कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ |
3 % DA Hike for maha government
Maharashtra Government employees
Government employees news
Central Government news
Maharashtra Government employees DA Hike
नमस्कार, 3 % DA Hike for maha government तुम्ही जर सरकारी कर्मचारी असाल किंवा तुमच्या मित्र परिवारात सरकारी नोकरी करणारी व्यक्ती असेल, तर लवकरच तुम्हाला आनंदाची बातमी मिळेल. सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता 3 टक्के वाढ होणार आहे, परंतु त्यापूर्वीच महाराष्ट्र शासनाने राज्य कर्मचाऱ्यांना आनंदाची वार्ता दिली आहे . सरकारने महागाई भत्त्यात 3 % वाढ केली आहे. त्यामुळे महागाई भत्ता 53% इतका झाला आहे. राज्य शासकीय कर्मचारी व इतर पात्र पूर्ण कालीन कर्मचाऱ्यांना महागाई भत्त्यात वाढ झाली आहे.
25 फेब्रुवारीच्या शासन निर्णयानुसार एक जुलै 2024 पासून सातव्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतन संरचनेतील मूळ वेतनावरील अणुकीय महागाई भत्त्याचा दर 50% वरून 53% करण्यात आला आहे. सदर महागाई भत्त्यात वाढ 1 जुलै 2024 ते 31 जानेवारी 2025 या कालावधीतील थकबाकी सह फेब्रुवारी 2025 च्या मूळ वेतनासोबत रोखीने देण्यात यावा, असे आदेश काढण्यात आलेले आहेत. 3 % DA Hike for maha government
नमो शेतकरी सन्मान निधी मध्ये होणार वाढ | शेतकऱ्यांना मिळणार आता दरवर्षी 15 हजार रुपये | मुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा |
शासन आदेशात काय म्हटले आहे ?
1 जुलै 2024 पासून सातव्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतन संरचनेतील मूळ वेतनावरील महागाई भत्त्याचा दर 50% वरून 53% करण्यात यावा, असा निर्णय शासनाने केला होता, त्यानुसार एक जुलै 2024 पासून 31 जानेवारी 2025 या कालावधीत थकबाकीचा फेब्रुवारी 2025 च्या वेदनासोबत रोखीने देण्यात येणार आहे. 3 % DA Hike for maha government
कर्मचाऱ्यांमध्ये होती नाराजी |
केंद्र शासनाच्या धर्तीवर राज्य कर्मचाऱ्यांना आर्थिक लाभ देण्याचे राज्य शासनाचे धोरण आहे. दरवर्षी 1 जानेवारी व 1 जुलैपासून केंद्र शासन केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ करीत असते, एक जुलैपासून केंद्र शासनाने केंद्रीय कर्मचाऱ्यांना 2% महागाई भत्ता लागू केला, त्यानंतर राज्य सरकारने देखील दिवाळीमध्ये राज्य कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता लागू करणे अपेक्षित होते, व तशी कर्मचाऱ्यांना मोठी अपेक्षा होती. दरम्यानच्या काळात विधानसभा निवडणुका घोषित झाल्यावर आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली.
दूध उत्पादकांसाठी आनंदाची बातमी | दुध दारात झाली पुन्हा एकदा वाढ | पहा काय आहेत, सध्याचे नवीन दुध दर |
त्यानंतर विधानसभा निवडणुका झाल्या व नवीन सरकार सत्तेवर आले, तरी नवीन वर्षात प्रलंबित असलेले महागाई भत्ता राज्य सरकारने घोषित करेल, अशी अपेक्षा होती. मात्र हा निर्णय न झाल्याने राज्यातील 17 लाख राज्य व जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीची भावना पसरली होती. ज्या कर्मचाऱ्यांनी लाडकी बहिणी योजना यशस्वी राबवली. तेच कर्मचारी आर्थिक अधिकारापासून वंचित आहेत. असा आरोपी होत होता, अखेर शासनाने महागाई भत्त्यात वाढ केल्याने कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
कास्ट्राईबच्या मागणीला यश |
राज्य कर्मचाऱ्यांनी विधानसभा निवडणुकीची प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने यशस्वी पार पडली, तेच लाडकी बहीण योजना देखील यशस्वी राबवल्यामुळे 1 जुलै २०२४ पासून तीन टक्के महागाई भत्ता लागू करण्याची मागणी जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेचे डॉक्टर सोहन चौरे व सचिव नरेंद्र धनविजय यांनी शासनाला केली होती, अखेर कास्ट्राईबच्या मागणीला यश आले आहे. 3 % DA Hike for maha government