भूमिहीन शेतमजुरांना मिळणार जमीन |
Agriculture land scheme
Land scheme for government
Former workers land scheme Maharashtra
Maharashtra government scheme
CM scheme
नमस्कार, Agriculture land scheme राज्यातील भूमीहीन शेतकऱ्यांना सन्मानाने जगता यावे, शेतमजुरीतून त्यांच्या सुटका व्हावी, यासाठी राज्य शासनाकडून कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान योजना राबवली जाते. या योजनेच्या माध्यमातून भूमिहीन व शेतमजूर अनुसूचित जाती – जमातीतील शेतकऱ्यांना 100 टक्के अनुदान तत्वावर जमीन उपलब्ध करून दिली जाते. आर्थिक दृष्ट्या भूमी शेतकऱ्याजवळ स्वतःची जमीन उपलब्ध नसते, त्यामुळे अशी कुटुंब दुसऱ्याच्या शेतात मजुरी करतात.
त्याचबरोबर आर्थिक स्थिती नसल्यामुळे, त्यांना स्वतःची जमीन विकत घेणे शक्य नसते. त्यामुळे अशी कुटुंबे पिढ्यान पिढ्या दुसऱ्याच्या शेतात मजुरी करून राबतात. या शेतकऱ्यांना सन्मान मिळावा, त्यांना स्वाभिमानाने जगता यावे. यासाठी कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण योजना राज्यात राबवली जाते.
राज्यातील अनुसूचित जाती – जमाती, नवबौद्ध, दारिद्र्य रेषेखाली व्यक्तींना,परितक्त्या किंवा विधवा महिला तसेच भूमी व्यक्ती यांची उन्नती आणि सामाजिक स्थिती सुधारण्यासाठी या योजनेची सुरुवात केली. कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान योजना असे या योजनेचे नाव आहे.
सरकारी घरकुल योजनेतील लाभार्थ्यांना मोफत वीज मिळणार | फडणवीस यांनी सांगितली माहिती | वाचा सविस्तर |
सहाय्यक आयुक्त समाज कल्याण सोलापूर यांच्याकडून आवहान |
कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान योजना अंतर्गत दारिद्र रेषेखालील, भूमी शेतमजूर, अनुसूचित जाती म्हणून उपलब्ध घटकांना 2 एकर बागायत किंवा 4 एकर जमीन 100% अनुदान स्वरूपात खरेदी करून देण्यात येत असल्याची माहिती समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त सोनवणे यांनी दिली आहे.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी, अनुसूचित जातीचा, दारिद्र रेषेखालील व कुटुंब प्रमुखाचे वय 60 वर्षापेक्षा जास्त आहे, अशा कुटुंबातील व 60 वर्षापेक्षा कमी वय असणाऱ्या कुटुंबप्रमुखाच्या पतीला या योजनेचा लाभ घेता येईल. Agriculture land scheme
बचत गटांना मिळणार मिनी ट्रॅक्टर आणि ट्रॅक्टर अवजारांचा लाभ | ” ही ” आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख | लगेच करा अर्ज |
जमिन विक्रीसाठी नियम |
- अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांना लाभ देण्यासाठी जिल्हा समाज कल्याण कार्यालयास जमीन खरेदी करावयाची आहे.
- जमीन विक्रीच्या अर्जावर शेत जमीन विक्री करणाऱ्या जमीन मालकाशिवाय संबंधीच्या, त्याच्या कुटुंबातील दोन व्यक्तींची जमीन विक्री बाबतचे ना हरकत प्रमाणपत्र आवश्यक आहे.
- जे जमीन मालक जिरायती जमीन कमाल 5 लाख रुपये प्रति एकर व बागायत जमीन कमाल 8 लाख रुपये प्रति एकर प्रमाणे विक्री करण्यास तयार आहेत, अशी जमीन मालकांनी जमिनीच्या सातबारा व आवश्यक कागदपत्रांसह सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालय, सोलापूर यांच्याशी संपर्क साधावा. असे आवाहन करण्यात आले आहे.
मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना | नवीन वर्षात 3 गॅस सिलेंडर मोफत मिळणार | लगेच करा हे काम |
यांना मिळणार लाभ |
- दारिद्र्य रेषेखालील भूमिहीन, अनुसूचित जाती, नवबौद्ध प्रवर्गातील, परितक्त्या स्त्रिया, दारिद्र्यरेषेखालील भूमीहीन, विधवा स्त्रिया, अनुसूचित जाती – जमाती कायद्याअंतर्गत जातीचे अत्याचार ग्रस्त या घटकांना लाभार्थी निवडीमध्ये प्राधान्य देण्यात येईल.
- महसूल विभागाने गायरान व सिलिंगच्या जमिनीची वाटप केलेल्या कुटुंबांना लाभ अनुज्ञ नाही.
- या योजनेअंतर्गत जमिनीची वाटप झाल्यानंतर जमिनीची मशागत करणे, स्वतःची जमीन कसणे आवश्यक आहे.
- सदर जमिनीचे अन्य व्यक्तीस, संस्थेस हस्तांतरित व विक्री करता येणार नाही, तसेच भाडे तत्वावर देता येणार नाही. Agriculture land scheme