सौरचलित नॅपसॅक फवारणी पंप |
Solar spray pump subsidy
Solar spray pump subsidy scheme
Spray pump anudan Yojana
MAHA Dbt subsidy scheme
Krushi scheme Maharashtra
नमस्कार, Solar spray pump subsidy राज्यातील शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाच्या वतीने विविध योजनांसाठी अनुदान सुरू करण्यात आलेले आहे. शेतकरी बांधवांसाठी महाडीबीटी पोर्टलवर शासनाकडून अशाच एका नवीन योजनेसाठी अनुदान उपलब्ध करून देण्यास सुरवात झाली आहे. ते म्हणजे सौर चलित वेबसाईट फवारणी पंप हा 50 टक्के अनुदानावर उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
महाडीबीटी पोर्टल कडून सौरचलित नॅपसॅक फवारणी पंपासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. या फवारणी पंपासाठी 50 टक्के अनुदान दिले जात आहे. जी काही फवारणी पंपाची किंमत आहे, त्याच्या 50% किंमत दिली जात आहे.
तरी या सौरचलित नॅपसॅक फवारणी पंपासाठी पात्रता काय ? अर्ज कोण करू शकतो ? कोणाला लाभ मिळणार, आवश्यक कागदपत्रे कोणती लागणार ? फायदे काय ? याची सविस्तर माहिती आपण या लेखात पाहणार आहोत. त्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचा.
भारतीय रेल्वेत 32,438 हजार पदांसाठी मोठी भरती | पात्रता काय ? अर्ज कुठे करायचा ? सविस्तर माहिती |
सौरचलित फवारणी पंप योजनेचा उद्देश |
- सौर चलित फवारणी पंप शेतकऱ्यांना उपलब्ध करून देणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.
- पारंपारिक पंपामुळे होणारा खर्च आणि कष्ट कमी करून शाश्वत शेतीला चालना देणे, हा प्रमुख हेतू आहे.
- त्याच बरोबर ज्या शेतकर्यांना स्वंय खर्चाने पंप खरेदी कारण शक्य होत नाही, अशा शेतकर्यांना आर्थिक सहाय्य करणे.
सौर चलित फवारणी पंपाचे फायदे |
- या पंप ने फवारणी केल्याने शेतकऱ्याचा वेळ आणि श्रम दोन्ही वाचतात.
- शेतीसाठी होणारा खर्च कमी प्रमाणात होतो.
- सौरऊर्जेचा वापर केल्यामुळे पर्यावरणा चा त्रास होण्यापासून वाचवता येते.
- पारंपारिक पंपापेक्षा अधिक कार्यक्षम
सरकारी घरकुल योजनेतील लाभार्थ्यांना मोफत वीज मिळणार | फडणवीस यांनी सांगितली माहिती | वाचा सविस्तर |
आवश्यक पात्रता |
- अर्जादर शेतकरी हा महाराष्ट्र राज्यातील मूळ रहिवासी असावा. Solar spray pump subsidy
- शेतकऱ्याकडे स्वतःच्या नावावर जमीन असणे आवश्यक आहे.
- या योजनेच्या माध्यमातून अनुसूचित जाती – जमाती, महिला शेतकरी, लघु आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना प्रथम प्राधान्य दिले जाईल.
Solar Spray Pump Subsidy | आवश्यक कागदपत्रे |
- शेतकऱ्याचे आधार कार्ड
- सातबारा उतारा
- 8अ उतारा
- जात प्रमाणपत्र
- रहिवासी दाखला
- उत्पन्नाचा दाखला
- पासपोर्ट साईज फोटो
- बँक पासबुक
- मोबाईल नंबर
- ईमेल आयडी
योजनेसाठी अर्ज कसा करावा ?
सौरचलित नॅपसॅक फवारणी पंप योजनेचा लाभ घेण्यासाठी राज्यातील शेतकऱ्यांना प्रथम महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाईन अर्ज सादर करावा लागतो त्यासाठी :
- प्रथम महाडीबीटी पोर्टल वर नवीन शेतकरी म्हणून नोंदणी करा.
- यासाठी आधार कार्ड, बँक खाते तपशील आणि शेत जमिनीचे दस्तऐवज आवश्यक आहे.
- नोंदणी पूर्ण केल्यानंतर युजर आयडी आणि पासवर्ड तयार होईल.
- या तपशिलाचा वापर करून पोर्टलवर login करा.
- लॉगिन केल्यानंतर ‘ सौरचलित नॅपसॅक फवारणी पंप योजना ‘ हा पर्याय निवडा.
- आवश्यक कागदपत्रे अपलोड करा आणि अर्ज सादर करा.
- अर्ज सादर केल्यानंतर त्याचा स्टेटस नेहमी तपासत रहा.
- अर्ज मंजूर झाल्यानंतर तुम्हाला पुढील प्रक्रिया कळवली जाईल. Solar spray pump subsidy
1 thought on “सौरचलित नॅपसॅक फवारणी पंपासाठी मिळणार 100 % अनुदान | Solar Spray Pump Subsidy | लगेच करा अर्ज, मिळेल लाभ |”