लाडकी बहिण योजना |
Ladki Bahin Yojana
Ladki Bahin Yojana 7th installment
Ladki Bahin Yojana news
Ladki Bahin Yojana scrutiny
Mukhymantri Mazi ladki bahin Yojana
नमस्कार, राज्यात माहयुती सरकारने सुरू केलेली लाडकी बहिण योजना कायम चर्चेतच राहिलेली आहे. या योजनेमुळे राज्यातील महायुती सरकारला पुन्हा सत्ता स्थापनेची संधी मिळाली आहे, असे बोलले जाते. महिलांचा पाठिंबा महायुती सरकारच्या बाजूला असल्याने महायुती सरकार निवडून आलेले आहे.
या योजनेअंतर्गत डिसेंबर महिन्यापर्यंत या योजनेचा लाभ 2 कोटीहून अधिक महिलांनी घेतलेला आहे. त्याचबरोबर या योजनेचे सर्व हप्ते वेळेवर आलेले आहेत. मात्र आत्ता जानेवारीचा बरासच कालावधी संपल्यानंतरही जानेवारीचा हप्ता जमा झालेला नाही. त्यामुळे जानेवारीचा हप्ता कधी जमा होणार ? असा प्रश्न महिला वर्गातून विचारला जात आहे.
त्याचबरोबर शासनाकडून अर्जाची पुनर पडताळणी होणार असल्याच्या चर्चेमुळे महिलांमध्ये या महिन्याचा हप्ता जमा होणार की नाही ? याबद्दल संभ्रम निर्माण झालेला आहे. Ladki Bahin Yojana 7 th installment
त्यामुळे लाडकी बहिणी योजनेअंतर्गत कोणत्या महिलांना लाभ मिळणार ? कोणाला लाभ मिळणार नाही ? कोण पात्र ठरणार ? त्याचबरोबर जानेवारीचा हप्ता कोणत्या तारखेला खात्यात जमा होणार ? याबद्दलचे सविस्तर माहिती आपण आज या लेखात पाहणार आहोत, त्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचा.
प्रत्येक अपंग नागरिकाकडे कार्ड असलेच पाहिजे ? त्यासाठी अर्ज कसा करायचा ? जाणून घ्या संपूर्ण माहिती |
आतापर्यंत किती हप्ते जमा झाले ?
राज्यातील महिलांना आर्थिक पाठबळ देण्याच्या उद्देशाने सुरू केलेली लाडकी बहिण ही योजना सरकारने जुलै 2024 मध्ये या योजनेची घोषणा केली. जुलैपासून डिसेंबर 2024 पर्यंत प्रत्येकी 1500 याप्रमाणे 9000 रुपये महिलांच्या खात्यात जमा झाले आहेत. राज्यातील सुमारे सव्वा 2 कोटी महिला या योजनेचा लाभ घेत असल्याचे शासकीय आकडेवारीतून समोर आलेले आहे. आता या महिन्यात म्हणजे जानेवारीचा येणारा हफ्ता हा सातवा हप्ता असेल, मात्र हा हप्ता अजूनही जमा झालेला नाही. Ladki Bahin Yojana 7 th installment
या तारखेला येणार जानेवारी चा हप्ता |
महिला वर्ग अतिशय तीव्रतेने वाट पाहत असणाऱ्या जानेवारी हत्याबाबतची तारीख अद्याप फिक्स झालेले नाही. जानेवारी महिन्याचा सातवा हप्ता कदाचित 26 जानेवारी नंतर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. काही दिवसापूर्वी मंत्री अदिती तटकरे यांनी ज्या महिला लाभार्थ्याबाबत तक्रारी आले आहेत, त्यांची अर्ज तपासणी करण्याचे काम सुरू असल्याचे सांगितले होते. त्यामुळेच जानेवारीत काही महिला लाभार्थी कमी होतील, असे सांगितले जात आहे. त्यामुळेच महिलांच्या बँक खात्यात 26 जानेवारी नंतर पैसे जमा होण्यास सुरुवात होईल असे बोलले जात आहे.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर रोपवाटिका योजना | कोणाला मिळणार लाभ ? सविस्तर माहिती |
पात्रता तपासणी व तक्रार निराकरण |
राज्यातील काही महिलांनी योजनेचा लाभ स्वतःहून सोडल्याचे बाब समोर आली आहे. तसेच दुबार नोंदणी, उत्पन्नाची मर्यादा ओलांडणे किंवा अन्य योजनेचा लाभ घेणाऱ्या काही महिलांची नावे यादीतून कमी करण्यात आलेली आहेत. तरीही जानेवारी महिन्यातील लाभार्थ्यांची संख्या ही जवळपास 2.47 कोटी इतकी राहील, असे अदिती तटकरे यांनी सांगितले.
त्याचबरोबर फेब्रुवारी महिन्याच्या हप्ता साठी सुद्धा आतापासूनच नियोजन सुरू केले असल्याचे मंत्री तटकरे यांनी सांगितले. प्रत्येक महिन्याचा हप्ता वेळेवर पोहोचण्यासाठी महिला व बालविकास विभाग विशेष लक्ष देत आहे. त्याचबरोबर अर्थसंकल्पानंतर महिलांना वाढीव रक्कम 2100 रुपये मिळू शकते असे अदिती तटकरे म्हणाल्या. Ladki Bahin Yojana 7 th installment