चेक करायचे ? याबद्दलची सविस्तर माहिती आपण या लेखात पाहूया. त्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचा.

लाडक्या बहिणींना 8 वा हप्ता जमा |

राज्य शासनाच्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहिण योजनेच्या अंतर्गत पात्र महिलांना दरमहा दीड हजार रुपये देण्यात येतात. आत्तापर्यंत एकूण सात हप्त्याचे एकूण साडेदहा हजार रुपये ( जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी ) लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात जमा झालेले आहेत. आता आठवा हप्ता म्हणजे फेब्रुवारी महिन्याचा हप्ता पात्र बहिणींच्या बँक खात्यात जमा होत आहे.

श्रवण बाळ व संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत तुम्हाला फेब्रुवारी महिन्याचा हप्ता मिळणार नाही ?

बँक खात्यात पैसे जमा झाले की नाही ? असे तपासा स्टेटस |

  • लाडकी बहिणी योजनेचे पैसे तुमच्या बँक खात्यात जमा झाल्यास तुम्हाला तुमच्या बँकेकडून एसएमएस येईल.
  • बँकेकडून एसेमेस ना आल्यास तुम्ही बँकेच्या बॅलन्स चेक क्रमांक वर एसएमएस पाठवून किंवा टोल फ्री क्रमांक मिस कॉल करून तुमच्या बँक खात्यातील रकमेच्या संदर्भात जाणून घेऊ शकता.
  • तुमच्याकडे स्मार्टफोन असेल आणि नेट बँकिंग गुगल पे फोन पे वापरत असाल तर बॅलन्स तपासू शकता.
  • डेबिट कार्ड असल्यास एटीएम मध्ये जाऊन लास्ट ट्रांजेक्शन एसटी पाहू शकता. Ladki Bahin Yojana
  • तसेच बँकेत जाऊन तुम्ही आपल्या बँक खात्यात पैसे जमा झालेत की नाही ? ते तपासू शकता.
बँक ऑफ बडोदा मध्ये महाभरती | पदवीधर उमेदवारांना नोकरीची संधी | पहा संपूर्ण माहिती |

या महिलांना मिळणार नाही लाभ |

लाडकी बहिण योजनेअंतर्गत ज्या महिलांचे उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त आहे. त्या महिलांना या योजनेअंतर्गत लाभ दिला जाणार नाही. त्याचबरोबर तसेच उत्पन्नाच्या माहिती घेण्याकरता आयकर विभागाकडून मदत घेतली जाणार आहे.

यापैकीच्या ज्या बहिणींनी निकष बाहेर जाऊन लाभ घेतलाय हे त्या ज्यांना लक्षात आले, त्यांनी स्वतःहून योजनेचा लाभ घेणे बंद केले तसेच अनेक महिलांनी स्वतःहून पैसे परत केलेले आहेत.

लाभाची रक्कम परत घेतली जाणार नाही |

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अपात्र ठरलेल्या लाभार्थ्यांना इथून पुठे हप्ता  वितरित केला जाणार नाही, तसेच लाभार्थ्यांच्या बँक खात्यातून आत्तापर्यंत देण्यात आलेल्या लाभाची रक्कम ही परत घेतली जाणार नाही, असे सरकारने यापूर्वी स्पष्ट केलेले आहे.

राज्यात महिला व बालविकास विभागात मेगा भरती | 18882 पदे भरणार | वाचा नक्की, कोणत्या पदासाठी होणार भरती |

अपात्र महिलांच्या संख्येत वाढ |

अपात्र ठरवण्यात आलेल्या लाभार्थ्यांमध्ये संजय गांधी निराधार योजनेचे लाभार्थी असलेल्या महिला, वय वर्ष 65 पेक्षा जास्त असलेल्या महिला, तसेच कुटुंबातील सदस्यांच्या नावे चार चाकी वाहन असलेल्या, त्याचबरोबर नमो शक्ती योजनेच्या लाभार्थी असलेल्या महिला अशा एकूण महिला 5 लाख महिला  आतापर्यंत अपात्र ठरलेला आहेत, त्याचबरोबर आता या संख्येत आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. Ladki Bahin Yojana

Leave a Comment