आरटीई प्रवेश प्रक्रिया |
Maharashtra RTE Admission
RTE Admission Open
RTE Admission 2025 – 26
RTE Admission Maharashtra government
RTE Admission student
नमस्कार, RTE Admission Open शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत ( राईट टू एज्युकेशन ) 2025 – 26 शैक्षणिक वर्षासाठी आर टी ई प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे. या साठी अर्ज प्रक्रियेला सुरुवात 14 जानेवारीपासून झाली आहे. पालक आपला पाल्याचे प्रवेश निश्चित करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर अर्ज करत आहेत. त्यानुसार पालकांना मुलांचे अर्ज 27 जानेवारी पर्यंत भरता येणार आहेत.
आर्थिक दुर्बल आणि वंचित घटकातील विद्यार्थ्यांसाठी शिक्षण हक्क कायद्यानुसार इयत्ता पहिली ते आठवीसाठी इंग्रजी शाळांमध्ये मोफत शिक्षणाची विद्यार्थ्यांना सुविधा उपलब्ध केली जाते. यंदाच्या प्रवेश प्रक्रियेसाठी 18 डिसेंबरला शाळा नोंदणीची प्रक्रिया सुरू झाली आहे. ती 31 डिसेंबर पर्यंत होती, त्यानंतर ती वाढवून 4 जानेवारी पर्यंत मुदत वाढ दिली. त्यानुसार 8, 849 शाळांची नोंद झालेली आहे.
त्यामुळे ज्या पालकांनी अद्यापही आपल्या मुलाचा अर्ज भरलेला नाही, ज्यांनी अर्ज करायचा आहे, त्यांनी अंतिम मुदतीच्या अगोदर म्हणजे 27 जानेवारी पर्यंत आपल्या पाल्याचा अर्ज करून घ्यावा, हा अर्ज तुम्ही ऑनलाईन भरू शकता.
अर्ज कसा करायचा ? कागदपत्रे कोण – कोणती लागणार आहेत ? वयाची अट काय ? याबद्दल सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत. त्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचा. RTE Admission Open
अर्जांची संख्या आणि शाळांची नोंदणी |
आतापर्यंत राज्यातील राज्यातील आर टी ई अंतर्गत नोंदणी करण्यात आलेल्या शाळांची संख्या ही 8863 इतकी पूर्ण झालेली आहे. तर प्रवेशासाठी एकून राज्यात एक लाख 9 हजार 111 जागा उपलब्ध आहेत. आरटीई प्रक्रियेत आत्तापर्यंत 1 लाख 36 हजार 983 विद्यार्थ्यांनी आर टी ई प्रवेशासाठी अर्ज केला आहे. यामधून असे लक्षात येते की, पालकांची सक्रियता आणि आरटीई प्रवेशासाठी ची मागणी खूप मोठी आहे.
26 जानेवारी नंतर लाडक्या बहिणीच्या खात्यात होणार 1500 हजार रुपये जमा | तारीख फिक्स |
पालकांसाठी महत्त्वपूर्ण सूचना |
- एकापेक्षा अधिक अर्ज भरलेचे निदर्शनास आल्यास, एकही अर्ज लॉटरीसाठी विचारात घेतला जाणार नाही.
- पालकांनी विचारपूर्वक 10 शाळांची निवड करावी.
- प्रतीक्षा यादी मध्ये नाव आहे. याचा अर्थ प्रवेश निश्चित असा होत नाही.
- पालकांनी केवळ मेसेजवर अवलंबून न राहता, आरटी पोर्टल वरील सूचनांचे पालन करावे.
- चुकीची माहिती भरून दिशाभूल केल्याप्रकरणी आरटी प्रवेश कोणत्याही टप्प्यावर रद्द होणार.
- अर्ज भरताना पालकांनी निवासस्थानचे ठिकाण अचूक नमूद करावे.RTE Admission Open
प्रत्येक अपंग नागरिकाकडे कार्ड असलेच पाहिजे ? त्यासाठी अर्ज कसा करायचा ? जाणून घ्या संपूर्ण माहिती |
आवश्यक कागदपत्रे |
- जन्मदाखला ग्रामपंचायत – नगरपालिका, महापालिका, बालवाडीतील रजिस्टर दाखला
- निवासी पुरावा – रेशन कार्ड, वाहन परवाना, वीज, टेलिफोन बिल, प्रॉपर्टी टॅक्सची पावती, घरपट्टी, गॅस बुक, बँक पासबुक
- उत्पन्न दाखला – एससी एसटी संवर्गातील पालकांना उत्पन्न मर्यादेची आट नाही
- जात प्रमाणपत्र
- विधवा महिलेस पतीचे मृत्यू प्रमाणपत्र
- अनाथ व दिव्यांग बालक – अनाथालयाची कागदपत्रे
- दिव्यांग असल्याचे प्रमाणपत्र RTE Admission Open